डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

स्वच्छता शपथ pledge

 स्वच्छता शपथ (pledge) घ्या व डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र मिळवा...


डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्राच्या सदस्यांसाठी खास स्वच्छता शपथ डिजिटल प्रमाणपत्र ची लिंक सादर करत आहोत.

आपणही शपथ घेऊन स्वच्छता विषयी जागरूक होऊया व इतरांनाही करूया.

 मित्रांनो जास्तीत जास्त या लिंक ला शेअर करा



शपथ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....



https://pledge.mygov.in/swachhta-pledge-2022/




शिक्षणाची नका कापू नाळ.... होईल बालकाचे फार हाल...

 शिक्षणाची नका कापू नाळ....    होईल बालकाचे फार हाल....



शासनाने १४००० च्यावर लहान शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा फारच कठीण निर्णय  राहणार आहे.


मी गेल्या १९ वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत काम करत आलोय. जेव्हा लागलो होतो तेव्हा शाळेत फक्त बंद  पडलेला टु इन वन (रेडीओ + टेपरेकॉर्डर ) होता.

         अशा शाळेत २००५ ला पहिल्यांदा २ संगणक आले व ती शाळा डिजिटल होत विद्यार्थ्यांना जगाशी जोडणी झाली .

पुढे थांबायच नव्हतं नविन स्वरूपाचे प्रशस्त डिजिटल क्लासरुम उभारणी करण्यात वाटचाल सुरु केली . शाळा फक्त डिजिटलच नव्हे तर ग्रीन स्कूल मिशन सुंदर शाळा अशी माझी शाळा पुर्णत:  सोलार ऊर्जेवर चालणारे जिल्ह्यातील आणखी शाळेंना मार्गदर्शक ठरले २०१२ - २०१८ या काळातच  माझ्या लहानशा शाळेने छ. संभाजीनगर जिल्ह्यातील ४८ शाळेंना डिजिटल होण्यात व यातील १७ या सोलार ऊर्जेवर होण्यास प्रेरित केले. हे सर्व होत असतांना समाज सहभाग महत्त्वाचा ठरला. 

     शाळेच्या परिसरात किंवा गावात एक असा शिक्षण प्रेमी असतोच जो पुर्ण रान पेटवतो नेमके अशाच व्यक्तीला माझ्या शाळेच्या भेटीत आणावा असा आग्रह संबंधित शाळेच्या शिक्षकांना असायचा. व मनी जसे तसे प्रत्यक्षात चित्र बदलतांना पाहून निश्चितच खूपच आशादायी व फलदायी बाब होत होती. पुढे हा प्रवास राज्यभर डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या राज्यस्तरीय तथा कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगांव जिल्ह्या पर्यंत असा १८ हजार शिक्षक  व १५ हजार शाळेच्या जोडणीने बनू शकला.

    शिक्षकांना डिजिटल कन्टेट उपलब्ध झाले, शैक्षणिक पीडीएफ , व्हिडीओ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट ते होऊ लागले. मी कल्पित केलेल्या एका विचाराची व्याप्ती इतकी व्यापक होईल ही कधी कल्पनाही केलेली  नव्हती .

      पुढे कोरोना ची चाहूल भारतात झाली मार्च २०२० चे लाॕकडाऊन पडले तेव्हा मनात वेगळी भिती निर्माण झाली या ग्रामीण भागातील शिक्षणाचे काय होणार. मे २०२० ला हेडगेवार हॉस्पिटलची संस्था सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळ यांच्या सहयोगाने शिक्षकांना आत्मबळ मिळण्यासाठी व विद्यार्थ्यांना लाॕकडाऊन काळात शिक्षण या हेतूने राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा घेतली. यात गायन व कवितेचा आशय स्पष्ट होणारे १२० व्हिडीओ १ ली ते १० वी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊन राज्याच्या लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला. 

       मी स्वतः ज्या शाळेत आज काम करत आहे. ती फारच दुर्गम डोंगर भागातील शाळा असून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य आपण साजरा जरी केला असला तरी वाडीपर्यंत अजूनही रस्ता नाही वाडी सोडा गावात ही रस्ता होऊ शकलेला नाही. अशा दुर्लक्षित मुरूमखेडावाडी शाळा सोलारयुक्त डिजिटल होत येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची दारे उघडी होऊ शकली. शाळेतील आमचे आधुनिक शिक्षणात रोबोटिक्स कार, फ्लाॕईंग ड्रोन प्रात्यक्षिक, डिझाईन फाॕर चेंजचे उपक्रम , 

 हे सर्व करत असतांना अल्प निधी ही समस्या जरी होती वेळ प्रंसगी तो आर्थिक भार आम्ही शिक्षकांवर येत होताच याच बरोबरीने कित्येक काम शाळा सुटल्यावर श्रमदानातून घामाने व वेळप्रसंगी रक्त ही सांडले( येथे कोणास मारहाण  नव्हे तर काम करतांना झालेली वैयक्तिक इजा)

इतके काही करत असतांना २०१८ नंतर सर्व शिक्षा अभियान थांबले व समग्र  अंतर्गत शाळेंना पटसंख्या आधारित निधी सुरु झाला. लहान शाळेंना केवळ ५००० रू इतका अल्पसा निधी मिळू लागला . व नेमका २० पटा आतील शाळा बंद करण्यास जणू हाच मुद्दा कारणीभूत ठरतोय की काय असे वाटते. सन २००० नंतर सर्व शिक्षा अभियान आले. यात लहान शाळेंना वार्षिक ७५०० रु दुरुस्ती,  ५००० रू शाळा अनुदान तर शिक्षक अनुदान स्वरूपात १००० रु असे एकूण १३५००/- सरसकट मिळत. या तुलनेत आज सनृ २०२३ महागाई स्वरूप पाहिल्यास केवळ ५००० रू एक संस्था वर्षभर गुणवत्ता पुर्ण कशी चालू शकेल ? हा ही प्रश्न फार महत्त्वाचा म्हणावा लागेल .

 शाळा व शिक्षण  हे आपल्या देशात खर्च म्हणून पाहणे हे फारच दुर्देवी आहे. मुळात हे खर्च नसून ही उदयाची विकसित भारत निर्माण होण्यासाठीची फार मोठी गुंतवणूक असणार आहे.

    काहीही झाले तरी या ग्रामीण लेकरांचा हक्क हिरावून घेऊ नका. त्यांना त्यांच्या अंगणात मिळत असलेले शिक्षण परके करू नका. एक जरी मुलगा शिक्षणातून वंचित होऊन तो गुन्हेगार बनून समाज विध्वंसक बनला व तुरुंगात टाकून त्याला सांभाळायचा खर्च हा आज देण्यात येणाऱ्या शिक्षणापेक्षा निश्चितच जास्त असणार आहे.

   माझी सर्व राजकीय मंडळीना एक विनंती आहे. असे शिक्षण उदासीन होणारे निर्णय कृपया घेऊ नका....


आज बळ आले अखेर या शिक्षणाने देशात सर्वांना,

सोसून गुलामीचे घाव होतो अनुभवा स्वातंत्र्य सुखांना...


    प्रकाशसिंग राजपूत 

        सहशिक्षक 

छ. संभाजीनगर

केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता

 केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत.

केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेबाबत मा. न्यायालयात दाखल होत असलेल्या याचिका व प्राप्त निवेदने, तसेच शासकीय कर्मचारी यांचेकरीता असलेल्या अर्हता या सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुख पदाच्या अर्हतेमधील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ अनुसार शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील सुधारित करण्यात आलेली परिच्छेद क्र. ५.१ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता पदवी परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक असलेली अट रद्द करण्याबाबतची, तसेच शासन निर्णय दि.०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र. ५.२ येथील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरीता विहित करण्यात आलेली किमान ५० वर्ष वयाची अट रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने आवश्यक अर्हतेबाबत पुढीलप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे:-

शासन निर्णय:-


मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित संदर्भ क्र. २ येथील शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात येत आहेत. परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहतील.


०२. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता पुढीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात येत आहे:-


२.१ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड:-


मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.


२.२ पदोन्नतीने नियुक्तीसाठी:-


ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व


गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.

०३. केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक


सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी. ०४. सदर शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०९२७१२२३५५३४२१

आदेश पहा....







एक वेतनवाढ देण्याबाबत शासन निर्णय ...

 पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत शासन निर्णय ...



पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत

 

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतचा आजचा शासन आदेश.  ...




जी.आर. डाऊनलोड करा...









“शाळांऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्यावे”

 

समूहशाळा विकसित करणे, कंपन्यांना शाळा दत्तक देण्याची योजना आणि शासकीय पदभरतीचे कंत्राटीकरण करणे असे निर्णय राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने केली.

हा फोटो प्रातिनिधीक आहे.

हे निर्णय रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्यासोबतच प्रत्येक आमदार, खासदार आणि तहसीलदार यांना निवेदन द्यावे, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पत्र लिहून भावना कळवाव्यात, असे आवाहन समितीने शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना केले आहे. राज्य शिक्षण बचाव कृती समितीची बैठक शनिवारी (२४ सप्टेंबर) पुण्यात झाली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा करणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे निर्णय सरकारने बिनशर्त मागे घ्यावेत,” अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने सरकारकडे केली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “आम्ही बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मागणी सरकारकडे करत असताना सरकार आणि प्रशासन गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण हिरावून घेत आहे. हे थांबवण्यासाठी आपल्याला मोठी लढाई उभारावी लागणार आहे. त्यासाठी कृती कार्यक्रमाची आखणी करावी लागेल.”

“शाळांऐवजी  मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्यावे”

“शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची हजारो रिक्त पदे भरण्याऐवजी सरकारचा भर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावर भर देत आहे.

१४ हजारांहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून समूहशाळा विकसित करणे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण हिरावून घेण्याचा गंभीर प्रकार आहे. शाळांना कंपन्यांकडे दत्तक देण्याऐवजी मंत्रालयाला कंपन्यांकडे दत्तक द्या,' अशी बोचरी मागणी सुधीर तांबे यांनी केली.

“शिक्षण हक्काचे जनआंदोलन ही समाजाची लढाई बनायला हवी”

विकसित देश शिक्षणावर १० टक्क्यांहून अधिक खर्च करतात भारतात हा खर्च तीन टक्क्यांच्या आत आहे. शिक्षण हा देशाचा प्राधान्यक्रम नसल्याबद्दल सावंत यांनी तीव्र खेद व्यक्त केला. “शिक्षण हक्काचे जनआंदोलन ही समाजाची लढाई बनायला हवी”, अशी अपेक्षा सुभाष वारे यांनी व्यक्त केली. शरद जावडेकर यांनी शिक्षणाच्या आशयाची मोडतोड केली जात असल्याकडे लक्ष वेधले.

बैठकीतील प्रमुख मागण्या

१. शाळा दत्तक योजनेचा निर्णय रद्द करावा.
२. समूह शाळा विकसीत करण्याचा निर्णय बिनशर्त मागे घ्यावा.

३. शिक्षण क्षेत्राचे कंपनीकरण आणि कंत्राटीकरण थांबवावे.
४. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देणे तातडीने थांबवावे.
५. विविध उपक्रम, मोबाइल अॅपचा भडिमार बंद करावा.
६. शिक्षण क्षेत्रासाठी श्वेतपत्रिका जाहीर करावी.
७. कोणतीही पळवाट न काढता शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
८. शिक्षणातील ‘सल्लागारशाही’ त्वरित बंद करावी.



दत्तात्रय वारे गुरुजी अखेर दोषमुक्त

दत्तात्रय वारे गुरुजी आरोप सिद्ध न झाल्याने अखेर झाले दोषमुक्त....


वाबळेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी करणारे दत्तात्रय वारे यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल विभागीय चौकशी समितीने दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी हा अहवाल सादर होताच वारे यांना दोषमुक्त केले आहे. तसेच निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेशही जिल्हा परिषदेकडून जारी करण्यात आला आहे. 



वाबळेवाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी डोनेशन घेतला जात असल्याचा तोंडी आरोप १४ जुलै २०२१ मध्ये उपशिक्षक दत्तात्रय वारे यांच्यावर झाला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी या प्रकरणावरून गदारोळ केल्याने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी वारे यांचे निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी लावली. महत्त्वाचे म्हणजे, ज्या व्यक्तीने तोंडी तक्रार केली होती. त्याचीच लेखी तक्रार चौकशी सुरू असताना १५ दिवसानंतर जिल्हा परिषदेने दाखल करून घेतली. त्यांच्यावर शालेय कामकाजामध्ये हलगर्जीपणा करणे व कर्तव्यात कसूर करून पदाचा दुरुपयोग करणे, शालेय प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता व निष्काळजीपणा करणे, महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा वर्तवणूक नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग करणे, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.


तब्बल दोन वर्षे विभागीय चौकशी चालू राहिल्याने हे प्रकरण विधानसभेत पोहोचले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापर्यंत तर गेलेच शिवाय माजी मंत्री बच्चू कडू यांनीही याबाबत सरकारला वारंवार जाब विचारले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडीच्या शाळेतील अनियमिततेबाबत पुन्हा एकदा भाष्य केले होते. त्यावर स्थानिक नागरिकांनी आमदार पवार यांच्या गाव बंदीचा ठराव केला होता. त्यानंतर आता विभागीय चौकशी समितीने या संपूर्ण चौकशीत वारे यांच्यावर झालेले हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर व प्रशासकीय कामात निष्काळजीपणासह संपूर्ण आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळविले व नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे यांना वरील सर्व आरोपांतून दोषमुक्त करीत निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच जारी केला आहे.

राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्याबाबत.

 राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीद्वारे करण्याबाबत.

दि. १४/०९/२०२३ चे शासन पत्राची प्रत सोबत जोडली आहे. (प्रत संलग्न) उपरोक्त विषयी संदर्भ क्र. ४ अन्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील FAST CMP कार्यान्वित असलेल्या ९ जिल्हयांमधील (रायगड, पुणे, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, वर्धा.) जिल्हा परिषदेच्या शाळांमधील, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील तसेच पुणे व कोल्हापूर विभागातील महानगरपालिका / नगरपालिका/कटक मंडळ यांचे मार्फत चालविल्या जाणा-या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर २०२३ चे वेतन सीएमपी (CMP) प्रणालीमार्फत करण्याची आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. सदर टप्पातील आहरण व संवितरण अधिका-यांची यादी संदर्भिय शासन पत्रासोबत जोडली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास तसेच शासनास अवगत करावे. असे आदेशात म्हटलेले आ

आदेश पहा....




२० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा होतील समूह शाळा...

 राज्यामध्ये विविध व्यवस्थापनामार्फत साधारणत १ लाख १० हजार शाळा चालविल्या जातात त्यापैकी सुमारे ६५ हजार शाळा या स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविल्या जातात.

 राज्यातील प्रत्येक मुलाला पूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी, त्यासोबतच राज्यातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात राहील हा उद्देश राहील.

  समूह शाळा निर्माण करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकाची पदे कमी करणे हा उदेश नाही तर गुणवतेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात त्याच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे. या पत्रासमवेत पानशेत जिल्हा पुणे यांचा समूह शाळेबाबत प्रस्ताव यासोबत उदाहरणादाखल उपलब्ध करून दिला आहे.



मायेची चादर

 वेळ काळ जरी बदलला, माय तीच व तिच्या मायेची चादर तिच,*



ती नसण्याची भीती ही जगातली सर्वात मोठी हानी व दुःख असते,

       सर्व माय माऊलींना हा काव्यरुपी प्रणाम🙏🏼

23 नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेला मंजुरी

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भागीदारीद्वारे 23 नवीन सैनिक शाळांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. 

या शाळा, त्यांच्या नियमित संलग्न बोर्ड अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, सैनिक शाळा शिक्षण प्रणालीतील विद्यार्थ्यांना 'शैक्षणिक प्लस' अभ्यासक्रम देखील प्रदान करतील. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नवीन शाळा, संबंधित शिक्षण मंडळांशी त्यांच्या संलग्नतेशिवाय, सैनिक स्कूल सोसायटीच्या आश्रयाखाली काम करतील आणि भागीदारी सैनिक शाळांसाठी सोसायटीने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करतील. निवेदनात म्हटले आहे की, सरकारने स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीत पद्धतशीरपणे सहावी ते वरील 100 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याच्या उपक्रमास मान्यता दिली आहे.



या उपक्रमांतर्गत सैनिक स्कूल सोसायटीने देशभरातील 19 नवीन सैनिक शाळांसोबत सामंजस्य करार केला आहे. यानंतर, भागीदारीत नवीन सैनिक शाळा उघडण्याच्या अर्जांचे मूल्यमापन केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भागीदारीद्वारे 23 नवीन सैनिक शाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. military schools मंत्रालयाने म्हटले आहे की, या उपक्रमामुळे, सैनिक स्कूल सोसायटीच्या नेतृत्वाखाली भागीदारी पद्धतीने चालणाऱ्या नवीन सैनिक शाळांची संख्या 42 वर पोहोचली आहे, त्याशिवाय सध्याच्या 33 सैनिक शाळा सध्याच्या स्वरुपात कार्यरत आहेत.


आंतरजिल्हा बदलीबाबत महत्त्वाचे

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक


शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.


२. आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते.

 मात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आज करण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रियेकरीता E.D. लॉगीन मध्यरात्री पासून सुरु करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दि. १४/०९/२०२३ ते दि. १७/०९/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी असे आदेशात म्हटलेले आहे.

शासन आदेश पहा...




YCMOU BEd प्रवेश 2023-24

 YCMOU BEd प्रवेश 2023-24: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बॅचलर ऑफ एज्युकेशन पदवी कार्यक्रमासाठी प्रवेश देते.  हा कार्यक्रम  शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेली आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो. 

 हे तुम्हाला विविध अध्यापन तंत्रांबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांची वास्तविक जीवनात अंमलबजावणी करण्यास मदत करते.  YCMOU B.ED प्रवेश 2023-24 ऑनलाइन नोंदणी सबमिट करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2023 होती.  YCMOU B.ED पदवी कार्यक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अर्ज होती.


बी.एड. प्रवेश शुल्क कसे असणार




YCMOU B.ED प्रवेश 2023-24 अधिकृत वेबसाईट

 ycmouoa.digitaluniversity.ac.in


 YCMOU Bed प्रवेश 2023

शिक्षण सेवा पंधरवडा यापुढे दरवर्षी

 शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी "शिक्षण सेवा पंधरवडा अभियान " राबविणेबाबत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मा. मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या संकल्पनेस अनुसरुन "शिक्षण सेवा पंधरवडा' आयोजित करावयाचा आहे.
शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या कारणासाठी त्यांना संबंधित कार्यालयात वारंवार भेटी द्याव्या लागत आहेत आणि या कारणामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. त्यांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सेवा विहित कालमर्यादेमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे.

तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने "शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गतीमान व पारदर्शक पद्धतीने सेवा विहित कालमर्यादित देण्याच्या अनुषंगाने दि. ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस "शिक्षण सेवा पंधरवडा यापुढे दरवर्षी राबविण्यात येणार आहे. शासन आदेश पहा....





जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची सभा गुंडाळली

 जोरदार गोंधळानंतर शिक्षक पतसंस्थेची आमसभा निर्णय विना गुंडाळली...


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण आमसभा रविवारी दि. १० सप्टेंबर रोजी आयोजित   करण्यात आली होती. मात्र, गोंधळामुळे एकही ठराव मंजूर न करता ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे अनेक सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा टीव्ही सेंटर येथील गुलाब विश्व हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. सभेच्या पहिल्या सत्रात विभागीय सहायक संचालक रवींद्र वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व सत्कार  करण्यात आला. 

दुसऱ्या सत्रात संचालक मंडळाने तीन ठराव ठेवले...

१) पतसंस्थेतील ठेव एक हजार रुपयांवरून १२०० रुपये करण्यात यावी, 

२)कल्याण निधी २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात यावा आणि

३) पतसंस्थेतील संचालक १३ वरून १७ करण्यात यावे या ठरावांचा समावेश होता.

त्याचवेळी सभासदांच्यावतीने दोन ठराव मांडले. 

 व्याजदर आठ टक्के करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संचालक मंडळाने साळकर यांनी मांडलेल्या ठरावांना विरोध केला. त्यामुळे सभासदांनी संचालक मंडळाच्या ठरावांनाही जोरदार विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंनी गोंधळ सुरू झाल्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली.

  एकही ठराव मान्य न होता आमसभा आटोपली याची खंत सर्वच सदस्य व मागणीकर्ते श्री  विजय साळकर श्री गणेश सोनवणे आर.आर.पाटील यांनी व्यक्त  केली.

मराठा योद्धा मनोज पाटील यांच्यावर लिहिलेली सुंदर कविता...

 मराठा योद्धा मनोज पाटील....

🚩🚩🚩🚩🚩

कवी: दत्ता टरले 9420219159

😊🚩🚩🚩👏🏻


करून जिवाचं रान

बसला वाघ जिद्दीने..

लोटले भले भले ते

आपुल्या हुशार बुद्धीने

😇😇🚩🚩🚩🚩🚩


मग जागली सूड बुद्धी

केला क्रूर  खाकी हल्ला

मग पेटला अजुन सूर्य

गोडीत दिला सल्ला

🚩🚩🚩🚩😊

त्या लाठ्या कट्या छेरे

त्या किंकाळ्या गाजल्या

मग जागला अजुन मराठा

गावोगावी तुताऱ्या वाजल्या

🚩🚩🚩🚩💪💪


आजी माजी दमले

जो तो येऊन झटला..

पण वाघ तो मराठा

एक कण मागे न हटला

🚩🚩🚩🚩🚩


ना द्वेष केला कुणाचा

ना मान ही तिथे कुणाला

द्या माझ्या हक्काचे मज

एका स्वरात म्हणाला

🚩🚩🚩😊😊


मरणाला सामोरे जावे

हे प्रेम किती जातीचे..

हा मावळा खरा शिवबांचा

नाते महाराष्ट्र मातीचे

🚩🚩🚩🚩😊😊


हाच सूर्य आहे मराठा

हा आरक्षणाचा दाता

उठा जागे व्हा ओळखा

हा खरा मराठा नेता

😊🚩🚩👏🏻👏🏻🤝🤝


कवी: दत्ता टरले 9420219159

🚩🚩🚩🚩🚩🚩



 

कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती स्थापण्याबाबत

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये 


आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमुर्ती यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याबाबत.. शासन निर्णय पहा....



शिक्षक दिनी आंदोलन #teachersday

 शिक्षकांना शिकवू द्या जिल्हा परिषद शाळा टिकू द्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक दिनी  लक्षवेधी आंदोलन teachersday

         जिल्हा परिषद शिक्षकांना कायमच असणारी अशैक्षणिक कामे, विविध सर्व्हे, ऑनलाईन माहिती, परीक्षेचा भडिमार, बी एल ओ ची कामे अशी विविध अशैक्षणिक कामे बंद करून "शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या!"असे लक्षवेधी बॅच लावून  उद्या शिक्षक दिनी शिक्षकांनी काम करावे असे आवाहन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





         शिक्षक दिनानिमित्त देशभर शिक्षकांचा सन्मान होत असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शाळा सध्या बदनाम करण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शिक्षकांना अशी  अशैक्षणिक काम लादून ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप समन्वय समिती च्या वतीने करण्यात आला आहे. शिक्षकांना वेगवेगळी उपद्रवी उपक्रमामुळे व मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहे.

           याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने एकत्र येऊन शासनापर्यंत रोष व्यक्त होण्यासाठी व आपल्या भावना पोहोचवण्यासाठी सर्वांनी शिक्षक दिनी "आम्हाला शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या" अशा आशयाचे घोषवाक्याचे टॅग लावून शिक्षक काम करणार असल्याचे शिक्षक समन्वय समिती तर्फे आवहान करण्यात आले आहे.

'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?

 'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?


श्याम नाडेकर यांच्या लेखणीतून

(लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर )

 'तुम्हाला आम्ही पुरस्कार देतो, त्यासाठी तुम्हीच प्रस्ताव पाठवा', असे म्हणणे आणि प्रस्ताव पाठवल्यावरही 'छाटणी करून पुरस्कार देऊ', असा प्रकार करणे म्हणजे शिक्षकाचा आणि त्याच्या सेवेचा अपमानच नव्हे का? असाच काहीसा प्रकार 'आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीत होत असल्याची चर्चा शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्तुळात रंगायला लागली आहे.

शिक्षक दिनाच्या पर्वावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. मात्र, यासाठी स्वतः शिक्षकांना स्वतःच्या कार्याचा गवगवा करणारे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावे लागते.

केलेले अथवा करत असलेले उल्लेखनीय कार्य प्रखरतेने दिसत असताना, त्या कार्याची दखल स्वतः घेण्याऐवजी शिक्षकालाच स्वत:विषयी प्रस्ताव पाठवण्यास सांगणे, योग्य ठरते का? हा प्रकार म्हणजे, पुरस्कार भिकेमध्ये देण्यासारखे किंवा शासनाकडून खैरात वाटण्यासारखाच असल्याची खंत जिल्ह्यातील अनेक स्वाभिमानी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

संपुर्ण लेख वाचा....




वृक्षांगण #कविता

 माझी निसर्ग व वृक्षसंपत्ती यावरील काव्यरचना व्हिडीओ स्वरूपात नक्कीच पहा...

गायन - श्रीमती ज्योती फड मॕडम 



🌴🌴🌳 *वृक्षांगण*🌳🌴🌴


हिरवी काया देई छाया,

असावं या भुमीवर,

हिरवाईने नटलेलं,

वृक्षांगण मनोहर,


साजे ही वृक्ष असोत,

कितीही आगळी वेगळी  ,

कर्म माञ एकच,

असेल जरी रुपे निराळी,


उभे राहती सोसुनी ,

ऊन ,वारा नी पाऊस,

करती सर्वच अर्पण ,

त्यागून सजीवसृष्टीस ,


सर्वत्र फुलवा हिरवी अंगणे,

माणसा तु सोड क्रूरता,

तोडूनी ही वृक्षसंपती,

निसर्गात होईल कमतरता ,


 वर्षानुवर्षे होत हा संहार,

 होईल हानी लाखमोल,

उत्पत्ती तुझी नाही विनाशा,

ठेव जाण वृक्ष लावूनी अनमोल,


  *प्रकाशसिंग राजपूत*

      छ. संभाजीनगर 

ISRO Aditya-L1 Live Streaming #isro #aadityal1 #sunmission

 आदित्य L1 हे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले अंतराळ आधारित भारतीय मिशन असेल.  पृथ्वीपासून अंदाजे 1.5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) भोवती हेलो ऑर्बिटमध्ये अंतराळयान ठेवले जाईल.   #india sun mission


ISRO Aditya-L1 Live Streaming: Aditya L1 चे प्रक्षेपण उद्या सकाळी ठीक 11:50 वाजता होणार आहे, तुम्ही ते इथे थेट पाहू शकता.

Live streaming watch #isro



 L1 बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाचा कोणताही ग्रहण/ग्रहण न होता सूर्य सतत पाहण्याचा मोठा फायदा आहे.  यामुळे सौर क्रियाकलाप आणि रिअल टाइममध्ये अवकाशातील हवामानावर त्याचा परिणाम पाहण्याचा अधिक फायदा होईल.  इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाह्य स्तरांचे (कोरोना) निरीक्षण करण्यासाठी अंतराळ यानामध्ये सात पेलोड आहेत.  विशेष व्हॅंटेज पॉइंट L1 वापरून,

आदित्य L1 india sun missionपेलोड्सचा संच कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये, अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कण आणि प्रदेशांचे प्रसार इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाची माहिती प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

विज्ञानाची उद्दिष्टे:


 आदित्य-L1 मिशनची प्रमुख विज्ञान उद्दिष्टे आहेत:india sun mission


 सौर वरच्या वातावरणातील (क्रोमोस्फियर आणि कोरोना) डायनॅमिक्सचा अभ्यास.


 क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटिंगचा अभ्यास, अंशतः आयनीकृत प्लाझमाचे भौतिकशास्त्र, कोरोनल मास इजेक्शनची सुरुवात आणि फ्लेअर्स


 सूर्यापासून कणांच्या गतिशीलतेच्या अभ्यासासाठी डेटा प्रदान करणारे इन-सीटू कण आणि प्लाझ्मा वातावरणाचे निरीक्षण करा.


 सौर कोरोनाचे भौतिकशास्त्र आणि त्याची गरम यंत्रणा.


 कोरोनल आणि कोरोनल लूप प्लाझमाचे निदान: तापमान, वेग आणि घनता.


 उत्क्रांती, गतिशीलता आणि सीएमईची उत्पत्ती.


 अनेक स्तरांवर (क्रोमोस्फियर, बेस आणि विस्तारित कोरोना) होणार्‍या प्रक्रियांचा क्रम ओळखा ज्यामुळे शेवटी सौर उद्रेकाच्या घटना घडतात.


 सौर कोरोनामध्ये चुंबकीय क्षेत्र टोपोलॉजी आणि चुंबकीय क्षेत्र मोजमाप.


 अंतराळ हवामानासाठी चालक (सौर वाऱ्याची उत्पत्ती, रचना आणि गतिशीलता).


आदित्य-L1 पेलोड:


 आदित्य-L1 ची उपकरणे सौर वातावरण प्रामुख्याने क्रोमोस्फियर आणि कोरोनाचे निरीक्षण करण्यासाठी ट्यून केलेली आहेत.  इन-सीटू उपकरणे L1 येथील स्थानिक वातावरणाचे निरीक्षण करतील.  जहाजावर एकूण सात पेलोड आहेत, त्यापैकी चार सूर्याचे रिमोट सेन्सिंग करतात आणि तीन इन-सीटू निरीक्षण करतात.



राज्य आदर्श पुरस्कार

 सन 2023 चा राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून जिल्ह्यानुसार पुरस्कार प्राप्त शिक्षक नावे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.


 खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये आपण पुरस्कार यादी पाहू शकतात .डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्राच्या या ऑफिशियल वेबसाईटला सदैव भेट देण्यासाठी कृपया खालील भागामध्ये फॉलोचे बटन आहे .

कृपया या वेबसाईटला फॉलो करा.

 सर्व आदर्श  पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे डिजिटल समूहाच्या वतीने खूप खूप अभिनंदन... 





वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन

 वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे.

 या कार्यालयाचे आदेश जा.क्र. राशसंप्रपम/आय.टी/व.नि प्रशिक्षण / २०२३-२४/०३०२९ दिनांक ०७/०७/२०२३ नुसार दिनांक १० जुलै २०२३ पासून वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाची अंमलबजावणी सुरु आहे. 

सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांसाठी विविध घटकांचा अभ्यास व्हिडिओ व पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. दिनांक ०७/०७/२०२३ च्या प्रशिक्षण पत्रानुसार आवश्यक सूचना, मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

तसेच सदर प्रशिक्षणामध्ये सर्व घटकांच्या अभ्यासानंतर एक स्वाध्याय चाचणी व अभिप्राय देखील देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तथापि काही प्रशिक्षणार्थी यांनी संदर्भीय प्रशिक्षण


पत्रामध्ये आवश्यक सूचना देऊनही प्रशिक्षण स्वाध्याय कसा सोडवावा? हे PDF, Screen Record द्वारे आपल्या यूट्यूब चैनल, ब्लॉग, WhatsApp आदि च्या माध्यमातून जाहीररित्या प्रसिद्ध करून प्रशिक्षणाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आलेले असून सदरची बाब ही अतिशय गंभीर आहे.. याबाबत संबंधितांचे पुरावे ही गोपनीयरित्या प्राप्त करून घेण्यात आलेले असून काही प्रशिक्षणार्थ्यांच्या विरोधात IT act 2000, IPR 2003 व COPYRIGHT act 1957 नुसार आवश्यक कारवाई संबंधित शैक्षणिक


विभागाचे शिक्षण उपसंचालक यांचेमार्फत प्रस्तावित करण्यात येणार आहे. आदेश पहा...