डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढाल...

 ई-श्रम कार्ड पोर्टल




असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.

देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.

ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचं वय मात्र 16 ते 59 च्या दरम्यान असणं गरजेचं आहे.


एकदा का या पोर्टलवर नोंदणी केली, की कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेलं ई-श्रम कार्ड दिलं जाईल. ज्याला यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर असं म्हटलं गेलं आहे.

ई-श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढायचं?

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला e shram असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ई-श्रम पोर्टलची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला Register on e-shram नावाचा रकाना दिसेल. त्यावर क्लिक करायचं आहे.

इथं Self Registration या रकान्यात आधारशी लिंक मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा म्हणजे पुढच्या रकान्यात दिसणारे अंक आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.

त्यानंतर तुम्ही EPFO आणि ESIC चे सदस्य नाही असं सांगायचं आहे. या दोन्ही पर्यायांपुढील NO या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि मग सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट म्हणायचं आहे. पुढे आधार नंबर टाकायचा आहे. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टिक तशीच ठेवायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.

त्यानंतर मग नोंदणीसाठीच्या अटी आणि शर्थी मला मान्य आहेत, यासमोरील डब्ब्यात टिक करायचं आहे आणि मग सबमिट म्हणायचं आहे.

पुढे तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकून validate वर क्लिक करायचं आहे.

मग तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डचे डिटेल्स नाव, जन्मतारीख पत्ता दिसेल. याखाली असलेल्या वरची सगळी माहिती बरोबर आहे, या डब्ब्यात तुम्हाला टिक करायचं आहे आणि मग continue to other details वर क्लिक करायचं आहे.

आता सगळ्यात आधी वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाचं स्टेटस, वडिलांचं नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा आहे. पुढे अपंग असाल तर yes नसाल तर no वर टिक करायचं आहे.

त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यात नॉमिनीचं नाव, त्यांची जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबतचं नातं निवडायचं आहे. मग save and continue वर क्लिक करायचं आहे.

पुढे पत्त्यासंदर्भात माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सध्याचा पत्ता सांगायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे.

त्यानंतर मग तुम्ही याठिकाणी किती वर्षापासून राहता ते सांगायचं आहे. हे झालं की मग परमानंट अड्रेस टाकायचा आहे. यात शहरी भागासाठी urban आणि ग्रामीण भागासाठी rural पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर घर क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

आता शैक्षणिक माहीत भरायची आहे. इथं सुरुवातीला तुमचं शिक्षण किती झालं ते निवडायचं आहे आणि मग दरमहा किती कमावता तोही आकडा निवडायचा आहे. त्यानंतर save and continue वर क्लिक करायचं आहे.

शिक्षणाचा हक्क आंतरराष्ट्रीय स्वरूप #Righttoeducation,

 शिक्षणाचा हक्क एक  वैश्विक हक्क आहे.

 एक असा हक्क जो मानवी हक्क  म्हणून ओळखला जातो . आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वरील आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाचा हक्क म्हणजे सर्वांसाठी मुफ्त सक्तीचे प्राथमिक शिक्षण तसेच माध्यमिक शिक्षण सर्वांसाठी वापरण्याजोगे करावे म्हणून एक बंधन तसेच ज्या लोकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही कले,त्यांच्यासाठी पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षणाच्या हक्कात येते . कमीत कमी प्रमाण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सर्व पातळीवरील भेद्भ्व कमी करण्याच्या बंधनाचा शिक्षणाच्या हक्कात  समावेश होतो. 


 आंतरराष्ट्रीय कायदेशीर आधार -

  शिक्षणाचा  हक्क  हा मानवी हक्काचे वैश्विक प्रतिज्ञापत्र यातील २६ व्या लेखातील एक कायदा आहे . आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांवरील आंतरराष्ट्रीय अधिवेशन यातील २०० वा  आणि १४ वा कायदा आहे  .१९६० मध्ये शिक्षणाचा हक्क    मानवी हक्कांचे उनेस्को अधिवेशन यांच्याकडून आणि १९८१ मध्ये स्त्रीयान्विरोधात सर्व प्रकारचे  भेदभाव हटवण्याचे  अधिवेशन  यात पुन्हा एकदा ठासून सांगितले आहे.. युरोपेमध्ये मानवी हक्कांवरील युरोपिअन अधिवेशन च्या पहिल्या मुल प्रतीच्या दुसऱ्या लेखानुसार शिक्षणाचा हक्क हा एक मानवी हक्क म्हणून ओळखला जातो आणि शिक्षणाचा अधिकार निर्माण करण्यासाठी समजला जातो .आंतरराष्ट्रीय  आर्थिक,  सामाजिक, आणि सांस्कृतिक करारानुसार .स्त्रौस्बेर्ग्मधील मानवी हक्कांचे युरोपियन न्यायालयाने हा नियम लागू केलेला आहे उदाहरणार्थ - बेल्गीम भाषाविषयक घटना ..युरोपमधील सामाजिक सानादेतील दहाव्या घटनेत स्वताच्या आवडीचे शिक्षण घेण्याच्या अधिकाराची हमी देते .  

 व्याख्या - शिक्षण म्हणजे औपचारिक ,संस्थात्मक सूचना . साधारणपणे आंतरराष्ट्रीय साधने हा शब्द या अर्थाने वापरतात आणि आंतरराष्ट्रीय मानवी 
हक्क साधने यांच्याकडून  जतन केलेला शिक्षणाचा 
हक्क प्रथमिकपणे  एका अर्थाने वापरला जातो .
 १९६०  मध्ये युनेस्को प्रकरण शिक्षणाची व्याख्या खालीलप्रमाणे देते - शिक्षणाचे सर्व प्रकार आणि पटली त्यामध्ये शिक्षणाचे वापर प्रमाण आणि शिक्षणाचा दर्जा तसेच अटी ज्यांवर ते दिले गेलेले आहेत   एका मोठ्या अर्थाने शिक्षणाचे वर्णन खालीलप्रमाणे केले जाते -अशा सर्व हालचाली (क्रिया) ज्यामुळे एक मानवी समूह त्यांच्या वंशजांना एक ज्ञान आणि प्राविण्य देतात आणि एक नैतिक संकेत पण देतात  जे त्यांना  अस्तित्वात राहण्यास मदत करतात  .या अर्थाने शिक्षण म्हणजे पुढच्या पिढीला दररोजच्या जगण्याची कार्ये करण्याची कौशल्ये देणे आणि एका विशेष समूहाचे सामाजिक,सांस्कृतिक अध्यात्मिक आणि तात्त्विक मूल्ये देणे    शिक्षणाचा हक्क हा एक  वैश्विक हक्क आहे. एक असा हक्क जो मानवी हक्क  म्हणून ओळ-खला जातो . आर्थिक , सामाजिक आणि सांस्कृतिक वरील आंतरराष्ट्रीय करारानुसार शिक्षणाचा हक्क म्हणजे सर्वांसाठी मुफ्त सक्तीचे प्राथमिक शिक्षण तसेच माध्यमिक शिक्षण सर्वांसाठी वापरण्याजोगे करावे म्हणून एक बंधन तसेच ज्या लोकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण नाही कले,त्यांच्यासाठी पायाभूत शिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षणाच्या हक्कात येते . कमीत कमी प्रमाण ठेवण्यासाठी आणि शिक्षणाच्या दर्जा वाढवण्यासाठी शिक्षण संस्थेच्या सर्व पातळीवरील भेद्भ्व कमी करण्याच्या बंधनाचा शिक्षणाच्या हक्कात  समावेश होतो.
मानवी हक्काचे युरोपिअन न्यायालय शिक्षणाची व्याख्या देते -शिक्वाने किंवा सूचना खास करून ज्ञान देणे आणि बौद्धिक विकास आणि थोड्या विस्तृत अर्थाने एक पूर्ण   प्रक्रिया  कोणत्याही  समाजात  ज्याने  प्रौढ  त्यांचे  मूल्ये युवाना  प्रसारित करतात. पूर्तेचे मूल्यमापन -       शिक्षणाच्या हक्काचे मूल्यमापन 4A च्या सहाय्याने केले जाते जे ठासून सांगतात कि शिक्षण एक अर्थपूर्ण हक्क बनवण्यासाठी ते AVAILABLE (उपलब्ध ),ACCESSIBLE (सुगम) ,ACCEPTIBLE  (स्वीकार्य) आणि ADAPTABLE (अनुकूल) असायलाच पाहिजे .हा 4A चा सांगाडा  माजी UN  REAPPORTEUR  TOMASEVELS   यांच्याकडून शिक्षणाच्या हक्कावर विकसित झाला होता .4A  चा सांगाडा सांगतो  कि  सरकारला एक सर्वात महत्वाचे कर्तव्याधारक म्हणून शिक्षण  AVAILABLE (उपलब्ध ),ACCESSIBLE (सुगम) ,ACCEPTIBLE  (स्वीकार्य) आणि ADAPTABLE (अनुकूल) बनवून शिक्षणाच्या हक्काचा आधार ,संरक्षण आणि पूर्तता करायला हवी. हा सांगाडा शिक्षण व्यावेस्थेतील आणखी लोकांना पण जबाबदारी देतो उदा.एक लहान मुल जो शिक्षणाच्या हक्काचा विशेष विषय आहे  त्याची जबाबदारी म्हणजे सक्तीच्या शिक्षणाच्या विनंतीस मान देणे .पालान्काची जबाबदारी म्हणजे पाल्याचा पहिले शिक्षक बनणे आणि व्यावहारिक शिक्षकांची जबाबदारी म्हणजे एक चांगले गुरु बनणे . . खालीलप्रमाणे 4A चे व्यवस्थित वर्णन केलेले आहे -
१. ACCEPTIBILITY - (उपलब्धता )- सरकारकडून निधी दिलेले शिक्षण हे वैश्विक , मुफ्त आणि सक्तीचे आहे . विध्यार्थ्यांसाठी  जेथे ते शिकतात तेथे आधारभूत संरचना आणि सुविधा ,पुरेशा पुस्तके आणि साहित्ये असली पाहिजेत . २.ACCESSIBILITY - (सुगमता)-सर्व मुलांना लिंग , जात , धर्म ,जातीयता  सामाजिक किंवा आर्थिक स्थितीची परवा केल्याविना सुगमता  असायला हवी .कुठल्याही प्रकारची विलगता किंवा कुठल्याही विध्यार्थ्याला वापरण्याला विरोध होऊ नये .बालकामगार आणि बालकांना प्राथमिक शिक्षण घेण्यापासून रोखणे या शोषणाच्या  विरोधात योग्य कायदे आहेत कि नाही याची खात्री करण्याचाही समावेश यात होतो .समाजातील मुलांसाठी शाळा एका योग्य अंतरावर असायला हवी नसल्यास वाहतूकव्यवस्था पुरवली जावी खासकरून ज्यांना जे खेडेगावातून आहेत .पुस्तके ,गरजा ,आणि गणवेश मुलांना काही अधिक पैसे न देता पुरवायला हवे आणि शिक्षण सर्वाना परवडणारे असावे . विशेष मुलांना शिक्षण हक्क आहे ३.ACCEPTIBILITY -(स्वीकार्यता) -दिले गेलेले शिक्षण हे भेदभाव मुफ्त ,प्रासंगिक आणि सांस्कृतिक अशा सगळ्या विध्यार्थ्यांसाठी उपयोगी असायला हवे. विध्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा वैचारिक मतांशी जुळल्यास अपेक्षा करू नये . शिकवण्याची पद्धत निपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ असावी. आणि उपलब्ध साहित्य एक विस्तृत विश्वास आणि विचारांची रचना प्रतिबिंबित करायला हवे.शाळामध्ये स्वच्छता आणि सुरक्शावर भर दिला गेला पाहिजे .यामध्ये कोणत्याही प्रकारच्या शिक्षा करणे याचाही समावेश होतो .शिक्षकांची  व्यावसायिकता राखायला हवी . ४.ADAPTABILITY -(अनुकुल्नियाता)-शिक्षणाचे उपक्रम लवचिक आणि सामाजिक बदलानुसार आणि गरजानुसार  जुळवून घेण्यासारखे आहे . धार्मिक किंवा सांस्कृतिक सुत्त्यांशी  जुळवून घेण्याचा शाळांकडून आदर झाला पाहिजे.तसेच विकलांग मुलांना पुरेशी मदत झाली पाहिजे .                                                                      ऐतिहासिक सुधारणा -युरोपमध्ये १८व्या  आणि १९व्या शतकातील प्रबोधानापूर्वी शिक्षण ,आई ,आणि वडील हि चर्चची जबाबदारी होती . फ्रेंच आणि अमेरिका क्रांतीच्या सोबतच शिक्षण पण एक सार्वजनिक कार्य म्हणून घोषित केले गेले .असा विचार केला गेला होता कि शिक्षणाच्या क्षेत्रात एक सक्रीय भूमिका पार पडण्याची मदत ,शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध आणि वापरण्याजोगे करण्यात मदत होईल .त्यामुळेच शिक्षण हे आधी केवळ वरच्या वर्गालाच उपलब्ध होते आणि सार्वजनिक शिक्षण हे  एक समतावादी विचार निर्माण होण्याचे साधन होते त्या दोन्ही क्रांतीमधील                                                                                                                                                                                                                                                        पालक हे कर्तव्य पार पडतात कि नाही हे पाहणे हे राज्याचे बंधन होते आणि भरपूर राज्यांनी शाळेतील हजेरी सक्तीचे करून हा कायदा मानला .त्यानंतर बालाकाम्गराचे  नियम सुधा पाळले गेले आणि मुलानो शाळेत यावे म्हणून त्यांनी किती तास काम करावे हे ठरवण्यात आले .राज्य अमेरिका  पण शाषण नियामवली मध्ये समाविष्ट झाले आणि शिक्षणाचे कमीत कमी प्रमाणे निर्माण केली.लीबेर्त्य जोहन स्तुअर्त मिल्ल मध्ये लिहिले आहे कि राज्यांद्वारे स्थापन केलेले शिक्षण केवेल अस्तित्वात असायला हवे .१९व्या शतकातील उदारमतवादी विचाराचे लोकांना धोक्यांपेक्षा जास्त इशारा शिक्षणाकडे केलेला आहे .परंतू राज्याचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा हक्क त्यांच्या स्वतःच्या आई-वडिलांपासून वाचवण्यासाठी रक्षा करत होते .१९व्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षेचा हक्क घरघुती हक्कांमध्ये समाविष्ट केला गेला .

१० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

 पुणे – नाशिक महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे १० वी व १२ वी च्या प्रश्नपत्रिका (question papers)  घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली.



दरम्यान, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली असून ‘द बर्निंग’ टेम्पो थरार येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चालक मनीष चौरसिया व मॅनेजर रामविलास राजपूत हे टेम्पो क्रमांक एम. पी . ३६ एच. ०७९५ मधून भोपाळ येथून पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याला येत होते. बुधवारी पहाटे टेम्पो चंदनापुरी घाटात हॉटेल साईप्रसादच्या समोर आला असता पाठीमागच्या बाजूने अचानक पेटला. मागच्या बाजूने अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला.

मनीष चौरसिया व रामविलास राजपूत यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रयत्न अपुरे पडत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  घटनास्थळी दाखल झाले. 

त्यापाठोपाठ संगमनेर नगर परिषद आणि संगमनेर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझवली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून नाशिक – पुणे वाहतूक काही काळासाठी जुन्या घाटातून चालू आहे. पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्या टेम्पोला आग लागल्याचे समजताच शिक्षणाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार....

 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय संपात मुंबईतील तब्बल 17 लाख सरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत.



 नवीन पेन्शन योजना, रिक्त पदे तातडीने भरणे यासह अन्य मागण्यांविरोधात सरकारी कर्मचारी संप करत असल्याचे समोर आले आहे.

कामगारांच्या मागण्यांबाबत सरकारने उदासीन राहिल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सोमवार, २१ फेब्रुवारी रोजी दिला.


 शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले की, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.


 यापूर्वी 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2018 रोजी तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर या आंदोलनानंतर सातवा वेतन आयोग लागू झाला.  मात्र, इतर विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.


 त्यामुळे राज्य सरकारने जानेवारी 2019 मध्ये वित्त राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती.  या समितीच्या काही बैठका झाल्या.  परंतु नवीन पेन्शन धोरण रद्द करायचे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.


 केंद्र सरकारने, यथास्थिती, राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली आहे.  याबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याचा आरोप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी केला.  त्यामुळे त्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


 इतर प्रलंबित मागण्या


 बक्षी समितीचा दुसरा खंड प्रकाशित व्हावा


 केंद्र सरकारनुसार सर्व भत्ते द्या आणि सर्व रिक्त पदे प्राधान्याने भरा


 बिनशर्त अनुकंपा नियुक्तीसाठी योजना तयार करा


 सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेत हे उपक्रम होणार ....



शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार....





 दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रा संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. 

त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत....

 शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे,

 वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, 

विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे.

 या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत .


●खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे


अ. शालेय स्तरावर विद्यार्थ्यासाठी आयोजित करावयाचे उपक्रम

या फोटो अपलोड करावा. वैज्ञानिक रांगोळी दिलेल्या विज्ञानातील संकल्पना विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.



इयत्ता पहिली ते पाचवी


१. चित्रकला २. पोस्टर निर्मिती


१. माझी पृथ्वी. २. परिसरातील मित्र/सोबती.


चित्रकला / पोस्टर निर्मिती:


दिलेल्या दोन विषयांपैकी कोणत्याही विषयावर चित्र /

पोस्टर काढून त्याचा फोटो अपलोड करावा लागणार . 


निबंधलेखन:- 


इयत्ता सहावी ते आठवी


१. निबंध लेखन 

२. वैज्ञानिक रांगोळ्या


१. स्वयंपाकघरातील विज्ञान.



२. भविष्यातील दळणवळण.


३. माझी शाश्वत जीवनशैली. 

४. विज्ञानातील संकल्पना,


इयत्ता नववी व अकरावी


१. निबंध लेखन 

२. फोटोग्राफी/ व्हिडिओनिर्मिती



निबंध लेखन विषय :

१. माझा आवडता संशोधक.

२. भविष्यवेधी विज्ञान 

३. विज्ञानातील सफर.

४. जैवविविधता.

५. विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन


दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर १००० शब्दांत निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. फोटोग्राफी/व्हिडिओ निर्मिती : गमतीजमती. दिलेल्या कोणत्याही विषयावर विषयावर ०३ मिनिटांचा व्हिडिओ 


प्राथमिक,

१. वैज्ञानिक

१. समाजोपयोगी विज्ञान

 २. शाश्वत विकास


वैज्ञानिक प्रतिकृती / वैज्ञानिक खेळणी निर्मिती दिलेल्या कोणत्याही विषयावर वैज्ञानिक | प्रतिकृती किंवा वैज्ञानिक खेळणी तयार करून त्याचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडीओ तयार करावा. वैज्ञानिक प्रतिकृतीची लिहून त्याचा फो |व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे.


प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी


१) प्रतिकृती निर्मिती 


२. वैज्ञानिक खेळणी निर्मिती




प्रज्ञानंधाने जगातील १ नंबर कार्लसनला केले पराभूत

 एअरथिंग्ज मास्टर्स या ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीदरम्यान, त्याने जागतिक विजेत्या मॅग्नस कार्लसनला केवळ 39 चालींमध्ये हरवून कार्लसनचे सलग तीन विजय संपुष्टात आणले.



 प्रज्ञांनधाने 31 वर्षीय कार्लसनला पराभूत केले - सध्या जगातील नंबर 1 - काळ्या तुकड्यांसह ताराश विविधता गेममध्ये.

 कार्लसनने सलग तीन विजय मिळवले, परंतु प्रज्ञानंधाकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर, नॉर्वेजियन खेळाडू काल लीडर बोर्डवर 11 व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर राहिला.


 आठ फेऱ्यांनंतर आठ गुणांसह प्रज्ञानंधा संयुक्त 12व्या स्थानावर आहे.  याआधीच्या फेऱ्यांमध्ये,  आणि त्याने लेव्ह अरोनियनवर फक्त एकट्याचा विजय, दोन ड्रॉ आणि चार पराभवांचा समावेश केला.


 किशोरने अनिश गिरी आणि क्वांग लीम ले यांच्याविरुद्ध बरोबरी साधली आणि एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन-क्रिझस्टोफ डुडा आणि शाख्रियार मामेदयारोव्ह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

 Airthings Masters हा 16 खेळाडूंचा खेळ आहे ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूला प्राथमिक फेरीत विजयासाठी तीन आणि अनिर्णित राहण्यासाठी एक गुण मिळतो.  प्राथमिक टप्प्यात आणखी सात फेऱ्या आहेत.


 नेत्रदीपक खेळ म्हणजे प्रज्ञानंधाचा कार्लसनविरुद्ध बुद्धिबळाच्या कोणत्याही प्रकारातील पहिला विजय.


 " प्रज्ञानंधाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ला सांगितले की तो विजय कसा साजरा करणार आहे .


 बुद्धिबळातील प्रगल्भ, ग्रँडमास्टरची पदवी मिळवणारी प्रज्ञानंधा ही पाचवी सर्वात तरुण व्यक्ती आहे.  2018 मध्ये त्याला विजेतेपद मिळाले.

वाॕटर पार्क येथे अपघात शिक्षिकेचा मृत्यू

 पिकनिकसाठी आले होते विद्यार्थी आणि शिक्षक...



 हरियाणाच्या अंबालामध्ये आज वॉटर पार्कमध्ये मोठा अपघात घडला. येथे एका खासगी शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी पिकनिकसाठी आले होते. यादरम्यान वॉटर पार्कमध्ये तयार केलेल्या झोपाळ्यावर शिक्षक आणि विद्यार्थी बसले तर केबिनचा ग्रिल तुटला. 23 वर्षीय शिक्षिकेसह 3 विद्यार्थी खाली पडले.


खाली पडल्यामुळे शिक्षिका गंभीर जखमी झाली, शिवाय विद्यार्थ्यांनाही जबर मार लागला आहे. हे ही जी आई होऊन जेवू घालत होती, तिचीच केली हत्या; व्यसनापायी तरुणाने सर्व संपवलं,

वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी केली अटक... 


अपघातानंतर जखमींना रुग्णालयात पोहोचवलं. त्यावेळी 23 वर्षीय रिया गर्ग हिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मृत अधोई गावातील जय पब्लिक शाळेत काम करीत होती. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा अपघात H2O पार्कमध्ये झाला. शिवाय वॉटर पार्कच्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संस्कृतीचे छत्रपती शिवाजी महाराज वरील भाषण...

 संस्कृती अवघ्या साडे तीन वर्षाची. तिचे पुर्ण नाव संस्कृती प्रशांत दळवी असून ती रायगड येथे राहते.

 इतक्या लहान वयातील तिची वकृत्वशैली नक्कीच तिला खूप यशस्वी करणार....




शिवराय..... राजं हे दैवत ....नविन गीत...

 स्वराज्य संस्थापक व महाराष्ट्रातील तमाम जनमनात ज्यांचा आदर्श आहे, क्षत्रिय कुलावंतस, जनकल्याणकारी राजे श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेले माझे गीत .... शिवजयंती निमित्त राजेंना गीत वंदना 🚩🚩🚩





*🚩शिवराय..... राजं हे दैवत ....🚩*


*राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां सारेच गडकिल्ले....*

*आसमंती गर्जना, अशी घुमुनी,*

*जयघोष होता जय जय शिवाजी..... ,*


*स्वराज्याचा.. उभारुन कळस,*

*लढवय्या ...घडविला हा प्रदेश,*

*झुकला नाहीत राजं, गनिमासमोर,*

*ताठ उभा मराठी मुलख  आजवर..*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*उभारला आदर्श...राज्य  कल्याणकारी,*

*गनिमी कावा असा, मावळा तुटून शत्रूवरी,*

*ललकार अशी ही शत्रूची होत हाहाकार*

*फत्ते होऊन मोहिम ,विजयाचा वाजे झंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*नामघोष होता, छत्रपती शिवाजी महाराज,*

*जसा सह्याद्रीच्या शिरपेचात शोभूनी ताज,*

*आई भवानीचा,मिळून  आशीर्वाद ,*

*भगवा फडकला, भरूनी हुंकार....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


*अफाट शौर्य , ज्याने दिले स्वराज्य...*

 *संकटातून निघूनी, सदैव सज्ज,*

*हार ना मानुनी ,तक्ख्त दिल्लीचा  झुकविलात,*

*विजयी पताका, लावून देश असा घडविलात....*


( *राजं हे दैवत , ह्या महाराष्ट्राचे,*

*तीर्थ  हे  आम्हां ,सारेच गडकिल्ले....*)


   *✒️प्रकाशसिंग राजपूत*✒️

           *औरंगाबाद*

         9960878457

एप्रिलमध्ये होणार 'शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२२'

 एप्रिलमध्ये होणार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२

शिक्षक भरतीसाठी (teachers appointment )  उमेदवारांना 'शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' २०१७ मध्ये बंधनकारक करण्यात आली. 

                         

त्याचवर्षी ही परीक्षा (examination)  झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. 



शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२' एप्रिलमध्ये घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पवित्र पोर्टलद्वारे (pavitra portal) सांगण्यात आले आहे.

 त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडत चालली आहे. 

प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी अनेकजण मागणी  करत आहेत.

बदलीबाबत अवघड क्षेत्रा बाबतीत महत्त्वाचा बदल

 अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकाना बदली

 करुन घ्यावयाची आहे त्यांच्या जागा सुद्धा रिक्त जागा म्हणुन दाखवण्यात येणार आहेत.


 हा नविन बदल झालेला आहे.ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकास बदली हवी आहे त्यांनी आपले नाव आगोदरच द्यावयाचे आहे. आपन बदलीसाठी नाव दिल्यास आपले पद रिक्त दाखवण्यात येणार आहे.

(उणीव संवर्ग ०१/०२ मधील एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील जागा मागितली आणि त्या शिक्षकाची बदली पसंतीक्रमात दिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत झाली तर त्या अवघड क्षेत्रातील शाळेतील बदली इछुक शिक्षक बदली अर्ज करण्या आगोदर विस्थापित होइल. आणि बदली इछुक शिक्षकाने बदलीमध्ये पसंतीक्रम देवुन सुद्धा पसंतीक्रमातील शाळा मिळाली नाहीतर तो परत विस्थापित होइल. आणि त्याची जागा भरल्यामुळे त्याला प्रशासनामार्फत शाळा द्यावीच लागेल. इथ थोडा गोधळ उडणार आहे. ही या बदली धोरणातील उणिव राहणार आहे. अवघड क्षेत्रातील शिक्षकाने दिलेल्या पसंतीक्रमामधील शाळा मिळेलच असे काही नाही आणि तो बदली इछुक आसल्यामुळे त्याची जागा रिक्त दाखवल्यामुळे तो बदलीच्या आगोदरच विस्थापित होइल हा शिक्षक विस्थापित झाल्यानंतर या विस्थापित शिक्षकास पदस्थापना कशी द्यायची याचा उलगडा कोठेही नाही कारण हा शिक्षक बदलीच्या आगोदरच विस्थापित होणार आहे त्यामुळे बदली इछुक यादीमध्ये नाव द्यावे की नाही याच विचारात तो राहु शकतो.)

शाळेसाठी साॕफ्टवेअर #school software

 📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥

डिजिटल स्कूल पुणे समूहाचे तंत्रस्नेही समूहसदस्य श्री आत्माराम हंडेसर यांनी शाळेसाठी निर्मिती केली आहे. 

    सदरील साॕफ्टवेअर संगणकावर अधिक उपयुक्तपणे चालणार आहे. 



         

इ.१ली ते ७वी या वर्गांचे सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन ;शाळा सोडल्याचा दाखला;बोनाफाईड सर्टिफिकेट;जातीनिहाय पट तयार करण्यासाठी Excell Software आहे आपण वापरून पहावे आम्ही तयार करून आपले काम कमी वेळात जास्तीत जास्त रिपोर्ट तयार होतील हे Excell Software असल्याने  संगणकावर वापरावे.

धन्यवाद🙏🏻

साॕफ्टवेअर डाऊनलोड करा....



*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*

*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*

राज्यात इतक्‍यात मास्कमुक्ती होणार नाही...


 जालना - गेल्या काही दिवसांत सातत्याने करोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ही लाट ओसरेल असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

सेच राज्यात इतक्‍यात मास्कमुक्ती होणार नाही असेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले, सध्या राज्यभरात करोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधी पर्यत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरेल.

सध्या राज्यात मास्क मुक्ती केली जाणार नाही. त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्ती बाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे लसीकरण करून घ्यावे. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहितीही टोपे यांनी यावेळी दिली.

मुख्यालयी राहण्याच्या आदेशाविरुद्ध शिक्षक समितीने मागितली औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद....

 मुख्यालयी राहण्याच्या प्रश्नासंदर्भात शिक्षकांच्या हितासाठी शिक्षक समिती मैदानात...


 मुख्यालयी राहण्याच्या  आदेशाविरुद्ध  शिक्षक समितीने मागितली   औरंगाबाद उच्च न्यायालयात  दाद------- (जिल्हाध्यक्ष विजय साळकर.)     


        

शिक्षकांनी मुख्यालयी राहिलेच पाहिजे अन्यथा त्यांच्याविरुद्धही शिस्तभंगाची कारवाई करू असे नुकतेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक आदेश निर्गमित केला *

१)ग्रामीण भागात वाडी-वस्ती तांड्यावर राहण्यासाठी निवासस्थान नाहीत. 


२)महिला कर्मचाऱ्यांना  वाडी-वस्ती तांड्यावर निवासासाठी संरक्षण व सुरक्षितता  नाही..

 ३)कर्मचाऱ्यांच्या मुलांना  चौथीनंतर /आठवी नंतर शिक्षणाची व्यवस्था नाही शिक्षणासाठी ,महाविद्यालय,काँलेज, इ.ची सोयी-सुविधांची उपलब्धता नाही .


४) 2018 च्या बदली प्रक्रियेत पती-पत्नी प्रचंड प्रमाणात विस्थापित झाले त्यांची मुख्यालय वेगवेगळे आहे त्यांच्या दोन शाळेमधील शंभर किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे त्यांनी कोणत्या ठिकाणी राहायचं हा सर्वात मोठा प्रश्न आहे .


५) आजही ग्रामीण भागामध्ये उच्चनीचतेचा भेदभाव केला जातो त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना  गावातील लोक घर देत नाही.


 ६) बऱ्याच कर्मचाऱ्यांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे त्यांना वेळप्रसंगी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ग्रामीण भागात व्यवस्था नाही .


७) बहुतांशी कर्मचाऱ्यांना वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करावा लागतो त्यांच्या औषध /हॉस्पिटल याची व्यवस्था त्या ठिकाणी नसते.


 ८) शासनाने  ग्रामीण भागात राहण्यासाठी निवासस्थाने अद्यापही बांधून दिलेले नाही ** म्हणून काही कर्मचारी मुख्यालयापासून जेथे सोयीस्कर वाटते तिथे वास्तव्य करून आपले कर्तव्य इमानेइतबारे बजावून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मेहनती घेत असताना... प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना मुख्यालयी न राहिल्यास वेतन मिळणार नाही, शिस्तभंगाची कारवाई करू अशी तंबी देणारे पत्र  पारित करण्यात आले आहे...

शासकीय कर्मचाऱ्यांनी *मुख्यालयी राहण्या संदर्भात* महाराष्ट्र शासनाने  *वेळोवेळी काढलेले आदेश रद्द करून कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता व वेतनाला व कर्तव्याला  संरक्षण द्यावे* व वरील अटी रद्द करण्यात याव्यात यासाठी               

  *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती* ने  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि.1 फेब्रुवारी रोजी निवेदन देऊन न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली होती. शिक्षक समितीच्या वतीने आज मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात आज *दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी याचिका क्रमांक WPST/4317/2022 BOMBHC-Bombay High Court दाखल करण्यात आली*. म.रा.प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने अँड. संभाजी मुंडे हे शिक्षकांची बाजू मांडणार आहेत. शिक्षकांची मानसिकता खराब करुन गुणवत्तेत अडथळा निर्माण करणाऱ्या आदेशाविरुद्ध शिक्षक समिती न्यायाची अपेक्षा करणार आहे.

राईट टु सर्व्हिस विषयी जाऊन घेऊया....

 महाराष्ट्र राज्यात  'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय.

 यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43  सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.


तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्र सरकारची वेबसाईट


www.aaplesarkar.maharashtra.gov.in


वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.


कोण कोणत्या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...

महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार


विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.

या सेवांचा आहे समावेश....


• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

• मिळकतीचे प्रमाणपत्र

• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र

• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

• पत दाखला

• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज

• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र

• भूमिहीन प्रमाणपत्र

• शेतकरी असल्याचा दाखला

• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र

• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

• जन्म नोंद दाखला

• मृत्यु नोंद दाखला

• विवाह नोंदणी दाखला

• रहिवाशी प्रमाणपत्र

• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

• हयातीचा दाखला

• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला

• निराधार असल्याचा दाखला

• शौचालयाचा दाखला

• विधवा असल्याचा दाखला

• दुकाने आणि अस्थापना नोंदणी

• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण

• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी

• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी

• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण

• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी

• सेवानियोजकाची नोंदणी

• शोध उपलब्ध करणे

• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे

• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड

'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.

सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.



*कृपया जास्तीत जास्त शेअर करा*

नवोदय विद्यालय मेगाभरती लवकरच #jobs

 नवोदय विद्यालय समिती (NVS)कडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु होत आहे. जवळपास दोन हजार पदांसाठी ही भरती असून 10 फेब्रुवारीच्या आधी या पदासाठी अर्ज करायचा आहे.




गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार नवोदय विद्यालय समिती भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर 10 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. यासाठी नवोदयच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. https://navodaya.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

           

रिक्त पदांचा तपशील
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण 1925 रिक्त पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये सहाय्यक आयुक्तांची 5 पदे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) 2 पदे, महिला कर्मचारी परिचारिका 82 पदे, सहाय्यक विभाग अधिकारी 10 पदे, लेखापरीक्षा सहाय्यक 11 पदे, कनिष्ठ अनुवाद अधिकारी 4 पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 1 पद, लघुलेखक 22 पदे, संगणक परिचालक 4 पदे, खानपान सहाय्यक 87 पदे, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक 630 पदे, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर 273 पदे, लॅब अटेंडंट 142 पदे, मेस हेल्पर 629 पदे आणि मल्टी स्टाफ हेल्पर 23 पदे आहेत.

 पात्रता काय असणार ?

ऑनलाइन परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ही ऑनलाइन परीक्षा 9 मार्च ते 11 मार्च 2022 या कालावधीत घेतली जाईल. इयत्ता 10वी आणि 12वी व्यतिरिक्त, पदवीधर उमेदवार नवोदय विद्यालयातील गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे सेट केली गेली आहे, त्यामुळे उमेदवार तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

ऑनलाईन अर्जासाठी शुल्क ?
सर्व पात्र उमेदवार NVS शिक्षकेतर कर्मचारी भरती 2022 साठी 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सहाय्यक आयुक्त पदासाठी, उमेदवारांना 1500 रुपये आणि महिला स्टाफ नर्ससाठी 1200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, लॅब अटेंडंट/मेस हेल्पर/मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 750 आणि इतर पदांसाठी रु. 1000 भरावे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.


7 व्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत मा. आ. श्री.कपिल पाटील साहेब यांचा पाठपुरावा

 📣📣



राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नावरील कार्यवाहीबाबत आमदार कपिल पाटील यांचं शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र.*

➖➖➖➖➖➖➖➖➖


➖➖➖➖➖➖➖➖➖


प्रति,

मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड,

शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य.




विषय -  राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या तारांकीत प्रश्नावरील कार्यवाहीबाबत.....


महोदया,


सहाव्या वेतन आयोगामध्ये नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर ५२००-२०२०० (ग्रेड पे २८००) वेतनश्रेणी मिळाल्यानंतर चटोपाध्याय समितीने केलेल्या शिफारशीनुसार १२ वर्षानंतर मूळ वेतनात वाढ होऊन ग्रेड पे ४२०० रु. होत असे. अशी वेतनश्रेणी मिळत असून मूळ वेतनात ग्रेड पेमध्ये १४००/- रुपयांची वाढ होते. ही वाढ वार्षिक वेतनवाढीच्या सुमारे साडेतीनपट होती. मात्र १ जानेवारी, २००४ नंतर सेवेत आलेल्या म्हणजेच दिनांक १ जानेवारी, २०१६ नंतर १२ वर्षे पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करताना Pay Matrix ही संकल्पना आणल्यामुळे चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ नष्ट झाला असून या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ मिळत नाही. याबाबत महाराष्ट्र विधानपरिषदेत दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी मी विचारलेल्या तारांकीत प्रश्न क्र.६५ ला उत्तर देताना आपणही हा आर्थिक अन्याय होत असलेबाबत मान्य केलेले आहे.

शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर चटोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरीष्ठ वेतन श्रेणीचा लाभ नष्ट झाला आहे. पर्यायाने १ जानेवारी २००४ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना कालबद्ध वेतनश्रेणीचा कोणताही लाभ न मिळता नियुक्तीच्यावेळी जी वेतनश्रेणी मिळाली त्याच वेतनश्रेणीत सेवानिवृत्त होण्याची वेळ आली आहे. याबाबत शासन स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.


तरी सदर शिक्षकांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी खंड २ ची प्रसिद्धी करताना चटोपाध्याय वेतनश्रेणींची पूर्ववत रचना करून, दोन वेतनवाढीची तूट दूर या शिक्षकांना न्याय दयावा, ही विनंती. धन्यवाद!



आधीच जुन्या पेन्शनला हे शिक्षक मुकले आहेत. तसेच शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ही एकमेव वेतनातील वाढ आहे जी सेवेत एकदाच तीही एकाच पदावर एकाच वेतनश्रेणीत १२ वर्षे राहिल्यावर मिळते. निवडश्रेणी २४ वर्षानंतर मिळत असली तरी ती लाभार्थ्यांपैकी फक्त २०% शिक्षकांनाच मिळत असल्याने, कित्येक शिक्षक ती घेण्याआधी मयतही झालेले आहेत. तरी सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतनश्रेणी मध्ये बदल करून ती सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळून दोन वेतनवाढीची तूट भरून काढेल अशी रचना करण्यास विनंती आहे.

10 वी 12 वी बाबत नियमावली....परीक्षा

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२



कार्यवाहीचा तपशील


प्रकटन


महाराष्ट्र राज्यमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षांचा कालावधी व स्वरूप निश्चित करण्यासाठी शासन व मंडळामार्फत मुख्याध्यापक, विषय शिक्षक व तत्सम तज्ञांशी विचारविनिमय करूनसदर परीक्षांचा कालावधी व स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. तसेच परीक्षा सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पाडण्याकरिता विद्यार्थ्यांसाठी काही विशेष उपाययोजना राबविण्यात येत

आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

 १. परीक्षेचा कालावधी प्रचलित पद्धतीनुसार इ. १२ वी ची परीक्षा २० फेब्रुवारी दरम्यान व इ. १० वीची परीक्षा ०१ मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. तथापि चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. इ. १२ वी लेखी परीक्षा दि. ०४ मार्च २०२२ ते दि. ३० मार्च २०२२


श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. १४ फेब्रुवारी २०२२ ते दि. ०३ मार्च २०२२ इ. १० वी लेखी परीक्षा दि. १५ मार्च २०२२ ते दि. ०४ एप्रिल २०२२ श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. २५ फेब्रुवारी २०२२ ते दि. १४ मार्च २०२२


२. विद्यार्थी संख्या सद्यस्थितीत मंडळाकडे परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी इ.१२वी- १४,७२,५६२ इ. १० वी १६, २५,३११


३. विषय माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या


मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरुपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. इ. १२ वी विषय १५८, विज्ञान शाखा माध्यम ०४ इतर शाखा माध्यम ०६ प्रश्नपत्रिका संख्या ३५६ इ. १० वी विषय ६० माध्यम ०८, प्रश्नपत्रिका संख्या १५८


४. परीक्षेत विविध घटकांचा सहभाग -


सदर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिरक्षक, मुख्य नियामक नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व मंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे १.७५ लक्ष घटकांचा समावेश असतो.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्याथ्र्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता प्रचलित ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.


१. परीक्षा केंद्रे


प्रचलित पद्धतीनुसार मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतल्या जातात. तथापि गदर परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत तेथेच त्यांना लेखी परीक्षा देता येईल. त्यामुळे त्यांना परिचित वातावरण मिळून परीक्षा देण्यास सुलभता वाटेल. तसेच परीक्षेसाठी कमी प्रवास करावा लागेल.


२. परीक्षेची वेळ -


विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ तसेच ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.


३. अभ्यासक्रम -


कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात २५% कपातकरण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन ७५% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.


४. प्रात्यक्षिक परीक्षा


कोबिड १९ च्या प्रादुर्भावामुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिककार्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलतदेण्यात आलेली आहे.


इ. १२वी प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. इ. १० वी शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल.


किमान ४०% च्या मर्यादेतशाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेसाठी प्रयोग निवडण्याची लवचिकता असेल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहि:स्थ परिक्षक संबंधित शाळा / उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधून नियुक्त करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. परीक्षांचे नियोजन व सबमिशन गटनिहाय केले जाईल.


५. तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन याबाबत मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्याची शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना मुभा दिली आहे.


६. विशेष सवलत


कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत व तत्सम मूल्यमापन प्रात्यक्षिक / सबमिशन करून शकल्यास लेखी परीक्षेनंतर इ. १० वी आणि इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.


आकारिक चाचणी क्रमांक २ नमुना प्रश्नपत्रिका १ ली ते ५ वी....

 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक -२


आकारिक नमुना प्रश्नपत्रिका निर्मिती

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र व शिक्षक मित्र समूह नगर यांच्या सौजन्याने तथा डिजिटल टिम सदस्य 

        श्री मच्छिंद्र तुळशीराम कदम सर अहमदनगर, मो.नं. ९५४५५५५३८९ श्री गोरक्षनाथ ज्ञानदेव रोकडे सर

यांच्या विशेष प्रयत्नाने .....


१ ली ते ४ थी सेमी माध्यम आकारिक चाचणी २ नमुना प्रश्नपत्रिका .....



१ ली ते ५ वी मराठी माध्यम आकारिक चाचणी २ नमुना प्रश्नपत्रिका  .....




संकलन


सहकार्य

श्री शरद कोतकर, श्री शिवाजी नवाळे श्री रविंद्र पगिरे, श्री योगेश देशमुख, श्री लक्ष्मीकांत इडलवार श्री सुगतकुमार वाघमारे, श्री गोकुळ हारदे, श्री हरीप्रसाद शिंदे श्री रविंद्र अरगडे, श्री मंगेश करंडे


सर्व समूह प्रशासक शिक्षकमित्र नगर समूह


सौजन्य

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र

शिक्षकमित्र नगर समूह


धन्यवाद !


डिजिटल स्कूल समूह तथा शिक्षकमित्र समूहाच्या वतीने आकारिक मूल्यमापन चाचणीसाठी नमुना प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन मार्गदर्शिका व अध्ययन निष्पत्ती यांना अनुसरून प्रश्नपत्रिका निर्मिती करावी.

बजेट व डिजिटल शिक्षण budget and education

 बजेटमध्ये अगदी कार्पोरेट क्षेत्रांपासून तर सर्वसाधारण लोकांपर्यंत  सर्वांच्याच फायद्यासाठीच्या घोषणा करण्यात आल्यात. 



यामध्ये शिक्षण  आणि रोजगार  क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. देशातील वाढती बेरोजगारी आणि कमी होणारं नोकऱ्यांचं प्रमाण यावरही घोषणा करण्यात आली. तर जगभरात ट्रेंडिंग असणारं डिजिटल शिक्षण आणि डिजिटल लर्निंग   यबद्दलही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.


नक्की विद्यार्थ्यांसाठी आणि रोजगार नसलेल्या उमेदवारांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या याबद्दल जाणून घेऊया. Budget 2022: या वर्षात सुरू होणार 5G मोबाइल सर्विस, अर्थमंत्र्यांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षणाबाबत केलेल्या घोषणांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल युनिव्हर्सिटी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनल 200 टीव्ही चॅनलपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पूर्वीपासून असलेल्या सुविधांचा विस्तार करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांमध्ये येणार 200 टीव्ही चॅनेल्स अर्थमंत्री सीतारणम यांनी शिक्षणात सुधारणा करण्याच्या आणि प्रत्येक मुलासाठी शिक्षण सुलभ करण्याच्या उद्देशानं सुरू केलेले पूरक शिक्षण प्रादेशिक भाषांमधील 200 टीव्ही चॅनेलद्वारे  इयत्ता 1 ते 12 वीच्या मुलांपर्यंत पोहोचवले जातील अशी घोषणा केली आहे. आतापर्यंत फक्त 12 टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून मुलांना शिक्षण मिळत होतं. मात्र आता हे संख्या वाढवून 200 करण्यात आली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार आहे. 60 लाख लोकांना मिळणार रोजगार देशात वाढत जाणारं बेरोजगारीचं प्रमाण लक्षात घेता. देशात येणाऱ्या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल अशी घोषणा अर्थमंत्री सीतारणम यांनी केली आहे. त्यामुळे बेरोजगारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

तसंच गरिबांसाठी 80 लाख घरे बांधली जातील. त्याचे बजेट 48000 कोटी रुपये आहे. 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी केले जातील, ज्यात एक चिप असेल. परदेशात जाणार्‍यांना आराम मिळेल.

पोस्ट ऑफिसमध्येही आता एटीएम उपलब्ध होणार आहेत.

उच्च दर्जाची ई-सामग्री प्रदान करण्यासाठी उत्तम शिक्षक तयार केले जातील.

डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी डिजिटल विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. ज्यामध्ये ISTE मानकानुसार जागतिक दर्जाचे दर्जेदार शिक्षण दिले जाईल. देशात सध्या सुरू असलेले कौशल्य विकास कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तरुणांना कार्यक्षम आणि पुन्हा कुशल बनवण्यासाठी डिजिटल देश ई-पोर्टल देखील सुरू केले जाईल. त्याचबरोबर सर्व राज्यांतील आयटीआय कौशल्य विकासाचे हे अभ्यासक्रम चालवले जातील अशीई घोषणा करण्यात आली आहे.