डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
#cbseboard लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#cbseboard लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे

 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकूणच प्री स्कूल ते बारावीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

सेमिस्टर पॅटर्न, १५० विषयांची पाठ्य पुस्तके, जादुचा पेटारा आदींचा समावेश या बदलात असणार आहे.

खासकरुन नववी ते बारावी या तीन वर्षाच्या शैक्षणिक कार्यक्रमात मोठा बदल होणार आहे.

पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही पूर्णपणे बदलणार आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा एकूणच आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५० विषयांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना यातूनच आपले पर्याय निवडायचे आहेत. विशेष म्हणजे अकरावी व बारावीसाठी विज्ञान, वाणिज्य व कला अशा तीनच शाखा होत्या. आता संगीत, क्रीडा, हस्तकला व व्यावसायिक शिक्षणांनाही गणीत, विज्ञान, मानव्य शाखा, भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांप्रमाणे दर्जा मिळणार आहे.नववी ते बारावीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) तयार करण्यात आला आहे. प्री-स्कूलमध्ये मुलांना पिशव्याशिवाय शिकवले जाईल. तीन ते आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना शाळेत दप्तर आणण्याची गरज नसेल. या मुलांचा जादुचा पेटारा मिळणार असून यामध्ये ५३ प्रकारचे खेळ, पोस्टर खेळणी, बोर्ड, बिल्डींग ब्लॉक, प्लेईंग कार्ड आदींचा समावेश असणार आहे. याचाच आधार घेऊन मुलांना शिकविले जाणार आहे.

थोडक्यात स्वरूप असे असणार...

सेमिस्टर पद्धतीचा अवलंब
इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे. तिन्ही वर्गांमध्ये प्रत्येकी १६ विषयांची परीक्षा द्यावी लागेल. नववीचा निकाल दहावीच्या निकालात जोडला जाईल व अकरावीचा निकाल बारावीच्या निकालाशी जोडला जाणार आहे.

स्थानिक भाषेचा वापर
इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक भाषेत असणार आहे. इयत्ता तिसरीमध्ये ८ ते ११ वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार असून प्रथमच त्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. पाचवीच्या वर्गात दुसऱ्यांदा मूल्यमापन होईल.

चार टप्प्यांमध्ये विभागणी
इयत्ता पहिली ते दुसरी फाऊंडेशन स्टेज, तिसरी ते पाचवी तयारी टप्पा, सहावी ते आठवी मध्यम आणि नववी ते बारावी माध्यमिक टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे. स्थानिक भाषेच्या वापराने विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडून घेणे सोपे होणार आहे.


CBSE ने 'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

 CBSE च्या विद्यार्थ्यांना तसंच शाळांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलेले आहे.
 CBSE इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी टर्म 2 चे निकाल जाहीर करण्याआधी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने  'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी हे निकष आपण पुर्ण करत आहात का?

हे पोर्टल सर्वांसाठी OSD (one stop destination)  म्हणून काम करेल अशी माहिती बोर्डाकडून स्पष्ट  करण्यात आलेली आहे. यात टर्म 2 च्या निकालासह परीक्षेशी संबंधित सर्व क्रियाकलापांचा समावेश आहे. CBSE च्या परीक्षा संगम पोर्टल parikshasangam.cbse.gov.in वर प्रवेश करता येईल. त्याचे 3 भाग आहेत - 

शाळा (गंगा), 
प्रादेशिक कार्यालय (यमुना) 
आणि 
मुख्य कार्यालय (सरस्वती).

शालेय विभागात, अभ्यासक्रम, परिपत्रक, नमुना प्रश्नपत्रिका इत्यादी परीक्षा साहित्याचा पर्याय आहे. OASIS, परीक्षा नोंदणी इ. सारख्या पूर्व परीक्षा उपक्रम. यासह, अंतर्गत क्रमांक आणि पुनर्मूल्यांकन इत्यादीसारख्या परीक्षेनंतरच्या क्रियाकलापांसाठी अर्ज करण्याचे पर्याय आहेत. परिक्षा संगम पोर्टलद्वारे डायरेक्ट डिजीलॉकरमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

ही आहे सीबीएसई परीक्षा संगम पोर्टलची थेट लिंक इथेच जाहीर होणार CBSE टर्म 2 निकाल 2022 CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चा निकाल जाहीर होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलैमध्ये निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in
व cbse.gov.in निकाल पाहू शकणार आहेत.

असे पास होणार विद्यार्थी...

विद्यार्थ्यांना प्रत्येक अटी स्वतंत्रपणे उत्तीर्ण करण्याची गरज नाही आणि अंतिम निकालात 33 टक्के गुण मिळवणे हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असेल. 
     टर्म 1 चा निकाल जाहीर करताना, CBSE ने किती विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले किंवा होऊ शकले नाहीत याचा डेटा जारी केला नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण विचारात न घेता टर्म 2 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बोर्डाने तेव्हा जाहीर केले होते की अंतिम गुणांच्या आधारे उत्तीर्णतेची टक्केवारी मोजली जाणार आहे.

CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत

 CBSE बोर्डाच्या परीक्षा  रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा  दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.यावेळी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा होणार की पुन्हा एकच परीक्षा  होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. 

आता मात्र CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. 

काय आहेत हे बदल जाणून घ्या....

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने 10वी, 12वी परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठा बदल केलेला आहे.

सीबीएसई 10वी, 12वी बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे.