डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
learn english लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
learn english लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

English reading basics

 मुलांना इंग्रजी वाचन घेतांना उपयुक्त अशी फोनेटिक्स आधारित पद्धत नक्कीच आपल्या मुलां  ही उपयुक्त ठरेल. 

जि.प,प्रा.शा.मुरूमखेडावाडी येथील इयत्ता १ ली मधील श्लोक Alphabets चे  साऊंण्ड वाचन करतांना .... Leaning English reading 
इंग्रजी वाचनास उपयुक्त खालील पीडीएफ मधील नावावर क्लिक करा व्हिडीओ प्ले होईल.

आपल्या घराबद्दल बोलणे Speaking about Home

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥


भाषांतरातून इंग्रजी  संभाषण शिका.....
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे..... श्री नितिन गबालेसर इंग्लिश टिचर यांची निर्मिती असलेला  नाविण्यपुर्ण उपक्रम ....


       संकलन व प्रकाशन

        प्रकाशसिंग राजपूत 

       (समूहनिर्माता) 

(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र  )

दिवस ४ थाआपल्या घराबद्दल बोलणे.


नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आता माझ्या घराबद्दल बोलणारे आहे.

Hello Friends, Now I am going to speak about my home.


घर हे आपल्या जीवनात खुप महत्त्वाचे आहे.

House is very important in our life.


प्रत्येकाला एक सुंदर घर हवं असतं. Everybody wants to have a nice house.


प्रत्येकाला त्याचं घर आवडतं.

Everybody loves his house.


मला माझ घर खुप आवडतं.

I love my home very much.


माझं घर गारखेडा नं. एक या गावात आहे.

My house is in Garkheda no.1.


माझं घर छान व स्वच्छ आहे.

My home is nice and clean.


माझ्या घरात एकुण पाच खोल्या आहेत.

There are five rooms in my home.

or

My home has five rooms.


माझ्या घरात अनेक सुविधा आहेत.

There are many facilities in the hall. 


हॉलमध्ये अनेक वस्तु आहेत.

There are many things in my home. 


हॉलमध्ये एक टि. व्ही. संच, रेडिओ व संगणक आहे.

There is a T.V. set, radio and computer in the hall. 


माझ्या स्टडीरूम मध्ये एक टेबल व एक खुर्ची आहे.

There is a study table and a chair in my study room. 

माझ्या रूममध्ये पुस्तक ठेवण्यासाठी एक कपाट आहे.

There is shelf for putting books in my room. 


मी माझ्या रूममध्ये अभ्यास करतो व झोपतो.

I study and sleep in my room.


 मी माझं घर स्वच्छ व निटनिटकं ठेवतो..

I keep my home clean and tidy..


माझ्या घरात मोठं किचन आहे.

There is a big kitchen in my home.


कीचनमध्ये अनेक साहित्य आहेत, जसे की गॅस सीलेंडर शेगडी, कीचनओटा, भांड्याचे कपाट, ट्रॉल्या, भांडी इत्यादी.

 There are many things in the kitchen; such as: gas cylinder, stove, kitchen ota, shelf, kitchn trollies, pots e.t.c.
कीचनमध्ये डायनिंग टेबल आहे.

There is a dining table in the kitchen.


 कीचनमध्ये एक फॅन, शीतकपाट व मोठा एलईडी दिवा आहे.

There is a fan, refridgerator and a big LED light in the kitchen. 


कीचनमध्ये अनेक वस्तू व भांडी आहेत.

There are many things and utensils in the kitchen. 


कीचनमध्ये खालील साहित्य आहे ईडली करण्यासाठी ईडली पात्र, पुरण करण्यासाठी पुरणपात्र अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकर, भाजी करण्यासाठी पातेल, पोळ्या करण्यासाठी पोळपाट आणि बेलणं, भाज्या ठेवण्यासाठी भांडे, गॅस पेटवण्यासाठी लायटर इत्यादी साहित्य आहे. 

There are following things in the kitchen: Idali stand for making idalis, puran machine for making puran, pressur cooker for cooking foods, wok or pan for making Bhaji, rolling board and rolling pin for making chapatis, vessels for putting bhaji, lighter for lighting gas stove e.tc. • कीचनमध्ये खालील साहित्य आहे. उदा. पोळ्या ठेवण्यासाठी डब्बा, दाळी ठेवण्यासाठी डब्बे पदार्थ तळण्यासाठी कढई. चहा बनवण्यासाठी पातेलं. चहा गाळण्यासाठी गाळणी पाणी ठेवण्यासाठी भांडं पाणी घेण्यासाठी तांब्या व ग्लास, भाज्या कापण्यासाठी वस्तु, पोळ्या भाजण्यासाठी तवा,पोळ्या उलथवण्यासाठी उलथनं, गरम पातेलं धरण्यासाठी कडची फळ व भाज्या सोलण्यासाठी पीलर, पीठ चाळण्यासाठी चाळणी, बटाटे बारीक करण्यासाठी पोटॅटो मॅशर मसाला मिक्स करण्यासाठी मिक्सर, वरण घेण्यासाठी पळी, भाज्या किसन्यासाठी किसनी, भजी व पूरी तळण्यासाठी झारा मसाला ठेवण्यासाठी डब्बा आणि दही घुसळण्यासाठी साधन इत्यादी.

There are following things in the kitchen : pot with lid for putting chapatis, steel canisters for putting pulses or dal, frying pan or wok for frying food, tea-pot for making tea, strainer for straing tea, pitcher for storing water.

Water vessels for putting water, and glasses for taking or drinking water, chopping board for cutting vegetables, griddle for roasting chapati or Bhakari, spatula for turning chapatis, pincer for holding hot vessels or pan, grater for grating fruits or vegetables, sieve for shifting flour, potato masher for mashing potatoes, mixer for grindingor mixing spices or ladle for taking dal or bhaji, pestle and mortar for pounding grain or making chutany, skimmer for frying puri or Bhaji, spicebox for putting spices and whisk for whisking curd. 


आमच्या कीचनमध्ये वॉटर फील्टर व पीठाची गीरणीपण आहे.

There is water filter and floar mill too in our kitchen. 


उन्हाळ्यात पाणी पीण्यासाठी आम्ही मातीचं मटकं वापरतो.

We use water pot in summer for drinking water.


 आमच्या घरात वातानुकूलीत संच पण आहे.

There is an air conditioner in our house. 


आमच्या घरात चार कॉटस् आणि दोन टेबल आहेत.

There are four cots and two tables in my home. 


हॉलमध्ये एक झुंबर व फ्लॉवर पॉट (फुलदानी) आहे.

There is a chandelier and a flower pot in the hall.आमच्या घरात कचरा भरण्यासाठी दोन सुपल्या व फरशी स्वच्छ करण्यासाठी एक पोच्या आहे.

There are two dust pans and one mop in my home.


छतावर एक सोलर हीटर आहे.

There is a solar heater on the terrace or roof. 


माझ्या घरात दहा ब्लँकेट, दहा गाद्या दहा उशा व दहा पडदे आहेत. 

There are ten blankets, ten mattresses, ten pillows and ten curtains in my home. 


माझं घर गावाच्या मध्यभागी आहे. माझ्या घराच्या मागे एक मंदीर आहे.


My home is in the centre or middle of village. There is a temple behind my home.


 माझं घर दोन मजली आहे. प्रत्येक रूममध्ये स्वच्छतागृह जोडलेले आहे. 

My home has two floors or storeys. Every room has a washroom attached. 


माझ्या घरात जीना आहे.

There is the stair in my home.


माझ्या घरात धान्य साठवण्यासाठी दोन कोठ्या व एक देवघर आहे. 

There are two steel granaries and an oratory in my home.स्पोकन इंग्लिश शाळेबद्दल बोलणे.... Talk about school

 

📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥


भाषांतरातून इंग्रजी  संभाषण शिका.....
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे..... श्री नितिन गबालेसर इंग्लिश टिचर यांची निर्मिती असलेला  नाविण्यपुर्ण उपक्रम ....


       संकलन व प्रकाशन

        प्रकाशसिंग राजपूत 

       (समूहनिर्माता) 

(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र  )

दिवस ३ राशाळेबद्दल व अभ्यासाबद्दल बोलणे 
(Speaking about school and study)


शाळा ही आपल्या जीवनात खूप महत्त्वाची असते.
School is very important in our life.


मी दररोज शाळेत जातो.
I go to school every day.

मी शाळेत शिकतो, खेळतो आणि तेथे मज्जा करतो
I learn play at school and I have fun there. 

मी माझ्या मित्रांसोबत मैदानावर कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन खेळतो.
I play Kabaddi, Kho-kho, Cricket and Badminton with my friends on the ground.


माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा गारखेडा नं. एक आहे.
My school name is zilla parishad central upper primary school Garkheda no.1


मला माझी शाळा खूप आवडते कारण तेथे मला आनंद मिळतो.

 I love my school very much because I get joy there.माझ्या शाळेत एकुण सात वर्ग आहेत.
There are seven classes in my school.


माझ्या शाळेत पहिलीपासून सातवीपर्यंत वर्ग आहेत.
There are seven classes from class one to Seven in my school. 


माझ्या शाळेत सात शिक्षक व दोनशे विद्यार्थी आहेत.
There are seven teachers and two hundred students in my school.


श्री. किरण पाटील माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
Mr. Kiran Patil sir is the headmaster of our school 


माझे सर्व शिक्षक खूप हुशार आहेत ते आम्हाला खुप छान शिकवता 
My all teachers are very clever. They teach us very nicely.


आमचे शिक्षक खुप दयाळू आहेत. ते आमचे चांगले मित्र आहेत. 
Our teachers are very kind. They are our good friends. 


श्री. सचिन पाटील हे आमचे वर्गशिक्षक असुन ते आम्हाला इंग्रजी व मराठी खूप छान शिकवतात.
Mr. Sachin Patil sir is our class teacher. He teaches us English, and Marathi very nicely.


आम्ही सर्व मुलं व शिक्षक आमच्या शाळेची काळजी घेतो.
We all children and teachers take care of our school.खेळाचे साहित्य संगणक आणि मोठे मैदान.
माझ्या शाळेत अनेक सुविधा आहेत. जशा की ग्रंथालय प्रयोगशाळा कक्ष बाग 
There are many facilities in my school; such as: library, laboratory, garden, playing aids, computer lab and big ground.


आम्ही दर शनिवारी ग्रंथालयात जातो आणि गोष्टींची पुस्तक वाचतो. 
We do experiments on every Friday in laboratory. 

आम्ही मैदानावर अनेक खेळ खेळतो जसे की क्रिकेट, फुटबॉल बॅडमिंटन, इत्यादी.
We play many games on ground such as: cricket,football, badminton etc. 


आमच्या शाळेच्या बागेत आम्ही दुपारचं जेवण एकत्र करतो.
We have our lunch together in our school garden.


आम्ही आमची बाग स्वच्छ ठेवतो. झाडांना पाणी देतो We clean our garden. We water the trees.

आम्ही संगणक कक्षात दर बुधवारी संगणक शिकतो.
We learn computer on every Wednesday in our computer lab.


आम्ही आमच्या शाळेचा परिपाठ मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषेत घेतो. 
We conduct our assembly in Marathi, English and Hindi.आमच्या शाळेत अनेक उपक्रम घेतले जातात जसे की कथा सांगणे, कविता गायन, स्पोकन इंग्लिश, गणित उपक्रम, पेपर वाचन, सामान्य ज्ञान स्पर्धा, आनंदनगरी विज्ञान प्रदर्शन, सहल, क्षेत्रभेट व सांस्कृतिक कार्यक्रम. There are many activities conducted at our school; such as telling stories singing poems, spoken English, Maths activities, reading newspaper, quiz, Anand nagari, science exhibition, spot visit and gathering.


माझी शाळा माझे मंदिर आहे.
My school is my temple.


जरी माझी शाळा खेड्यात असली तरी तेथे खूप उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते.

Tough my school is in village; but there is high quality education is given in my school. 

मी माझी शाळा कधीच विसरू शकत नाही कारण ती माझं जीवन आहे. 
I can never forget my school because it is my life. 

आपण दररोज शाळेत जायला हवं. दररोज अभ्यास व गृहपाठ पूर्ण केला पाहिजे. शाळा बूडवायला नाही पाहिजे.
We should go to school every day. We should study and complete our homework every day. We should not bunk or miss our school.आपली शाळा स्वच्छ ठेवणे व शिक्षकांचा आदर करणं हे आपल कर्तव्य आहे.
It is our duty to keep our school clean and respect our teachers. 


आपण आपल्या मित्रांना अभ्यासात व त्यांच्या अडचणीत मदत केली पाहिजे.
We should help our friends in their studies and problems. 

माझी शाळा ही माझ्यासाठी खूप आनंददायक जागा आहे
My school is my delightful place for me.
इंग्रजी संभाषण शिका जलद भाग १ learn english, spoken english

 इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी व संभाषण सराव होण्यासाठी श्री नितीन गबालेसर निर्मित इंग्रजी संभाषण हा उपक्रम आपणासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे.

दिवस पहिला

भाषांतरातून इंग्रजी शिका

Learn English through the translation.

Lesson No. 1

स्वतः ची ओळख व स्वतःबद्दल बोलणे

(Introduction and speaking about myself)

 सुप्रभात. माझे नाव राम आहे.

Good Morning. 
My name is Ram 

मी आता स्वतःची ओळख करून देणार आहे.

Now I am going to introduce myself. माझे पूर्ण नाव राम गणेश पाटील आहे.

My full name is Ram Ganesh Patil. 

मी अकरा वर्षाचा आहे.

I am eleven years old.

मी पाचवीत शिकतो.

I learn / study in class five.

मी गारखेडा नं. एक या गावात राहतो.

I live in Garkheda no.1 village.

माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गारखेडा न. एक आहे.

My School name is Zilla parishad central primary school Garkheda no. 1


माझ्या वडिलांचे नाव गणेश व आईचे नाव गंगा आहे.

My father's name is Ganesh and mother's name is Ganga. 


माझे वडील शेतकरी व आई गृहिणी आहे.

My Father is a farmer and mother is housewife.

माझे वडील शेतात काम करतात.

My Father works in the farm.

माझी आई आमच्या सर्वांची काळजी घेते.

My mother takes care of us.

माझ्या कुटूंबात एकुन सहा सदस्य आहेत.

There are six members /persons in my family. माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझे आजोबा, माझी आजी आणि मी.

My mother, my father, my sister, my grandfather, my grandmother and me. 

मला एक बहिन आहे पण भाऊ नाही.

I have a sister but I don't have a brother.

 माझ्या बहिणीचे नाव साक्षी आहे व ती आठवीत शिकते.

My sister's name is Sakshi and she learns in class eight.मी दररोज शाळेत जातो.

I go to school every day.

मला माझी शाळा, शिक्षक व मित्र फार आवडतात.

I love my school, teachers and friends very much.

मला माझं कुटूंब खुप आवडतं.

I love my family very much.

मला गोष्ट वाचनं आणि मित्रांसोबत खेळणं फार आवडतं.

I like reading story and playing with friends.क्रिकेट खेळणं हा माझा छंद आहे.

My hobby is playing cricket. 

गाणं गाणे ही माझी विशेष आवड आहे.

My passion is singing a song.महेश हा माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे.

My best friend is Mahesh.

तो मला नेहमी मदत करतो व माझ्यासोबत खेळतो.

He always helps me and plays with me.

आम्ही आमची सुखं दुखं एकमेकांशी वाटतो.

We share our pleasures and sorrows with each other.

तो मला नेहमीच समजून घेतो. 

He always understands me.


मी दररोज व्यायाम करतो.

I do exercise every day.

मला क्रिकेट हा खेळ खुप आवडतो.

I like the game of cricket very much.

मी माझ्या मित्रांसोबत रविवारी क्रिकेट खेळतो.

I play cricket with my friends on Sunday. 

मला क्रिकेट हा खेळ आवडतो कारण तो खूप मजेशीर व मनोरंजक खेळ आहे.

I love cricket because it is very funny and interesting game.

मला पाव-भाजी हा पदार्थ खुप आवडतो कारण तो खूप चवदार असतो. 

I like Pav-bhaji because it is very tasty.

मला इंग्रजी हा विषय आवडतो.

I like English subject.

माझे आदर्श माझे आई व वडील आहेत.

My role models are my mother and father. 

माझा आवडता सण दिवाळी आहे, कारण तो दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे.

I like Diwali festival because it is the festival of lamps and happiness.माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे कारण तो खुप प्रामाणिक प्राणी आहे.

My favourite animal is a dog because it is very loyal animal.

माझे आवडते शिक्षक श्री. सुनिल पाटील आहेत कारण ते खुप दयाळू आहेत आणि ते खुप छान शिकवतात.

My favourite teacher is Mr. Sunil Patil sir because he is a very kind teacher and he teaches very well. 

माझा आवडता खेळाडू रोहीत शर्मा आहे कारण तो खुप छान फलंदाजी करतो.

My favourite player is Rohit Sharma because he bats. very nicely.

माझा आवडता अभिनेता अजय देवगण आहे कारण तो खुप छान अभिनय करतो.

My favourite actor is Ajay Devgan because he acts very well.

मला डॉक्टर व्हायचे आहे.

I want to be a doctor.

माझा आवडता नेता महात्मा गांधी आहेत कारण ते एक महान स्वातंत्र्यसेनानी होते.

My favourite leader is Mahatma Gandhi because he was a great freedom fighter.मला 'तानाजी' चित्रपट फार आवडतो.

I like 'Tanaji' movie very much. 

मला मोर हा पक्षी फार आवडतो. मला पोपट हा पक्षी सुध्दा आवडतो.

I like peacock very much. I like parrot too. 

मला गाणी आणि संगीत फार आवडते.

I love songs and music very much. 

मला सफरचंद व द्राक्षे फार आवडतात.

I like apples and grapes very much. 

मी माझ्या मित्रांना, शिक्षकांना व कुटूंबाला नेहमी मदत करतो.

I always help my friends, teachers and my family. 

एक सर्वोत्कृष्ट डॉक्टर बननं हे माझं स्वप्न आहे.

My dream is to become the best doctor.


इंग्रजी शब्दार्थ भाग १ व २

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥


🎊🎉 *इंग्रजी - मराठी चिञशब्द मालिका*🎀🎈

🥁🥁🥁🎁🎁🎁🥁🥁🔮🌹 *भाग १ 👇🏼💐*🔮

    *💎🌹भाग २🌹💎*

*भाषेचा अध्ययन म्हटलं तर शब्दांचा समृद्ध भंडार असणे आवश्यक आहे. म्हणूनच डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र इंग्रजी भाषेची शब्द संपत्ती वृद्धींगत करण्यासाठी श्री मिलिंद जामदार तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांची उपयुक्त निर्मिती असलेला इंग्रजी मराठी चित्र शब्द मालिका आजपासून घेऊन आलो आहोत . निश्चितच त्याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना होईलच व त्यांच्या भाषा समृद्धी मध्ये भर पडेल...*

         *निर्मिती व संकल्पना*


         *श्री  मिलिंद जामदार*

        ता. नेवासा जि.अहमदनगर 


          *संकलन व प्रसारण*


         *प्रकाशसिंग राजपूत*

              औरंगाबाद  

*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*

*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*


*आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा....*