डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
Rte लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Rte लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रतिक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ

 RTE प्रवेश बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत ऑनलाइन राबवण्यात येणाऱ्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या पहिल्या फेरीमध्ये नावे जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळाला.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील बालकांचे प्रवेश प्रक्रियेची मुदत 10 मे 2022 रोजी पर्यंत होती. निवड झालेल्या 90 हजार 685 विद्यार्थ्यांपैकी 62 हजार 155 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. याआधी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

शालेय शिक्षणाचे हायब्रीड माॕडेल विकसित व्हावे... नरेंद्र मोदी

 त्यामुळे प्रतीक्षा यादीसाठी 39 हजार 751 जागा शिल्लक राहिल्या होत्या. त्यानंतर 19 ते 27 मेपर्यंत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली. यावेळी प्रतीक्षा यादीतील 7 हजार 576 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मात्र अनेक पालकांना प्रवेश घेण्यासाठी शाळांमध्ये जाण्यात अडचणी येत असल्याने प्रतीक्षा यादीतील पहिल्या फेरीतील बालकांच्या प्रवेशासाठी 3 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाचे संचालक  यांनी घेतलेला आहे.


30 जून बदली स्थगितीचा तो आदेश केवळ प्रशासनासाठीचा...

आरटीई प्रवेश यंदा अनेक जागा रिक्त

 खाजगी इंग्रजी शाळेच्या आरटीई अंतर्गत  शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांचे मोफत प्रवेश केले जातात. 

यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा ९ हजार ८६ शाळांतील १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला. 



प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेल्या सोडतीत ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत जवळपास ५४ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली. 

आरटीई अंतर्गत सुरू असलेली प्रवेश प्रक्रिया आतापर्यंत मंदगतीने सुरू आहे.


जागा रिक्त राहील्या असे का झाले?


 आरटीई प्रवेश प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे पालकांकडे उपलब्ध नसल्याने किंवा ती उपलब्ध होण्यास वेळ लागत असल्याने अनेक पालकांना प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. 

प्रवेशासाठी देण्यात आलेल्या मुदतवाढीचा कालावधी संपत येऊनही प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ३५ हजार विद्यार्थ्यांचा अद्याप प्रवेश निश्चित नाही.

मुदतवाढ परत मिळणार ?

आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशांसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार, की प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.