डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Teachers Day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Teachers Day लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शिक्षक दिनी आंदोलन #teachersday

 शिक्षकांना शिकवू द्या जिल्हा परिषद शाळा टिकू द्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक दिनी  लक्षवेधी आंदोलन teachersday

         जिल्हा परिषद शिक्षकांना कायमच असणारी अशैक्षणिक कामे, विविध सर्व्हे, ऑनलाईन माहिती, परीक्षेचा भडिमार, बी एल ओ ची कामे अशी विविध अशैक्षणिक कामे बंद करून "शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या!"असे लक्षवेधी बॅच लावून  उद्या शिक्षक दिनी शिक्षकांनी काम करावे असे आवाहन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





         शिक्षक दिनानिमित्त देशभर शिक्षकांचा सन्मान होत असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शाळा सध्या बदनाम करण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शिक्षकांना अशी  अशैक्षणिक काम लादून ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप समन्वय समिती च्या वतीने करण्यात आला आहे. शिक्षकांना वेगवेगळी उपद्रवी उपक्रमामुळे व मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहे.

           याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने एकत्र येऊन शासनापर्यंत रोष व्यक्त होण्यासाठी व आपल्या भावना पोहोचवण्यासाठी सर्वांनी शिक्षक दिनी "आम्हाला शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या" अशा आशयाचे घोषवाक्याचे टॅग लावून शिक्षक काम करणार असल्याचे शिक्षक समन्वय समिती तर्फे आवहान करण्यात आले आहे.