डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रशांत बंब यांच्या सभेत गावकरींनी विचारले त्यांना प्रश्न

 औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब (prashant bumb)यांच्या सभेमध्ये गावकऱ्यांनी धिंगाणा घातलेला आहे.

 सभा चालू असताना अनेक तरुण त्यांच्या स्टेजवर समोर गेले व त्यांनी त्यांना प्रश्न विचारणे सुरू केले.

 तरुण मंडळी एवढ्यावरच थांबली नाही तर पुढे जाऊन त्यांनी सभाही उधळून लावली आपण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये आपण घडलेला प्रकार पाहू शकतात.


अनेक  महत्त्वपुर्ण व्हिडीओ पहाण्यासाठी आपण चॕनलला सबस्क्राईब करा....




बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मिळावे शिक्षणमंत्री

 राज्यातील प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी बोली भाषा आहे. या बोली भाषेतून प्राथमिक शिक्षण मुलांना दिले तर ते जास्त चांगले होणार आहे.




बोली भाषेच्या माध्यमातूनच मग त्यांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेल्यास त्यांचा शिक्षणाचा पाया भक्कम होईल. त्यामुळे अशा प्रकारे स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पुस्तकांची निर्मिती डाएटमार्फत करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या.


सावंतवाडी येथे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

प्रशांत बंब व शिक्षक आमने सामने पहा ... Click here

मुलांचा कल ८ वी पासूनच ठरवण्यात यावा अशा सूचना करुन शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्येच व्यावसायिक शिक्षणाविषयी गोडी निर्माण करता आली पाहिजे.

 त्यांना स्थानिक भाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. असे सुप्त गुण हेरून त्यावर शिक्षकांनी काम केले पाहिजे. त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्यात यावा.


 हा प्रकल्प राज्यभर राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल याचा अभ्यासही करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.



छ. संभाजीनगर ढगफुटी...

 छत्रपती संभाजीनगर मध्ये बाप्पाच्या आगमनांसह मुसळधार पाऊस  झाला .

अगदी जोरदार पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला आहे. यापूर्वी जिल्ह्यात शेतकरी पाऊस नसल्यामुळे चिंताग्रस्त झाला होता. परंतु गणेश आगमनासह पाऊस अगदी ढगफुटी समान पाऊस झाल्याने एकदम आनंदाचे वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आहे .

पावसाचा जोर इतका होता की अनेक ओढे भरभरून  वाहून  निघाले .

आपण खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पाऊस किती जोरदार होता. आपण अजून जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपण लगेच या चॅनलला सबस्क्राईब करावं.

 गणेश आगमनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!


जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

बाप्पा आला .... पाऊस झाला...
https://youtu.be/zaarr1Td1mY



शाळेत पत्रकार आले खाली हात गेले....

साफल्य नविन काव्यरचना

मराठी काव्य रसिकांकरिता मी प्रकाशसिंग राजपूत माझी एक काव्यरचना आपणासाठी घेऊन येत आहे. मराठी काव्य मनास मंत्रमुग्ध करणारा प्रकार मनातील भाव व्यक्त करणारा अनेक भावनांना एकत्र जपणारी शब्दांची माळ ...


आता Flipkart वर माझे पुस्तक खरेदी करा... आपल्या प्रियजनास भेट देण्यास उत्तम...खास १०%सवलती दरात




साफल्य.....



जगण्याची प्रीत ह्या जीवना,

राखूनी मनी किती वेदना,

असह्य काळ जरी टळेना,

सौदार्य स्वतःशी दावेना,



उरात दाटे अवेहलना,

कीर्तीचे नातं हे कळेना,

फिरुनी जगी मन भरेना,

साफल्य कधी लाभेलना,



अंतकरणास रुप भावेना,

 उदासी अखेर मिटेलना,

दीव्यत्वाची ओढ मना,

तेज कर्तुत्वाचा उभारेलना....



सोडीत ज्वलंत भावना,

कुणास का मी कळेना,

विराम माझ्याच जीवना,

प्रिये तुला मी दिसेना.....



   ✒️ *प्रकाशसिंग राजपूत*✒️

           औरंगाबाद

व्याजाचे खोके एकदम ओके

 पैठणी ते पार पडलेली शिक्षक व संस्थेच्या आमसभेमध्ये व्याजाचे खोके एकदम ओके,

 कमिशनचे खोके एकदम ओके अशा घोषणा देत विरोधी गटाने पतसंस्थेच्या संचालक मंडळ आला चांगलेच धारेवर धरले ,

याबाबतचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी  या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .

कॉमेंट मध्ये नक्कीच आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.




शिक्षकांनी आता आवाज बुलंद केलाय ...✊

 *शिक्षकांनी आता आवाज बुलंद केलाय ...✊*


नांदेड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये दोन पत्रकार शिक्षक बांधवाकडून निधी मिळविण्यासाठी गेले होते. वास्तविक शिक्षक अशा परिस्थितीत काम करतात की अनेकदा विद्यार्थ्यांना वही पेन या प्राथमिक शैक्षणिक साहित्याची ही कमतरता असते. तेव्हा अनेक शिक्षक अशा विद्यार्थ्यांना या साहित्याची मदत करतात.

     हा विषय वास्तविक व्यक्त करण्याचा नसून पण आज समाजात जे काही शिंतोडे शिक्षकांवर उडविल्या जात आहे ते पाहून नक्कीच हा काळ सावित्रीबाईंना ज्याप्रमाणे त्या काळात त्रास सहन करून स्त्री शिक्षण या देशात सुरू  केले जणू तिच व्यवस्था शिक्षणांस धारेवर धरु पहात आहे का? 

शिक्षकाचे कार्य हे कोणत्या मोजपट्टीत मोजता येत नसून ते केवळ प्रगत समाजाच्या प्रतिबिंबात झळकून येथे. आजचा समाज जो काही प्रगत दिसून येतो तेच या सामाजिक अभियंत्याचे नवनिर्माण असून याचे कुठलेच एमबी किंवा आॕडीट कधीच होऊ शकत. शिक्षक देशाचा खरंतर मुख्य  स्तंभ आहे. परंतू त्यास या राजकीय व्यवस्थेने पायमल्ली करण्याचे काम केलेले आहे.

   लोकप्रतिनिधी मुख्यालय  राहणे शिक्षकांना अत्यावश्यक सेवा नसतांना एकूणच अपमानकारक शब्द वापरून संपूर्ण शिक्षकांवर लगाम लावण्याची भाषा करतात.  

    नांदेड जिल्ह्यात नेमके कायच घडले हे खालील व्हिडीओ  मध्ये पहा....




https://youtu.be/RLyKx79__Fg

शिक्षक मुख्यालय एबीपी माझावर लाईव्ह चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे

 मुख्यालय व शैक्षणिक गुणवत्ता 

ABP माझा वर live चर्चा. मुख्यालयाच्या प्रश्नावर 

आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या समोरासमोर

 *मुख्यालय व शैक्षणिक गुणवत्ता* याबाबत डिबेट ( चर्चा )झाली. 

ती एबीपी माझावर लाईव्ह चर्चेतील महत्त्वाचे  मुद्दे 

संघटनेच्या मान्यवर प्रतिनिधींनी  भुमिका मांडली. मुख्यालयाचा मुद्दा आमदार प्रशांत बंब (prashant bamb)

     शिक्षकांनी चर्चेत बंब यांना घेरले👇





अशैक्षणिक कामे काढा 👇




आमचा पगार शासन ठरवेल 👇



शिक्षण कोठे घेणे घटनात्मक अधिकार...👇