डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
newsong लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
newsong लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मानवा राख शिष्टाचार newsong,

 *कोविड आजार आता जरी जागतिक महामारी नसली तरी मानव जातीचे खूप मोठे नुकसान त्या आजाराने केलेले आहे.... लाॕकडाऊन काळातील यावर,  लिहिलेले माझे गीत व्हिडीओ स्वरूपात सादर...*



*मानवा तु राख शिष्टाचार ....*





https://youtu.be/7tapQzxJrOs



वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी

तमाम भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐जय हरि विठ्ठल🙏🏼🙏🏼🙏🏼*



वारी रं ...वारी... विठ्ठलाची पंढरी


धाव पाऊलांची गवसे पंढरी,

विठु रुखमाई दर्शनास वारी,

पावन होऊन जीवन उद्धारी ,

अखंड भक्तीची आस ही भारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



साज भक्तांवर भक्तीचा जरी,

आत्मशांती लाभे या नगरी,

विठुरायाची सजूनी  पंढरी,

सार्थ होण्या भक्ताची वारी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



हरिनामाची जपुनी माळ जरी,

तीर्थरुपी सावली विठ्ठल धरी,

भक्तांची बनुनी माय माऊली,

गर्जे नभ कडकडाडे वीज जरी,

वारी रं... वारी.... विठ्ठलाची पंढरी



 *काव्यलेखन*

     ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

         औरंगाबाद 

📲  9960878457

तळपता ज्वाला.... वीर शंभो.... शुर शंभो....




 *🚩 शुरवीर, महापराक्रमी ,बाहुबली शुर योद्धा छत्रपती  संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा🚩🚩🚩* 

गीतगायन - श्री सुभाष शिंदे

गीतलेखन -  प्रकाशसिंग राजपूत 


https://youtu.be/_ceLAgaGbkE

तळपता ज्वाला गीत पहाण्यासाठी......



*🚩वीर शंभो ,शुर शंभो....🚩* 


*तळपता ज्वाला उठला,*

*जेव्हा शंभुराजा छत्रपती जाहला,*

*वणवा शौर्याचा सर्वत्र भडकला,*

*प्रजेच्या मनी सिंह वसला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 


*विजेचा  कडकडाट  असा,*

*तेज नवा स्वराज्यास मिळाला,*

*गौरव या मराठी मुलखाचा,*

*अभिमान या मातीचा राखला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



*पराक्रम असा दिगला,*

*मावळे लढूनी चौफेर शत्रूला,*

*चमचमता तारा या उंच ,  नभात,*

*राजा शक्तीशाली या विश्वात ,*

*वीर शंभो,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



*अंखड दीप हा या राष्ट्राचा*

*इतिहास शौर्याचा रचला,*

*अन्याय  कुणावर नव्हता  मान्य ,*

*बाहुत बळ असे आणला,*

*वीर शंभो ,शुर शंभो ....*

*आवाज  सह्याद्रीत घुमला,* 



  🖋 *प्रकाशसिंग राजपूत*🖋

          *औरंगाबाद*

       9960878457


  हे गीत जर स्टुडिओत बनावे आपली इच्छा असल्यास कृपया आपले योगदान 9960878457 यावर संदेश पाठवू शकता.