डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
मोफत गणवेश योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोफत गणवेश योजना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गणवेश, बुट योजना माहिती अधिकार | rti | |school uniform |

गणवेश, बुटांचे टेम्पो भरून दस्तऐवज प्राथमिक शिक्षण विभागाला कागदपत्रे



विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेश व बुटांच्या खर्चाचा तपशील जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे मागितला. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुका, केंद्रनिहाय शाळेकडून गणवेश, बूट school uniform खर्चाच्या तपशिलाची कागदपत्रे मागविली आहेत. सध्या शिक्षण विभागात एक टेम्पो भरून दस्तऐवज जमा झाले. ते सर्व आमदार बंब यांना पाठवले जाणार आहेत.
school uniform



काही महिन्यांपासून आमदार बंब शिक्षण विभागाला वेगवेगळ्या प्रकारची निवेदने देऊन माहिती घेत आहेत. मागील महिन्यात त्यांनी शासकीय शाळेत नोकरी करत असताना जोड व्यवसाय करणाऱ्या शिक्षकांची माहिती मागविली होती. 

 त्यानंतर पुन्हा श्री. बंब यांनी शैक्षणिक वर्ष २०२३ २४ साठी जिल्हा परिषद शाळांमधून शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत देण्यात आलेल्या गणवेश व बुटांच्या निधीची माहिती मागवली आहे. त्यामध्ये गणवेश योजनेसाठी शाळानिहाय झालेला निधी वाटप व निधी वाटप करतानाचे निकष, गणवेश, बुटांची शाळास्तरावर झालेल्या खरेदीची सर्व देयके, लाभधारक विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी, शाळानिहाय पुरवठादारांची यादी, तसेच पुरवठादाराने दाखल केलेल्या दरपत्रकांच्या प्रती यासह सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट वाटप करण्यात आले का, याबाबतची माहिती मागवली आहे. जिल्हा परिषद समग्र शिक्षा विभागाकडून या सर्व कागदपत्रांचा तपशील मागवून घेतला जात आहे. जमा करण्यात आलेल्या या कागदपत्रांनी शिक्षण विभागातील संपूर्ण एक खोली भरली आहे. साधारणतः ५० पोती दस्तावेज जमा झाले आहे. ही सर्व कागदपत्रे आमदार बंब यांच्या मागणीनुसार पाठवले जाणार आहेत.

मोफत गणवेश योजना

 ꧁📺• *डिजिटल स्कूल  समूह महाराष्ट्र*🖥️꧂⁣

♛꧁🇮 *मोफत गणवेश योजना*🇮꧂⁣♛•°


डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र तर्फे शाळास्तरावर ठेवण्यासाठी मोफत गणवेश योजनेचे आवश्यक असलेले रेकाॕर्ड पी.डी.एफ स्वरूपात देत आहोत. 

१) बुट व पायमोजे बाबतीत शाळास्तरावर ठेवावयाचे रेकाॕर्ड...




२) मोफत गणवेश योजनेचे शाळास्तरावर ठेवावयाचे रेकाॕर्ड...





                  निर्मिती 
श्रीमती लीना वैदय 
समूहप्रशासक 
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

                 प्रकाशन
प्रकाशसिंग राजपूत 
समूहनिर्माता
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र








꧁🙏🏼💐•༆ *टिम डिजिटल समूह महाराष्ट्र*༆•💐🙏🏼