डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

वरिष्ठ वेतन श्रेणीवर झालेला अन्याय दूर होणेबाबत

 ७ व्या वेतन आयोगाचा लाभ सन २०१६नंतर वरिष्ठ वेतनक्षेणी लागु होणाऱ्या शिक्षकांना मिळावा याबाबत सरचिटणीस यांना महत्त्वाचे पत्र ...
प्रति,

सरचिटणीस,

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

मंत्रालय,

मुंबई- ४०० ०३२

दि. २३/०३/२०२३


संदर्भ :- महाराष्ट्र राज्य राजपत्र, असाधारण भाग IV -B दिनांक 03 मार्च २०२३,

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई, अधिसूचना, दि. ३ मार्च २०२३ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २२/०२/२०१९ नुसार विषय:- वरील संदर्भाने प्राथमिक शिक्षक पदाबाबत हरकती नोंदवण्याबाबत


7 व्या वेतन आयोगाच्या प्राथमिक शिक्षक (HSC, Ded) संरचनेमध्ये १ जानेवारी २०१६ नंतर वरिष्ठ श्रेणी / चटोपाध्याय (Senior acale) लागू होत करतांना प्राथमिक शिक्षकांचे वेतन निश्चिती करतांना नुकसान होत असल्याबाबत हरकत नोंदवण्या बाबत.


सर,

उपरोक्त विषयी विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की, महाराष्ट्र

शासनाने बक्षी समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार व दि ०३/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार प्राथमिक शिक्षक (HSC, D ed.) यांना 12 वर्ष सलग पदोन्नती न घेता एकाच वेतनश्रेणीत सेवा केल्याने सदरील कर्मचाऱ्यांस वरिष्ठ वेतनश्रेणी (senior scale) प्रदान करण्यात येवून मूळ वेतनात वाढ करण्यात येते. 6 व्या वेतन आयोगामध्ये प्राथमिक शिक्षकाला ही चटोपाध्याय वेतनश्रेणी / वरिष्ठ वेतनश्रेणी (seniour scale) देतांना असुधारीत वेतनश्रेणी PB1 ( 5200-20200) Grade Pay 2800 सुधारित वेतन श्रेणी PB2 (9300-34800) Grade Pay 4200 या वेतनश्रेणीत वेतन निश्चिती करण्यात येत होती. यामुळे प्राथमिक शिक्षकाचे मुळवेतन PB1 ते PB2 मध्ये जाताना GP च्या वाढीमुळे 1400 रुपयांनी वाढत होते. डिसें 15 च्या अनुषंगाने महागाई भत्ता (DA) 142% व घरभाडे भत्ता (HRA) 10% विचारात घेतल्यास एकूण वेतनात 3528 रु ची वाढ 6 व्या वेतन आयोगात होत होती. परंतू दिनांक 14 मार्च 2023 च्या शासन राजपत्रानुसार व शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि. २२/०२/२०१९ नुसार प्राथमिक शिक्षकांची 12 वर्षा नंतर मिळणारी चटोपाध्याय वेतनश्रेणी/ वरिष्ठ वेतनश्रेणी (senior scale) ही 7 व्या वेतन आयोगात म्हणजेच दि ०१/०१/२०१६ नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होतांना S10 हा मेट्रिक्स सेल मधून S13 या मेट्रिक्स सेल मध्ये मुळवेतन (Basic) स्थानांतरित करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ वेतनात कोणत्याही प्रकारची वरिष्ठ वेतनश्रेणी म्हणून अपेक्षित असलेली वाढ होतांना दिसून येत नाही फक्त S10 मेट्रिक्स सेल मधील मुळवेतनाचा आकडा हा S13 त तंतोतंत न जुळल्याने अपघाताने 700 किंवा 600 रु ची नगण्य वाढ दिसते. ही मुळवेतनातील वाढ ही वरिष्ठ वेतनश्रेणी ची नसून S10 मधील मुळवेतन S13 या मेट्रिक्स टेबल मध्ये शोधतांना मिळालेली वाढ आहे. 7 व्या वेतन आयोगात वार्षिक वेतनवाढ ही सुमारे 1200 रु ची आहे, त्या तुलनेत 12 वर्षानंतरची वाढ ही 700 रु कशी असू शकते?

6 व्या वेतन आयोगात वरिष्ठ वेतनश्रेणीत मुळवेतन PB1 ते PB2 असे स्थानांतर होत असतांना 2800 रु grade pay मुळवेतनात वाढत होते, 7 व्या आयोगात ही वाढ 600/700 ची कशी असेल?

31 डिसेंबर 2015 ला 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या प्राथमिक शिक्षकाचा ग्रेड पे 2800 हुन हा 4200 रु झाल्याने 1 जाने 2016 ला 7 वा वेतन आयोगात 2.57 ने मुळवेतनास गुणतांना त्याची 1400 रु ची वरिष्ठ वेतनश्रेणी वाढ देखील 2.57 पट होते, त्यामुळे सदरील शिक्षकाची S13 मधील वेतन निश्चिती उच्च स्तरावर (level वर) होते. तर 01 जाने 2016 नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकाची मुळवेतना तील वाढ 12 वर्ष पूर्ण होणाऱ्या दिनांकास 1400 रु च्या 2.57 पट होत नाही. व त्यांची वेतन निश्चिती त्यांच्यापेक्षा 1 वर्ष सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांपेक्षा 3 स्तर (level) निम्न असणाऱ्या मुळवेतनावर होते.

ही 7 व्या वेतन आयोगातील त्रुटी असून या त्रुटींमुळे 6 व्या वेतन आयोगात 31 डिसेंबर 2015 ला वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त शिक्षक व 2 जाने 2016 ला वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त शिक्षक यांच्यात 1 वेतनवाढी ची तफावत असणे अपेक्षित असतांना तब्बल 3 वेतनवाढी ची तफावत निर्माण झाली आहे.


उदाहरणांसह वेतन निश्चिती. फरक खालीलप्रमाणे

| सहावा वेतन- वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ

| वरिष्ठ वेतनश्रेणी पूर्वीचे मुळवेतन=१५६८०

सातवा वेतन वरिष्ठ वेतनश्रेणीलाभ

वरिष्ठ वेतनश्रेणी पूर्वीचे मुळवेतन = ४०४०० (१५६८०४२. ५० ने गुणून S-10 मध्ये

निश्चिती)

| वरिष्ठ वेतनश्रेणी नंतरचे

| मुळवेतन = १७०८०

वरिष्ठ वेतनश्रेणी नंतरचे

| मुळवेतन = ४११०० (४०४०० ही रक्कम S-13 मध्ये ४११०० निश्चिती) | वरील मूळवेतनात वाढ १४००रु. म्हणजेच वरील मूळवेतनात वाढ ७००रु. म्हणजेच ८.९२% इतकी.

१.६८% इतकी.

असे नुकसान ०१ जानेवारी २०१६ नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी लागणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे होणार आहे.

संपात सहभागी कर्मचारी यांची असाधारण रजा

 राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दिनांक १४ मार्च, २०२३ ते दिनांक २० मार्च, २०२३ या कालावधीत संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते, 

त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता "असाधारण रजा" म्हणून नियमित करण्यात यावी. असे आदेशात नमूद करण्यात आले. तथापि, सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दिनांक १४.०१.२००१ च्या आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता निवृत्तीवेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.


सदर आदेश पहा 👇
मुलांचा वाढत जाणारा चिडचिडपणा.... #Children #child

 मुलांचा हट्टीपणा वाढत जाण्याची कारणे-


 

मुलांचा हट्टीपणा वाढत जाण्याची कारणे व त्यामुळे त्यांची होणारी चिडचिड या मागचे नेमके कारण काय आहे .ते आपण आज खालील व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. मुलांची  जोपासना करताना त्यांना जर चांगले आणि वाईट यांचा फरक  आपण व्यवस्थित समजावू शकलो तर ही समस्या त्यांना निर्माण होणार नाही.
 अशा प्रकारे मुलांना आपण चांगला प्रकारे वळण लावू शकतो .आणि मुलांचा हट्टीपणामुळे मुलांमध्ये वेगळे दोष तयार होतात .
खरच प्रमुख कारण समजण्यासाठी  आपण खालील व्हिडिओ अवश्य पहावा इतरांनाही शेअर करावा...

खालील लिंकवर क्लिक करा


https://www.facebook.com/reel/237759748619875?s=yWDuG2&fs=eकलेक्टर झालो तो बाईंच्या छडीने

 *एका जिल्हा कलेक्टरने त्याच्या आवडत्या शिक्षकाकडून पुन्हा एकदा हातावर छडी मागितली कदाचित त्याला वाटत असेल की या छडीमुळेच तो आज कलेक्टर आहे..
जी.आर. ७ एप्रिल २०२१

 

यासाठी आपणांस ७ एप्रिल २०२१ नेमका जी.आर. काय ? कोणत्या बाबी बदल सुचवणे आहे त्याचा क्रमांक गुगल फाॕर्मवर नोंदवणे आहे.
बदली सुधारणा अधिकृत लिंक

 सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या जिल्हाअंतर्गत  शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे. कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा. सदरील फॉर्म अंतिम दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत भरावा. 

https://forms.gle/PpNPDsSaUWzQv46J6 


यासाठी आपणांस ७ एप्रिल २०२१ नेमका जी.आर. काय ? कोणत्या बाबी बदल सुचवणे आहे त्याचा क्रमांक गुगल फाॕर्मवर नोंदवणे आहे. 


नविन काव्यरचना

 सुमने किती ही सुगंधी 


माझी नविन काव्यरचना आपणसाठी सादर करत आहे आवडल्यास नक्कीच शेअर करा....
 माझा काव्यसंग्रह "काव्यरंग " आता अॕमेझाॕन व Flipkart वर उपलब्ध असून आपल्या प्रियजनास ही काव्यभेट नक्कीच द्या....बदली बाबत महत्त्वाचे अपडेट

 *🛑बदली प्राधान्य सुधारित🛑**✳️जिल्हाअंतर्गत बदली अपडेट*

*दि.23/03/2023 

(सदरच्या सूचना आपले तालुक्यातील बदली झालेल्या सर्व शिक्षकांना तात्काळ द्याव्यात.)

*जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या शिक्षकांना बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी दि.23/03/2023 ते 30/03/2023 अखेर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे*

*शिक्षक त्यांच्या वैयक्तिक लॉगइनवरून स्वतःचा बदली आदेश PDF स्वरूपात Download करून घेऊ शकतात.*

✳️विशेष संवर्ग भाग 1

✳️विशेष संवर्ग भाग 2

✳️बदली अधिकारप्राप्त शिक्षक

✳️बदलीपात्र शिक्षक

✳️विस्थापित शिक्षक

✳️अवघड क्षेत्रातील रिक्त जागी बदली झालेले शिक्षक 

✳️या सर्व शिक्षकांना आपला बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी

प्रथम शिक्षकांनी आपले 

बदली पोर्टलवर लॉग इन करावे.

✳️ Intra District या टैब मध्ये 

✳️Transfer Order 

यावर क्लिक करावी.

✳️आपले नाव, बदलीची तारीख ,सध्याची शाळा व बदलीने मिळालेली शाळा इ. माहिती दिसेल

✳️उजव्या कोपऱ्यात *DOWNLOAD* हे बटण दिसेल त्यावर क्लिक करावे.

✳️आपला आदेश डाउनलोड झालेला असेल त्याची प्रिंट काढून  घ्यावी.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली आदेशाबाबत

 बदली बाबत अपडेट....

प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली आदेशाबाबत 
सर्व बदली झालेल्या शिक्षकाना अवगत करण्यात येते की , ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्या शिक्षकांच्या इमेल वर बदली झाल्याचे कंफरमेशन इमेल  पाठविण्यात आलेले आहेत. आपले इमेल चेक करुन घ्यावेत .

   वेळापत्रकानुसार आज दिनांक २१-०३-२०२३ रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन  बदली आदेश याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत .


👆बदली व शिक्षण संदर्भात रहा अपडेट सबस्क्राईब करा डिजिटल स्कूल चॕनल

   शिक्षकांचे वैयक्क्तिक बदली आदेश डाउनलोड करण्याची सुविधा सायंकाळ पर्यंत उपलब्ध  होणार आहे. 

  शिक्षकांचे लॉगिन सक्षम झाल्यानंतर शिक्षकांच्या लॉगिनवरुनही शिक्षकाना   आपले बदली आदेश डाउनलोड करता येतील .


   याबाबत शिक्षणाधिकारी यांनी अधिनिस्त सर्व शिक्षकाना अवगत करावे अशा सूचना ही देण्यात आलेल्या आहे.


            


*ज्या शिक्षकाना बदली होवुनही  इमेल प्राप्त झाले  नाहीत त्यांचे इमेल चुकीचे असु शकतात ही पण  नोंद घ्यावी.*             बदली कक्ष 

       

शिक्षणाधिकारी पुणे यांचा पाठिंबा

  सन 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारण्यात आली .

अनेक वर्ष या विरोधात आंदोलन झाल्यानंतर आता सर्वच कर्मचाऱ्यांनी आता संपाचा शेवटचा हत्यार उपसला आहे.

आता दिवसेंदिवस फार मोठे आंदोलन होत चालले आहे. जुनी पेन्शन करिता संपात सहभागी होत  पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी स्वतः येऊन जुनी पेन्शन संपामध्ये सहभागी शिक्षकांना पाठिंबा  दर्शविला आहे.


जुनी पेन्शन
 राजस्थान प्रमाणे महाराष्ट्र राज्यात ही पेन्शन लागू होईल का? आपणांस काय वाटते ते मत नोंदवा.... 


  अवघड क्षेत्रात बदली अपडेट


अवघड क्षेत्रातील बदली करिता भरावयाचे पर्याय साठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिले  असून.

 यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे 17 मार्चला जिल्ह्यानुसार किती प्रमाणात  फॉर्म भरण्यात आलेले आहे. ते खालील यादीमध्ये दिलेले आहे.

 तरी ज्यांचे पर्याय भरायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर अवघड क्षेत्रातील त्यांचे पर्याय भरून अर्ज सबमिट करावा.
या संघटनेच्या संपात सहभागी न होणाऱ्या पदाधिकारींवर शिस्तभंगाची कारवाई होणार

 ✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻✊🏻
*लढेंगे जितेंगे..!!*

*शिक्षणाच्या हक्कासाठी!!*

*शिक्षकांच्या सन्मानासाठी!!*

🙏🏻📜✍🏻

*संघर्ष नको...परंतु सर्व पाहिजे*

    आम्ही सरकारी, निम-सरकारी शिक्षक, कर्मचारी असल्यामुळे आम्हाला आमचे सर्व सेवा विषयक लाभ, सर्व आवश्यक सुविधा मिळायलाच पाहिजे. नव्हे तो आमचा हक्क आहे.  ते हक्क मिळत नसेल तर संघटनांनी आमच्यासाठी संघर्ष केलाच पाहिजे, आंदोलने केलीच पाहिजे, संप केलाच पाहिजे... 

   मी मात्र संघर्षात उतरणार नाही. आंदोलन पुकारणाऱ्या नेतृत्वावर कारवाई झाली तरी चालेल. परंतु संपात उतरल्यावर मला मात्र धक्काही लागायला नको. 

    स्वराज्यासाठी- राष्ट्र उभारणीसाठी छत्रपती शिवराय पाहिजेत, राष्ट्रपिता महात्मा गांधी पाहिजेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत. प्राग-परंपरा, वाईट रुढी दूर सारून सामाजिक न्यायासाठी महात्मा फुले, सावित्रीब्आई फुले, राजर्षी शाहू महाराज पाहिजेत. त्या-त्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत संकटाला तोंड देत या  लोकांनी आपले कार्य पार पाडले. त्यामुळेच ते महान झाले. हे सर्व आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. परंतु आपण कितपत कृतीत आणतो याचा विचार करणे गरजेचे आहे. 

   आमच्या मागण्यासाठी संप केला पाहिजे, आंदोलन का करत नाही. संघटना मूग गिळून बसल्या का. सरकारला विकल्या का असे म्हणणारे आम्ही..! संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारल्यानंतर- शासनाच्या धमक्यांना घाबरून, सोशल मीडियावरून दीड दमडीच्या लोकांकडून टीका होत होत असल्याने शाळेत, कार्यालयात संप सोडून पळून जाण्याची एखाद-दुसरी घटना चर्चेत येत आहे ही शोकांतिका आहे.

श्री संतोष ताठे राज्य संपर्कप्रमुख शिक्षकभारती (प्रा)   परंतु अनेक ठिकाणी १००% कर्मचारी, शिक्षक संपात आहेत ही सकारात्मकता लक्षात घेत नाही ही शोकांतिका आहे.

   मला जुनी पेन्शन पाहिजे. मला वेतन त्रुटी दुरुस्त करून पाहिजे. मला माझी वैयक्तिक सोय होईल असेच बदली धोरण पाहिजे. विषय पदवीधराची वेतनश्रेणी पाहिजे. मुख्यालय राहण्यातून सूट पाहिजे. आदर्श शिक्षकाची वेतनश्रेणी पाहिजे. १०, २०, ३० वर्षाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पाहिजे. उच्च शैक्षणिक अर्हता असल्याने वरचे पद पाहिजे. अप्रशिक्षित शिक्षण सेवक म्हणून लागलेली माझी सेवा सर्व लाभासाठी मान्य केली पाहिजे. वस्ती शाळा स्वयंसेवक म्हणून पहिल्या दिवसापासून ची माझी सेवा सर्व गोष्टीसाठी मान्य केली पाहिजे. मला वार्षिक वेतन वाढ पाहिजे. नियमित महागाई भत्ता वेळेवर मिळाला पाहिजे. वाढीव रजा, विशेष सुट्ट्या, बाल संगोपन रजा पाहिजेत. पितृत्व रजा सुद्धा पाहिजे. अपंगत्वाचे सर्व फायदे मिळाले पाहिजे. नियमितपणे वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजेत.       सरकारद्वारे राबवले जाणारे उपद्रवी उपक्रम मला नकोत. अशैक्षणिक कामे नकोत. 

      हे सर्व मिळण्यासाठी मला संघटनेची गरज आहे. संघटनेने माझे प्रश्न घेऊन लढले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. 

   *_मी मात्र संघटनेच्या आव्हानाला प्रतिसाद न देता संपावर येणार नाही, संपात सहभागी झाल्यावर पळपुटेपणा दाखवून कर्तव्यावर रुजू होण्याचा विचार करतो, घरीच राहतो. केवळ समाज माध्यमावरच व्यक्त होऊन आपली शूरता दाखवतो._*

   अशा प्रकारची नकारात्मक भूमिका, घाबरटपणा हा केवळ चळवळीशी विश्वासघात नसून- यातून आपणच सुरक्षित भविष्याचा विचार न करता आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहोत. आपला आत्मघात करणार आहोत.

    सन्मा. अपवाद वगळता काही प्रसार माध्यमे, कवडीची सामाजिक किंमत नसलेले आयटी सेलचे चे अर्धसाक्षर, संपविरोधी भूमिका घेऊन सरकारकडून काही लाभ मिळतात का याची आस लावून बसलेले तथाकथित समाजसेवक- हे सर्व आज आम्हा कर्मचारी, शिक्षकांच्या विरोधात गरळ ओकत आहे.

   मात्र आपल्याला संघर्ष कायम ठेवून, उद्याचा विचार करून संपात आपलाही सहभाग कायम ठेवायचा आहे. 

    १९७८ च्या ५४ दिवसाच्या संपातून मिळवलेले कुटुंब निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढी हे सर्व बंद करण्याचा कुविचार (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि कॉर्पोरेट घराण्याच्या दबावातून) होत असताना, कामगार कायदे बदलवून आमची सुरक्षितता धोक्यात आली असताना- *आपण संघर्षापासून दूर कसे राहू शकतो..?* 

   चळवळीतील प्रत्येकाला विनंती आहे की, आपल्या सहकारी बंधू-भगिनींना हे भयावह वास्तव समजावून सांगा. या आंदोलनातील त्यांचा सहभाग कायम राहण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या. जे अजूनही संपात नाही त्यांना त्यांचे व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसदारांचे भविष्य अंधारात जाण्याची स्थिती व धोरण समजावून सांगा. 

    *शिक्षक भारती* च्या सर्व राज्य,विभाग,जिल्हा, तालुका पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, कुठे नकारात्मक भावना न ठेवता संप यशस्वी झालाच पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे.

     _*शिक्षक भारती चे जे राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी प्रत्यक्ष संपात सहभागी नसतील तर अशांच्या नकारात्मक भूमिकेची माहिती घेऊन त्यांच्यावर संघटनात्मक शिस्तभंगाची कारवाई करून पदमुक्त करण्याचाही निर्णय घेतला जाईल.*_

    *शिक्षक भारती* चे *_जे पदाधिकारी स्वतः संपात सहभागी होणार नाहीत किंवा राज्य शाखेकडून सूचना येण्यापूर्वी (अर्थात संप मागे घेण्यापूर्वी) संपातून माघार घेतील अशा कोणत्याही पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला भविष्यात तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर कोणतेही पद दिले जाणार नाही._*

   *शिक्षक भारती* च्या *_कोणत्याही तालुका जिल्हा विभाग शाखेला संप  परस्पर मागे घेण्याचा असा नकारात्मक कोणताही निर्णय घेता येणार नाही._* 

   ज्या तालुका, जिल्हा, विभाग शाखा संपविरोधी भूमिका घेतील त्या शाखांच्या नकारात्मक भूमिकेचा गांभीर्याने विचार करून शाखा बरखास्तीचा निर्णय घेतला जाईल.

कळावे...!!

आपण सर्व उपरोक्त बाबीचा विचार करून चं योग्य निर्णय घ्याल या अपेक्षे सह...!


*लढेंगे जितेंगे..!!*

*शिक्षणाच्या हक्कासाठी!!*

*शिक्षकांच्या सन्मानासाठी!!*

        आपला 

   *संतोष ताठे* 

राज्य संपर्कप्रमुख शिक्षकभारती (प्रा)

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

महिलांना आता अर्ध्या तिकिटात प्रवास

 महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ २४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दि. १७.०३.२०२३ पासुन सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपुर्ती शासनाकडुन करण्या येणार आहे. सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत अनुज्ञेय करणे बाबत निर्देश प्राप्त झाले.

त्यानुसार पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.


१ सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, मिडी / मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत

शयन आसनी, शिवशाही (आसनी) शिवनेरी शिवाई (साधी व वातानुकुलीत) इतर इत्यादी ] बसेसमध्ये ५० % सवलत दि. १७/०३/२०२३ पासुन अनुज्ञेय करण्यात येत आहे. 

सदरची सवलत ही भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या

बसेस करिता देखील लागु राहील.

सदर योजना ही 'महिला सन्मान योजना 'या नावाने संबोधण्यात येत आहे.


सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय आहे. सदर सवलत शहरी वाहतूकीस अनुज्ञेय नाही.


 ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking)

घेतलेले आहे. अश्या महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये. सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.


सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे विंडो बुकींगव्दारे ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील


अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.

सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले


जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ.स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तु व सेवाकरची

रक्कम आकारण्यात यावी.


 मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मुल्याची परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या


तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मुळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)


सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत दयावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मुल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु.१०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु. ५०/- व रु. १००/- मुल्यवगांची जोड तिकीटे देण्यात यावीत. सदरची सवलत इटीआय मशीन मध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.


 लेखाशीर्ष ... 

महिलांना देण्यात येणा-या विनामुल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करणेसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.) १३ ७५ वर्षावरील महिलांसाठी 'अमृत जेष्ठ नागरिक' योजनेच्या परिपत्रकीय सुचनेनुसार १००%


सवलत अनुज्ञेय राहिल.. १४ ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना 'महिला सन्मान योजना' हीच सवलत अनुज्ञेय राहिल.


१५ ५ ते १२ या वयोगटातील मुलींना यापूर्वी प्रमाणेच ५०% सवलत अनुज्ञेय राहिल.


सदर सवलतीपोटी येणारी रक्कम मोठया प्रमाणात असल्यामुळे त्याचा कोणत्याही स्तराव

एकच मिशनचा दिसतोय परिणाम

 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांची दि. १५ मार्च २०२३ रोजीची ऑनलाईन बैठक झाली या बैठकीत राज्यातील इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) चे आयोजन दिनांक १७ मार्च २०२३ रोजी करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. राज्यस्तरावरून दिनांक १० ते १३ मार्च २०२३ या कालावधीत सर्वेक्षण

साहित्य जिल्हास्तरावर वितरीत करण्यात आलेले आहे. याबाबतची आवश्यक पूर्वतयारी जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत करण्यात आलेली होती .

मात्र दिनांक १४ मार्च २०२३ पासून राज्यातील बरेच शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत. राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण (SLAS) साठी क्षेत्रीय अन्वेषक (FI) म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 याबाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची दिनांक १५ मार्च २०२३ रोजी ऑनलाईन बैठक घेतली असता बरेच शिक्षक संपावर असल्याने सांगण्यात आले. तसेच बऱ्याच शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी नसल्याचे सांगण्यात आले. सदर बाबीचा विचार करता सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येवू शकतात असे सांगण्यात आलेले आहे. यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिनांक १७ मार्च २०२३ रोजी घेण्यात येणारे राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण सदर दिवशी होणार नाही. सर्वेक्षणाची पुढील दिनांक आपणास यथावकाश कळविण्यात येईल.असे पत्रात म्हटले आहे.
तुमची ईस्टेट कुणाची छ. संभाजीनगर मध्ये वाघिनीची डरकाळी...

तुमची ईस्टेट तुमची आहे का? हे शेजारी ठरवणार का?

 एकच मिशन जुनी पेन्शन या हा नारा घेऊन राज्यातील लाखो कर्मचारी पेन्शन मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेले आहे,

दिपीका एरंडे यांचे पेन्शन बाबत महत्त्वाचे वक्तव्य...

तुमची ईस्टेट शेजारी ठरवणार का?राज्य मीडिया प्रमुख

जुनी पेन्शन संघटना


 शासनाने या सर्वांचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा त्यांच्या या हक्कावरीलच माझी एक रचना आपल्यासमोर सादर करत आहे .निश्चित आपणास आवडल्यास आपण ही जास्तीत जास्त शेअर करावी.

*आवडल्यास पुढे शेअर करा....*


*✊पेन्शन हवी पेन्शन....✊*


*सरकार मायबाप असू दे चिंता,*

*आमच्या कुटुंबाच्या भविष्याची ही,*

*आस साऱ्यास जगण्याची,*

*अधिकार आमचा हिरावून जगी**काळ सरता देह दाटतो अंती,*

*नको अंधार जीवन मावळता,*

*ग्रसलो या नियमाने सारेच,*

*उगवता सुर्य पाहू उजळता,**मागून हक्क सर्व समानता ,*

*समान कामास मिळे सम सुविधा,*

*जास्त देण्या कायच हा बोजा,*

*वाटतो का हेवा? देण्यास दुविधा...**सेवा बजावता वाटे समाधान,*

*चाकरीचे फळ म्हातारपणी,*

*सांभाळ या झिजलेल्या देहाचा,*

*पेन्शन मिळू दे सकलजणी...*  *प्रकाशसिंग राजपूत*

    🚩छ. संभाजीनगर🚩ही कविता फारच सुंदर आहे एकच मिशन...पेन्शन


🚩✊🚩 लढतोय आम्ही हक्कासाठी🚩✊🚩

शासकीय दरबारी आम्ही

प्रामाणिक चाकरी करतो

देशाच्या या भावी पिढीला

आम्ही शिक्षक घडवतो


अनेक अशासकीय कामे देऊन

सरकार राबवुन  घेत असते

शिकवणे हेच काम आमचे

त्यावेळी मात्र का विसरते


सगळ्यांना न्याय एक असावा

 विनंती आता करत आहोत

शांततेत राहुन मागण्यांसाठी

 हक्का साठी लढत आहोत


अन्याय आमच्यावर करु नका

सरकारी दरबारी  हवी हमी

आमची ताकद पाहताय तुम्ही

शिक्षकांना लेखु  नका  कमी


मागणी मान्य करुन आम्हाला

समान न्याय  व हक्क द्यावा

एकच पेन्शन या योजनेचा

सर्व कर्मचाऱ्यांना लाभ हवा


कवयित्री 

सुप्रिया इंगळे

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

पहा का दिला संघाच्या तालुका अध्यक्षांनी राजीनामा 


पहा का दिला राजीनामा

 

संघाच्या शिलेदाराने संपातून माघार नाही दिला तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा....

अवघड क्षेत्र फेरीतील पसंतीक्रम भरणेबाबत

 शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.  अवघड क्षेत्रातील फेरीसाठी शिक्षकांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर कसा भरावा याची माहिती आम्ही देणार आहोत .

अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी ज्या शिक्षकांची सुगम क्षेत्रात दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वर्ष  पूर्ण झालेली आहे. अशा सर्व शिक्षकांची यादी यापूर्वी  विन्सिसने पोर्टलवर जाहीर केली होती .त्या यादीत विशेष संवर्ग एक मध्ये मोडत असलेले व ज्यांना बदलीतून सूट हवी आहे अशा शिक्षकांची नावे होती.
त्यांना बदलीतून सूट घेता यावी यासाठी या फेरी आधी  विशेष संवर्ग येथे अर्ज भरून घेतले होते.
त्यांचे अर्ज पडताळणीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता .ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी होती व ज्या शिक्षकांचे अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांकडून मंजूर झाले अशा शिक्षकांची नावे यादीतून वगळण्यात आली .पण ज्या शिक्षकांचे अर्ज शिक्षण अधिकाऱ्यांनी रद्द केले त्या शिक्षकांची नावे यादी तशीच राहतील. त्यानंतर शिक्षकांची सुधारित यादी पोर्टलवर पुन्हा एकदा प्रसिद्ध होईल अवघड क्षेत्रात जितकी रिक्त पदे असतील तेवढेच शिक्षकांची नावे त्या यादीत असतील यादीच्या शिक्षकांची नावे येतील त्यांना पोर्टलवर आपला पसंतीक्रम देण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिलेला आहे . 
जे शिक्षक आपला पसंती क्रम पोर्टलवर देणार नाही त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या जागेवर बदलीने नियुक्ती देण्यात येईल. त्यामुळे शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पसंती क्रम पोर्टलवर भरावा परंतु त्या पसंती क्रमाप्रमाणे साधा उपलब्ध नसतील तर त्यावेळी उपलब्ध असलेल्या जागेवर पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल.
पसंतीक्रम भरण्यासाठी -
शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करावे.
त्यातील एप्लीकेशन फॉर्म वर क्लिक केले की स्क्रीनवर डिफिकल्ट एरिया एप्लीकेशन वर क्लिक केले की अर्जदाराचे पूर्ण नाव त्याच्या शालार्थ क्रमांक व विद्यमान शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल त्याखाली सिलेक्ट प्रेफरन्सेस म्हणजे पर्याय निवडा दिलेले आहे. तुम्हाला खाली रेड बॉक्स मध्ये मिनिमम चॉईसेस म्हणजे किमान पर्याय एक व मॅक्झिमम चॉईसेस म्हणजे कमाल पर्याय तीस अथवा उपलब्ध असलेल्या पर्यायांशी संख्या दिसेल तुम्ही कमाल पर्यायांपैकी किती पर्याय निवडले त्याची संख्याही येथे तुम्हाला दिसेल.खालील ड्रॉप डाऊन मधून तुम्हाला तालुका निवडायचा आहे. व त्याखालील मधून शाळा निवडायची आहे येथे पर्यायाचे बंधन नाही तुम्ही कमीत कमी एक पर्याय निवडून अर्ज सबमिट करू शकता पर्याय निवडून झाल्यावर खाली तुम्हाला एक स्वीकारण स्वीकारावे लागेल त्यात असे नमूद केले आहे की मी दिलेल्या पसंती क्रमाप्रमाणे पद उपलब्ध असेल तर मला त्या जागेवर नियुक्ती मिळेल परंतु माझ्या पसंती क्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसतील तर उपलब्ध जागेवर माझी बदलीने नियुक्ती केली जाईल हे मला मान्य आहे तुम्ही चेक बॉक्स चेक केला की तुम्हाला सेव व सबमिटचे बटन दिसू लागेल तुम्ही तुमचे पर्याय सेव करून ठेवू शकता सबमिट बटन वर क्लिक केले की ओटीपी प्रविष्ट करून फॉर्म सबमिट करू शकता इथे शिक्षकांनी लक्षात ठेवावे नुसता फॉर्म सेव करून चालणार नाही तर तो सबमिट करावा लागेल नाहीतर तुमचा पसंतीक्रम ग्राह्य धरला जाणार नाही ओटीपी प्रवेश करून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे हा अर्ज तुम्ही पुन्हा म्हणजेच मागेही घेऊ शकता करण्यासाठी पुन्हा एकदा डिस्ट्रिक्ट वर क्लिक करावे आपलिकेशन फॉर्मवर क्लिक केले असता स्क्रीनवर डिफिकल्ट एरिया एप्लीकेशन वर क्लिक केले की तुम्ही भरलेल्या पसंती क्रमाचा अर्ज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याखाली म्हणजे विकल्प मागे घ्या हे बटन दिसेल त्यावर क्लिक केले असता ओटीपी प्रविष्ट करून तुम्ही तुमचे विकल्प मागे घेऊ शकता व मुदत असेपर्यंत अर्ज पुन्हा भरू शकता अर्ज भरायची मुदत असेपर्यंत पोर्टलवर अर्ज कितीही वेळा भरून ते विट्रो करू शकता परंतु एकदा का तारीख उलटली की नंतर तुम्ही पोर्टलवर सबमिट करावा त्यानंतर पोर्टलवर बदली प्रक्रिया राबवली जाईल व बदलीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून निर्गमित केले जातील 2022 च्या बदलीचे सर्व टप्पे पूर्ण होतील.


आरटीई प्रवेशबाबत

 आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झालेली होती.

 त्याची १७ मार्चपर्यंत मुदत असून, राज्यभरातून या प्रवेशप्रक्रियेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दहा दिवसांतच या प्रवेशांसाठी राज्यभरातून एक लाख  १९६९ जागांसाठी दोन लाखांवर प्रवेश अर्ज दाखल झाले आहेत.


राज्यभरातून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे मूळ पोर्टलवरील अर्ज दाखल करण्याच्या student.maharashtra.gov.in लिंकला अनेक समस्या येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन साइट संथ असल्यास पुन्हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करण्याची सूचनाही शिक्षण विभागामार्फत देण्यात आली होती. परंतु, गेल्या काही दिवसांत समस्या अधिकच वाढल्याने अनेक पालकांनी पैसे खर्च करून इंटरनेट कॅफेमध्ये अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.

यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे.

या समस्यांमुळे वैतागलेल्या पालकांनी ही सुविधा सुरळीत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरटीई प्रवेश अर्जांसाठी rte25admission.maharashtra.gov.in ही पर्यायी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १७ मार्चला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पालकांना मूळ पोर्टल किंवा नव्याने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दाखल करता येणार आहे.

१७ मार्चपर्यंत मुदत

मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना १ ते १७ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, असे शिक्षण विभागाने कळविले आहे

नेमका मोफत प्रवेश कोणास ?

 अनुसूचित जाती, अनु. जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागासप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, हे विद्यार्थी मोफत प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्याच्या आधारावर या गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येतो. याशिवाय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असावे. कोरोनामध्ये पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवेश मिळणार आहे.

कोणती  कागदपत्रे लागतात ?


- रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल आदी.
- आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला.
- विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला.
- विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.नवीन गझल

 

गीत अलंकार प्रस्तुत करत आहे...

श्रीमती सारिका बद्दे मॕडम यांची रचना गीत स्वरुपात ....

मानते मी.... गझल....गायन  श्रीमती आशा चौधरी मॕडम

संगीत व व्हिडीओ
प्रकाशसिंग राजपूत

शिक्षण विभाग व ॲमेझॉन यांच्यात करार

 

शालेय जीवनात कोडींगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. या उद्देशाने राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअर इनिशिएटिव्ह तसेच लीडरशिप फॉर इक्विटी या दोन संस्थांसमवेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या ई-उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला अनुसरून समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीकोनातून हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा तयार करणे आणि एकात्मिक अभ्यासक्रम तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद या नऊ जिल्ह्यात हा उपक्रम सुरू करण्यात येत असून एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.


संकलित चाचणी २ डाऊनलोड

 संकलित चाचणी क्रमांक २ नमूना प्रश्नपत्रिका

खालील टॕबला क्लिक करा....

संकलित चाचणी नमुना प्रश्नपत्रिका

 संकलित चाचणी क्रमांक २ नमूना प्रश्नपत्रिका


डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र मिनीशाळेच्या सौजन्याने संकलित चाचणी क्र २ च्या नमुना प्रश्नपत्रिका एकाच पी.डी.एफ मध्ये उपलब्ध करून देत आहोत.

     ही फक्त नमूना दाखल असून आपण आपल्या स्तरावर आपल्या परिने स्वतः चाचणी पेपर तयार करून चाचणी घेण्यास सोयीस्कर होण्यासाठी ही पी.डी.एफ देत आहोत.


नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी 👇याडं की खुळं गीत...

 🤣  *नक्कीच तुमच्या आजूबाजूला अशा प्रवृत्ती वावरत असतील...😇😄*

व्यंगात्मक गीत...


*तर ऐका... व जास्तीत जास्त शेअर करा...*
https://youtu.be/75GLH4smJFQपुढील वर्षापासून 'सेलिब्रिटी स्कूल' सुरु होणार

  देशात नवीन शैक्षणिक धोरण आता राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेतून उच्च व तंत्र शिक्षणासह इतरही सर्व प्रकारचे शिक्षण घेता येणार आहे. यामुळे शाळांमध्ये पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांचा ओघ वाढणार आहे. मराठी मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.'सेलिब्रिटी स्कुल' सुरू करणार...


शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून 'सेलिब्रिटी स्कुल' सुरू करण्यात येणार आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ (सेलिब्रिटी) इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व आदी कला शिकवतील. त्यानंतर स्पर्धा घेवून पहिल्या १ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेले सेलिब्रिटी या १ हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देतील,

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 'इंद्रधनुष्य २०२३' हा कला आणि क्रीडा आविष्कारांचा सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळीतील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम येथे संपन्न झाला. या सोहळ्यात २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला आणि क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.


अवघड क्षेत्रातील बदली अर्ज

 जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील पुढील टप्पा  म्हणजेच अवघड क्षेत्रात करावयाच्या बदल्यासाठी शिक्षकांनी जे फॉर्म भरायचे आहेत .

त्याबाबत आज विन्सिस तर्फे एक मार्गदर्शन पर व्हिडिओ पाठवण्यात आलेला आहे व अर्ज करण्याच्या पूर्वी हा व्हिडिओ निश्चित सर्वांनी पहा जेणेकरून पुढील प्रक्रियेत अडचणी येणार नाही.

महाराष्ट्रात लवकरच शिक्षक भरती

 

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची  भरती होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती सभागृहात दिली.राज्यातील पात्रता  धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती. परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.

आमदार राजेश एकडे आणि इतरांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली.माननीय आयुष प्रसाद साहेब यांच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻माननीय आयुष प्रसाद  साहेब यांच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

✍🏻✍🏻✍🏻✍🏻

👉🏼 1)शिक्षक संवर्ग चार 4 साठी त्यांच्या बदल्या करत असताना कुठचीही जागा  समानीकरणामध्ये ठेवू नये. अर्थातच सर्व रिक्त व बदली  पात्र शिक्षकांच्या जागा त्या संवर्ग चार  4 साठी खुल्या करण्यात याव्यात. संवर्ग दोन  2

👉🏼2) संवर्ग 2 मध्ये या वर्षी बदली झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत 

या वर्षी ज्यांची संवर्ग 2 मध्ये बदली झालेली आहे अशा पती व पत्नी यांना इथून पुढे किमान 5 वर्षे बदलीपात्र धरण्यात येऊ नये.

 आयुष प्रसाद साहेब यांनी ही मागणी अमान्य केली आहे.

 संवर्ग तीन 3

👉🏼3)विषय - संवर्ग 3 मधील अवघड मधून सुगम मध्ये आलेल्या शाळेतील शिक्षकांना येत्या  बदली प्रक्रियेत एक संधी मिळणेबाबत मागणी करण्यात आली होती

2019 च्या यादीनुसार ज्या शाळा अवघड मध्ये होत्या परंतु 2022 च्या यादीत त्या सुगम मध्ये आल्या आहेत. अशा शाळेतील शिक्षकांना येत्या जिल्हा अंतर्गत बदलीत संधी मिळावी कारण फेब्रुवारी 2023 मधील प्रक्रियेत राज्यातील अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना रिक्त पदे न दाखवल्याने  शिक्षकांनी बदली प्रक्रियेत सहभाग घेतला नाही आणि आज त्यांच्या शाळा सुगम मध्ये आल्यामुळे त्यांना त्याच शाळेत 10 वर्ष काढावे लागणार आहेत. त्यामुळे अशा अवघड मधून सुगम मध्ये आलेल्या शाळेतील शिक्षकांना ज्यांनी यापूर्वीच्या बदली प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही अशा शिक्षकांना पुन्हा एक संधी बदली प्रक्रियेत मिळावी ही  विनंती माननीय साहेबांनी मान्य केलेली आहे.


👉🏼4) सामाजिक शास्त्र, भाषा व विज्ञान या प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या बदल्या करत असताना त्याची एकही जागा  समानीकरणांमध्ये ठेवू नये. या जागा  समानीकरणांमध्ये ठेवून खाजगी शाळेतील पदवीधर  शिक्षकांना समायोजनामध्ये पदस्थापना  देण्यात आलेली आहे ही बाब जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधर शिक्षकांसाठी  अतिशय अन्यकारक आहे. यावर  माननीय आयुष  प्रसाद साहेब यांनी याबाबत ज्या जिल्ह्यांमध्ये खाजगी प्राथमिक पदवीधर शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली या जागावर पदस्थापना देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यातील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवणार व जागा ह्या समानीकरणांमध्ये टाकण्यात येणार नाहीत अशा प्रकारचे आश्वासन माननीय साहेबांनी शिष्टमंडळास दिले आहे. व तसेच मला अध्यक्ष या नात्याने पुढच्या जिल्हा परिषद मध्ये किती खाजगी शिक्षकांना समायोजनाच्या नावाखाली पदस्थापना देण्यात आलेली आहे याचा आकडा माहित करण्याचे सुचविले आहे.

👉🏼 5)संवर्ग एक च्या बाबतीमध्ये "एन्जोप्लास्टी चा"शासन निर्णयामध्ये समावेश करण्यात यावा अशा प्रकारचे मागणी करण्यात आली होती. अशा अनेक आजारांना संवर्ग एक मध्ये टाकू टाकण्याची मागणी येईल व त्यामुळे संवर्ग 1 एक च्या बदलीचा आकडा फुगलेला दिसेल व त्याचा परिणाम हा संवर्ग एक, दोन,तीन आणि चार वर होणार. यामुळे या आजाराला शासन निर्णयाच्या बदली प्रक्रियेत समावेश करता येणार नाही. असे स्पष्ट सांगितले

👉🏼6) सेवाजेष्ठतेची निश्चित तारीख ही 31 मे ऐवजी आता 30 जून ही धरण्यात येणार आहे. ही अनेक शिक्षकांच्या मागणी होती आणि या मागणीला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य करत न्याय दिला आहे.

 याबरोबर अनेक विषयावर चर्चा झाली.

 यावेळी महाराष्ट्र राज्यातून शिक्षक संघटना समन्वय समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

🌹🌹🌹🌹🌹

संजय नागे यांच्या लेखणीतून बदली अपडेट

 ✳️ *बदली अपडेट*

*अवघड क्षेत्र रिक्त जागा भरणे महत्त्वाचे टप्पे*


*संजय नागे दर्यापूर 9767397707*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या या टप्प्या मध्ये बदलीचा संदर्भ दिनांक 30 जून 2022 असेल*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरावयाच्या टप्प्यामध्ये पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या वास्तव सेवा जेष्ठतेने म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा जेष्ठतेने करण्यात येतील*


➡️ *सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची 10 अथवा 10 पेक्षा जास्त वर्षे सेवा झाली आहे या शिक्षकांना शाळेवरील सेवेची अट राहणार नाही अशा शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाईल.*


✳️ *नकाराची सुविधा खालील प्रकारचे शिक्षक घेऊ शकतील* 


➡️ *जे शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असून सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष न झाल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत असे शिक्षक या टप्प्यामध्ये नकार देऊन आपली बदली टाळू शकतात*


➡️ *ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता होकार दिला होता परंतु त्यांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात व ते नकार देऊन बदली टाळू शकतात*


➡️ *तसेच ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांना शाळेवर तीन वर्ष झाले असताना सुद्धा या बदली प्रक्रियेमध्ये होकार किंवा नकार नोंदवला नव्हता अशा शिक्षकांची नावे या यादीमध्ये येऊ शकतात असे शिक्षक सुद्धा या बदली टप्प्यामध्ये नकार नोंदवून बदली टाळू शकतात*


➡️ *विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना  आपण संवर्ग एक मध्ये येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील सादर केलेल्या प्रमाणपत्राची वैधता पडताळण्यासाठी 30 जून 2022 ही तारीख प्रमाणित धरण्यात येईल* 


✳️ *सदर बदली टप्प्यांमध्ये खालील शिक्षकांचा समावेश होणार नाही*


➡️ *जिल्हातर्गत बदली प्रक्रिया 2022 च्या बदली प्रक्रियेमध्ये यापूर्वी कोणत्याही संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही*

➡️ *ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वीच बदली प्रक्रियेमध्ये बदली करिता नकार दिलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही* 


➡️ *तसेच याआधी बदलीपात्र शिक्षकाने, विशेष संवर्ग 1 मधून अर्ज भरताना बदलितून सूट हवी आहे का या प्रश्नाला नकार नोंदवला व पसंती क्रम न भरल्यामुळे त्या शिक्षकाची विस्थापित राउंडमध्ये बदली झाली*


➡️ *विशेष संवर्ग भाग एक च्या ज्या शिक्षकांनी बदली करिता होकार नोंदवून बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही*


➡️ *ज्या विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झाले नाहीत अशा शिक्षकांचाही समावेश या बदली टप्प्यामध्ये होणार नाही*


✳️ *अत्यंत महत्त्वाचे नकार कसा नोंदवावा*


*ज्या शिक्षकांना बदलीतून सूट हवी असल्यास म्हणजेच नकार द्यावयाचा असल्यास किंवा असलेल्या शाळेवरून बदली नको असल्यास*

*खालील पोर्टल वरील विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर होय (Yes) नोदवावे*


*माझे नाव अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या यादीत आले असून मला बदलीतून सूट हवी आहे ? --- होय Yes*


*या यादीत समाविष्ट असलेले सर्व संवर्ग एक चे शिक्षक बदली करिता नकार नोंदवणार आहेत म्हणजेच आहे त्या शाळेवरून बदली मागणार नाहीत त्यामुळे होकारासंदर्भात स्पष्टीकरण दिलेले नाही*


✳️ *बदली प्रक्रिया खालील प्रमाणे करण्यात येईल*


➡️ *सर्वप्रथम सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांची वास्तव सेवा जेष्ठतेनुसार यादी दिनांक 6 मार्च पूर्वी प्रकाशित करण्यात येईल*


➡️ *प्रकाशित केलेल्या यादी मधील संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकार देण्याची सुविधा दि. 6/03/2023 ते 8/03/2023 दरम्यान  देण्यात येईल यामध्ये शक्यतोवर संवर्ग एक च्या शिक्षकांनी नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली होणार नाही*


➡️ *ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी होकार किंवा नकार नोंदवलेला आहे त्या शिक्षकांच्या संवर्ग एक च्या पुराव्याची व अर्जाची पडताळणी दि. *9/03/2023 ते 11/03/2023 दरम्यान शिक्षणाधिकारी करतील*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी प्रकाशित होईल  तसेच अवघड क्षेत्रात रिक्त पदांच्या संख्येएवढी  सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक ,भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र व मुख्याध्यापक शिक्षकांची यादी संवर्ग एक च्या नकार दिलेल्या शिक्षकांना वगळून दि 13/03/2023 रोजी प्रकाशित करण्यात येईल* 


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून दि.14/03/2023 ते 17/03/2023  दरम्यान प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल* 


➡️ *प्राधान्यक्रम भरल्यानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या  जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया दि.18/03/2023 ते 20/03/2023 दरम्यान चालविली जाईल याच कालावधीत ज्या शिक्षकांना त्यांच्या प्राधान्य क्रमाने बदली देणे शक्य न झाल्यास अशा शिक्षकांची बदली सिस्टीम व्दारे करण्यात येईल*


➡️ *जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2022 या ठिकाणी पूर्ण होत असल्यामुळे या बदली प्रक्रियेतील सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश दिनांक 21 /3/ 2023 ला प्रकाशित करण्यात येतील*➡️ *या बदली टप्प्यामध्ये आपण पसंती क्रम न दिल्यास आपली बदली सिस्टीम द्वारे करण्यात येईल*


➡️ *पसंतिक्रम देण्यासाठी बंधन नाही. किमान 1 आणि कमाल 30 पर्याय बदली अर्जामध्ये आपण देऊ शकता.*


➡️ *अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याच्या बदली टप्प्यामध्ये प्रकाशित झालेल्या यादीतील शिक्षकांनी शक्यतोवर तीस शाळांचा पसंती क्रम भरावा*


➡️ *पसंतीक्रम भरत असताना आपला यादीतील सेवा जेष्ठता व उपलब्ध असलेल्या जागांचा समन्वय साधून प्राधान्यक्रम भरावा जेणेकरून याच तीस शाळांपैकी एक शाळा मिळणे सोयीचे होईल*


➡️ *आपण दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार जर आपल्याला शाळा न मिळाल्यास आपली बदली सिस्टीम द्वारे करण्यात येईल या ठिकाणी आपणास गैरसोयीच्या शाळा मिळू शकतात*

*काही अडचण आल्यास आपण मला सरळ कॉल करू शकता* 


*धन्यवाद*

अवघड क्षेत्रातील संवर्ग १ बदलीबाबत

 जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र. १ येथे नमूद पत्रातील वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १,२,३, ४, ५ व ६ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

२शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील विशेष संवर्ग-१ शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे. परंतु बदली प्रक्रिया राबविताना विशेष संवर्ग -१ मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणेबाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्यात समाविष्ट झालेले आहेत. तसेच विशेष संवर्ग-१ मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे,


अवघड क्षेत्रातील शाळेवर बदलीस कोण कोण ठरले पात्र ?वाचा....

 अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणेबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, याबाबतचे ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र....👇