डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
dcps लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
dcps लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

परिभाषीत पेन्शन योजना शासन आदेश

 

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली 

अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.

संपुर्ण आदेश पहा 👇


३१/०३/२०२३ चा आदेश पहा....

#chandryan3live, #isromoonmission,

Dcps समितीस मुदतवाढ nps

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS)व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत.

दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
 सदर समितीस तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्टया विश्लेषण करून शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस दिनांक १४.०६.२०२३ पासून पुढील दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली  आहे.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७२७१५२९४२०१०५ असा आहे. हा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे..

पेन्शन संघर्ष यात्रा दिवस ३ रा.....#pension #dcps #nps

 *जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती..!*


( *निमंत्रक : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना* )

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

( २४ नोव्हेंबर २०२१, बुधवार )

*१. सिन्नर : स्वागत* 


सिन्नर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेची आपली टीम तसेच शिक्षक संघ ( थोरात गट) यांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी संघर्ष यात्रेचे सिन्नर नगरीत स्वागत केले. 


*२. संगमनेर येथील स्वागत, पायी रॅली व सभा :* 


संगमनेर शहरातील घुलेवाडी फाटा पासून गाड्यांची रॅली पंचायत समिती पर्यंत पोहचली. तिथे रॅलीच स्वागत BDO साहेब यांनी केले. तिथून रॅली १ किमी चालत सभास्थळी पोहचली. 


संगमनेर मध्ये जोरदार, धडाकेबाज, आकर्षक नियोजन टीम ने केले होते. आमदार सुधीर तांबे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष दत्ताजी ढाकणे, लिपिकवर्गिय संघटनेचे सचिव जोर्वेकरजी यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी आपल्या टीम सह उपस्थित होते. 

या संपूर्ण उत्तम सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, सचिन नाबगे, शिवाजी आव्हाड, अमोल साळवे, विश्वस्त बाजीराव मोढवे सह सर्व तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार. सर्वच टीमचे अभिनंदन..! यासोबतच आपल्या तालुक्यातील  सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*३. राजगुरुनगर (खेड, पुणे ) येथील सभा :*


इंकलाब जिंदाबाद करून हसत फासावर लटकलेल्या ध्येयवेड्या शहीद राजगुरू यांच्या जन्मभूमीत  आजची झालेली सभा अतिशय उत्तम रित्या पार पडली.


प्राध्यापक, वन , आरोग्य आदी या सह शिक्षक संघटनेचे विविध स्तरीय पदाधिकारी, पेन्शन शिलेदार यावेळी उपस्थित होते. 


सदरची सभा देखील दणक्यात पार पडली. या आजच्या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सभागृहाच्या जवळपास ५०% महिला भगिनी या वेळी उपस्थित होऊन पेन्शन विरोधात एल्गार करत होत्या. 


या उत्तम सभेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, वैभव सदाकाळ, योगेश ठोसर, विनायक शिंदे, सोमनाथ कुदळे यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*४. पुणे मनपा टीम कडून प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम :*


दिवसभराच्या धावपळीतून काहीतरी वेगळे करत आपले विविध प्रेरणादायी विचार व्यक्त करणारे पुणे मनपा टीमचे जितूजी फापाळे, प्रणव काळे आदी पदाधिकारी यांनी केले.


*उपस्थित जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती सहकारी 

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

वितेश खांडेकर - राज्याध्यक्ष, मधुकर काठोळे

समन्वयक - सर्व शिक्षक संघटना, शैलेश भदाने - वनरक्षक वनपाल संघटना सचिव, गोविंद उगले - राज्य महासचिव, श्री. प्राजक्त झावरे पाटील - राज्य कार्याध्यक्ष, श्री. आशुतोष चौधरी - राज्य कार्याध्यक्ष, श्री. सुनिल दुधे - राज्य सल्लागार, श्री. शैलेश राऊत - कार्यालयीन चिटणीस, संजय सोनार - राज्य संघटक, श्रीमती दीपिका एरंडे मॅडम - राज्य मीडिया प्रमुख, श्री. नदीम पटेल - विश्वस्त, श्री. अनिल वाकडे - विभागप्रमुख नागपूर, अतुल खांडेकर - तालुकाध्यक्ष उमरेड, नागपूर, अनिल पत्रे - तालुकाध्यक्ष मौदा, नागपूर


सहकाऱ्यांनो,

भक्कम पाठबळ आणि प्रेम असेच राहू द्यात.


*कायम आपलाच,*

श्री. प्राजक्त झावरे पाटील

राज्य कार्याध्यक्ष

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

______________________________