डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद
केंद्रप्रमुख परीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
केंद्रप्रमुख परीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ

 केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ ....


शाळास्तरावरील लेखे व अंदाजपत्रके....

डिजिटल स्कूल समूह घेऊन आला आहे. शिक्षण विभागातील विविध भरती परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शक व्हिडीओ ...केंद्रप्रमुख परीक्षा व्हिडीओ ३ व ४

केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ 

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहाच्या वतीने जिल्हा परिषद मधील केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेच्या तयारीचा विषय ....

आपल्या YouTube चॕनल @prayagainstitute  (  www.youtube.com/c/Prayagainstitute )

       पेपर एक आणि पेपर दोन बद्दल सविस्तर माहिती दररोज अगदी  मोफत 👍👍

ही संधी दिल्या बद्दल  समूहनिर्माता  प्रकाशसिंग राजपूत व मुख्यप्रशासक श्रीमती लीना वैदयमॕडम यांचे  आभार...

आजचे व्हिडिओ👍👍


व्हिडीओ ३ रा    राष्ट्रीय बालहक्क संरक्षक आयोग 
व्हिडीओ ४ था बालकासंबंधीचे  सर्व  कायदे केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ १ | rte 2009 |

केंद्रप्रमुख परीक्षा  तयारी करणाऱ्या सर्व परीक्षा त्यांनी संधी सोडू नका सर्वांनी पुढील नियोजनानुसार अभ्यास चालू ठेवा...


पुढील आठवड्या मधील आपल्या केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विस्तार अधिकारी भरती परीक्षेकरिता नियोजित तासिका*...

1. 9 डिसेंबर सकाळी सात वाजता... 1111

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 संपूर्ण स्पष्टीकरणासहित Rte 2009

केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शक व्हिडीओ २ रा | maharashtra rte act |kendrapramukh exam |

 

दहा डिसेंबर रोजी रविवार असल्याकारणाने दोन तास होतील.... 

दहा डिसेंबर संध्याकाळी सहा वाजता....

महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम

पुढील व्हिडीओ 👇

4. 11 डिसेंबर सकाळी सात वाजता

राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी

चॕनलला सब्सक्राईब अवश्य करा... 👇

https://bit.ly/4arBrVl

 

conclusion

१२ डिसेंबर सकाळी सात वाजता

*राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग 2005*

6. 13 डिसेंबर सकाळी सात वाजता

*विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना*

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची सुवर्णसंधी

 

आता पहा केंद्र प्रमुख पदासाठी अधिक माहिती...     

जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्याची पुन्हा एकदा संधी आली...
          

केंद्रप्रमुख परीक्षा डिसेंबर 2023 मध्ये होणार; जाणून घ्या परीक्षेसाठीची आवश्यक शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप...

केंद्रप्रमुख भरती           महाराष्ट्र  शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेत  2384 केंद्रप्रमुख पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा" या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन डिसेंबर 2023 मध्ये  करण्यात आले आहे.


अर्ज भरण्याचा कालावधी


        केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. 01/12/2023 ते 08/12/2023 या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती  www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


     IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे.

 
     शासन निर्णय 27 सप्टेंबर 2023 नुसार विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सुधारित नवीन अर्हता


         कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.


        आता सुधारित अर्हतेनुसार 50 वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच ज्यांना पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकही अर्ज करू शकणार आहेत. तसेच या पूर्वी अर्ज केलेले असल्यास पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही*

केंद्रप्रमुख वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400


           केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी


     केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
         केंद्रप्रमुख पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.

         पेपर क्रमांक एकमध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.   

 
     पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता


        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.


पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह


1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4.अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5. माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6. विषयज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7.संप्रेषण कौशल्य  - 15 गुण


     एकूण - 100 गुण                         

पेपर 1+ पेपर 2=200 गुण


महागाई भत्ता वाढ .... ४% जुलैपासून ....

केंद्रप्रमुखपदी विषयनिहाय पदोन्नती देण्याच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या धोरणाला अंतरिम स्थगिती...

 राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांना उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. 

न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनावाला यांच्या खंडपीठाने केंद्रप्रमुख पदी पदोन्नती देताना त्या शिक्षकाच्या सेवाज्येष्ठतेचाच विचारात घेतला पाहिजे. विषयनिहाय पदोन्नती देणे चुकीचे आहे, असे स्पष्ट करताना केंद्रप्रमुखपदी विषयनिहाय पदोन्नती देण्याच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या धोरणाला अंतरिम स्थगिती दिली. तसेच राज्याच्या नगरविकास विभागासह जिल्हा परिषदेचे सीईओ व शिक्षण उपसंचालकांना नोटीस बजावून १ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

सोलापूर जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाने १ डिसेंबर २०२२ आणि २७ सप्टेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयांचे पालन केले नाही. शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती न देता विषयनिहाय पदोन्नतीचे धोरण राबवून बेकायदेशीपणे पदोन्नतीची तशी यादी प्रसिद्ध केली. या यादीविरोधात बबन पातुळे यांच्यासह अन्य १६ शिक्षकांच्या वतीने अॅड. निरंजन भावके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकेवर पद न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. निरंजन भावके यांनी राज्य सरकारच्या निर्णयाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. राज्य सरकारने घेतलेला निर्णय बेकायदा असल्याचा दावा करत पदोन्नतीची यादी रद्द करा आणि सेवाज्येष्ठतेनुसार केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्याबाबत जिल्हा परिषद सीईओंना निर्देश द्या, अशी विनंती केली.

खंडपीठाने याचिकेची गंभीर दखल घेतली. सोलापूर जिल्हा परिषदेने दोन शासन निर्णय का डावलले ? विषयनिहाय पदोन्नती अनेक शिक्षकांवर अन्याय करणारी आहे. असे देव असताना सेवाज्येष्ठतेनुसार त्यां पदोन्नती देण्याच्या सरकारी धोरणाचे पालन का केले नाही? याबाबत १ नोव्हेंबरपर्यंत लेखी उत्तर सादर करा, असे आदेश देत जिल्हा परिषदेचे सीईओ, नगरविकास विभाग, पुणे येथील शिक्षण उपसंचालकांना नोटीस जारी केली.

केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द

 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील केंद्रप्रमुखांच्या भरतीसाठी ५० वर्षे वयोमर्यादा आणि ५० टक्के गुणांची ठेवलेली अट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या भरतीपासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ५ जून रोजी केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली  होती. 

केंद्रप्रमुख पदे ही बढतीने कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून सेवाज्येष्ठता ५० टक्के व मर्यादित विभागीय परीक्षेने ५० टक्के अनुशेष भरण्याच्या निर्णय घेतला होता; परंतु गेल्या ७९ वर्षांत ही पदे कोणत्याच पद्धतीने न भरल्याने आता परीक्षेसाठी कमाल ५० वर्षे वयोमर्यादा आणि पदवीला ५० टक्के गुणांची अट ठेवल्याने अनेक सेवाज्येष्ठ, अनुभवी, राज्य राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक पात्रता असूनही केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेला बसण्यापासून वंचित राहणार होते.केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता

 केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत.

केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा. न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अनुसार शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील सुधारित करण्यात आलेली परिच्छेद क्र. ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची, तसेच शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र. ५.२ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता विहित करण्यात आलेली किमान ५० वर्ष वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक अर्हतेबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

शासन निर्णय:-


मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात येत आहेत. परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहतील.


०२. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता पुढीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात येत आहे:-


२.१ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड:-


मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.


२.२ पदोन्नतीने नियुक्तीसाठी:-


ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व


गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.

०३. केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक


सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी. ०४. सदर शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०९२७१२२३५५३४२१

आदेश पहा....केंद्रप्रमुख परीक्षा करिता के सागर ची उपयुक्त पुस्तके

 समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 3री आवृत्ती के सागर केंद्रप्रमुख भरती परीक्षा पेपर पहिला


अभियोग्यता (अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व)
भाषिक क्षमता चाचणी (मराठी)
भाषिक क्षमता चाचणी (इंग्रजी)
गणितीय चाचणी
बुद्धिमापन व तार्किक क्षमता

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती करिता अभ्यासक्रमांनुसार रचना केलेला एकमेव संदर्भ

https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/

=====================================

केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर -2 डॉ. शशिकांत अन्नदाते शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह चर्चात्मक व विश्लेषणात्मक स्वरूपात

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध...

नमुना पी.डी.एफ पहा...केंद्रप्रमुख सराव परीक्षा क्र. १

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - 2023

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2023- सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 [Educational Youtube Channel : DDC Learning (Fun, Enjoy & Knowledge  ]


एकूण प्रश्न : 200


एकूण गुण : 200एकूण वेळ : 120 मिनिट


: परीक्षार्थीना महत्वपूर्ण सूचना :


1) ही सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 01 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 च्या के 2 च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असून, फक्त ही परीक्षा देणाऱ्या परीक्षा या सरावासाठी, youtube Channel क्र. 1 व अधिकच्या अभ्यासासाठी असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे किंवा BRR संस्थांशी काहीही संबंध नाही.

2) ही परीक्षा प्रत्यक्ष ऑनलाईन होताना, आपला युजर आयडी, आपले संपूर्ण नाव, आपला फोटो चेक करून घ्यावा. काही चूक असेल तर तत्काळ पर्यवेक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावे. पासवर्ड साठी पर्यवेक्षकांच्या सूचनेकडे लक्ष द्यावे. परीक्षेदरम्यान काहीही अडचण असल्यास पर्यवेक्षकांना सांगावे व त्यांच्या सूचनेनुसार कृती करावी. learnin

3) या प्रश्नपुस्तिकेतील प्रत्येक प्रश्नाला 4 पर्यायी सुचविली असून, त्यांना 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक दिलेले आहेत. त्या चार उत्तरांपैकी अर्थात योग्य उत्तराचा क्रमांक उत्तरपत्रिकेवरील सूचनेप्रमाणे तुमच्या समोरील ऑनलाईन स्क्रीन्  गोल करून (क्लिक करून) नमूद करावा.

4) अशा प्रकारे उत्तरपत्रिकेवर उत्तरे क्रमांक नमूद करताना तो संबंधित प्रश्न क्रमांकासमोर छायांकित करून / गोल/ क्लिक करून विला जाईल याची काळजी घ्यावी. कारण बऱ्याचदा घाई-घाईने चुकीचा पर्याय छायांकित /गोल मिलक होऊ शकतो. आपणाला उत्तर बरोबर येत असून अशी चूक होऊ शकते. अशा मुळे विनाकारण आपल्या मेरिटवर परिणाम होऊ शकतो. याची जास्त काळजी घ्यावी.

5) या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप शासन निर्णयानुसारच्या अभ्यासक्रमानुसार दोन्ही पेपर / विभागानुसार एकूण प्रश्न एकूण गुण : 200; एकूण वेळ : 120 मिनिटे असे आहे. वेळ लावून ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा on to copy सराव करणे अपेक्षित आहे.

6) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. यास्तव सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. घाईमुळे चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊनच शक्य तितक्या वेगाने प्रश्न सोडवावेत. क्रमाने प्रश्न सोडवणे श्रेयस्कर आहे.

7) पण एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ वाया न घालवता पुढील प्रश्नाकडे वळावे. कारण पुढील सोपे-सोपे प्रश्न वेळ न मिळाल्यामुळे सोडवायचे राहू शकतात. अशा प्रकारे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर वेळ शिल्लक राहिल्यास कठीण म्हणून वगळलेल्या प्रश्नांकडे परतणे सोईस्कर ठरेल.

8) प्रत्यक्ष होणारी ऑनलाईन केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा- 2023 ही या स्वरुपाची, या पॅटर्ननुसार असू शकते किंवा प्रश्नांचे स्वरूप, पॅटर्न बदलू शकते, याची सर्वांनी नोंद घ्यावी व त्यानुसार अभ्यास करावा.


9) शब्द, वाक्य ह्या व्याकरणीय चुका, टंकलेखनाच्या असू शकतात. ही परीक्षा प्रत्यक्ष ऑनलाईन होता मराठी व इंग्रजी या दोन भाषेत असेल, इथे मात्र फक्त मराठीत सराव प्रश्न दिलेले आहेत. 10) उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केलेले उत्तर खोडता येईल. एकदा नमूद केलेले उत्तर खोडून नव्याने उत्तर देता येईल. पण असे वारंवार केल्याने तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. एकापेक्षा जास्त उत्तरे नमूद


करताच येणार नाही. कारण एकाच पर्यायासमोरील उत्तर छायांकित/गोल/क्लिक होतो. 11) प्रस्तुत परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील उत्तरांनाच गुण दिले जातील. नकारात्मक गुण पद्धत नसल्यामुळे सर्वच प्रश्न दिलेल्या वेळेत सोडवणे परीक्षार्थीच्या फायद्याचे राहील. दोन तास संपल्यावर परीक्षा आपोआप सबमिट होऊन, परीक्षा संपेल. त्यामुळे वेळेत संपून प्रश्न सोडवावेत.

 youtube Channel

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा- 2023 Educational Youtube Channel: DDC Learning (Fun, Enjoy & Knowledger


12) सर्व परीक्षार्थीना “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा-2017 साठी मनपूर्वक शुभेच्छा.


परीक्षा सोडविण्यासाठी खालील टॕबला क्लिक करा...केंद्रप्रमुख परीक्षा उपयुक्त माहिती

केंद्रप्रमुख भरती थोडक्यात महत्त्वाचे 


 महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीवर नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे.

अंदाजे खात्रीशीर माहितीनुसार परीक्षा 25 जून 2023 किंवा 2 जुलै 2023 रोजी होऊ शकते.*

परीक्षा योजना :

५.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा

५.२ परीक्षेचे स्वरूप- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

५.३ प्रश्नपत्रिका एक

५.४ एकूण गुण २००

५.५ लेखी परीक्षे योजना व सविस्तर अभ्यासक्रम :

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील. यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.

सौजन्य DDC learning 

केंद्रप्रमुख भरती संपुर्ण जाहिरात पहा...

 

केंद्रप्रमुख 2384 पदांची जाहिरात प्रसिद्ध, शिक्षकांना 15 जून 2023  पर्यंत अर्ज करता येणार ; परीक्षा ऑनलाइन व नवीन अभ्यासक्रमानुसार होणार... 

जाहिरात पहाण्यासाठी खालील टॕबवर क्लिक करा...