डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

मायेची चादर

 वेळ काळ जरी बदलला, माय तीच व तिच्या मायेची चादर तिच,*



ती नसण्याची भीती ही जगातली सर्वात मोठी हानी व दुःख असते,

       सर्व माय माऊलींना हा काव्यरुपी प्रणाम🙏🏼

मायेची चादर.....



जन्मलो जिच्या पोटी,
ममतेचे रुप ती माऊली,
धन्य माझे भाग्य या जीवनी,
लाभली मज प्रेमाची सावली,

दुःख माझ्ये हे बनत तिचे,
मला देऊन सुखाची चादर,
अश्रू माझे बघून तिचे काळीज रडे,
आज कळलं तिच्या ममतेचा सागर,

ब्रम्हांडी दैवत नाही पाहिला,
मायच्या रुपात सर्वस्वी  अनुभवला,
बोट धरून या दुनियेत पाऊल पडला,
काटा पायी रुतता तिचा जीव आटला,

ओस आहे जग तिच्या ममतेशिवाय,
ओढ तिची माझ्या जगण्याला,
वय वाढता ती ही थकली,
ममतेचा झरा मात्र नाही सुकला,

आजाराचा पडता माझ्यावर विळखा,
ढाल ही बनत माझी माऊली वाढवी,
यशाची चढत मी पायरी,
स्वप्नं हे तिचे मज घडवी,

नातं हे नाळेच्या बंधनाचे,
तुटली नाळ तरी मनी घट्ट वसे,
तिच्या मायेची असावी सदैव चादर,
मायेच्या रुपात दैवत हेच माझे दिसे....

 


     प्रकाशसिंग राजपूत

        छ. संभाजीनगर