डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
मुल्यशिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुल्यशिक्षण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मुल्यशिक्षण moral story

 मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो.चांगले किंवा वाईट या दोन्हीतील सापेक्ष संकल्पना आहेत. एखादी चांगली वाटणारी गोष्ट इतरांना चांगली वाटेल तसे नसते. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

बालवयापासून,आपल्या,आई-वडील,आजी,आजोबा इत्यादी कुटुंबातील मोठे आपल्याला जे संस्कार किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात.

मुरूमखेडावाडी शाळेत परिपाठात निश्चितच याचा सहभाग केलेला आहे.मूल्यशिक्षणाचे एकूण दहा प्रकार आहेत.


1.नीटनेटकेपणा।Neatness.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अंतर्बाह्य चांगला बदल घडवून नीटनेटकेपणा हा महत्त्वाचा असून नीटनेटकेपणा म्हणजे, 

एखाद्या व्यक्तीचे राहणीमान, बोलणे, वागणे, तसेच केशभूषा वेशभूषा किंवा घरातील आपल्या इतर कुटुंबातील व्यक्ती सोबत राहणे घरातील किंवा ऑफिसमधील, शाळेतील वस्तूंची योग्य व्यवस्थित मांडणी, आपले आचार, विचार योग्य रीतीने मांडणी नेटकेपणा ची सवय प्रत्येकाने आपल्या जीवनात लावली पाहिजे.

 

आपण आपल्या घरात कसे राहतो याचे मूल्यमापन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक समारंभ, कार्यक्रम या ठिकाणी आपण कसे वागतो, कसे बोलतो, यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे असते. यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामधील नीटनेटकेपणा ला महत्त्व आहे. 


आपली विचारसरणी कशी आहे, यावर आपण विचार करणे गरजेचे आहे. "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" हे तत्व बाळगणे आवश्यक आहे. नीटनेटकेपणा हा दैनिक जीवनाचा भाग आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा ची सवय किंवा महत्त्व जाणून घेणे व अंगिकारने खूप महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर होतो.


त्यासाठी त्यांना बालवयात नीटनेटकेपणा चे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यामध्ये बोलणे,वागणे, वक्तशीरपणा या गोष्टीचा अंतर्भाव होतो.तसेच शाळेमधील वस्तूची, नीटनेटकेपणाने मांडणी करणे शाळेतील स्वच्छता करणे,गावातील,परिसरातील स्वच्छता करणे, घरातील वस्तूंची व्यवस्थित मांडणी करणे, इत्यादी या सर्व गोष्टी नेटकेपणा मध्ये येतात. 


नीटनेटकेपणा मध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण विद्यार्थ्यांना सवयी लावू शकतो. नीटनेटकेपणा आणि टापटीपपना यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्तर, दप्तरा मधील वह्या व्यवस्थित लावणे, पुस्तक व्यवस्थित लावणे, कंपास पेटीतील साहित्य व्यवस्थित ठेवणे, आपल्या वस्तूची काळजी घेणे, तसेच आपल्या वस्तू खराब होणार नाहीत याकडे लक्ष देणे. इत्यादी छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण नीटनेटकेपणा विद्यार्थ्यांमध्ये वाढ करू शकतो.