CBSE 10वी 12वी निकालाची तारीख कधीही जाहीर होऊ शकते.
कधी लागणार निकाल?
परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, तो cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल.
येथे उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूण 30 टक्के गुण आवश्यक आहेत. मात्र, एक-दोन विषयांत कमी गुण मिळाल्यास निराश होऊ नका, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे कंपार्टमेंट पेपरचे आयोजन केले जाते. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत 21 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. CBSE लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म 2 परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. दोन्ही वर्गांचे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.
एसएमएसद्वारे निकाल पाहता येईल
विद्यार्थी त्यांचे CBSE निकाल 2022 10वी आणि 12वीचे निकाल एसएमएसद्वारे देखील मिळवू शकतात. यासाठी तुमचा इयत्ता 10वी किंवा 12वीचा रोल नंबर टाका आणि हा एसएमएस 7738299899 वर पाठवा.
कोणत्या माध्यमातून तुम्ही निकाल तपासू शकता
CBSE निकाल 2022 जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in आणि cbseresults.nic.in व्यतिरिक्त, विद्यार्थी UMANG अॅप, डिजीलॉकर आणि एसएमएसद्वारे देखील तपासू शकतात.
असा पहाल निकाल
-विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत साइट cbse.gov.in, cbresults.nic.in ला भेट देऊ शकतात.
-यानंतर CBSE 10वी/12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
-आता तुमचा नोंदणी क्रमांक/रोल क्रमांक टाका.
-यानंतर 10वी आणि 12वी 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
-विद्यार्थ्यांना यानंतर त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करायचे आहेत.
-शेवटी निकालाची प्रिंट काढा.