डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#Da लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#Da लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जुलैत ४% महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

 सरकार जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता  वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 



या दरम्यान, महागाई भत्त्यामध्ये  4 टक्के वाढ होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर जुलै महिन्यापासून केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 दरम्यान, सलग दोन महिने एआयसीपीआय इंडेक्स  कमी झाला तरीही मार्चमध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. जानेवारीत इंडेक्स कमी होऊन 125.1 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत 125 अंकावर आला होता. पण मार्च महिन्यात एका झटक्यात इंडेक्स एक अंकाने वाढून 126 वर पोहचला. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची चर्चा आहे. 


राष्ट्रीय पुरस्कार निवड प्रक्रिया १ जूनपासून सुरु 



सरकारने यावर्षी सुरुवातीला 3 टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास डीए 38 टक्क्यांवर पोहचेल. जर सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ याचा लाभ होत पगारात वाढ होईल. कोरोना महामारीमुळे काही काळ डीए वाढवण्यावर स्थगिती होती. दीड वर्षानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात डीए 17 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता.

पेन्शन धारकांना केंद्र सरकारने डी.ए. बाबतीत हा निर्णय घेतला

 केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट  सांगितले आहे की जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान थांबलेल्या डीएच्या थकबाकीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.



काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक निवेदन जारी केले होते की, कोरोना महामारीमुळे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करण्यात आला आहे, जेणेकरून सरकार त्या पैशातून गरीब आणि गरजूंना मदत करू शकेल.     

महामारीच्या काळात सरकारी मंत्री, खासदारांच्या पगारातही कपात करण्यात आली होती. यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही किंवा डीएमध्येही कपात करण्यात आली नाही. वर्षभराचा डीए आणि त्याचा पगार झाला आहे.

सरकारच्या या घोषणेमुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा झटका बसू शकतो. मात्र, ही थकबाकी द्यावी, अशी मागणी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक संघटनेकडून सातत्याने होत आहे.

पगार आणि भत्ता हा कर्मचार्‍यांचा अधिकार आहे, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनाही १८ महिन्यांच्या थकबाकीचा लाभ मिळायला हवा.

केंद्र सरकारने १ जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २८ टक्क्यांनी वाढ केली आहे. यापूर्वी त्यांना १७ टक्के दराने मोबदला मिळत होता. त्याच वेळी, ऑक्टोबर २०२१ मध्ये, ते 3 टक्के आणि 31 टक्के करण्यात आले. त्याचवेळी मार्च २०२२ मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

 सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी डीए दिला जातो.

हे सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिले जाते.