डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Admission लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Admission लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शाळा १५ जूनलाच सुरू |zpschool-educational-news-schooladmission-rte-admission|

 

शाळा १५ जूनलाच सुरू होणार ! 

५ ते २५ एप्रिलपर्यंत परीक्षा अन्‌ उन्हाळा सुट्ट्यांमुळे १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष अशक्य; ‘CBSE’च्या शाळा मात्र १ एप्रिलपासून       


१ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही प्राप्त नाही. अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्या असतील आणि त्यानंतर १५ जूनपासूनच शाळा सुरू होतील.





राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्य मंडळाच्या सर्वच शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा ८ ते २५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. त्यांचा निकाल १ मे रोजी जाहीर होईल आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश २ मेपासून सुरू होतील. चालू शैक्षणिक वर्षातील नियोजित उन्हाळा सुट्या देखील द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे २०२५-२६ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच सुरू होईल, 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य मंडळाचे शैक्षणिक वर्ष देखील १ एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्यासाठी आणखी एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शाळा १ एप्रिलपासून सुरू करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांच्या उन्हाळा, दिवाळी सुट्या निश्चित कराव्या लागतील.

शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक सुट्या आणि परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासंबंधीची कार्यवाही अजून पूर्ण झालेली नाही. त्यातच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेच्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून शक्य नसून पालक व विद्यार्थ्यांनी मनातील संभ्रम काढून टाकावा, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच

१ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही प्राप्त नाही. अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्या असतील आणि त्यानंतर १५ जूनपासूनच शाळा सुरू होतील. गुढीपाडव्यानंतर शिक्षक प्रवेशासाठी पालकांच्या गाठीभेटी सुरू करतात. १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर पहिलीच्या वर्गाचे प्रवेश सुरू होतात.

     Nps /Gps पेन्शन स्कीम संदर्भात पहा...          

‘सीबीएसई’च्या शाळा १ एप्रिलपासून भरणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पण, राज्य मंडळाच्या शाळा १ एप्रिलपासून सुरू करण्यासंदर्भातील राज्य शासनाचा निर्णय अजून झालेला नाही. 

विद्यार्थी अभावी सरकारी शाळेवर संकट|school close admission zpschool|

 राज्यातील १५ हजार शाळा बंद होण्याचा धोका  ?

शाळापूर्व तयारी अभियान.....अशी तयारी करा...

 शाळापूर्व तयारी अभियान.....

           शाळापूर्व तयारी मेळावा घ्यायच्या दिवशी सर्व प्रथम प्रभातफेरी काढायची आहे. 

आपल्याला शाळेत ७ प्रकारचे स्टॉल लावायचे आहेत. सर्व स्टॉल हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित आहेत.



 स्टॉल क्र-१ नाव नोंदणी आणि रिपोर्ट कार्ड देणे.


             पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत करायचे आहे.त्यांचे वजन,उंची याची नोंद करायची आहे.

स्टॉल क्र-२ शारीरिक विकास...


             यामध्ये दोरीच्या उड्या, दोन्ही हाताच्या साहाय्याने चेंडू किंवा रिंग फेकणे,कागदाच्या साहाय्याने होडी तयार करणे,रंग भरणे,चेंडू बादलीत टाकणे अशा वेगवेगळ्या कृतींचे आयोजन करून मुलांचा शारीरिक विकास कितपत झालेला आहे हे तपासायचे आहे.यात मुलांना मदतीची गरज आहे का किंवा तो चांगले करतो/करते याप्रमाणे नोंद करायची आहे.


स्टॉल क्र-३ बौद्धिक विकास


     यामध्ये लहान-मोठा फरक ओळखणे,२ प्रकारांमध्ये वर्गीकरण(जसे-फळे व पक्षी),दिलेल्या वस्तू-चित्रे क्रमाने लावणे,जोडी लावणे या क्षमतांचा समावेश होतो.


स्टॉल क्र-४ सामाजिक आणि भावनात्मक विकास-


        यामध्ये घरी राहिल्याने मुलांमध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला तपासायचे आहे.यात आपण त्यांना आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे,खेळ/क्रियांमध्ये आनंदाने सहभागी होणे,स्वच्छ आणि नीटनेटके राहणे,धीटपणे बोलणे या क्षमतांची आपण नोंद घेणार आहोत.


स्टॉल क्र-५ भाषा विकास -


       यात चित्र पाहून वर्णन करणे, गोष्ट सांगणे,अक्षरे ओळखणे,अक्षरे पाहून ओळखणे या क्षमतांची नोंद आपल्याला घ्यायची आहे.


स्टॉल क्र-६ गणनपूर्व तयारी -



    यात कमी-जास्त ओळखणे,आकार ओळखणे,अंक ओळखणे,वस्तू मोजणे या क्षमतांची  नोंद आपल्याला  घ्यायची आहे.


स्टॉल क्र-७ मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन. -

    यामध्ये सर्व नोंदी तपासून त्यानंतर सर्व मुलांना व पालकांना मार्गदर्शन करायचे आहे.


                अशा पद्धतीने आपल्याला स्टॉल उभारायचे आहेत.


स्टार कॕम्पेन नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम

 गेल्या दोन वर्षांपासून शाळेत येणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी कोरोनामुळे होत नव्हती. त्यासाठी आता राज्य शिक्षण संशोधन परिषदेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण प्रकल्प संचालकांनी दिली Star Campaign For First Standard Students आहे.



राज्यातील इयत्ता पहिलीसाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्यात येणार  Students Pre School Preparation आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना लेखन, वाचन कौशल्य तसेच गणन पूर्वतयारी करता आलेली नाही. यादृष्टीने तयारी करण्यासाठी आता आरंभिक वाचन, गणन, पूर्वतयारी मानसिक आणि भावनिक सक्षमता निर्माण व्हावी यासाठी, काही कौशल्य कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिक्षण प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.

नेमका कसा असेल कार्यक्रम? : 

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर ७ स्टॉल लावले जाणार आहेत. या स्टॉलवर विद्यार्थ्यांनी केलेली कृती ही नोंदवली जाणार आहे. 

बालकांची नोंदणी होणार आहे. स्थूल आणि स्थूल स्नायू विकास, भावनिक आणि मानसिक विकास, भाषा विकास, गणित पूर्वतयारी, रिपोर्ट कार्ड, माता आयडिया रिपोर्ट कार्ड, बालकांच्या कृतींची नोंद करून त्याप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना करणे, अशा विविध बाबतीत या अभियानाच्या माध्यमातून मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार केले जाणार आहे.

किती मुलांचा असणार सहभाग? : 

केंद्र सरकारच्या स्टार म्हणजे स्ट्रेंथेन टीचिंग ऍक्टिव्हिटी अँड रिसर्च Strengthening Teaching Activity and Research या प्रकल्पांतर्गत देशातील सहा राज्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत असून महाराष्ट्रातही हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील ५१०४ केंद्रांवर आणि ६५००० शाळांमधील सुमारे १३ लाख बालकांसाठी हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती पगारे यांनी दिली.

कोविडनंतर महत्त्वाचे अभियान : 

राज्यातील सर्वच बालकांची कोरोना काळात लेखन वाचनाची सवय सुटलेली आहे. त्यातच पहिलीसाठी दाखल होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखन, वाचनाचे वातावरण अथवा गणन पूर्वतयारीसाठी कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने हे अभियान अत्यंत महत्त्वाचे ठरले जाणार आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे. एकदा विद्यार्थी शाळेत दाखल झाल्यानंतर त्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अधिक असे उपक्रम नंतर राबवता येतील. राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात पुढील आठवड्यात होणार आहे