डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
मोफत गणवेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मोफत गणवेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मोफत गणवेश वाटपास उपयुक्त

 मोफत शालेय गणवेशासाठी उपयुक्त असलेले संपूर्ण फाईल आज आपणासाठी डिजिटल स्कूल समूहावर देत आहोत.

 या फाईल मुळे आपल्याला गणवेश खरेदी प्रक्रियेतील संपूर्ण फॉर्म उपलब्ध होणार असून याचा फायदा आपल्या रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी होणार आहे. एकच फाईल मध्ये आपल्याला संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येणार असून आपल्याला गणवेश करीत प्रक्रिया सुलभ करता येणार आहे.

 डिजिटल स्कूल ग्रुप महाराष्ट्र या शैक्षणिक ब्लॉगला आपण फॉलो करावे जेणेकरून आपल्याला वेळेवर विविध माहिती उपलब्ध होत जाईल .

एकमेव शैक्षणिक शाळा केंद्रित असे हे ब्लॉग आहे. ही  फाईल खालील टॕबला क्लिक करून डाऊनलोड करू शकतात.       निर्मिती 

श्रीमती लीना वैदय

समूहप्रशासक

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

सन 2023/24 SMC स्तरावरून गणवेश बाबत मार्गदर्शक सूचना

 मोफत गणवेश वाटप बाबत मार्गदर्शक सूचना...


शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व मूली, अनू जाती मुले, अनुजमाती मुले तसेच दारिद्रय रेषेखालील पालकांची मुले यांना लागू आहे.

 समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०२३-२४ करिता भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या (PAB) दि. २४ एप्रिल २०२३ रोजीच्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे.


तरतूद खर्च करण्याचा स्तरः- चालू आर्थिक वर्षात प्रती लाभार्थी दोन गणवेश संचाकरिता मंजूर असलेला निधी रु.६००/- याप्रमाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

 त्यापैकी एक गणवेश संचासाठी रक्कम रु.३००/- या दराने दरवर्षीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात यावा. उर्वरित एका गणवेशाचा लाभ देणेबाबत शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात यावी.


महत्वाच्या सूचना-


१. समग्र शिक्षा अंतर्गत प्रती लाभार्थी रक्कम रु.३००/- याप्रमाणे निधी उपलब्ध झाल्यानंतर रु.३००/- या दराने एक गणवेश संचाचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांकडे भौतिक लक्षाप्रमाणे तात्काळ

वर्ग करण्यात यावा असे सुचित करण्यात आलेले आहे.२. इयत्ता १ लीच्या वर्गात प्रवेशित तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या निपपात्र लाभार्थी एक गणवेश संघ शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत निधारित करण्यात आलेला गणवेश वितरीत करण्यात पावा, सदर योजनेच्या लाभापासून गणवेश पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षात घेण्यात यावी. ३. लाभार्थी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या दुसऱ्या गणवेशाबाबत शासन स्तरावरून प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार

कार्यवाही करावी दोन्ही गणवेश वापराबाबत शासनाच्या सूचनांनुसार मुख्याध्यापक यांनी कामकाज करावे असे सुचित करण्यात आलेले आहे.

४. शाळा व्यवस्थापन समित्यांना अनुदान वितरणास विलंब होऊ नये म्हणून सदरचे अनुदान जिल्हा स्तरावरून चैट तालुका स्तरावर PFMS प्रणालीच्या माध्यमातून वितरीत करण्यात यावे व शाळा व्यवस्थापन समित्यांनी गणवेश वितरणाची कार्यवाही विहित कार्यपध्दतचा अवलंब करून गणवेश खरेदी करावी व देवकांनी अदायगी करण्याकरिता संबंधित प्रमाणके व उपप्रमाण के तालुका स्तरावर सादर करावे,


१५. राज्य शासनाचे सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्यक विद्यार्थ्यासाठी गणवेश अथवा शासनमान्य वसतीगृहातील विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जात असल्यास

अशा लाभाच्यांना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येऊ नये. एकाच विद्यार्थ्यास दुबार गणेशाचा लाभ अनुज्ञेय होणार नाही, याची दक्षत घेण्यात यावी असे नमूदकेले आहे .

महानगरपालिकांकडून त्यांच्या स्वनिधीमधून महानगरपालिकांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांना 

गणवेश उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा लाभार्थी विद्यार्थ्याना समग्र शिक्षा अंतर्गत गणवेशाचा दुबार लाभ देण्यात येऊ नये असे सुचित करण्यात आलेले आहे.

६. वरील नमूद प्रमाणे प्रस्तावित एक गणवेश वितरणाच्या अनुषंगाने शालेय गणवेशाचा रंग, प्रकार स्पेशिफिकेशन बाबीसंदर्भात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावयाचा आहे.


७. प्रस्तावित प्रमाणे एक गणवेश वितरणाबाबत संपूर्ण अधिकार संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस

असल्याने शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून निर्णय घेण्यात यावा,


१८. प्रत्येक शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरुन त्यांच्या शाळेतील गणवेश पात्र लाभार्थ्याच्या वयोगटानुसार व विद्याथ्यांच्या मापानुसार (Sire प्रमाणे) मुलांसाठी आणि मुलींसाठी गणवेश खरेदी करून वितरित कराये ९. गणवेश शिलाई पक्क्या धाग्याची असावी. शिलाई निघाल्यास, गणवेशाचे कापड फाटल्यास अथवा वेशाबाबत कोणतीही तक्रार उपस्थित झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची राहाणार आहे.

 १०. प्रस्तावित प्रमाण सध्या प्रती लामाथी एक गणवेश संचाकरिता रु.३००/- तरतूदीपेक्षा अधिकचा खर्च होणार नाही याची दक्षता देखील संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने घेणे आवश्यक आहे. रु.३००/- तरतूदीपेक्षा जादा खर्च झाल्यास जादा झालेला खर्च मान्य केला जाणार नाही.


११. प्रत्येक जिल्हयांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश योजनेची अमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात व गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या गटातील संबंधित शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश वितरणाबाबत योग्य मार्गदर्शन करावे असे सुचित करण्यात आलेले आहे.


शासन आदेश पहा....
.