शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रिकरण करणेबाबत...|शासन-निर्णय-gr-zpschool-educational-news|
१. माता पालक संघ
शिक्षकांची अशैक्षणिक कामं कमी
अशैक्षणिक काम कमी करण्याचा निर्णय : "राज्यातील शिक्षकांची किमान ५० टक्के अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय येत्या १५ दिवसातच घेण्यात येईल.
जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्याचे आव्हान आहे. यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवीत आहेत, ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करु व राज्यात अशा शिक्षकांची 'आयडॉल बँक' तयार करण्याचा मानस समोर ठेवला आहे. सुट्ट्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमांबाबत पालकांना माहिती द्यावी, जेणेकरून पटसंख्या वाढीत मदत होईल व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व पटसंख्या टिकून राहील, यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे," असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलं.
; font-family: "Noto Sans"; font-size: 18px; font-weight: bolder;">गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे : शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत अशा ठिकाणी इमारती, वर्गखोल्या उभारणीसाठी शासन प्रयत्नशील असून, यासाठी विविध सेवाभावी संस्थांचीदेखील मदत घेण्यात येणार असल्याचं दादा भुसे म्हणाले. वास्तवात सध्या जिल्हा परिषद, नगरपालिका त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे पटसंख्या टिकविण्याचे आव्हान समोर आहे. अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिलेत.
22222
शाळा १५ जूनलाच सुरू |zpschool-educational-news-schooladmission-rte-admission|
शाळा १५ जूनलाच सुरू होणार !
५ ते २५ एप्रिलपर्यंत परीक्षा अन् उन्हाळा सुट्ट्यांमुळे १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष अशक्य; ‘CBSE’च्या शाळा मात्र १ एप्रिलपासून
१ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही प्राप्त नाही. अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्या असतील आणि त्यानंतर १५ जूनपासूनच शाळा सुरू होतील.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य मंडळाचे शैक्षणिक वर्ष देखील १ एप्रिलपासून सुरू होणार आहे, पण त्यासाठी आणखी एक वर्ष वाट पहावी लागणार आहे. तत्पूर्वी, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पहिली व दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शाळा १ एप्रिलपासून सुरू करण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांच्या उन्हाळा, दिवाळी सुट्या निश्चित कराव्या लागतील.
शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापन होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सार्वजनिक सुट्या आणि परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासंबंधीची कार्यवाही अजून पूर्ण झालेली नाही. त्यातच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परीक्षेच्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून शक्य नसून पालक व विद्यार्थ्यांनी मनातील संभ्रम काढून टाकावा, असे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष १५ जूनपासूनच
१ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसून तसा आदेशही प्राप्त नाही. अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर शाळांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्या असतील आणि त्यानंतर १५ जूनपासूनच शाळा सुरू होतील. गुढीपाडव्यानंतर शिक्षक प्रवेशासाठी पालकांच्या गाठीभेटी सुरू करतात. १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर पहिलीच्या वर्गाचे प्रवेश सुरू होतात.
Nps /Gps पेन्शन स्कीम संदर्भात पहा...
‘सीबीएसई’च्या शाळा १ एप्रिलपासून भरणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पण, राज्य मंडळाच्या शाळा १ एप्रिलपासून सुरू करण्यासंदर्भातील राज्य शासनाचा निर्णय अजून झालेला नाही.
राज्यात rte घोटाळा |rte scam|
राज्यामध्ये RTE घोटाळा....
गरजू वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु केली. मात्र याच आरटीई योजनेचा गैरवापर करून आपल्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून खोटी कागदपत्रं जमा करून वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
![]() |
Rte घोटाळा |
नागपुरात जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स बनवून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटीई अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सिताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला.
प्रत्येक शाळेत निवडक जागा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र, याच जागांवरील प्रवेशात मोठा घोळ केला जात असल्याचे नागपुरात समोर आले आहे.या योजनेअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय केली आहे.
मात्र नागपुरात 'आरटीई रॅकेट'सक्रिय असल्याचे समोर आले. आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना पालक बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती.पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात 17 पालकांविरोधात तर सदर पोलीस ठाण्यात 2 पालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....
राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....
जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....
शिक्षक दिनी शिक्षक विरोधात प्रशांत बंब याचा मोर्चा
शिक्षकदिनी शिक्षक मुख्यालय प्रश्न संदर्भात ५ सप्टेंबरला नागरिक व कार्यकर्त्यांसह आमदार प्रशांत बंब जिल्हा परिषदेवर मोर्चा काढणार आहेत.
याबाबत त्यांनी जिल्हा परिषद 'सीईओ'ना स्मरणपत्र दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा शिक्षकांचा मुख्यालयी राहण्याचा प्रश्न पेटणार असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता घरभाडे भत्ता उचलतात, असे आरोप अनेकदा होतात. मात्र शासन कर्मचारींना सरकारी निवासस्थान उपलब्ध नसल्याने घरभाडे भत्ता स्वरूपात दिल्या जातो. मात्र याच मुद्याचा राजकीय मुद्दा बनवून आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. एवढेच नाही, तर मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता कपात करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणीसुद्धा केली.
बंब यांच्या मागणीनंतर जि.प.कडून या नियमाचे पालन होत नसल्याचा आरोप आमदार बंब यांनी केला. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयावर पाच सप्टेंबरला लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आमदार बंब यांनी 'सीईओ' यांना पत्र दिले आहे.
#chandryan3live, #isromoonmission,