डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यवाही बाबत.|mdm scheme|

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत.


राज्यामध्ये विदर्भ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची नवीन शैक्षणिक वर्षामध्ये अंमलबजावणी करतांना खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तसेच जिल्हा स्तरावरुन याविषयी नियमितपणे संनियंत्रण करण्यात येईल याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी स्वतः घ्यावयाची आहे.

१. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमधून मिष्ठान्न भोजन अथवा पदार्थ सर्व पात्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत.


२. शाळेच्या पहिल्या दिवसापासून योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या पाककृतीनुसार पोषण आहार उपलब्ध करुन देण्यात यावा. काही कारणामुळे आहार शिजविण्यास अडचणी असल्यास, क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सदरची अडचण त्वरीत दूर करुन संबंधित शाळेत आहार शिजविला जाईल याचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे.


३. जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधून सर्व कार्यदिवसांमध्ये पोषण आहार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाईल याची दक्षता घ्यावी कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे.


४. जिल्हा / तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी खालील लिंक वर भेट देऊन दररोज दुपारनंतर आपल्या जिल्हा/तालुक्यातील शाळांनी लाभ दिलेबाबत खात्री करावयाची आहे. काही शाळा माहिती भरण्याकरीता प्रलंबित असल्यास योजनेचा लाभ दिलेबाबत संबंधित शाळांची माहिती त्याच दिवशी एमडीएम पोर्टलवर नोंदविली जाईल याची दक्षता घ्यावयाची आहे.


https://pmposhan-ams.education.gov.in/School_Reported_today_total_view.aspx


५. वरील लिंक वर आपल्या तालुका तथा जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती आपणास पाहण्यास उपलब्ध आहे. दररोज जिल्ह्यातील योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांनी आहार दिलेबाबतची नोंद एमडीएम पोर्टलवर करणे अनिवार्य आहे.

६. तालुका तथा जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करुन देखील एम.डी.एम पोर्टलवर माहितीची नोंद न केल्यास त्याकरीता संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्ह्याकरीता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना व्यक्तिशः जबाबदार समजण्यात येऊन पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्राकरीता संबंधित प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग हे याकरीता जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद घ्यावयाची आहे.


७. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांनी राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे आहार देण्यात येऊन, दिलेल्या आहाराची नोंद एमडीएम पोर्टलवर त्याच दिवशी होईल याकरीता विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिलेले आहेत.


८. शाळास्तरावर अथवा तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही तांत्रिक अडचणी असल्यास त्वरीत त्याचे निराकरण जिल्हा कार्यालयाने करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरुन संबंधित अडचणींचे निराकरण शक्य नसल्यास त्वरीत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा.


९. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांचे कामकाज सुरु होत असल्याने सर्व शाळांमधील स्वयंपायगृहे, भाडी, तांदुळ व धान्यादी माल स्वच्छ असल्याची खात्री करुन घेण्यात यावी. मुलांना आहार स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये उपलब्ध होईल याची दक्षता घेणेत यावी.


१०. केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना वरील नमूद सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने आवश्यक ते निर्देश आपलेस्तरावरुन देण्यात यावेत.


११. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये योजनेस पात्र सर्व शाळांमधून परसबाग निर्मितीचे उद्दिष्ठ ठेवण्यात आलेले आहे. याकरीता स्थानिक प्रगतीशील शेतकरी, पालक, विद्यार्थी, स्वयंपाकी तथा मदतनीस आणि शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांची मदत घेण्यात यावी व शाळेमध्ये उत्कृष्ठ परसबाग विकसित होईल याचे नियोजन करण्यात यावे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी परसबाग निर्मितीबाबत प्रत्येक महिन्याला तालुक्यांकडून प्रगती अहवाल घेऊन संचालनालयास कळवावे.


१२. प्रत्येक तिमाही नंतर योजनेस पात्र सर्व मुलांच्या वजन व उंचीची नोंद नोंदवही मध्ये घेण्यात यावी. लवकरच सर्व शाळांना नोंदवह्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल याची नियोजन करण्यात यावे. जंतनाशक गोळ्या आणि आयर्न आणि फोलिक अॅसिड गोळ्यांचा लाभ आरोग्य विभागामार्फत योजनेस पात्र सर्व शाळांमधून दिला जाईल याकरीता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी आवश्यक तो संपर्क करण्यात यावा.


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेच्या प्रत्येक दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगला, दर्जेदाज आहार उपलब्ध होईल याची आवश्यक ती दक्षता घ्यावी.


प्रवेशोत्सव फलकलेखन

 प्रवेशोत्सव फलक लेखन 


नविन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत

 राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या शिफारशीनुसार शासनाच्या मान्यतेने वेतनस्तर सुधारित केलेल्या संवर्गांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे / सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन निश्चिती करणेबाबत.

शुध्दीपत्रक :-


वाचा येथील क्र.२ येथील दिनांक २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकातील क्र.२ च्या पृष्ठावर तिसऱ्या ओळीत "१.१.२०१६ रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर या वाक्याऐवजी १.१.२०१६ रोजी व तद्नंतर पदोन्नती अथवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतननिश्चिती केल्यानंतर असे वाक्य वाचण्यात यावे.

11111

क्र.२ च्या पृष्ठावर पाचव्या ओळीत दि.१.१.२०१६ रोजी च्या पुढे किंवा तद्नंतर " या शब्दांचा समावेश करण्यात यावा.


सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०६१२१६१४५७७८०५ असा आहे.जीवन शिक्षण मासिकासाठी लेख/साहित्य पाठविण्याबाबत

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे सर्व शिक्षणाधिकारी यांना आदेश

विषय : 'जीवन शिक्षण' मासिकाच्या पुनर्रचनेनुसार साहित्य पाठविण्यास सर्व शिक्षक, अधिकारी यांना कळविण्याबाबत...


उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यास येते की, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ३०. यांच्या मार्फत जीवन शिक्षण हे मासिक दरमहा प्रकाशित केले जाते. या मासिकाला १५० वर्षाहून अधिक वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे हे मासिक शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून वितरीत करण्यात येते.


जीवन शिक्षण मासिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वदूर प्राथमिक शाळांतील शिक्षण विषयक नवे विचार, नव्या जाणिवा, शैक्षणिक संशोधन व नवीन शैक्षणिक तंत्रे शिक्षकांपर्यंत पोहचविले जातात. शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनातील गरजा व अडचणी विचारात घेवून वेळोवेळी नवीन अभ्यासक्रमसंदर्भात तज्ज्ञांचे लेख, शिक्षण विषयक विचार आणि मार्गदर्शन शिक्षकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाते.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विषयीची माहिती, शिक्षकांची प्रज्ञा, प्रतिभा यांच्या संपूर्ण विकासासाठी विविध लेख, मुलाखती, अनुभव आदी अंतर्भूत करण्यात आलेले असतात विद्यार्थ्यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या संस्कारासाठी सोप्या सुगम भाषेत लेख दिलेले असतात. शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रम, प्रकल्प, नवसंशोधन, शिक्षण क्षेत्रातील घडामोडी अशा लेखांचा अंतर्भात असतो. शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यांचा अंतर्भाव असतो. शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, अधिकारी, संस्था अदययावत राहण्यासाठी या अंकातील ज्ञान, माहिती अत्यंत उपयुक्त असते. ज्यामुळे शिक्षकांची, शाळांची गुणवत्ता वृध्दिगत होण्यास मदत होते.


तरी आपल्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अध्यापक विदयालयातील अध्यापकाचार्य, छात्राध्यापक इत्यादीनी खाली दिलेल्या मुद्दयांप्रमाणे जीवन शिक्षण मासिकासाठी लेख/साहित्य पाठविण्याबाबत आपणामार्फत कळविण्यात यावे.


• संशोधनात्मक लेख यामध्ये संशोधन उद्दिष्टे, कार्यवाही, फलनिष्पती, निष्कर्षाचे सार्वत्रिकीकरण व आवश्यक पुरावे असणारे लेख.


• नवोपक्रम अधिकारी, शिक्षक यांनी आपल्या कार्यक्षेत्रात राबविलेले नवोपक्रम याविषयी नवोपक्रमाची उद्दिष्टे, कार्यवाही, फलनिष्पती, आवश्यक पुरावे यानुसार मद्देसूद मांडणी असणारे लेख.


• स्थानिक शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक यांचे शिक्षणविषयक लेख पाठविण्याबाबत प्रोत्साहन दयावे.


• ज्या शिक्षकांची मागील २ महिन्यात शैक्षणिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी दोन प्रतीत पुस्तके व त्यांचा सारांश पाठविण्याचे आवाहन करण्यात यावे. जीवन शिक्षण अंकात प्रत्येक महिन्यात उचित निकषानुसार पुस्तकांचा सारांश व संबंधित लेखकांची माहिती प्रकाशित करण्यात येणार आहे.


• Ph.D व इतर राज्य, राष्ट्रीय पुरस्कार यांची माहिती व पुरावे घेऊन अशा अधिकारी, शिक्षक यांची माहिती जीवन शिक्षण मासिकात प्रसिध्दी करण्याबाबत पाठविण्यात यावी.

• अधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी वैशिष्ट्यपूर्ण शाळा, संस्था यांना दिलेल्या भेटी व त्यावर आधारित लेख.


• आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, शिक्षक यांचे पुस्तक परीक्षण (Book Review) मागील दोन महिन्यात प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर आधारीत (नवीन पुस्तके) परीक्षणात्मक तथा पुस्तकांचे वाचन करून संबंधितांनी लिहिलेले लेख.


वरीलप्रमाणे उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण लेखन असणाऱ्या लेखांनाच 'जीवन शिक्षण' मासिकामधून प्रसिध्दी देण्यात येईल.

इयत्ता २ री चे वार्षिक नियोजन

 इयत्ता २ री चे वार्षिक नियोजन ....डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

घेऊन आला आहे....

शिक्षक मित्र समूह निर्मिती असलेले खास अभ्यासक्रमाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक नियोजन ....


पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा....इयत्ता १ ली चे वार्षिक नियोजन|varshik niyojan|

 इयत्ता १ ली चे वार्षिक नियोजन... 


डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

घेऊन आला आहे....

शिक्षक मित्र समूह निर्मिती असलेले खास अभ्यासक्रमाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक नियोजन ....


पीडीएफ स्वरूपात पहा व डाऊनलोड करा....
पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा...


सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत समिती

 सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ची स्थापना 

शासन आदेश

 शासन निर्णय दिनांक १६.०३.२०२४ अन्वये सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने या विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील दि. २३.०४.२०२४ रोजीच्या आदेशान्वये २ सहायक कक्ष अधिकारी व १ लिपिक-टंकलेखक अशा ३ कर्मचाऱ्यांच्या सेवा वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ च्या कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. सदर ३ कर्मचाऱ्यांपैकी श्री. प्र.दि. रेडकर, सहायक कक्ष अधिकारी, महसूल व वन विभाग यांचे आदेश प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असून त्यांच्याऐवजी खालील कर्मचाऱ्याच्या सेवा वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी अधिग्रहीत करुन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत :-


अ.क्र.


कर्मचाऱ्यांचे नाव


पदनाम


सध्याचा विभाग


१.


श्रीमती स्व. चिं. मुंडे


सहायक कक्ष अधिकारी


सार्वजनिक आरोग्य विभाग


२. श्रीमती मुंडे यांच्या सेवा वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी ०६ महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करणेपर्यत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यत तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येत आहेत. श्रीमती मुंडे यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहीत करण्यात येणार असल्याने त्यांच्या वेतनादी विषयक बाबी संबंधित कर्मचारी ज्या विभागात सध्या कार्यरत आहेत त्या विभागाकडून हाताळण्यात येतील.


३. श्रीमती मुंडे यांनी इतर कोणत्याही आदेशाची प्रतिक्षा न करता दिनांक ०५.०६.२०२४ (म.पू.) रोजी वित्त विभाग/सेवा-९ येथे रूजू अहवाल सादर करावा. सदरचे आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता नाही. तसेच श्रीमती मुंडे यांना कार्यमुक्त न करण्यासंदर्भात संबंधित विभागाच्या कोणत्याही विनंतीची दखल घेतली जाणार नाही. त्याचप्रमाणे सदरप्रयोजनासाठी श्रीमती मुंडे यांनी रुजू होण्यास हयगय केल्यास त्यांच्या विरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्ताविण्यात येईल.


४. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०६०४१७५२४६८००७ असा आहे.
12 वी नंतर करिअर व विविध प्रवेश प्रक्रिया|after 12th admission neet iit|

 HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती....(After 12th)

----------------------------------------

 मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

----------------------------------------

०१) *नीट* आँनलाईन फाॅर्म प्रिंट

०२) *नीटप्रवेश* पत्र

०३) *नीट मार्क* लिस्ट

०४) १० वी चा मार्क मेमो

०५) १० वी सनद

०६) १२ वी मार्क मेमो

०७) नॅशनॅलीटी सर्टीफिकेट

०८) रहिवाशी प्रमाणपत्र

०९) १२ वी टी सी

१०) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस

११) आधार कार्ड

१२) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१३) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते

१४) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

०१) जातीचे प्रमाणपत्र

०२) जात वैधता प्रमाणपत्र

०३) नाॅन क्रिमीलीयर प्रमाणपत्र 

(मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)

----------------------------------------

कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे.

After 12th


----------------------------------------

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे*(engineering admission process)

----------------------------------------

०१) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट

०२) *MHT-CET* पत्र

०३) *MHT-CET* मार्कलिस्ट

०४) १० वी चा मार्क मेमो

०५) १० वी सनद

०६) १२ वी मार्क मेमो

०७) नँशनँलीटी सर्टीफिकेट

०८) रहिवाशी प्रमाणपत्र

०९) १२ वी टी सी

१०) आधार कार्ड

११) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं १६ वडिलांचा

१२) राष्ट्रीय बँकेतील खाते

१३) फोटो

----------------------------------------

*मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*

----------------------------------------

०१) जातीचे प्रमाणपत्र

०२) जात वैधता प्रमाणपत्र

०३) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र (मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत लागू)


कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण करून घ्यावे

----------------------------------------

           *वैद्यकीय क्षेत्र* 

----------------------------------------

*शिक्षण - एमबीबीएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEET प्रवेश परीक्षा 

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*

----------------------------------------

*शिक्षण - बीएएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका*

----------------------------------------

*शिक्षण - बीएचएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडी*

----------------------------------------

*शिक्षण - बीयूएमएस*

कालावधी - पाच वर्षे सहा महिने 

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*

----------------------------------------

*शिक्षण - बीडीएस*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET

संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - एमडीएस*

----------------------------------------

*शिक्षण - बीएससी इन नर्सिंग*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण*

----------------------------------------

*शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच*

कालावधी - पाच वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET

संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

----------------------------------------

         *शिक्षण - डिफार्म*

----------------------------------------

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश

संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय

----------------------------------------

*पुढील उच्च शिक्षण - बीफार्म*

----------------------------------------

*शिक्षण - बीफार्म*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमफार्म

----------------------------------------

  *संरक्षण दलांत प्रवेशासाठी*

----------------------------------------

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात. 

एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात. 

वयोमर्यादा : साडेसोळा ते १९ वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात

----------------------------------------

*अभियांत्रिकी व ऑटो मोबाईल*

 ----------------------------------------

*शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश 

संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश

*शिक्षण - बीई*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस

*शिक्षण - बीटेक*

कालावधी - चार वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी

कालावधी - चार वर्षे

पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी

शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण

कालावधी - दोन वर्षे

पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण

----------------------------------------

    *कॉम्प्युटरमधील कोर्सेस*

----------------------------------------

डीओईएसीसी 'ओ' लेव्हल

कालावधी - एक वर्ष

डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी

कालावधी - दोन वर्षे

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी

कालावधी - सहा महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन

कालावधी - तीन महिने

सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग

कालावधी - दहा महिने

इग्नू युनिव्हर्सिटी

सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग

कालावधी - एक वर्ष

----------------------------------------

         *शिक्षण - बारावी*

 ----------------------------------------

*शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन* 

कालावधी - एक वर्ष

वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट

कालावधी - दोन महिने

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स

कालावधी - एक वर्ष 

(फक्त मुलींसाठी)

डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग

कालावधी - दोन वर्षे

गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट

कालावधी - एक वर्ष

प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन

कालावधी - एक वर्ष

कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट

कालावधी - एक वर्ष

डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर 

कालावधी - एक वर्ष

----------------------------------------

     *रोजगाराभिमुख कोर्सेस*

 ----------------------------------------

*शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता - बारावी (७० टक्के)

संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड

इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी

उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स

इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर

*शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग*

कालावधी - चार वर्षे

पात्रता - दहावी आणि बारावी पास

संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर

(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग

फाउंडेशन (एनटीटीएफ) 

सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस

कालावधी - एक वर्ष

फॅशन टेक्‍नॉलॉजी

कालावधी - एक वर्ष

मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस

कालावधी - तीन वर्षे

----------------------------------------

*हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम*

 ----------------------------------------

*टूरिस्ट गाइड*

कालावधी - सहा महिने

डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस

कालावधी - दीड वर्ष

बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग

कालावधी - तीन महिने

बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन

सिस्टम (एअर टिकेटिंग)

कालावधी - एक महिना 

अप्रेन्टाईसशिप

कालावधी - पाच महिने ते चार वर्षे

*शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी*

डिजिटल फोटोग्राफी

कालावधी - एक वर्ष

स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग

कालावधी - एक ते तीन वर्षे

सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी

कालावधी - एक ते तीन वर्षे

----------------------------------------

        *बांधकाम व्यवसाय*

 ----------------------------------------

*शिक्षण - बीआर्च*

कालावधी - पाच वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NATA , JEE

संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक

----------------------------------------

        *पारंपरिक कोर्सेस* ----------------------------------------

*शिक्षण - बीएससी*

कालावधी - तीन वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार 

पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी

----------------------------------------

*शिक्षण - बीएससी (Agri)*

कालावधी - ४ वर्षे

पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET

संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय

पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

----------------------------------------

*शिक्षण - बीए*

कालावधी - तीन वर्षे

संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार

पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

----------------------------------------

*शिक्षण - बीकॉम*

कालावधी - तीन वर्षे

संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

----------------------------------------

*शिक्षण - बीएसएल*

कालावधी - पाच वर्षे

संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा

पुढील उच्च शिक्षण - एलएलएम 

----------------------------------------

*शिक्षण - डीएड*

कालावधी - दोन वर्षे

प्रवेश - सीईटी आवश्‍यक

संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक

पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड

----------------------------------------

*शिक्षण* - बीबीए, बीसीए, बीबीएम

कालावधी - तीन वर्षे

प्रवेश - सीईटी

संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा 

पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए


----------------------------------------

*फॉरेन लॅंग्वेज*

(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज, जॅपनीज, कोरियन)

कालावधी :- बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर कोर्सेसवर आधारित

----------------------------------------

*फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.*

अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.

विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.

उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.


अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.


अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.


इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.


काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.

बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.

×+×+×+×+×+×+×+×+×+×


*काही महत्त्वाची संकेतस्थळे*

०१) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.

(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)

www.dte.org.in


०२) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)

www.dmer.org


०३) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)

www.dvet.gov.in


०४) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ

www.unipune.ac.in


०५) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 

आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)

www.iitb.ac.in


०६) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण

www.aipmt.nic.in


०७) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)

www.upsc.gov.in

बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवर घेणेत आलेल्या आक्षेपांच्या सुनावणीबाबत.

 • शिक्षणाधिकारी यांचे सर्व ग.शि.ना.आदेश...

 • विषय :- सन २०२४ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करणेबाबत बदलीपात्र शिक्षकांच्या यादीवर घेणेत आलेल्या आक्षेपांच्या सुनावणीबाबत.
  • संदर्भ :- १. इकडील पत्र क्रं. कोजिप/शिक्षण/कावि-१९/जिल्हातंर्गत बदली/२०२४ दिनांक १४/५/२०२४
  • उपरोक्त संदर्भित विषयास अनुसरुन, सन २०२४ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करणेबाबत संवर्ग १, संवर्ग २, संवर्ग ३ व संवर्ग ४ च्या याद्या प्रसिध्द करणेत आल्या असून सदर याद्यावर शिक्षकांचे आक्षेप असतील तर सदरचे आक्षेप या कार्यालयाकडे सादर करणेबाबत कळवणेत आले होते.
  • त्यानुसार सर्व गटस्तरावर अमान्य केलेले व जिल्हा स्तरावर सादर केलेले एकूण ४५ आक्षेपांची यादी या कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. अमान्य केलेले व जिल्हा स्तरावर सादर केलेले आक्षपांची सुनावणी दिनांक ३/६/२०२४ रोजी दूपारी ३.०० वाजाता आयोजित करणेत आली होती.
  • सुनावणी अंती सदर आक्षेप जिल्हास्तरावर मान्य/अमान्य करणेत आले असून सोबत यादी जोडली आहे. अमान्य करणेत आलेले आक्षेपाबाबत संबंधितांना दिनांक १०/६/२०२४ रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दाद मागता येईल. मा. मु. का. अ. यांचेकडे दाद मागणारे शिक्षकांची कागदपत्रे ग. शि. अ. यांनी एकत्रितपणे या कार्यालयाकडे दि. १०/०६/२०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सादर करावीत.


  राजस्थानमध्ये सक्तीने निवृत्ती लागू | vrs in rajsthan |

   विषय:- राजस्थान नागरी सेवा (पेन्शन) नियम 1996 च्या नियम 53 (1) अंतर्गत सक्तीच्या निवृत्तीबाबत.

  दि. 21.04.2000 रोजीचे परिपत्रक आणि कार्मिक (A-1/Go.P.) विभागाने जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो, ज्याद्वारे, राजस्थान नागरी सेवा (पेन्शन) च्या नियम 53 (1) नुसार ) नियम, 1996, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांची 15 वर्षे किंवा वयाची 50 वर्षे, यापैकी जे आधी असेल ते पूर्ण केले आहे आणि त्यांच्या आळशीपणा, संशयास्पद सचोटी, अक्षमता आणि अकार्यक्षमतेमुळे सार्वजनिक हितासाठी त्यांची उपयुक्तता गमावली आहे किंवा कामाची असमाधानकारक कामगिरी तीन महिन्यांची नोटीस देऊन किंवा त्याच्या जागी तीन महिन्यांचे वेतन आणि भत्ते देऊन तात्काळ प्रभावाने कमी केले जाऊ शकते.


  अनिवार्य सेवानिवृत्तीची कार्यवाही वित्त (नियम) विभाग परिपत्रक क्र. 15(3) F.D. / नियम/99 दिनांक 03.12.2002 आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचा आदेश 6 (9) AR/ कलम-3/2001 दिनांक 17.05.2018 आणि कार्मिक विभागाचे परिपत्रक क्रमांक 13 (53) कार्मिक/A-1/Go.P./06 दिनांक 19.04.2006, विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अनिवार्य सेवानिवृत्तीची कार्यवाही केली जाऊ शकते.


  सर्व प्रशासकीय विभाग आणि विभाग प्रमुखांना वरील आदेशानुसार सर्व राज्य सेवेतील अधिकारी/कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे आणि सक्तीच्या सेवानिवृत्तीची प्रक्रिया विहित मुदतीत सार्वजनिक हितासाठी पूर्ण झाल्याचे सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मर्यादेनुसार बिंदूनिहाय अद्यतनित माहिती विभागाला महिनावार पाठविण्याचे सुनिश्चित करा.


  अनिवार्य सेवानिवृत्तीशी संबंधित प्रक्रिया/वेळ सारणी, मार्गदर्शक तत्त्वे आणि विविध परिपत्रके वरीलप्रमाणे जोडलेली आहेत.

  पदवी अभ्यासक्रम तीनऐवजी चार वर्षे कालावधीचे|graduaction courses ba bcom bsc|

  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार(NEP) आता पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रमाच्‍या रचनेत बदल होत आहे. त्‍यानुसार आता पारंपरिक पदवी अभ्यासक्रम तीनऐवजी चार वर्षे कालावधीचे असणार आहेत.

  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हा बदल लागू राहणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कला, वाणिज्‍य व विज्ञान महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांना यासंदर्भात माहिती कळविली आहे. (BSc, BCom and BA )

  सर्वसामान्‍य पालक व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील या बदलांविषयीची माहिती करून द्यावी, अशा सूचना परिपत्रकातून प्राचार्यांना देण्यात आल्‍या आहेत. परिपत्रकात नमूद केल्‍यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्‍नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.


  सर्वसामान्‍य पालक व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील या बदलांविषयीची माहिती करून द्यावी, अशा सूचना परिपत्रकातून प्राचार्यांना देण्यात आल्‍या आहेत. परिपत्रकात नमूद केल्‍यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने विद्यापीठाशी संलग्‍नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.


  विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्‍या निर्णयानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. मंडळाच्‍या मान्‍यतेसह चार वर्षांचे पदवी स्‍तरावरील अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सर्व संलग्‍नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात येत आहेत. याआधीच विविध व्‍यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षांचा आहे. 

  इ. १ ली प्रवेशास या तारखा असणार वय निश्चितीच्या...

  आता पदवी अभ्यासक्रमदेखील तीनऐवजी चार वर्षांसाठीचे असणार आहेत.


  ग्रॕच्युइटी वाढसह महागाई भत्ता ५०%|employee gratuity increase da hike|

  केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी....


   सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभाग आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाचा महत्त्वाचा आदेश.... 


   दिनांक 30.05.2024


  विषय:

   केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा वाढवून महागाई भत्ता दर ५०% पर्यंत पोहोचवणे, सातव्या CPC-reg च्या शिफारशींची अंमलबजावणी.

  निवृत्ती वेतन/कौटुंबिक निवृत्तीवेतन/अपंगत्व निवृत्ती वेतन/पूर्व-निवृत्ती वेतन/ग्रॅच्युईटी/कम्युटेशनचे नियमन करणाऱ्या तरतुदींच्या सुधारणांबाबत या विभागाच्या OM क्रमांक 38/37/2016-P&PW (A) (i) दिनांक 04.08.2016 चा संदर्भ घेण्याचे अधोस्वाक्षरीचे निर्देश आहेत. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवर सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना एकरकमी भरपाई इ.


  2. खर्च विभागाने त्यांच्या OM क्रमांक 1/1/2024-E-II(B) द्वारे दिनांक 12.03.2024 जारी केले आहे. 1 जानेवारी 2024 पासून मूलभूत वेतनाच्या 46% वरून 50% पर्यंत महागाई भत्त्याचे दर वाढवण्याबाबत सूचना.


  3. त्यानुसार, सातव्या सीपीसीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीमध्ये सरकारच्या निर्णयानुसार, केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 अंतर्गत सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा किंवा केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय अंतर्गत ग्रॅच्युइटीचे पेमेंट) पेन्शन सिस्टीम) नियम, 2021, 1 जानेवारी 2024 पासून 25% ने वाढवले ​​जातील, म्हणजे 20.00 लाख रुपयांवरून 25.00 लाख रुपये.

  4. सर्व मंत्रालये/विभागांना विनंती करण्यात येते की त्यांनी या आदेशातील मजकूर लेखा/वेतन आणि लेखा कार्यालये आणि त्यांच्या अंतर्गत संलग्न किंवा अधीनस्थ कार्यालयांच्या नियंत्रकाच्या निदर्शनास आणून द्यावा.


  5. आयडी टीप क्रमांक 1(8)/EV/2024 दिनांक 27.05.2024 द्वारे वित्त मंत्रालय, खर्च विभाग यांच्याशी सल्लामसलत करून ही समस्या


  6. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागामध्ये सेवा करणाऱ्या व्यक्तींचा संबंध आहे, हा आदेश भारतीय राज्यघटनेच्या कलम 148(5) अंतर्गत अनिवार्य केल्याप्रमाणे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्याशी सल्लामसलत करून जारी केला जातो.


  7. सीसीएस (पेन्शन) नियम, 2021 आणि सीसीएस (एनपीएस अंतर्गत ग्रॅच्युइटीचे पेमेंट) नियम, 2021 मध्ये औपचारिक सुधारणा स्वतंत्रपणे अधिसूचित केल्या जातील.
  विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली|teacher transfer|

   शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा...

   राज्यातील विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली करता येणार आहे. यासाठी ८ जून २०२० ची नियमावलीतील सुधारणा व १ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार बदल्या होणार आहेत. न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ रोजी नियमबाह्य विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तुकड्यांवरून अंशतः अनुदानित, अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश दिला आहे. 

  Teachers transfer


  महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेसह इतर शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे.

   सरकारने ८ जून २०२० च्या सुधारणांच्या माहितीचा शासन निर्णय तब्बल दहा महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी काढला व अंमलबजावणी ८ जून २०२० पासून करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ रोजी नियमावलीतील सुधारणांना व १ मार्च २०२१ च्या शासन निर्णयाला स्थगिती देणारा अध्यादेश काढला. उच्च न्यायालयाने १ डिसेंबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे विनाअनुदानवरून अनुदानितवर बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याने यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.


  उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालये यांची संचमान्यता आॕफलाईन...

  उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत

   सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता अनुदानित व अंशतः अनुदानित (२० टक्के व ४० टक्के) उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करणेबाबत..

   सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पध्दतीने करण्याबाबत दि.१६.०२.२०२४ च्या बैठकीमध्ये सुचित करण्यात आलेले आहे.

  त्यानुषंगाने संच मान्यतेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. आपल्या जिल्हयातील तालुक्यांच्या दिनांका दिवशी आपण सकाळी १०.३० ते ६.०० यावेळेत उपस्थित राहुन आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता करुन घ्यावी.

  टप्पा क्रमांक :-१

  १. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (माध्यमिक) जिल्हा परिषद पुणे/अहमदनगर/सोलापूर यांनी दिनांक ०७.०३.२०२४ पर्यंत आधार व्हॅलीड संख्येनुसार करण्यात यावी.

  टप्पा क्रमांक :- २

  १. संच मान्यतेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबधित जिल्हयाच्या सहा. शिक्षण उपनिरिक्षक

  यांच्याकडुन शासन निर्णयामध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अद्ययावत केलेले जनरल रजिस्टर प्रमाणे तपासून घ्यावीत. व त्याचे प्रमाणपत्र संबधित सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावा सोवत सादर करावेत. २

  . सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी शाखानिहाय तुकडीनिहाय तपासलेली विद्यार्थी संख्या आणि सरल प्रणालीमध्ये नमुद केलेली विद्यार्थी संख्या एकसारखी असणे आवश्यक आहे.

  ३. संच मान्यतेसांवत शेक्षणिक वर्ष २०१३-१४,२०२१-२२ व २०२२-२३ ची संच मान्यतेची प्रत सादर करावी.

  ४. कनिष्ठ महाविद्यालयाचे शाखानिहाय वेळापत्रक सादर करावे,

  ५. विद्यार्थी निहाय/विषय निहाय शिक्षकांना दिलेला कार्यभाराचा तक्ता शिक्षकांच्या नावांनिशी व प्रकारानिशी सादर करावा. (परिशिष्ट-अ). (सोबत विहित नमुना जोडलेला आहे).

  ६. माध्यमिक विभागाकडील कार्यभार देऊन उच्च माध्यमिककडील पदे पुर्णवेळ करु नयेत, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विभागाकडील कार्यभार माध्यमिक विभागाकडे देऊ नये.

  ७. प्रस्तावा सोवत विद्यार्थी संख्या (सरल प्रणाली २०२३-२४ च्या हार्ड कॉपीसह सादर करावी, त्याशिवाय संच मान्यता केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

  ८. सन २०२३-२४ च्या संच मान्यतेसाठी सरळ प्रणालीमधील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या धरुनच संचमान्यता करण्यात येणार असल्याने ऑनलाईन आधार व्हॅलिड रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे.

  ९. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची संच मान्यता बाबत, कॉलेज निहाय डाटा व सांख्यिकी माहिती शासनास हवी असल्यामुळे प्रत्यक्ष शिबीराच्या ठिकाणी संगणकावर ऑनलाईन माहिती भरुन त्यानंतरच संच मान्यता प्रत प्रिन्ट काढावी. त्याकरिता आवश्यक ती सर्व माहिती घेऊनच उपस्थित रहावे.

  १०. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संस्थेचे कार्यरत असलेले संचालक मंडळ त्यांचा कार्यकाल, व मा.धर्मादाया

  आयुक्त, यांचे परिशिष्ट अ चो साक्षांकित प्रत / बदल अहवाल (चेंज रिपोर्ट) प्रत सादर करावी. ११. शैक्षणिक वर्ष २०२३ ३ चोच्या पूर्णवेळ/अर्थवेळ/प्र.प.ता नियुक्तीवायत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचार्य यांनी सादर करावे.

  १२. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुर्णवेळ / अर्थवेळ/प्र.घ.ता नियुक्तीबाबत कोणताही याद/न्यायालयीन प्रकरण सुरु असल्यास प्रकरण नियुक्ती/नियुक्ती रद्द करणेबाबत / संचालक मंडळातील यादायावत आहे याची थोडक्यात माहितीची प्रत सादर करावी

  १३. संस्थेत बाद असल्यास सादर केलेल्या प्रस्तावातील सर्व माहिती ही बिनचूक / बरोबर असल्याबाबत

  प्राचार्य यांनी हमीपत्र सादर करावे, त्याचप्रमाणे संस्थेतील बादामुळे प्राचार्य यांनी त्यांच्या अधिकारात

  केलेल्या सर्व नियुक्त्यांवावत प्राचार्य व्यक्तिशः जवाबदार असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. १४. प्राचार्य यांनी सादर केलेल्या माहितीबाबत भविष्यात काही न्यायालयीन प्रकरण/तक्रारी उद्भवल्यास त्यार प्राचार्य व्यक्तिशः जवाबदार असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.

  १५. शिवीराच्या ठिकाणी ऑनलाईन पध्दतीने तयार केलेली संच मान्यता प्रत तपासल्यानंतरच अंतिम प्रती ०४८ काढण्यायावत आदेशित केले जाईल. (पटपडताळणी व संच मान्यतेसाठी ३० सप्टेंबर २०२३ ची विद्यार्थी संख्या ग्राहय धरावी)

  १६. माहे फेब्रुवारी २०२४ पेड इन मार्च २०२४ चे वेतन देयकाची प्रत सोबत आणावी. तसेच खालील प्रपत्र अस मधील माहिती अचूक भरुन प्राचायांनी त्यांची पडताळणी करुन स्वाक्षरी व शिक्यासह सादर करावी.
  १० वी नंतर डिप्लोमा प्रवेश | diploma course after 10th|

   अभियांत्रिकी, तंत्रज्ञान पदविका प्रवेशप्रक्रिया जाहीर....

  अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून; अंतिम गुणवत्ता यादी २ जुलैला होणार प्रदर्शित... (diploma admission)

  दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, तसेच वास्तूकला प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवारपासून ता. २९ मे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जून रोजी, तर अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

  शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी तीन वर्षे कालावधीच्या पूर्णवेळ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वास्तूकला पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित आणि खासगी विनाअनुदानित पदविका शैक्षणिक संस्थांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशासाठी ई-स्क्रूटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटीनी याद्वारे नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे. अशा पात्र नोंदणीकृत विद्यार्थ्यांना 'कॅप' अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी विचारात घेण्यात येणार आहे. तसेच 'कॅप'व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे, या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत (कट ऑफ) सुरू ठेवल्या जाणार आहेत.

  diploma


  प्रत्यक्ष स्क्रूटीनी पद्धतीसाठी सुविधा केंद्रांची यादी संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही केंद्रे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली.


  विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना 

  राज्यमंडळामार्फत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना शैक्षणिक पात्रता तपशीलात स्वतःचा परीक्षा आसन क्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण करावा, राज्य मंडळातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले गुण राज्य मंडळाकडून थेट घेण्यात येतील आणि ते संबंधित विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये दर्शविण्यात येतील.

  प्रवेशाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे


  ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे.

  कालावधी

  २९ मे ते २५ जून


  कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे


  २९ मे ते २५ जून


  विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २७ जून


  तात्पुरत्या यादीवर तक्रार व हरकती नोंदविणे  २८ ते ३० जून


  अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. २ जुलै


  अर्ज सादर करण्यासाठी सुविधा - 

  संकेतस्थळ : 

  https://poly24.dtemaharashtra.gov.in/


  - मोबाइलवर 'DTE Diploma Admission' हे अॅप डाऊनलोड करून अर्ज भरता येईल  इयत्ता पहिलीत प्रवेश वय|1st standard admission age|

   

  इयत्ता पहिलीत प्रवेश...वाचा नर्सरी ते इयत्ता पहिली पर्यंत प्रवेशासाठी आवश्यक वयोमर्यादा...   शिक्षणाचा हक्क अधिकार कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुला मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण अनिवार्य केले गेले असून या वयोगटातील बालकांवर अभ्यासाचा किंवा इतर शैक्षणिक गोष्टींचा जास्तीचा ताण येऊ नये याकरिता 31 डिसेंबर 2024 रोजी ज्या बालकांचे वयाचे सहा वर्ष पूर्ण होणार आहेत अशा बालकांना यावर्षी पहिलीमध्ये ऍडमिशन करता येणार आहे.

  १ ली प्रवेश नंतर पहिल्याच दिवशी आनंदी बालके


  सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अशा बालकांना आता दाखल पात्र म्हणून समजण्यात येईल. विशेष म्हणजे आरटीईनुसार बघितले तर अशा बालकांना शाळेत दाखल करून घेण्याची मुख्य जबाबदारी ही संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असणार

  आहे.कारण जर आपण पाहिले तर कमी वयामध्ये जर विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश केला गेला तर त्यावर शैक्षणिक गोष्टींचा अभ्यासाचा जास्त ताण येतो

  व त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासूनच ते वंचित राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे केंद्र सरकारने शैक्षणिक सत्र 2024-25 करिता इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सहा वर्ष कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता त्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना खाजगी असो किंवा शासकीय शाळा असो त्यामध्ये प्रवेश देता येणार आहे.

  कोणत्या कालावधीत जन्मलेल्या बालकांना यावर्षी 

  मिळेल   पहिलीत प्रवेश?

  या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देताना सर्व शाळांना एक जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत ज्या बालकांचा किंवा ज्या मुलांचा जन्म झालेला आहे त्यांनाच यावर्षी पहिलीत प्रवेश देता येणार आहे. कारण या कालावधीप्रमाणे 31 डिसेंबर 2024 पूर्वी संबंधित विद्यार्थी हे सहा वर्षाचे होतील व त्यांना पहिलीत प्रवेश देता येणे शक्य आहे.

  नर्सरी ते इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळण्याचे वय -

  1- नर्सरीकरिता वयाची तीन वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

  2- जूनियरकेजीकरिता वयाचे चार वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

  3- सिनियरकेजीकरिता वयाची पाच वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

  4- इयत्तापहिलीकरिता 31 डिसेंबर २०२४ पर्यंत वयाचे सहा वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे.

  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

  जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

  10 वी निकाल ssc result | sscresult 10th result|

  आता दहावीच्या निकालाची (10th result) तारीखही जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २७ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येईल.

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे घोषणा केली. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

  10 th result


  विद्यार्थ्यांना पुढील वेबसाईटवर निकाल पाहता येणार :

  https://mahresult.nic.in

  http://sscresult.mkcl.org

  https://results.digilocker.gov.in

  https://results.targetpublications.or


  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

  जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

  जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

  अतिशय प्रेरणादायी  नक्कीच वाचा...

  इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश |Maharashtra Education News|

   

  Maharashtra Education News: राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमाबाबत (School Syllabus) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार इयत्ता तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात भगवत गीता (bhagavad gita) आणि मनाचे श्लोक (manache shlok) यांचा समावेश करण्यात येणार आहे. भाषा विषयात यांचा समावेश करण्यात येणार आहे.

  महाराष्ट्रात अनेक माध्यमांच्या शाळा आहेत. आपल्या मुलांना परंपरेची ओळख करुन त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत सरकारने आक्षेप आणि सूचना मागविल्या आहेत. SCERT ने (State Council of Educational Research & Training) विद्यार्थ्यांना भगवत गीता आणि मनाचे श्लोक यांचा पाठ करायला लावावे असे सूचवले आहे.  SCERT ने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला होता. या आराखड्यामध्ये विद्यार्थ्यांना (Student) देशाची परंपरा आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी मनाचे श्लोक आणि

  भगवत गीतेचा बारावा अध्याय पाठ करायला लावावा असे एससीईआरटीने सुचविले होते. त्यानुसार आता इयत्ता 3 री ते 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 1 ते 25 मनाचे श्लोक, 6 वी ते 8 वी साठी 26 ते 50 मनाचे श्लोक आणि 9 वी ते 12 वीसाठी भगवत गीता पाठांतराची स्पर्धा आयोजित करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. भगवत गीतेमधील बारावा अध्याय विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी द्यावा असे सांगितले आहे.

  भगवत गीता हा धार्मिक ग्रंथ आहे. तो शाळांमध्ये शिकविण्यावरुन आता विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेकांचा विरोध होऊ शकतो.

  आराखड्या नमूद केले आहे की...

  भारतीय ऋषींची दिनचर्या, भगवतगीतेतील ज्ञानयोग, आत्मयोग, गुरुशिष्य परंपरा, ऋषींचा आहार कसा होता याची ओळख विद्यार्थ्यांना करुन द्यावी. तसेच भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश गणित व विज्ञान विषयात करावा असे एससीईआरटीने जाहीर केलेल्या आराखड्यात म्हटले आहे.

  अतिशय प्रेरणादायी नक्कीच वाचा...

  जिद्द अशी की नशीबी आलेल्या परिस्थितीवर मात|motivational|

   जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरापेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी...


  जन्मतः अंध असल्याने आई- वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा पेटीत टाकून दिले होते. मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षेत यश मिळविले आहे. विषम परिस्थितीला तोंड देत जिद्दीने अभ्यास करीत माला ही एमपीएससीच्या 'लिपिक 'गट क' मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

  साधारण २० वर्षांपूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला ही जळगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती. पोलिसांनी आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध घेतला. परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांडहोम मध्ये दाखल करण्यात आले. तेथे दिव्यांगाच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशान्वये पोलीसांनी तिला वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले. शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारुन माला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले. त्या आधारे तिचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रहिवासी दाखला, इत्यादी कागदपत्राची पुर्तता करुन तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अनाथ, बेवारस, दिव्यांग १२५ मुला-मुलींसोबत बालगृहात मालाचा जीवनप्रवास सुरू झाला. जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले.
  येथील विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी परीक्षा २०१८ मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पदवी आणि पदव्यूत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्रा. प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली. २०१९ पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू झाली. येथील युनिक अकेडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एमपीएससी परीक्षेची तयार केली.

  तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक (टंकलेखक) परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला एवढ्यावरच थांबायचे नाहीतर युपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे.  निवृत्त शिक्षकांना का? करावे लागले आंदोलन....

  राज्यात rte घोटाळा |rte scam|

   राज्यामध्ये RTE घोटाळा....

  गरजू वंचित आणि दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शासनाने आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरु केली. मात्र याच आरटीई योजनेचा गैरवापर करून आपल्या मुलांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून खोटी कागदपत्रं जमा करून वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  Rte घोटाळा
  Rte घोटाळा 


  नागपुरात जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स बनवून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटीई अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सिताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरु करण्यात आला.

  प्रत्येक शाळेत निवडक जागा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र, याच जागांवरील प्रवेशात मोठा घोळ केला जात असल्याचे नागपुरात समोर आले आहे.या योजनेअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय केली आहे.

  मात्र नागपुरात 'आरटीई रॅकेट'सक्रिय असल्याचे समोर आले. आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना पालक बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती.पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात 17 पालकांविरोधात तर सदर पोलीस ठाण्यात 2 पालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

  जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

  जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

  जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक यांच्या मागण्या सी.ई. ओ. ना सादर |teachers protest|

  जि.प. सेवानिवृत्त शिक्षक थेट धडकले मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.अमरावती यांच्या दालनात....


            जि.प. अमरावती मधील सेवानिवृत्त शिक्षक आपल्या प्रलंबित मागणी साठी दिनांक 6 मे 2024 वार सोमवारला  आपल्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्ते रक्कम सह इतर मागणी साठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती यांची भेट घेतली असता. मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासना कडून मिळाल्यावरही प्रशासनाकडून सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम न मिळाल्यामुळे इतर मागणी सह आज दिनांक 20 मे 2024 वार सोमवारला सेवानिवृत्त शिक्षक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प. अमरावती यांच्या दालनात मोठ्या प्रमाणात धडकले होते.  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी मा. शिक्षणाधिकारी साहेब , जि.प. अमरावती यांना त्वरित सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्याचे आदेश दिले असून 24 मे 2024 वार गुरुवारला  सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्या खालील प्रमाणे होत्या.

  प्रमुख मागण्या या होत्या....

  1) सेवा निवृत्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम त्वरीत वितरीत करण्यात यावी. 

  2) सेवानिवृत्त शिक्षकांच्या  सातव्या वेतन आयोगाच प्रलंबित हप्ते रक्कम परत गेल्याने काही सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते रक्कम मिळणार नाही . अशा सेवानिवृत्त शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या हप्ते रक्कम मागणी त्वरीत करून लवकरात लवकर वंचित राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रक्कम मिळण्यात यावे .

  3) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना गटविमा योजना रक्कमेच्या लाभापासून वंचित आहेत . त्यांना त्वरीत गटविमा योजनेचा लाभ त्वरीत मिळण्यात यावा. 

  4) सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यात एक तारखेस मिळण्यात यावे.

  5) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांची उपदान रक्कम मिळाली नाही. करीता उपदान रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.

  6)अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी मिळाली नाही.त्यांना सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती नंतरची भविष्य निर्वाह निधी रक्कम त्वरीत उपलब्ध करून द्यावी.

  7) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना 1  जुलै ची काल्पनिक वेतन न लागून त्यांना वेतन वाढ फरकाची रक्कम मिळाली नाही. त्यांना त्वरीत वेतनवाढ फरकाची थकबाकी रक्कम मिळण्यात यावी.

  8) अनेक सेवानिवृत्त शिक्षकांना महागाई भत्याची एरीअर्स रक्कम मिळाला नाही. त्यांना महागाई भत्याची एरीअर्स त्वरीत मिळण्यात यावा.

  9) प्रत्येक पंचायत समिती स्तरावर प्रत्येक महिन्यात निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालत चे आयोजन करण्यात याव.   याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.  10) प्रत्येक महिन्यात जिल्हा स्तरावर निश्चित कोणत्याही एक तारखेस सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात यावे. त्याबाबत लेखी पत्र काढण्यात यावे.

  11) मा . शिक्षपाधिकारी (प्राथमिक विभाग ) जि .प . अमरावती यांच्या कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम हे एकाच टेबलावर आहे. पण जिल्हातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक या दोघांचे काम सांभाळण्यासाठी वेगवेगळे क्लार्क आहेत . त्याच प्रमाणे मा.शिक्षणाधिकारी कार्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी एक वेगळ्या क्लार्क ची व्यवस्था करावी . कार्यरत शिक्षकांचे काम सांभाळण्यासाठी दुसऱ्या क्लार्क ची व्यवस्था करावी सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांचे काम एकाच क्लार्क कडे देण्यात येवू नये . त्यामुळे कामाचा गोंधळ निर्माण होत आहे .

  12) जि . प . शिक्षक यांना सेवानिवृत्ती च्या दिनांकास सेवानिवृत्ती चे सर्व लाभ मिळणे बाबत .


       जिल्हा प्रशासनाने सेवा निवृत्त शिक्षकांच्या वरील समस्या न सोडविल्यास जिल्हातील जि .प . सेवानिवृत्त शिक्षक दि 30 मे 2024 वार गुरुवारला जिल्हा परिषद अमरावती समोर सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन सत्याग्रह करतील . मा . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब , जिल्हा परिषद , अमरावती यांनी दि 24 मे 2024 ला सभेचे आयोजन करून सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे . आजच्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर समश्या मांडण्या करीता सत्येंदु अभ्यंकर सर, प्रभाकर देशमुख सर, विनोद कुऱ्हेकर सर, श्याम पाटील सर, ॲड .सौ .निता प्रफुल्ल कचवे मॅडम , सौ अश्विनी देशमुख मॅडम, श्रीमती शोभा मेहरे मॅडम ,अजमत उल्ला खान सर, मिलींद लबडे सर, अरविंद महल्ले सर, वासुदेव रेचे सर ,प्रकाश डोंगरे सर, मुनेश्वर उमप सर, कु सुनंदा चांगोले मॅडम , मनोहर चर्जन सर, जावेद अहमद खान सर, प्रशांत गुल्हाणे सर, हरी कपले सर, अरुण धांडगे सर, साहेबराव काळेमघ सर, प्रमोद डहाणे सर, चंद्रकांत शंके सर , राजेंद्र खरकाळे सर, सौ अनिता कापडे मॅडम , सुरेश रायपुरे सर, दिनेश कनेटकर , भास्कर गजभिये सर, संदीप मेहरे सर , राहुल शेंडे सर, उद्धव दहाट सर , . डि. व्ही. राऊत सर , रणजीत नितनवरे सर , रामचंद्र गजभीये सर, सौ कुल्हे मॅडम , सौ . नलिनी लंगटे मॅडम , सुनंदा गोहत्रे मॅडम, शालीनी नागपुरे मॅडम , दिपक मुळे सर , राजु खरकर सर , पुंडलीक वितोंडे सर, देविदास उमप सर, मो . शकील मो रहेमान सर, आर . बी . नितनवरे सर, सौ . इंद्रकला गजभीये मॅडम , मसुद अहमद सर , आर एन . पापळीकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , धनराज साखरे सर, विलास गावनेर सर, निरंजन राऊत सर, संजय कुकटकर सर , सुरेंद्रनाथ वाडेकर सर , अनिल ढोके सर , दिलीप चौधरी सर , सुरेश राहाटे सर , राजु भाकरे सर व शेकडो सेवानिवृत्त शिक्षक हजर उपस्थित होते .

  शिक्षण क्षेत्रातील घडामोडी....

  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व संपुष्टात....

  जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....

  जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....


  वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत महत्त्वाचे

   वरिष्ठ वेतन श्रेणीतील त्रुटी बाबतच्या न्यायालयीन निर्णयाच्या...

   कोर्टाच्या अवमान बाबतची कार्यवाही  करण्यात येऊ नये सचिवस्तरावरून औरंगाबाद खंडपीठ येथे त्याबाबतचे पत्र सादर करण्यात आले आहे.

  वेतनत्रुटीबाबतचा प्रस्ताव दि.०६.०५.२०२४ रोजी अध्यक्ष, वेतनत्रुटी निवारण समिती, वित्त विभाग यांचेकडे सादर करण्यात आला आहे.

  तरी सदर प्रकरणी मा. न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येवू नये, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे.


  जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात असलेल्यांना लागूबाबत कार्यवाही पहा....

  जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सविस्तर माहिती....