डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत

 CBSE बोर्डाच्या परीक्षा  रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा  दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता.



यावेळी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा होणार की पुन्हा एकच परीक्षा  होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. 

आता मात्र CBSE बोर्डानं दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठे बदल केले आहेत. 

काय आहेत हे बदल जाणून घ्या....

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने 10वी, 12वी परीक्षेच्या पॅटर्नबाबत मोठा बदल केलेला आहे.

सीबीएसई 10वी, 12वी बोर्ड परीक्षांबाबत जुन्या पॅटर्नवर परतली आहे. त्यानुसार आता 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून एकदाच होणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या जात आहेत. वर्षातून एकदा परीक्षा घेण्याची तरतूद करण्यासाठी CBSE ने यात बदल केला आहे.