डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रोजेक्टर व एल.ई.डी टि.व्ही यातील फरक

*शाळा डिजिटल करतांना*

जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात आपण शाळा व्हर्चुअल करतांना घाईत निर्णय घेत वरच्यावर शाळा डिजिटल करत आहोत.

  खालील महत्त्वाचे काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

🔴आपण बजेटच्या तुलनेत एल.ई.डी. टि.व्ही. घेतो.बहुधा ३२" हेच आपल्या आवाक्यात बसणारा आकार आहे.
*साईज रुमच्या आकारात कसा असावा*
याचा एक नियम आहे.

टि.व्ही.चा आकार=खोलीची लांबी × 12÷ 3
उदा.आपली वर्ग खोली लांबी १८ फुट असेल तर
= 18×12÷3
= 216÷ 3
= 72
म्हणजेच १८ फुट लांबी असलेल्या हाँल साठी ७२" इंचचा टि.व्ही आवश्यक असणार तिथे आपण ३२" टि.व्ही वापरुन मुलांच्या डोळयाचा ताण वाढविणार आहोत.
🔵 आपण जर प्रोजेक्टर वापरला तर आपल्याला ६०" ते २००" स्क्रीन वापरता येते.

🔴एल.ई.डी टि.व्ही.तून Uv Ultra violate म्हणजेच अतिनिल किरणे निघतात व ती सरळ डोळयात येतात.
यामुळे मुलांना डोळयासंबंधीत आजारांना सामोरे जावे लागते .
🔵 प्रोजेक्टर ची किरणे ही सरळ डोळयावर न येता भिंतीवर परावर्तित होत असल्याने ही किरणे बहुतांशी विखुरल्या जातात व काही प्रमाणात शोषल्या जातात.व UV चा धोका नाहीसा होतो.
🔴 शाळा डिजिटलचा ३२"  टि.व्ही चा खर्च १६०००-१८०००/- या दरम्यान येतो.
🔵प्रोजेक्टरद्वारे हाच खर्च् ८५००-११०००/- या दरम्यान येतो.
( १२०० -१८०० ल्युमेन्स प्रोजेक्टर )
म्हणजेच एका टि.व्ही च्या खर्चात आपण दोन वर्ग डिजिटल करु शकतो.
🔴एल.ई.डी पँनलला सर्वाधिक धोका फुटण्याचा असतो. पँनलची किंमत ९०००/- ते १२०००/- च्या दरम्यान असते.
🔵प्रोजेक्टरला असला कुठलाच धोका


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....


शाळेची बाग निर्मिती जतन,संवर्धन

बागनिर्मिती व कुंपण*
   शाळेत  ४ वर्षापूर्वी १८० फुट लांबीचे जाळीचे कुंपण व खराब झालेल्या बोअरवेल मध्ये विद्युत मोटार ही कामे समाज सहभागातून पुर्ण करण्यात आलेली आहे.सन २०१३-१४ मध्ये  बागनिर्मिती करण्यात आली यात शोभेचे फुलांचे व फळांची रोपे लावण्यात आलेली आहेत.ठिंबकसिंचन वापरून या झाडांचे आजवर जतन संवर्धन करण्यात आलेले आहेत.
        शाळा सुंदर बाग निर्माण करून अतिशय प्रभावी वातावरण निर्माण केलेले असून यामूळे शाळेच्या सौंदर्य उत्तम होत विद्यार्थ्यांना आकर्षक परिसर निर्माण होणार आहे. जिवंतपणा एकूणच निर्माण होऊन. विशेष स्वरुप प्राप्त होणार आहे.
   2017 या वर्षी मार्च  महिना लागत आला व शाळेस भीषण असे पाण्याचे संकट उभे राहिले .त्यासाठी ९००० लिटर क्षमतेचे छोटया आकाराचा १५०० रू खर्च करून तलाव पाँलिथीन वापरुन कुंपणाच्या आत तयार करण्यात आलेला आहे. यामूळे टँकरने आलेल्या पाण्याची साठवणूक होणार आहे. जेणे करुन उन्हाळ्यात सुद्धा बागेचे जतन करता येणार आहे. प्रसन्न असे वातावरण निर्मितीस उपयुक्त ही बाग ठरणार आहे.



मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....



डिजिटल वाल पेन्टिंग

अभिनव उपक्रम

यावर्षी  शाळेस रंगरंगोटी करण्यात आली.शाळेत वातावरण निर्मिती होण्यासाठी मुलांना आकर्षित करतील अशी चिञे शाळेच्या दर्शनी भागात काढण्यात आलेली आहे.यासाठी प्रोजेक्टर वापरुन चिञ आधी भिंतीवर रेखाटली व त्यात आँईलपेन्टचे रंग भरण्यात आलेत . लहान मुलांना ही चित्रे आकर्षित करून नक्कीच शाळेची  ओढ लागण्यायास उपयुक्त ठरणार आहे . यामुळे १०-१२ हजार रुपयाची चिञे अवघ्या ६०० रू खर्चात काढता आली. शाळेच्या 

रंगरंगोटी कामास खूप पैसा लागतो. लहान प्राथमिक शाळेत हा निधी उपलब्ध नसल्याने शाळा सुधारणा करणे फार फार कठीण होऊन जाते. तेव्हा यावर एक कल्पना सुचली प्रोजेक्टर वापरुन स्केच काढायचे व पटकन रंग भरून चित्र पुर्ण करण्याचा उद्देश लगेच पुर्ण होऊन शाळेच्या  वातावरणात खूप मोठा बदल होणार हे निश्चितच .





मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....


     

नविन तंञज्ञानाची ओळख

नविन तंञज्ञानाची ओळख 


डिजिटल स्कुल समूह महाराष्ट्र हा शिक्षकांसाठी अनेक विविध कार्यक्रम घेतलेले आहे .यामुळे शिक्षकांना त्यांच्या कार्यामध्ये मदत मिळत आलेली आहे. अत्यंत उपयुक्त पीडीएफ अत्याधुनिक साधनांची माहिती ,नवीन पद्धती, शैक्षणिक व्हिडिओ अशा अनेक विविध उपक्रमांद्वारे शिक्षकांना उपयुक्त साहित्य समा मार्ग प्राप्त झालेले आहे .यामुळे शिक्षकांना दररोज अपडेट राहण्यामध्ये खूप मदत मिळाली आहे. त्यांना हे साहित्य वापरून विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रिया सुलभ करून देता आले.  अशाच प्रकारे समूहाद्वारे निर्मिती युट्युब वाहिनीचा ही वापर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. विद्यार्थ्यांनाही या साधनांचा खूप मोठा उपयोग झालेला दिसून येत आहे. जेणेकरून प्रगत प्रगत महाराष्ट्र बनण्यासाठी डिजिटल समूहाने एक छोटेसे पाऊल उचललेले आहे. याच मिशनमध्ये आज जवळपास आठ हजार शिक्षक जोडलेली आहे. राज्यासह शेजारी असलेला कर्नाटक राज्याच्या  बेळगाव जिल्ह्यात ही समूह सक्रिय आहे.








Mid day meal on dining ....

                 मिड - डे- मिल आँन डायनिंग


  विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खाण्यासाठी एकावेळेस ५० विद्यार्थी बसून जेवण करतील अशी डायनिंग टेबलची सुविधा शाळेतील बागेत करण्यात आली आहे. हा उपक्रम ही आजवरचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
         खाली जमिनीवर बसून आहार खात असतांना हवेने किंवा कोणी जवळपास चालून गेल्यामुळे ताटात धुळ , खडे येण्याची शक्यता असते याचबरोबर पावसाळ्यात ओल्या जागेवर आहार घेणे शक्य होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी योजना मी २०१७ साली बडकवस्ती माझ्या यापुर्वीच्या शाळेवर केलेली आहे. 
१३००० खर्चात मला ISO प्रमाणपत्र घेता आले असते पण ते फक्त कार्यालयात भिंतीवर ३ वर्ष सजून राहीले असते. तसे न करता तेवढया पैशात आमचे विद्यार्थी आनंदाने बागेत डायनिंग टेबलवर बसून जेवत आहे हाच शाळेचा व आमचा सन्मान आहे.

     प्रकाशसिंग राजपूत 
        सहशिक्षक 
     9960878457 

माझा परिचय

नमस्कार मित्रहो,

           मी प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत
                        सहशिक्षक
           जि.प.प्रा.शा. मुरुमखेडावाडी 
           केंद्र करमाड , ता./जि.औरंगाबाद
           मोबाईल क्र 9960878457

शैक्षणिक अहर्ता   -   बी.ए., डी.एड. , डी.एस.एम.

एकूण सेवा -            १७ वर्ष ६महिने

यापुर्वी प्राप्त पुरस्कार -

                    १) क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार
                         सन२०१५.
                   २) हँपी टु हेल्प फाऊंडेशनचा २०१८ चा जिल्हास्तरीय
                       आदर्श शिक्षक पुरस्कार
                   ३) दिव्य मराठी गुरुवंदन राज्यस्तरीय पुरस्कार २०२०
                   ४) महाराष्ट्र आदर्श शिक्षक समिती यांचा राज्यस्तरीय आदर्श
                       शिक्षक पुरस्कार २०२०
                   ५) ग्लोबल बंजारा  फॉऊंडेशन धुळे यांचा राज्यस्तरीय आदर्श
                      शिक्षक पुरस्कार २०२०
६) कोरोना परिस्थितीत विविध संस्था तथा वृत्तपत्रांनी माझ्या कार्याला दाद देत सन्मानित केले आहे.


शाळेतील महत्वपुर्ण योगदान :-

१) मराठवाडयातील पहिली सोलर व्हर्चुअल स्कूल :
     जि.प.प्रा.शा.बडकवस्ती , केंद्र के-हाळा, ता.सिल्लोड ही शाळा सन २०१३ -२०१४ मध्ये Led प्रोजेक्टर वापरत कमी खर्चात केवळ १०००० रु शाळा डिजिटल बनवत अवघ्या १४०००रु  सोलार सिस्टीम चा यशस्वी वापर करत सोलर व्हर्चुअल क्लास तयार केला.


२) मिड - डे- मिल आँन डायनिंग :-
      राज्यातील पहिलाच उपक्रम जि.प.प्रा.शा.बडकवस्ती , केंद्र के-हाळा, ता.सिल्लोड या शाळेत निर्मित केला. एकावेळी ५० विद्यार्थी बसून जेवतील अशी व्यवस्था करत सन २०१६-१७ मध्ये या योजनेची सुरुवात केली.


३) अनेक शाळेंना प्रेरणा :-
औरंगाबाद जिल्ह्यात डिजिटल स्कूल प्रचार, प्रसार व प्रत्यक्ष ४९शाळा डिजिटल होण्यात संपुर्ण मार्गदर्शन तथा १५ शाळा सोलर सिस्टीम वर होण्यात प्रोत्साहन देत विजेच्या बाबतीत स्वावलंबी बनवल्या. बडकवस्ती शाळेत राबविलेल्या उपक्रमांची जवळजवळ २०० लोकांनी भेटीतून माहिती घेत प्रेरणा घेतली.महाराष्ट्रतून अनेक शिक्षकांना फोनवरून सोलार विषयी मार्गदर्शन करत सौर ऊर्जा  वापराबाबत जनजागृती करत आहे.

४) प्रोजेक्टरचा वापर पेन्टींगसाठी :-
प्रोजेक्टरचा वापर करत शाळेत उत्तम प्रकारे रंगरंगोटी करत डिजिटल वाँलपेंन्टिगचा सोपा पर्याय निर्मित केला. १० ते १२ हजारचे काम अवघ्या ६०० रु करता आले.

५) शाळेत बागनिर्मिती व सिंचनासाठी अत्याधुनिक सुविधांचा वापर   :-
बडकवस्ती हा भाग कोरडवाहू श्रेञात असतांना ठिंबक सिंचन व वाँटर स्टोरेज आधुनिक पध्दती

वापरून शाळेचा परिसर बागेने खुलविला.सन २०१२-२०१३ या वर्षात बाग फुलविली व एकूण शाळेय वातावरण सुशोभित केले.

६) स्टडीमाँल   :-
  बडकवस्ती शाळेत टिंकशार्प फाँऊन्डेशनच्या मद्तीने स्टडीमाँल हा प्रोजेक्ट राबविला आहे.सन २०१७-१८ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. शाळेत विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी संपूर्ण सुविधा मिळाल्या आहेत.

७) अवघड क्षेत्रातील शाळेचा कायापालट व पटसंख्या वृद्धी :-
    मे २०१८ बदली होऊन मिळालेली औरंगाबाद तालुक्यातील जि प प्रा शा मुरुमखेडा वाडी केंद्र करमाड ही अवघड क्षेत्रातील शाळा असून शाळेत पूर्वीची पटसंख्या केवळ नऊ होती पालकांच्या सभा घेऊन शाळेची गुणवत्ता व दर्जा वाढवत सन २०१८-१९ ला १८ इतकी वाढवत पटसंख्या आज सन 2019- 20 ला 23 इतकी झालेली आहे .शाळेत मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहे यात इमारतीचे दुरुस्ती काम शाळेला 230 फुटाचे कुंपण, पाण्याची सुविधा, हँडवॉश ,सोलार सिस्टिम इत्यादी महत्त्वाचे बदल अवघ्या एका वर्षात करता आले आहे.

८) मुरुमखेडावाडी शाळेत ६०५ देशी प्रजाती औषधी झाडे असलेले घनवन हरित शाळा अभियान अंतर्गत तयार करत मियावाॕकी पद्धतीने निर्मिती केली असून या हरित शाळा अभियान औरंगाबाद यावर माझे लिहिलेले गीत प्रसिध्द संगीतकार, गायक व फिल्म निर्माता अतुलजी दिवेसरांच्या संगीतासह AMD Studio येथे रेकॉर्ड करण्यात आलेले आहे. 

९) डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहनिर्मिती :-
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या व्हाटसअपचे ३५ जिल्ह्यातल्या ३५५ तालुक्यातले शिक्षक   ८६ समूह बनवून १८००० पेक्षा जास्त  शिक्षक  व १५००० शाळा डिजिटल प्रवाहात एकत्र आणत .संपूर्ण शाळा डिजिटल करत प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट दिशेने वाटचाल करत संपूर्ण शाळा प्रगत होऊन डिजिटल शाळा वृद्धी व त्यांची समृद्धीचे कार्य अविरत सुरु आहे. संपूर्ण शाळा डिजिटल करत प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट दिशेने वाटचाल करत संपूर्ण शाळा प्रगत.


करोना काळातील शैक्षणिक व सामाजिक कार्य 

डिजीटल शाळा एकञित करत महाराष्ट्रसह कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगांव जिल्ह्यातही व्यासपीठ निर्माण करत ३५ जिल्ह्यातील १८ हजार शिक्षकांना या चळवळीचा भाग बनवत २०१३ पासून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करत सोलार ऊर्जा वापर प्रसार  करत सध्या शाळा बंद असतांना ही डिजिटल लाईव्ह क्लास सुरु करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभ करण्यात सहभाग  घेतला आहे. या  कार्याचा अल्पसा परिचय ...

🔹कोरोना प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात वाडीतील नागरिकांचे स्वच्छता बाबतीत व आरोग्य दृष्टिकोनातून  कोरोना बाबत बचावात्मक बाबतीत प्रबोधन.

🔹राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा  हेडगेवार हाँस्पीटलची संस्था असलेली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांचे  प्रायोजक मिळवून जून महिन्यात कविता गायन स्पर्धेत ११७ कविता आल्या ज्या अँनिमेशन युक्त करत  ४ लक्ष  १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कविता उपलब्ध  करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानात हातभार लावला.

🔹शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या निर्माण केलेल्या  राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक बाबी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्यात दररोज १ ली ते ८ वी पर्यत डिजीटल लाईव्ह क्लास द्वारे राज्यभरातील शिक्षकांच्या साहय्याने आँनलाईन शिक्षण झाले एका वर्षभरात १० लक्ष विद्यार्थ्यांना उपयोग झालेला आहे.

🔹मुरुमखेडावाडी अगदी लहानशा शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व व आरोग्य बाबतीत जागृक होण्यासाठी Design for change अंतर्गत  "हात पाय धुवु , कोरोना वाडीबाहेर ठेवू हा  उपक्रम राबविला आहे .ज्या मुळे अद्याप तरी वाडीतून कोणाला ही आजार झालेला नाही. तसेच गट पद्धतीने शिक्षण सुरू ठेवले आहे.

🔹इयत्ता १ली विद्यार्थ्यांना शाळाविना शिक्षण मिळावे व वाचन क्षमता विकास होण्यासाठी स्मार्ट डिजिटल पाटी बनवलेली आहे.जिचा उपयोग विद्यार्थ्यांना मुळाक्षरे अवगत होण्यात होत आहे.१ लक्ष विद्यार्थ्यांना या पाटीचा राज्य भरातून उपयोग झालेला आहे.

सोलर व्हर्चुअल क्लास

सोलर व्हर्चुअल क्लास

शाळेचे नाव*
जि.प.प्रा.शा.बडकवस्ती , 
के-हाळा ,ता,सिल्लोड ,
जि.औरंगाबाद .
*शाळा*
    १ली ते ४ थी

*शाळेतील उपक्रम*

१) *सोलार व्हर्चुअल क्लास*

 सिल्लोड तालुक्यातील पहिली डिजिटल स्कुल , सोलार सिस्टीमसह व्हर्चुअल क्लास असलेली जिल्ह्यातील पहिलीच शाळा. गेल्या दोन वर्षात शाळेच्या या उपक्रमाची प्रेरणा घेत व श्री प्रकाशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली
 *जिल्हाभरात ३६ शाळा डिजिटल झाल्यात त्यातील ७ सोलारसह व्हर्चुअल झालेल्या आहेत*. 
सिल्लोड तालुक्यातील २२ शाळा,
कन्नड  तालुक्यातील १२ शाळा,
फुलंब्री तालुक्यातील ०२ शाळा

शिक्षक तेथील पालक व गावकरी यांच्या प्रयत्नाने या शाळा सुद्धा डिजिटल व सोलार ऊर्जेवर झालेल्या आहेत. आजवर काही ही सुविधा नसलेल्या शाळेत डिजिटल साधने उपलब्ध झालेली आहे ही फार मोठी गोष्ट आहे. प्रगत महाराष्ट्र घडण्याच्या दिशेतील हे पहिले पाऊल होते. 


मित्रांनो आपणास हि माहिती आवडली असल्यास नक्कीच  आपण आमच्या फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम व युटूब ला ज्वाईन होण्या साठी साईटवर टॕब दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण येथे अॕड व्हावे.
        व्हाटसअप समूहात ज्वाईन होण्यासाठी आपणांस माहिती गुगल फाॕर्मवर भरून तो submit करायचा आहे. युटूब चॕनलला सबस्क्राईब करा जेणे करून नव नविन व्हिडीओ चे अपडेट आपणास मिळू शकेल. एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय एकमेव जिल्हा तसा समूह अशी ओळख डिजिटल समूहाची असून आपणांस माहिती खरच आवडल्यास लगेचच या साईटला follow करा .... प्रकाशसिंग राजपूत मुख्यप्रशासक व समूहनिर्माता डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र .....