डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
nps लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
nps लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Nps आंदोलन

 आम्ही संघर्ष पाहिला शिवरायांचा....*


*🎯आम्ही संघर्ष पाहिला बाबासाहेबांचा....*


*🎯आम्ही संघर्ष पाहिला आमच्या मायबाप शेतकर्‍यांचा...*


*🎯आम्ही संघर्ष पाहिला मृत कर्मचारी कुटुंबाचा...*


*_NPS च्या अंधकारास दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या पेन्शन जनक्रांती महामोर्चास सेवाग्राम येथून क्रांतीची मशाल पेटवून प्रारंभ झाला..._*🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥          आता वेळ आली आहे 2005 नंतरच्या बांधवांच्या संघर्ष इतिहासाची, या पेन्शन संघर्ष इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी व पेन्शन युद्धात आपला हक्काचा लढा अधिक बळकट करण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हा._


     _आज लढलो नाही तर भविष्यात रडावे लागेल याची जाणीव ठेवा._

_आपल्या आदर्श व्यक्तीचे संघर्ष आठवा व त्यांचे स्मरण करून या लढ्यात पूर्ण ताकतीनिशी सहभागी व्हा....!_

_चला तर मग..._


_12 डिसेंबर 2023  रोजी नागपूर येथिल पेन्शन जनक्रांती महामोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा....!!!_


*_एकच मिशन....!_*

*_जुनी पेन्शन.....!!_*


        

_गोविंद उगले, राज्य सचिव_ 9730948981

*_महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना._*

परिभाषीत पेन्शन योजना शासन आदेश

 

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली 

अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.

संपुर्ण आदेश पहा 👇


३१/०३/२०२३ चा आदेश पहा....

#chandryan3live, #isromoonmission,

Dcps समितीस मुदतवाढ nps

 राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS)व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत.

दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.
 सदर समितीस तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्टया विश्लेषण करून शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस दिनांक १४.०६.२०२३ पासून पुढील दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली  आहे.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७२७१५२९४२०१०५ असा आहे. हा शासन निर्णय खालील प्रमाणे आहे..

जुनीपेन्शन संदर्भात जालना येथे सहविचार सभा

 _*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना समनव्य समिती* ची जालना येथे सहविचार सभा संपन्न झाली._    _या सभेमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या समिती समक्ष तथा शासनस्तरावर सर्व संघटनेच्या लेटर पॅड वर *"म.ना.से.अधि 1982 व 1984 ची जुनी पेंशन योजना पूर्ववत लागु करावी "* ही एकमेव मागणी घेऊन  मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री, व समिती अध्यक्ष यांना वरील एकमेव मागणी देणारे निवेदन द्यावे अशी विनंती उपस्थित पदाधिकारी यांना केली._

     _या बैठकीसाठी माझ्या सोबत आपल्या संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष देशपांडे व जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर उपस्थित होते._ 


_गोविंद उगले,महासचिव_

*_महाराष्ट्र राज्य राज्य जुनी पेंशन संघटना._*


🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचा-यांना रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचा-यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचा-यांना रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत. 

आजचे पत्र_ 
कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचा-यांना रुग्णता निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबत

*संदर्भ :- शासन निर्णय, वित्त विभाग क्र. रानियो-२०१२/प्र.क्र.३४/सेवा-४, दि. ३१/०३/२०२३.*


*!! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना !!*


  *जुन्या पेन्शनसाठी गठित अभ्याससमिती समोर संघटनेची  जुन्या पेन्शनची मागणी*

                तसेच

   *मंत्रालय भेटी व चर्चा*


         आज दि. 21 एप्रिल 2023 ला जुन्या पेन्शनसाठी गठित *अभ्यास समितीच्या सचिव साहेबांनी आपल्या संघटनेच्या सरचिटणीस श्री. गोविंद उगले यांना केलेल्या भ्रमणध्वनी सुचने नुसार* संघटनेच्या वतीने अभ्यास समिती समक्ष *राज्याध्यक्ष श्री. वितेश खांडेकर व राज्य सल्लागार श्री. सुनिल दुधे* यांनी भूमिका  मांडणी व प्रस्ताव सादर केला.

           सदर अभ्यास समितीच्या  बैठकीत  समितीचे *अध्यक्ष श्री. सुबोध कुमार साहेब, श्री. के.पी. बक्षी साहेब,  श्री. वैभव राजेघाटगे साहेब (सचिव) तसेच VC द्वारे श्री. सुधीरकुमार श्रीवास्तव साहेब* _यांच्या उपस्थितीत दुपारी 1.00 वाजता स्वतंत्र बैठक आणि भूमिका मांडण्याची संघटनेला संधी देण्यात आली._

          अभ्यास समितीसोबत सुमारे एक ते सव्वा तास संघटनेची भूमिका व प्रस्ताव यावर चर्चा झाली.

      चर्चा व सादरीकरणा दरम्यान

 1. NPS योजनेतून महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजने प्रमाणे लाभ देणे किंवा मिळणे अशक्य आहे.

2.  राज्यात NPS व DCPS योजनेच्या धोरण व  अंमबजावणी मधील प्रचंड अनियमितता मुळे सदर DCPS व NPS योजनेतील कपातीवर आधारित खात्रीशीर पेन्शन देणे शक्य नाही.

3. त्यामुळे जुनी निवृत्तीवेतन योजना हीच सुरक्षित व न्यायिक पर्याय असल्याने 1982 व 84 ची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.

4. पेन्शन देण्यासाठी शासनाने वेगळा फंड व निधी निर्माण करावा.

5. 14% शासनवाटा याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आणि काही अतिरिक्त भार शासनाने स्वीकारल्यास जुनी पेन्शन देणे शक्य आहे.

6. निवृत्तीवेतनसाठी  शासनाला मोठ्या प्रमाणात येणारा आर्थिक बोझा हे आभासी असून नवीन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिल्यास शासनाला अल्प अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

7. अन्य पाच राज्यात जुनी पेन्शन कशी लागू केली त्याचे दाखले व चर्चा.

       यावर सादरीकरण करण्यात आले. अभ्यास समितीला संघटनेच्या अनेक मुद्दे हे प्रभावी वाटले. त्यामुळे स्वतः समिती *_अध्यक्ष श्री.सुबोध कुमार साहेब, श्री.बक्षी साहेब आणि सचिव राजेघाटके साहेब यांनी पुन्हा विस्तृत माहितीसह समितीच्या पुढील बैठकीत संघटनेला आमंत्रित केले._*


   🙏    *ज्या जुनी पेन्शन च्या मागणीला अश्यक बाब म्हटले जात होते, आज त्या जुनी पेन्शन मागणीसाठी  राज्यातील तीन प्रमुख संघटना -  राजपत्रित अधिकारी महासंघ सकाळी 11 ते 12,  राज्य मध्यवर्ती संघटना दुपारी 12 ते 1 आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 1 ते 2  दरम्यान   जुनी पेन्शन मागणी साठी प्रस्ताव सादर करतात. याचे पूर्ण श्रेय संपूर्ण पेन्शन शिलेदारांच्या संयमी आणि धाडसी लढ्याला जाते.*


  🙏   *मंत्रालयीन भेटी* 🙏

 

 दि. 31 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार NPS/DCPS धारक कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्ती वेतन तसेच मृत्यु आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले. 

       *1. मात्र त्याच्या कार्यपद्धती  बाबत वित्त विभागाचा  शासन निर्णय अजूनही न आल्याने सबंधित लाभ प्रत्यक्ष मिळणार नाहीत. त्यासाठी कार्यपद्धतीचा शासन निर्णय तत्काळ काढण्यात यावा यासाठी वित्त विभागाला निवेदन देण्यात आले.*

2. सबंधित  *कुटुंब निवृत्ती वेतनाचा स्वतंत्र शासन निर्णय  राज्य शासनाच्या अन्य विभागाने तत्काळ काढावा यासाठी.*

*_ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, नगर विकास विभाग, समाजकल्यान विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, आरोग्य विभाग यांना निवेदन देण्यात आले._*

3. शालेय शिक्षण विभागाने सबंधित कुटुंब निवृत्ती वेतन निर्णय तयार केला असून वित्त विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित केला आहे.


🙏

             सदर अभ्यास समितीसोबत संघटनेच्या स्वतंत्र बैठकीसाठी मंत्रालयीन स्तरावर *राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे,*  यांचे विशेष सहकार्य लाभले. भेटी व पाठपुराव्यासाठी *राज्य कोषाध्यक्ष प्रवीण बडे* आणि बैठकीसाठी विशेष स्तरावर  *राज्य मीडिया प्रमुख  दिपीका एरंडे* यांनी प्रयत्न केले.

      *राज्यसचिव श्री. गोविंद उगले* व *राज्य कार्याध्यक्ष श्री. आशुतोष चौधरी* यांच्या सहकार्य आणि चर्चेने *राज्याध्यक्ष श्री. वितेश खांडेकर* आणि *मी ( राज्य सल्लागार श्री. सुनिल दुधे)* मंत्रालयात सादरीकरण आणि भेटीसाठी उपस्थित होतो.


👏

   *अभ्यास समिती असो वा अभ्यासू मंत्री,  _जुनी पेन्शन लागू करण्यासाठी जुनी पेन्शन देणारे सरकार सत्तेत आणणे हाच पर्याय आहे._*

त्यामुळे

     लक्षात ठेवा.

      #VoteForOPS

      *मिशन - 2024*
      

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

  


त्रिसदस्य समितीचे जुनी पेन्शन संदर्भात कार्य सुरू..#nps, #oldpension,

 

जुनी पेन्शन (old pension) योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी एका तीन सदस्य समितीची देखील स्थापना करण्यात आली. या समितीची स्थापन झाल्यानंतर पुढील तीन महिन्यात आपला सविस्तर असा अहवाल शासनाला सुपूर्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यानुसार समितीला निर्देश जारी करण्यात आले.

 आता तीन महिन्यानंतर ही समिती राज्य शासनाला ज्या शिफारशी करणार आहे त्या शिफारशी राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी लागू केल्या जाणार आहेत.

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांसहित महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे देखील ही समिती नेमकी काय शिफारस देते, काय अहवाल शासनाला सादर करते याकडे लक्ष लागून आहे.

नविन शैक्षणिक धोरण स्वरूप पहा.... लवकरच राज्यात लागू

या तीन सदस्य समितीने आपले कामकाज सुरू केले आहे.या समितीने कर्मचारी संघटनांची भूमिका जुनी पेन्शन योजना संदर्भात नेमकी काय आहे हे समजून घेण्यास सुरुवात केली आहे. निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार हे या समितीचे अध्यक्ष असून कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या समितीची नुकतीच बैठक पार पडली आहे. यामध्ये कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू समितीच्या पुढे  मांडली आहे.

कर्मचारी शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी या समिती पुढे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच आर्थिक व सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळाला पाहिजे असा आग्रह यावेळी लावून धरला. एकंदरीत महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेसाठी एक पाऊल पुढे पडले आहे. 


पेन्शन संघर्ष यात्रा दिवस ३ रा.....#pension #dcps #nps

 *जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती..!*


( *निमंत्रक : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना* )

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

( २४ नोव्हेंबर २०२१, बुधवार )

*१. सिन्नर : स्वागत* 


सिन्नर येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेची आपली टीम तसेच शिक्षक संघ ( थोरात गट) यांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे सर यांनी संघर्ष यात्रेचे सिन्नर नगरीत स्वागत केले. 


*२. संगमनेर येथील स्वागत, पायी रॅली व सभा :* 


संगमनेर शहरातील घुलेवाडी फाटा पासून गाड्यांची रॅली पंचायत समिती पर्यंत पोहचली. तिथे रॅलीच स्वागत BDO साहेब यांनी केले. तिथून रॅली १ किमी चालत सभास्थळी पोहचली. 


संगमनेर मध्ये जोरदार, धडाकेबाज, आकर्षक नियोजन टीम ने केले होते. आमदार सुधीर तांबे यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष दत्ताजी ढाकणे, लिपिकवर्गिय संघटनेचे सचिव जोर्वेकरजी यांच्या सह विविध संघटनेचे पदाधिकारी आपल्या टीम सह उपस्थित होते. 

या संपूर्ण उत्तम सभेचे नियोजन करणारे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, सचिन नाबगे, शिवाजी आव्हाड, अमोल साळवे, विश्वस्त बाजीराव मोढवे सह सर्व तालुकाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांचे विशेष आभार. सर्वच टीमचे अभिनंदन..! यासोबतच आपल्या तालुक्यातील  सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*३. राजगुरुनगर (खेड, पुणे ) येथील सभा :*


इंकलाब जिंदाबाद करून हसत फासावर लटकलेल्या ध्येयवेड्या शहीद राजगुरू यांच्या जन्मभूमीत  आजची झालेली सभा अतिशय उत्तम रित्या पार पडली.


प्राध्यापक, वन , आरोग्य आदी या सह शिक्षक संघटनेचे विविध स्तरीय पदाधिकारी, पेन्शन शिलेदार यावेळी उपस्थित होते. 


सदरची सभा देखील दणक्यात पार पडली. या आजच्या मेळाव्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सभागृहाच्या जवळपास ५०% महिला भगिनी या वेळी उपस्थित होऊन पेन्शन विरोधात एल्गार करत होत्या. 


या उत्तम सभेसाठी जिल्हाध्यक्ष संतोष गदादे, वैभव सदाकाळ, योगेश ठोसर, विनायक शिंदे, सोमनाथ कुदळे यांच्या सह सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे विशेष आभार.


*४. पुणे मनपा टीम कडून प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम :*


दिवसभराच्या धावपळीतून काहीतरी वेगळे करत आपले विविध प्रेरणादायी विचार व्यक्त करणारे पुणे मनपा टीमचे जितूजी फापाळे, प्रणव काळे आदी पदाधिकारी यांनी केले.


*उपस्थित जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती सहकारी 

पेन्शन संघर्ष  यात्रा दिवस ३ रा.....

वितेश खांडेकर - राज्याध्यक्ष, मधुकर काठोळे

समन्वयक - सर्व शिक्षक संघटना, शैलेश भदाने - वनरक्षक वनपाल संघटना सचिव, गोविंद उगले - राज्य महासचिव, श्री. प्राजक्त झावरे पाटील - राज्य कार्याध्यक्ष, श्री. आशुतोष चौधरी - राज्य कार्याध्यक्ष, श्री. सुनिल दुधे - राज्य सल्लागार, श्री. शैलेश राऊत - कार्यालयीन चिटणीस, संजय सोनार - राज्य संघटक, श्रीमती दीपिका एरंडे मॅडम - राज्य मीडिया प्रमुख, श्री. नदीम पटेल - विश्वस्त, श्री. अनिल वाकडे - विभागप्रमुख नागपूर, अतुल खांडेकर - तालुकाध्यक्ष उमरेड, नागपूर, अनिल पत्रे - तालुकाध्यक्ष मौदा, नागपूर


सहकाऱ्यांनो,

भक्कम पाठबळ आणि प्रेम असेच राहू द्यात.


*कायम आपलाच,*

श्री. प्राजक्त झावरे पाटील

राज्य कार्याध्यक्ष

*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*

______________________________