डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शाळा सुरु होण्या पुर्वीच पुस्तके वाटपास उपलब्ध होणार

 शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहो‍चविण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे .



समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी, मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी इंदरसिंग गडाकोटी, शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, आदि उपस्थित होते.

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे तसेच अनुदानित शाळांना राज्य शासनातर्फे इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून २०२२ पासून राज्यातील शाळा नियमितपणे सुरु होत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्यात आले असून ही पाठ्यपुस्तके शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी आजपासून मोफत पाठ्यपुस्तक वितरणाला सुरुवात करण्यात आली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या अन्य विभागीय भांडारातूनही या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु करण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ करिता एकूण ५ कोटी ४० लाख प्रतींचा पुरवठा करण्यात येणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे निर्देश मंत्री श्रीमती गायकवाड यांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. समग्र शिक्षा अभियानाव्यतिरिक्त इयत्ता १ ली ते १२ वीची सर्व पाठ्यपुस्तके खुल्या बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

31 May ऐवजी 30 जून फक्त 2022 बदल्यासाठी

 31 May ऐवजी 30 जून फक्त 2022 बदल्यासाठी हा दिनांक असणार आहे. याबाबतीत शासन निर्णय आला आहे.



Rte प्रवेश करिता १० मे पर्यंत मुदतवाढ

 त्यानुसार 2022-23 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) 30 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  येथे काढण्यात आली होती. 




यानुसार दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS देखील पाठविण्यात आलेले आहेत.




शैक्षणिक वर्ष सन 2022-23 या वर्षाकरीता आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत संचालनालयाचे दिनांक 20 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रानुसार 29 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

 याबाबत निवड यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश घेण्याकरिता आता सुधारित निर्देशांनुसार दिनांक 10 मे 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

ही मुदतवाढ शेवटची मुदतवाढ असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून दिनांक 10 मे 2022 पूर्वी आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा