पिकनिकसाठी आले होते विद्यार्थी आणि शिक्षक...
हरियाणाच्या अंबालामध्ये आज वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात घडला. येथे एका खासगी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी पिकनिकसाठी आले होते. यादरम्यान वॉटर पार्कमध्ये तयार केलेल्या झोपाळ्यावर शिक्षक आणि विद्यार्थी बसले तर केबिनचा ग्रिल तुटला. 23 वर्षीय शिक्षिकेसह 3 विद्यार्थी खाली पडले.
खाली पडल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली, शिवाय विद्यार्थ्यांनाही जबर मार लागला आहे. हे ही जी आई होऊन जेवू घालत होती, तिचीच केली हत्या; व्यसनापायी तरुणाने सर्व संपवलं,
वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी केली अटक...
अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. त्यावेळी 23 वर्षीय रिया गर्ग हिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अधोई गावातील जय पब्लिक शाळेत काम करीत होती. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा अपघात H2O पार्कमध्ये झाला. शिवाय वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.