डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली प्रक्रियेचा होणार श्रीगणेशा...

 जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया गेल्या २ वर्षापासून स्थगित होत यावर्षीच्या ही बदल्या होतील की नाही याची शाश्वती शिक्षकांना वाटत नव्हती पण यावर पुर्ण विराम आता लागणार आहे.



वरीलप्रमाणे आज बदली प्रक्रियेला श्रीगणेश होत आहे.

 शाळा पुर्व तयारी अभियान मेळावा दुसरा...

बदल्यांना आता वेग येणार

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. 

सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी. निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. 


सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने बुधवार दि.०८.०६.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते १.०० या वेळेत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी, सदर प्रशिक्षणासउपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग), जिल्हा परिषद यांच्यासह उपस्थित रहावे,  असे कळविण्यात आलेले आहे.

वैद्यकिय बिल मंजुरीचे शिक्षणाधिकारी यांना आदेश

सदर प्रशिक्षणाची V.C. लिंक यथावकास कळविण्यात येणार आहे.



आजचे पत्र पहा....




शाळापुर्व तयारी अभियान मेळावा दुसरा आयोजन...

 शैक्षणिक वर्ष २०२२ -२०२३ पासून इयत्ता १ ली प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुर्वी पहिल्या मेळावा अंतर्गत विविध बाबतीत पुर्वतयारी करत आता प्रवेशास सक्षम करत शाळेची  गोडी लागलेली असून त्यांचा उत्साह आणखी या दुसऱ्या मेळाव्या अंतर्गत वाढणार आहे. 

     

  या आयोजनबाबते शासन आदेश प्राप्त झालेले आहेत.....



सेतू अभ्यासक्रमव चाचणी सन 2022 -23




वैद्यकीय खर्च मंजूरीबाबत आदेश

 वैद्यकीय खर्च मंजूरीबाबत :--

 

सहाय्यक संचालक, शिक्षण आयुक्तालय म. रा. पुणे यांचेकडील दि 3/06/2022 च्या पत्रकानुसार -

   राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100% अनुदानित खाजगी शाळांतील शिक्षकांची रू दोन लाख पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाची/बिलाची प्रतिपुर्ती / मंजूरी देण्यास माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक विभाग  यांना अधिकार प्रदान सविस्तर आदेश पहा...




जागतिक पर्यावरण दिन .... गीत

 🌳🌴☘️ *जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌹🌹🌹💐💐💐*


माझ्या या काही रचना गीत स्वरूपात सादर .... केपया आवडल्यास शेअर लाईक व चॕनलला सबस्क्राईब करा....


*वृक्ष बनुनी खरे सोबती ....*


https://youtu.be/wo_C_t7K3Y8


*खामनदी गीत....*


https://youtu.be/DKSGNlOGxBE


*वृक्षांगण....*


https://youtu.be/Rpe4c2hx4Po




                *गीतलेखन*

          *प्रकाशसिंग राजपूत*

                   औरंगाबाद



आधार प्रत देतांना सावधान

लगबग शाळेची गीत ...राजपूत प्रकाशसिंग

गेली दोन वर्षे  कोरोनाने शिक्षणाची फार दैना केली आता मात्र विद्यार्थी नव्या आशेने शाळा उघडण्याची वाट पहात आहे यावरच लिहिलेले हे काव्य ...

 कुणी गीत बनवू इच्छित असाल तर स्वागत 

     गीतलेखन     प्रकाशसिंग राजपूत 

               औरंगाबाद  9960878457 



 

लगबग लगबग ओढ शाळेची आता...


शाळेची घंटा वाजण्याची होती चिंता,

वर्षामागे वर्ष करोनाने वाया जाता,

रोहीण्या येता मनी उत्सव नवा सजता,

लगबग लगबग ओढ शाळेची आता .....



सुट्टीचा मनास लोभ खूप होता,

आता मात्र नको रे देवा पुन्हा  ही थट्टा,

अभ्यास  गेला वाहून पुर जसा येता,

खूप  शिकायचं स्वप्नं सत्यात यावं आता...


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....



खुलेल शाळा बहरुन आम्ही जाता,

शिक्षणाची शिदोरी पुन्हा मिळता,

तेज नवा आम्हा बालकांना येता,

घरोघरी दीप ज्ञानाचा दिसेल पेटता,


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....


खेळात नव्हता  रस काही उरता,

शाळेच्या गप्पांची उणीव राहता,

बालकांचा शत्रू करोना कसाच होता,

देवारं आस नव्याने घेतोय आता....


लगबग लगबग शाळेची ओढ आता.....



     *प्रकाशसिंग राजपूत*

           औरंगाबाद

        9960878457


 

सेतु अभ्यासक्रम व चाचणी

 सेतु पुर्नरचित अभ्यासक्रम चाचणी सन २०२२-२३ बाबतचे नियोजनबाबत खालील पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे.






 

जुलैत ४% महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

 सरकार जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता  वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 



या दरम्यान, महागाई भत्त्यामध्ये  4 टक्के वाढ होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

महागाई भत्त्यात ही वाढ झाली तर जुलै महिन्यापासून केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 दरम्यान, सलग दोन महिने एआयसीपीआय इंडेक्स  कमी झाला तरीही मार्चमध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. जानेवारीत इंडेक्स कमी होऊन 125.1 वर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीत 125 अंकावर आला होता. पण मार्च महिन्यात एका झटक्यात इंडेक्स एक अंकाने वाढून 126 वर पोहचला. म्हणून सरकारनं कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची चर्चा आहे. 


राष्ट्रीय पुरस्कार निवड प्रक्रिया १ जूनपासून सुरु 



सरकारने यावर्षी सुरुवातीला 3 टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता दिला जातो. जुलैमध्ये महागाई भत्ता वाढल्यास डीए 38 टक्क्यांवर पोहचेल. जर सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तात्काळ याचा लाभ होत पगारात वाढ होईल. कोरोना महामारीमुळे काही काळ डीए वाढवण्यावर स्थगिती होती. दीड वर्षानंतर केंद्र सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात डीए 17 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केला होता.

केंद्र सरकार पीएम श्री शाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे

 विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार पीएम श्री शाळा स्थापन करण्याचा विचार करत आहे. अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी सांगितली आहे .


केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान म्हणाले की, आम्ही पीएम श्री शाळा स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहोत, ज्या विद्यार्थ्यांचे भविष्य तयार करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज असतील. ते म्हणाले की या अत्याधुनिक शाळा NEP 2020 साठी प्रयोगशाळा म्हणून काम करतील.



प्रधान म्हणाले की, शालेय शिक्षण हा पाया आहे ज्यावर भारत ज्ञानाची अर्थव्यवस्था बनेल. ते म्हणाले की, 21 व्या शतकातील आपल्या नवीन पिढीचे ज्ञान आणि कौशल्य आपण हिरावून घेऊ शकत नाही. मी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि संपूर्ण शैक्षणिक परिसंस्थेकडून पीएम श्री शाळांच्या रूपात भविष्यातील बेंचमार्क मॉडेल तयार करण्यासाठी सूचना आणि अभिप्राय आमंत्रित करत आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करताना, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.

एकमेकांच्या अनुभवातून आणि यशातून शिकले पाहिजे, जेणेकरून शिकण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल. अधिक दोलायमान बनवा आणि भारताला अधिक उंचीवर नेऊ. ते म्हणाले की, जागतिक कल्याणासाठी वचनबद्ध असलेली ज्ञान अर्थव्यवस्था म्हणून भारताला प्रस्थापित करण्यासाठी पुढील 25 वर्षे महत्त्वपूर्ण आहेत.

शालेय शिक्षणाचे हायब्रीड माॕडेल विकसित करा ... मा.पंतप्रधान मोदीजी...

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या 5+3+3+4 दृष्टिकोनामध्ये प्री-स्कूल ते माध्यमिक शाळा, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन प्रोग्राम (ECCE), शिक्षक प्रशिक्षण आणि प्रौढ शिक्षण, कौशल्यावर भर देणे यांचा समावेश आहे.

शालेय शिक्षणासह. विकासाचे एकत्रीकरण आणि प्राधान्य इ. मातृभाषेतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे हे 21व्या शतकातील जागतिक नागरिक तयार करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.

आंतरजिल्हा बदल्यासाठी आता ही अट...

या पूर्वीच्या बदली टप्प्यांमध्ये 10 टक्के ही अट ठेऊन बदली प्रकिऱ्येतून असे जिल्हे वगळले होते ती बाब एप्रिल 2021 gr मध्ये नाही असे शासन vinsys व टीम ला कळवते आहे. सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल बदली होईल पण कार्यमुक्त पुन्हा सदर बिंदू भरती झाल्यानंतर होईल...


त्यानुसारच आंतरजिल्हा बदली होणार आहे जीआर आपण खाली पाहू शकतात.