*चला सोपा करूया परिपाठ*
*संकल्पना व लेखक*
*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*
मोबाईल नंबर 9130958046
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
तारीख - ७ फेब्रुवारी २०२३
वार- मंगळवार
तिथी-माघ कृष्ण २ शके १९४४
अयन-उत्तरायण
ऋतू - शिशिर ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना " रज्जब"
पारशी महिना शेहरेवार
Today's almanac
Date - 7 February 2023
Tuesday
Tithi-Magh krushna 2
Shaka 1944
Ayana-Uttarayana
Ritu - Shishir Ritu(Autumn season)
"Rajjab" month of Muslims
Parsi month Shehrewar
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सूर्योदय 7.01
सूर्यास्त 6.24
दिवस कालावधी 11 तास 22 मि.38 से.
चंद्र अस्त:-8.07
चंद्र उदय:-19.49
प्रदीपन. 98.8%
चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 404518 km
Sunrise 7.01 Am
Sunset 6.24Pm
Day duration 11 hrs 22 min 38 sec.
Moonset:-8.07
Moon rise:-19.49
Illumination 98.8%
Distance between moon and earth 404518 km.
🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙
सुविचार
*यशाला चकाकी तेव्हाच मिळते, जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असतो.*
Good thought
*Success shines only when the foundation of effort is strong.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दिनविशेष
जागतिक दिवस:
वन अग्नि सुरक्षा दिवस.
१९७४ ’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१८९८: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचा जन्म.
special day
World Day:
Forest Fire Safety Day.
1974 Independence Day of Grenada
1971: Women get the right to vote in Switzerland.
1898: Birth of Ramabai Ambedkar, wife of Dr. Babasaheb Ambedkar.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजची म्हण व अर्थ
खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कोडे
पानाचे ठेवले पदरावर पदर
बेसनाच्या सारणाची त्यामधे भर
चवीला हवा , चिंचेचा गर
वाफवुन तळा भरभर .......?
उत्तर अळू वड्या
############################
सामान्य ज्ञान
1) तुळजापूर हे तुळजाभवानीचे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर:- उस्मानाबाद
2) महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
उत्तर:-पैठण
3) महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागात आहेत?
उत्तर:- औरंगाबाद
4) शिर्डी हे साईबाबांचे धार्मिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर:- अहमदनगर
5) महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
ऊत्तर:- अरबी समुद्र.
General knowledge
1) In which district Tuljapur is the religious place of Tuljabhavani?
Answer:- Osmanabad
2) Which place is known as Dakshin Kashi of Maharashtra?
Answer:- Paithan
3) Which division has maximum number of districts in Maharashtra?
Answer:- Aurangabad
4) In which district is Shirdi, the religious site of Sai Baba?
Answer:- Ahmednagar
5) Which sea is west of Maharashtra?
Answer:- Arabian sea.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बोधकथा
*(जिल्हा परिषदेचे उद्याच्या परिपाठातील मूल्य आणि बोधकथा pdf प्राप्त न झाल्या मुळे ही बोधकथा तात्पुरती दिली आहे. उद्या सकाळी pdf मिळाल्यास त्यातलीच बोधकथा घ्यावी ही नम्र विनंती.)*
सशांना नेहमीच घाबरून जगावं लागतं.
कुठल्याही शिकाऱ्याची चाहुल लागली कि जीव मुठीत घेऊन पळत सुटावं लागतं.
असं सतत घाबरण्याला ससे एक दिवस कंटाळले.
सगळ्यांनी मिळुन ठरवलं कि आपण आता हे जंगल सोडुन जाऊया.
अशी जागा शोधूया जिथे आपल्याला कोणाला घाबरून राहावं लागणार नाही.
सगळे दुडूदुडू पळत निघाले.
पळता पळता ते नदीकाठी आले.
तिथे बेडुक बसलेले होते.
अचानक एवढे ससे पळत आल्यामुळे बेडुक दचकले आणि टणाटण पाण्यात उड्या मारायला लागले.
त्या बेडकांना पाहुन एक ससा थबकला.
त्याने विचार केला आपण लहान प्राणी म्हणुन सगळ्यांना घाबरत पळतो.
पण हे बेडूक आपल्यापेक्षाही लहान आहेत आणि ते आपल्याला घाबरत आहेत.
म्हणजे सगळ्यांना घाबरणाऱ्या आपल्यासारख्यानाही घाबरणारे कोणीतरी आहेत.
याचा अर्थ जिथे कोणी कोणाला घाबरणार नाही अशी जागा नाहीच.
आपल्याला सावध राहणं हाच एक मार्ग आहे.
त्याने हा विचार सर्वांना सांगितला आणि त्यांनी जंगल सोडण्याचा विचार रद्द केला.
बोध:- बोध:- परिस्थितीला घाबरून जगण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा सामना करत जगावे आणि संकटांचा न घाबरता सामना करावा.
Moral
Bodh:- Rather than living in fear of the situation, one should live facing the situation and face the difficulties without fear.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Rabbits always have to live in fear.
Any hunter has to run away with his life in hand.
One day the rabbits got tired of this constant fear.
Everyone decided together that we should leave this forest now.
Let's find a place where we don't have to be afraid of anyone.
Everyone ran away.
Running they came to the river.
Frogs were sitting there.
Suddenly, because so many rabbits ran, the frogs started jumping into the water.
Seeing those frogs, a rabbit started thinking.
He thought that as we are small animals, we run scared of everyone.
But these frogs are even smaller than us and they are afraid of us.
It means that everyone is afraid of others who are afraid of us.
It means that there is no place where no one is afraid of anyone.
One way is to be careful.
He shared this idea with everyone and they canceled the idea of leaving the forest.
English words
School community
Learning लर्निंग शिकणे
Classmate क्लासमेट वर्गमित्र
Primary school प्रायमरी स्कुल प्राथमिक शाळा
School yard. स्कूल यार्ड शाळेचे आवार
Pupil प्युपिल विद्यार्थी
(गेले 3 दिवस आपण school community बद्दल शब्द घेत आहोत.रोज 5 शब्द या प्रमाणे केले तर खुप दिवस लागतील.या उलट जर आपण विद्यार्थ्यांना या विषयाशी संबंधित जास्तीत जास्त शब्द शोधण्याचे आव्हान दिले तर हे काम अधिक गतीने होईल.तर चॅलेंज मुलांना द्या.आणि मुलांनी दिलेला प्रतिसाद पहा.शक्य झाले तर मला देखील कळवा🙏)
Wish you all Happy Tuesday💐💐