डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बालरक्षक अॕपडाऊनलोड करणे.

 बालरक्षक अॕप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....


https://play.google.com/store/apps/details?id=com.dhwaniris.saralapp

यावर लाॕगीन करण्यासाठी खालील प्रकारे युजर आयडी व पासवर्ड वापरा....

user id  - शाळेचा युडायस कोड (इंग्रजी अंकात) 

password  युडायस कोडसह @123


अशाप्रकारे आपण हा ॲप डाऊनलोड करून यावर लॉगिन करून यावरील माहिती पूर्णपणे भरू शकतात मित्रांनो माहिती आवडल्यास डिजिटल स्कूल समोर महाराष्ट्र या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे.
जिल्हातंर्गत बदली बाबत महत्त्वाचे

 

✳️  *जिल्हा अंतर्गत बदली अपडेट,सर्व संवर्गाच्या याद्या प्रसिद्ध*

(मार्गदर्शक पोष्ट आहे...!)

(बंधू -भगिनी यांना मदत व्हावी या हेतूने..)

✳️ *जिल्हा अंतर्गत बदली 2022 प्रक्रियेचे वेळापत्रक गेल्या काही दिवसात तीन वेळा बदललेले आहे आताच नुकते संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना सहमती अर्ज भरून झालेले आहेत*
✳️ *सदर बदली पोर्टल हे बदली आदेश 7 एप्रिल 2021 तथा त्या अनुषंगाने निर्गमित केलेली विविध परिपत्रके यांच्या माध्यमातून अपडेट केले असले तरीही बऱ्याच मुद्द्यांवर विसंगती आढळते परंतु आज आपणास बदली पोर्टलच्या अनुषंगाने बदली प्रक्रिया कोणत्या मुद्याचे आधारे राबवली जाईल त्यातील महत्त्वाचे मुद्द्यांचे विश्लेषण खाली दिलेले आहे*


✳️ *सर्व संवर्गातील शिक्षकांना महत्त्वाचे*


➡️ *दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ला संवर्ग एक व संवर्ग दोन यांच्या याद्या आज पुन्हा प्रकाशित झाल्यात. तसेच बदली अधिकार पात्र शिक्षक व बदली पात्र शिक्षकांच्या पुन्हा याद्या आज जाहीर होणार आहेत या याद्यातील बदली पात्र शिक्षकांच्या याद्यांचा संवर्ग एक च्या शिक्षकांना बदली प्रक्रियेत भाग घेताना महत्त्वाच्या ठरतील*


➡️ *दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ते 3 डिसेंबर 2022* 

*दरम्यान यापूर्वी संवर्ग एक व  संवर्ग दोनच्या शिक्षकांनी अर्ज भरल्यानंतर संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांना कोणतेही प्रकारचा आक्षेप असल्यास पोर्टलवर आपला आक्षेप नोंदवून शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील करू शकतात*


*ऑनलाइन पोर्टलवर अपील कसे नोंदवावे यासंदर्भातील व्हिडिओ पाहू शकता*


➡️ *दिनांक 5 डिसेंबर 2022 ते दिनांक 10 डिसेंबर 2022*  

*दरम्यान शिक्षकांकडून आलेले अपील शिक्षणाधिकारी  स्विकारतील किंवा नाकारतील*


➡️ *11 डिसेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022* 

*दरम्यान आपण केलेले अपिला संदर्भात आपले समाधान नसल्यास आपण वरील तारखांमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुन्हा अपील करू शकता*


➡️ *14 डिसेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022*

*दरम्यान माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे शिक्षकांकडून आलेल्या अपील संदर्भात निर्णय घेतील*


➡️ *19 डिसेंबर 2022 ला पुन्हा संवर्ग एक, संवर्ग दोन, बदली अधिकार पात्र शिक्षक व बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध होतील*


➡️ *20 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022*

*दरम्यान संवर्ग एक च्या शिक्षकांना पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास सुरुवात होईल*


➡️ *एखाद्या शिक्षकाचे निलंबन झालेले असेल तर त्याचा निलंबनाचा कालावधी संवर्ग निहाय निश्चित केलेल्या कालावधीतून वगळला जाणार नाही कारण अशा शिक्षकांचे मुख्यालय हे त्यांचे नियुक्तीचे ठिकाणच असते* 

 

➡️ *ज्या शिक्षकांना कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्षे पूर्ण झालेले नसतील तर अशा शिक्षकांचा या बदली प्रक्रियेमध्ये  समावेश होणार नाही*


➡️ *परंतु संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष पूर्ण  झाल्यास विनंती बदली मागू शकतो*


✳️ *समानीकरण महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *समानीकरणांतर्गत ठेवावयाच्या जागांच्या संदर्भात ज्या शाळेवर समानीकरणातंर्गत ठेवलेली जागा असेल व त्या शाळेवर कोणतेही संवर्गातील बदली करणारा शिक्षक नसेल तर त्या शाळेवरून कोणाचीही बदली होणार नाही*


➡️ *समानीकरणाअंतर्गत एखाद्या शाळेवर एक पद रिक्त ठेवायचे आहे व त्या शाळेवरून एक शिक्षक बदली पात्र असेल तर त्या शिक्षकाची बदली करण्यात येईल त्याचे बदलीने रिक्त होणाऱ्या जागेवर कोणताही शिक्षक बदलीने दिला जाणार नाही* 


➡️ *व तसेच समानीकरणाअंतर्गत एखाद्या शाळेवर एक रिक्त पद ठेवायचे असेल व त्या शाळेवर संवर्ग एकचा शिक्षक असेल व त्यांनी आपला नकार नोंदवलेला असेल तर त्याची बदली होणार नाहीं*


➡️ *परंतु जर त्या शिक्षकाने होकार नोंदवलेला असेल तर त्यांची बदली होईल व त्या जागेवर कोणीही बदलीने पदस्थापित केले जाणार नाही*


✳️ *विशेष संवर्ग भाग 1 महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांच्या व्याख्येतील क्रमवारीमधील प्राधान्यक्रमानुसार बदल्या करण्यात येतील*


➡️ *संवर्ग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली मागता येईल*


➡️ *संवर्ग एक च्या शिक्षकांना जर त्यांना शाळेवर तीन वर्ष झालेले असतील व त्यांना बदली नको असेल तर नकाराचा फॉर्म भरणे आवश्यक होते  नको म्हटल्यामुळे बदलीच्या प्रक्रियेत गणले जाणार नाही.  बदली नको असेल तर बदली नको असल्याची नोंद करावी असे सांगण्यात आले होते. जर अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या तर शासन निर्णयातील दहा वर्ष सर्वसाधारण क्षेत्रात सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना शाळेतील सेवेची अट गृहीत न धरता अवघड क्षेत्रातील शाळांचे पदे भरावी लागणार या  बदली प्रक्रियेत येऊ नये यासाठी बदली नकार दिला तर ते अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या बदली प्रक्रियेतही येणार नाहीत असे सांगण्यात आले.*


➡️ *अर्थातच संवर्ग एक च्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर तीन वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष झालेले असतील व त्यांनी बदली पोर्टलवर नकार नोंदवलेला असेल तर ते शिक्षक पुढील कोणत्याही बदली प्रक्रियेत येणार नाहीत*  


➡️ *परंतु अद्यापही बऱ्याच वरील प्रकारात येणारे शिक्षक नकार द्यायचे वंचित राहिलेले आहेत त्यामुळे पुढील प्रक्रिया राबवितांना शक्यतो त्यांना संवर्ग 1 चे पुरावे मागून त्यांचे नाव यादीतून कमी केले जाऊ शकते*


➡️ *संवर्ग एक मधील शिक्षकांनी जर ते बदली पात्र असतील व त्यांनी आपल्या अर्जामध्ये नकार नोंदवलेला असेल तर त्यांची बदली होणार नाही*


➡️ *परंतु विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी  क्षेत्रनिहाय सलग सेवा दहा वर्ष केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना बदली मिळेल व त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल परंतु त्यांची आहेत त्या शाळेवरून बदली होईल हे निश्चित*


➡️ *परंतु संवर्ग एक मधील शिक्षक ज्या शिक्षकांना जिल्ह्यामध्ये क्षेत्रनिहाय दहा वर्षे सलग सेवा  झालेली नाही अशा शिक्षकांनी संवर्ग एक मधून बदली मागितली असेल तर अशा शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रमाने बदली मिळेल परंतु त्यांच्या पसंती क्रमाने त्यांना शाळा न मिळाल्यास त्यांची बदली होणार नाही ते आहेत त्याच शाळेवर राहतील*


✳️ *विशेष संवर्ग भाग दोन महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या  व्याख्येतील क्रमवारी मधील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येतील*


➡️ *ज्या शिक्षकांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त आहे अशा शिक्षकांचा समावेश विशेष संवर्ग भाग दोन मध्ये होतो अशा शिक्षकांपैकी जर एक शिक्षक संवर्ग एक मध्ये येत असेल व त्या शिक्षकांनी संवर्ग एक मधून अर्ज करून बदली मिळाली असेल तर अशा शिक्षकांचा जोडीदार संवर्ग दोन मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऊ शकतात कारण संवर्ग एकच्या शिक्षकांनी घेतलेल्या बदलीमध्ये सदृश्यता नसल्यामुळे व अद्याप आदेश प्रकाशित न झाल्यामुळे बदलीचा लाभ घेऊ शकता*


➡️ *परंतु अशा स्थितीमध्ये संवर्ग एक शिक्षकाची बदली रद्द होऊन जोडीदाराला लाभ देण्यात येईल*


➡️ *तसेच दोघेही पती-पत्नी बदली प्रक्रियेमध्ये येत असतील व त्यापैकी एका शिक्षकांनी संवर्ग एकचा लाभ घेतलेला असेल व दुसरा जोडीदार हा बदलीस पात्र असेल तर त्यांना एक युनिटचा लाभ दिला जाणार नाही*


➡️ *ज्या दोन शिक्षकांच्या शाळेमधील अंतर हे 30 किलोमीटरच्या बाहेर असेल व त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व  कदाचित त्या शिक्षकाला  पती-पत्नी अंतर्गत  बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली  टप्प्यामध्ये बदली होईल*


➡️ *विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना एक वेळा संवर्ग भाग दोन नुसार बदली झाली असल्यास त्यांना पुढील तीन वर्षे विनंतीने बदली मागता येणार नाही परंतु प्रशासकीय कारणास्तव आपली बदली होऊ शकते जसे दोघांपैकी एक शिक्षक जर बदली पात्र झाला असेल तर दोघांचीही एक युनिट म्हणून बदली होऊ शकते*


✳️ *बदली अधिकार पात्र शिक्षक महत्त्वाचे मुद्दे*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या अवघड क्षेत्रातील सेवाजेष्ठतेने  करण्यात येतील* *GR परिच्छेद 4.4.3 नुसार*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकाला जर कार्यरत शाळेवर सलग पाच वर्ष पूर्ण झालेत व त्याच अवघड क्षेत्रामध्ये दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झाली असेल व त्या शिक्षकांनी जर पोर्टलवर बदली अर्ज भरलेला नसेल तर अशा शिक्षकांना रँडम राऊंडमध्ये बदली केली जाईल*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात एका किंवा एकापेक्षा जास्त शाळेवर सलग तीन वर्ष सेवा केलेले शिक्षक अशा शिक्षकांनी बदली प्रक्रियेमध्ये आपला बदलीचा फॉर्म भरलेला नाही व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये सुद्धा नाही तर त्यांची बदली होणार नाही*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षक जर बदली पात्र शिक्षक असेल तर त्यांची बदली निश्चित होईल*


➡️ *बदली अधिकार पात्र शिक्षकाचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा शिक्षकांना बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली न मिळाल्यास ते बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्ये बदली मागू शकतात*


✳️ *बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे*


➡️ *बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील*


➡️ *ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षाकांमध्ये करण्यात येतो*


➡️ *पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात इतर  कोणतेही सवर्गातील बदली टप्प्यांमध्ये घेऊ शकणार नाहीत*


➡️ *पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर  त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना 30 किलो मीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही*


➡️ *बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही*


➡️ *या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत  अशा शिक्षकांनी बदली घेताना आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना  निर्णय घ्यावा*


➡️ *बदली पात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरते वेळी त्यांच्या अर्जामध्ये अ व आ असे दोन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अ हा पर्याय बदली पात्र शिक्षकांनी निवडल्यास त्यांना त्यांच्या प्राधान्य क्रमांकाप्रमाणे बदली मिळेलच हे सांगता येणार नाही कारण हा पर्याय प्रशासकीय बदली संदर्भात येत असल्यामुळे शक्यतो राउंड मध्ये त्यांची शाळा कुणी न घेतल्यास त्यांची बदली होणार नाही परंतु कोणी त्यांची जागा घेतल्यास त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे बदली मिळेलच असे सांगता येणार नाही व सद्यस्थितीमध्ये बदली पात्र शिक्षकांची जागा कोणी घेणार नाही असेही होऊ शकणार नाही त्यामुळे बदली मात्र शिक्षकांनी आ हा पर्याय निवडणे सोयीचे होईल कारण त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणेच शाळा मिळतील*


➡️ *सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही!!

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

बदली बाबत नवे वेळापत्रक

 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार वेळापत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. परंतु, प्रशासकीय कारणास्तव प्रस्तुत वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक १८.११.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे. 
सबब, राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-


खाली दिलेल्या लिंकवरून पत्रक डाऊनलोड करा....

https://drive.google.com/file/d/1z_tyLerA0FOymxVh9nCdwUFUyCC7fCuW/view?usp=drivesdkपाढा आला नाही म्हणून हातावर चालवले ड्रील मशीन

 

विद्यार्थ्याला पाढा वाचता येत नाही म्हणून एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला शिक्षा देण्यासाठी त्याच्या हातावर ड्रिल मशीन चालवले.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये घडली. विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, शिक्षण अधिकार्‍यांची याची गंभीर दखल घेतली आहे.

कानपूरमधील प्रेमनगर य़ेथील प्राथमिक शाळेत विबान पाचवीच्या वर्गात शिकतो. त्याला दोनचा पाढा अनुज नावाच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं. त्‍याला पाढा वाचता आला नाही. संतापलेल्या शिक्षकाने मुलाच्या हातावर ड्रिल  मशीन चालवून त्याला जखमी केले, असा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला. ही घटना गुरुवारी दि.२४ नोव्हेंबर ला घडली. 

ही घटना विबानच्या घरी समजताच त्याच्या नातेवाईकांनी शाळेत गोंधळ घातला. प्रकरणाची माहिती शिक्षणाधिकारी Education officer यांना  मिळताच त्यांनी घटनास्थळी येवून प्रकरणाची चौकशी केली.

विबानच्या हातावर शिक्षकाने ड्रिल मशीन चावले त्‍याच्‍या हातातून रक्‍त आल्‍यानंतर वर्गात एकच गोंधळ उडाला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले. बेसिक एज्युकेशन कौन्सिल एम्प्लॉईज युनियनचे विभागीय अध्यक्ष परवेज आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलासोबत झालेल्या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितले की, गुरुवारी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष यादव रजेवर होते. सहायक शिक्षिकेच्या हातात चार्ज होता.

शाळेत बीएसए सुरजित कुमार यांच्या परवानगीने कौशल्य विकास योजनेंतर्गत मुलांना विविध प्रकारचे शिक्षण दिले जाते, त्याचसाठी ड्रिल मशीन ठेवण्यात आले होते. परवेज आलम यांचा शिक्षकांशी संवाद झाल्यानंतर त्यांना समजले की, मुलाला दोनचा पाढा ऐकवला जात होता, मात्र त्याचे लक्ष नव्हते. त्यामुळे त्याला घाबरवण्याच्या उद्देशाने मशीन सुरू करण्यात आल्याची शक्यता आहे, परंतु मशीनमुळे मुलगा जखमी झाला.


वन्यजीवमंडळ, शास्त्रज्ञ उपक्रम

 जि.प,प्रा.शा. मुरुमखेडावाडी केंद्र करमाड ता/जि औरंगाबाद येथे Our knowledge zone अंतर्गत उपक्रम राबवीत आहोत.प्रकाशसिंग राजपूत व सहकारी शिक्षक दिलीप आढे

1) वन्यजीव मंडळ,
2) ग्रंथालय
3) शास्त्रज्ञ विषयक माहिती
4) परमवीरचक्र विजेते
5) आॕलंपिक पदक विजेते खेळाडू

#olympic #paramvir #scientist


उपक्रमाचा व्हिडीओ पहा....*माझी शाळा माझे कॅलेंडर...डाऊनलोड करा👇*

              *2023*
*शास्त्रज्ञ व परमवीर चक्र विजेत्यांची जयंती साजरी करण्यासाठी उपयुक्त कॅलेंडर*


 *Pdf ची झेरॉक्स काढून शाळेत लावू शकता...*

झेडपी शाळा आता ग्रामपंचायत नियंत्रणाखाली

 

सरकार झेडपीच्या शाळा ग्रामपंचायतींच्या ताब्यात देणार असल्याची चर्चा आहे.यासंदर्भात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुंबईत याची माहिती दिली. तिसरीपासून आठवीपर्यंत परिक्षा नियमित घेतल्या जाणार आहेत, अर्थात नापास न करण्याची प्रक्रिया मात्र तूर्तास कायम ठेवली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. सध्या हा सर्व प्रकल्प राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, लवकरच शिंदे- फडणवीस सरकार त्यावर निर्णय घेईल असे शिक्षणमंत्री  केसरकर यांनी  सांगितले.

केरळमध्ये शिक्षणाबाबत खूप चांगले व यशस्वी मॉडेल तयार करण्यात आले असून तेथे शाळा ग्रामपंचायतींकडे सोपवल्या आहेत. महाराष्ट्रातही ग्रामपंचायतींकडे शाळा सोपविण्याचा सरकारचा विचार आहे. त्यातून स्थानिक ठिकाणच्या समस्या व त्यावर स्थानिक ठिकाणचे नियंत्रण या महत्वाच्या गोष्टी घडतील.

 बदली अर्जबाबत...

सध्या झेडपीचे शिक्षक हे शाळा व्यवस्थापन समिती असली तरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी किंवा ग्रामस्थ.शिक्षक विद्यार्थीकेंद्रीत असतात, तिथे मात्र स्थानिक ग्रामस्थ व पालकांचे संबंध चांगले राहतात, त्याचा विचार करता शाळांमधील वातावरण स्थानिक ठिकाणच्या परिस्थितीनुसार सुरळीत राहण्यासाठी व शिक्षकांवर वेळेचे, अभ्यासाचे नियंत्रण राहण्यासाठी ग्रामपंचायतींकडील नियंत्रण महत्वाचे ठरेल असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

खोटी माहिती भरून बदली घेतल्यास

 *ग्रामविकासचे दि. 22/11/2022 चे पत्र*

*चुकीची माहिती देऊन, खोट्या कागदपत्राच्या आधारे बदली झाल्यास.......


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. तद्नंतर, दि. २१/१०/२०२२ व दि.१८/११/२०२२ च्या पत्रान्वये सन २०२२ मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरु आहे. सदर सुधारित वेळापत्रकानुसार दि.१८/११/२०२१ ते दि. २२/११/२०२२ दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी संगणकीय बदली प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले आहे. अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणान्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होतो. शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाच्या पडताळणीबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत-


१) जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर संवर्गीय शिक्षकांनी भरलेल्या अर्जाची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी. संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतांनाही जाणिवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरलेले आढळल्यास नैसर्गिक न्याय म्हणून संबंधित शिक्षकांना म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देण्यात यावी. सदर पडताळणीचे काम कोणत्याही परिस्थितीत दिनांक २२/११/२०२२ ते २४/११/२०२२ या दरम्यान कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे.

२) पडताळणीअंती ज्या शिक्षकांनी जाणिवपूर्वक खोटया व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिध्द होईल. त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात यावा व अशा शिक्षकांविरुध्द शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करावी. मात्र, बदल्यासंदर्भात विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याची अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे. अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा अनुज्ञेय असणार नाही.

पत्र खालील प्रमाणे ...बदली अर्जबाबत

 जिल्हा अंतर्गत बदलीतील पहिला टप्पा म्हणजे संवर्ग एक व दोनच्या बदल्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अर्जातू रद्द करावयाचे अर्ज याविषयीचा मार्गदर्शक व्हिडिओ  कडून देण्यात आलेला आहे .

यामध्ये कोणते अर्ज संवर्ग एक व दोन मध्ये रद्द करता येतील याविषयी मार्गदर्शन देण्यात आलेले आहे पूर्ण माहितीसाठी खालील व्हिडिओ अवश्य पहा व डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा...

https://youtube.com/@DigitalSchoolGroup
कराhttps://youtu.be/FBWkRBhtoJo

 *अखेर बदली पोर्टल सुरू*

*खालील लिंकवर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता.*


https://ott.mahardd.in/अजून ही आपण डिजिटल स्कूल चॕनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच  करा...


Subscribe Now

बदली सुधारित वेळापत्रक

 जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात आजच्या शासन निर्णयामध्ये बदल झालेला आहे.

 सदरील बदलीचे वेळापत्रक खालील प्रमाणे असणार आहे .सलग तिसरे पत्र बदलीच्या वेळामध्ये बदल  बाबतीत आलेले आहे .

आपण खाली दिलेल्या  प्रमाणे हे पत्र पाहू शकतात


आजपासून संवर्ग १ व २ ची प्रक्रिया

 जिल्हांतर्गत बदल्यांमधील टप्पा क्रमांक एक व दोन च्या बाबतीत महत्त्वाची प्रोसेस आज पासून सुरू झालेली आहे यामध्ये आज स ११ वाजता रिक्त पदांची यादी सीईओ लॉगिन मधून प्रसिध्द होईल व त्यानंतर संवर्ग 1 व 2 साठी लॉगिन सुरू होणार आहे

आपल्या गटातील ज्या शिक्षकांना विशेष संवर्ग भाग 1 अथवा विशेष संवर्ग भाग 2 मधून लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी लॉगिन करून कार्यवाही दि.18/11/2022 ते दि.20/11/2022 अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहे . 
ऑनलाईन अर्ज सादर करतांना  माहिती साठी Vensys कंपनी चा खालील  व्हिडीओ पहावा
.


शालेय पोषण आहार खात्याचे आॕडीट

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे महालेखापाल (AG) व स्थानिक निधी लेखा विभागामार्फत लेखापरिक्षण होत असते. तथापि, या विभागांमार्फत शाळांचे १०० टक्के लेखापरिक्षण होत नाही. सदरच्या लेखापरिक्षणाकरीता शाळांची निवड यादृच्छिक (random) पद्धतीने केली जाते. तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षण • विभागामार्फत शासकीय अनुदानाचा लाभ घेणाऱ्या आस्थापनांचे लेखापरिक्षण व Test Audit करण्यात येते. शाळांच्या आकडेवारीचा विचार करता दरवर्षी ३८ टक्के शाळांचे लेखापरिक्षण होत असल्याचे   निदर्शनास आलेले आहे असे पत्रात म्हटलेले आहे .

केंद्र शासनाने वितरीत केलेला निधी लाभार्थ्यांपर्यंत विहित कालमर्यादेत पोहचत असल्याची खातरजमा करणे, वितरीत केलेले अनुदान कोणत्याही कारणासाठी शाळास्तरावर प्रलंबीत राहणार नाही हा उद्देश या लेखापरिक्षणामागे असून शाळा, तालुका व जिल्हास्तरावर योजनेकडून वितरीत करण्यात आलेले अनुदान, खर्च करण्यात आलेले अनुदान वितरणाच्या आणि मार्गदर्शन याअनुषंगाने लेखापरिक्षण करणे करीता विहित कार्यपध्दतीनुसार शिंदे, चव्हाण, गांधी अॅन्ड कंपनी या सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


योजनेच्या खर्चाबाबत वेळोवेळी निदर्शनास आलेल्या त्रुटी सुधारण्यासाठी व भविष्यात लेखे सुधारीत पद्धतीने ठेवण्यासाठी संस्थेमार्फत सकारात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदरील आदेश पहा... 👇

बदलीपात्र नेमके कोण ?

 शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्याच प्राधान्य क्रमाने त्यांच्या बदल्या केल्या जातील .

बदलीपात्र शिक्षक-

   ज्या शिक्षकाची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे .

आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे, अथवा ज्या शिक्षकाची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे .


असे शिक्षक दहा + पाच(10+5) वर्ष कुठल्याही क्षेत्रात म्हणजेच अवघड अथवा सुगम क्षेत्रात पूर्ण झालेली असेल तर तो शिक्षक बदलीपात्र आहे.


बदली पात्र शिक्षकांची बदलीतून सुटका यावेळी होणार नाही त्यांची बदली ही प्रणाली द्वारे होणारच...

 अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन दहा वर्षांपूर्वी केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल .

अवघड क्षेत्रातील सुंदर शाळा जि.प.प्रा.शा.मुरूमखेडावाडी, औरंगाबाद  


बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहिल्या असल्यास त्या भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा शिक्षकांची निवड होईल त्याला विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण असण्याची अट लागू होणार नाही.

बालदिन उत्साहात साजरा

 *आज दि १४ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी  येथे निपुण उत्सवाची सुरूवात व  बालदिन साजरा करण्यात आला.*

यावेळी विद्यार्थ्यांचे  फुल देऊन  स्वागत करण्यात  आले. विद्यार्थ्यांना गोड भात देण्यात आला, *आजच्या दिवसातील आनंददायी 😊बाब म्हणजे त्यांचे घेण्यात आलेले मनोरंजक खेळ यात मुलांनी संगीत खुर्ची खेळात मनसोक्त आनंद घेतला.*जिल्हातंर्गत बदली अर्ज भरण्यासाठी

 जिल्हा अंतर्गत बदलीतील टप्पा क्रमांक एक संवर्ग एक व दोन चे अर्ज कसे भरायचे याविषयी मार्गदर्शक व्हिडिओ विन्सेस कंपनीतर्फे देण्यात आलेला आहे.

 काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहणे सर्वांसाठी आवश्यक झाले  आहे .

आपणास आणखी यासारखे महत्त्वाचे व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे.


https://youtube.com/c/DigitalSchoolGroup
पवित्र प्रणाली तील भरती संदर्भात महत्त्वाचे

 राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती "अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी" यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे.

दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल/सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता •असल्याचे निदर्शनास आले. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त, शिक्षण यांच्या दिनांक १२.१०.२०२२ रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/ प्र.क्र. १४९/ टिएनटि-१, दि.०७.०२.२०१९ यामधील काही तरतूदी वगळणे / सुधारणा करणेबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतूदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे.

शासन आदेश पहा...👇

बदली संवर्ग १ होकार / नकार कोणी देणे?

 *संवर्ग ०१*

*होकार / नकार*


१) जो शिक्षक बदलीस  पात्र नाही आणि त्या शिक्षकास बदली करुन घ्यायची  नाही त्यानी होकार / नकार देण्याची आवश्यकता नाही .२) जो शिक्षक बदलीस पात्र नाही परंतु बदली करुन घ्यायची आहे त्यानी होकार द्यावा .


३) जो शिक्षक बदलीस पात्र आहे परंतु बदली नको आहे त्यानी बदलीस नकार द्यावा .


४) जो शिक्षक बदलीस पात्र आहे आणि त्याना बदली करुन घ्यायची आहे त्यानी होकार द्यावा .

बदली संदर्भात महत्त्वाचा आदेश...

  *होकार / नकार ची सुविधा अद्याप सुरु झाली नाही.ही सुविधा सुरु व्हायला आणखी अंदाजे ३ दिवस तरी लागतील*

🙏🏻

*पोर्टल सुरु होताच कळविण्यात येईल*  

*सस्नेह धन्यवाद.*

- संतोष ताठे

शिक्षकभारती

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण

 

शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे शालेय पोषण आहार योजना सुरू केली होती. 

 आता या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना 15 ऑगस्ट 1995 पासून राज्यात सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारने या योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण असे करुन 2021-22 ते 2025-26 या पंचवार्षिक आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्य सरकारने योजनेच्या नावात बदल केला आहे. यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणून ओळखली जाणार आहे.देशातील बालकांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू केली आहे. याअंतर्गत देशातील कोट्यवधी बालकांना मोफत आहार दिला जाणार आहे. केंद्र सरकारची ही योजना सुरू करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की शाळांमध्ये मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असणे आणि त्यांना चांगले शिक्षण आणि पोषण विकसित करणे. या योजनेच्या माध्यमातून शाळेत शिकणारे विद्यार्थीही स्वावलंबी होणार असून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. या योजनेंतर्गत शाळांमध्ये प्राथमिक वर्गात शिकणार्‍या मुलांना केंद्र सरकारकडून पोषण आहार दिला जाणार आहे.

नेमके  योजनेचे स्वरूप कसे असणार  ?


गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांच्या मध्यान्नसाठी केंद्र सरकारनं अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लाखो गरीब मुलांना फायदा होणार आहे. या योजनेला केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे नाव देण्यात आले. केंद्र सरकारच्या मते, देशातील जवळपास 11 लाख कोटींपेक्षा जास्त विद्यार्थांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकार एक लाख 71 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?


 

तूमचे व्हॉट्सॲप मॅसेज कोणी वाचत तर नाही ना?

 संदेशवहन  गतिमान करणारे ॲप म्हणजे व्हाट्सअप आणि या व्हाट्सअप मध्ये नवीन नवीन फीचर्स येत आहे. आत्ताच व्हाट्सअप  नवीन फिचर  दिलेले आहे की आता 32 जणांना आपण ग्रुप व्हिडिओ कॉल करू शकतो यासाठी तुम्हाला तुमचं व्हाट्सअपचे  वर्जन अपडेट करून घ्यावे लागणार आहे .

याचबरोबर ग्रुपची सदस्य संख्या वाढली असून 1024 सदस्य आता ग्रुप मध्ये ऍड करता येणार आहे हे सर्व वापरत असताना तुमचा अकाउंट जर कोणी त्यांच्या डिवाइसला जोडून घेतला आहे का हे पहा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे.


व्हॉट्सॲपवेब आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट यासारख्या व्हॉट्सॲप फीचर्सचे नावे तुम्ही ऐकली असतील. तुम्ही त्याचा वापरही करत असाल. या ॲपच्या मदतीने, तुम्ही एकाच वेळी दोनपेक्षा अधिक डिव्हाइसवर  एकच व्हॉट्सॲप वापरू शकता.

जर एखाद्या व्यक्तीने तुमचा फोन घेऊन दुसर्‍या डिव्हाइसवर लॉग इन केले तर तो तुमचे संदेश सहजपणे वाचू शकेल. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर काही सेटींग्स करू शकता. ज्यामुळे तुमचे मॅसेज प्रायव्हेट राहतील.

तुमचे अंकाऊट कोण वापरत आहे का?हे सेटिंग करा?

एखाद्याने तूमच्या व्हॉट्सॲपवर लॉगइन केले होता का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल. येथे तुम्हाला लिंक्ड डिव्हाइस Linked Deviceचा पर्याय मिळेल.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तूमचे व्हॉट्सॲप कोण कोणत्या डिव्हाइसला लॉग-इन केले आहे याचे डिटेल्स मिळतील. जर ऑनलाईन नसूनही तूमचे व्हॉट्सॲप लॉग इन दिसत असेल.तर,तूम्ही त्यातून लॉग आउट होऊ शकता.आजच्या युगात सावधगिरी बाळगणे यास शाहनपण म्हणता येईल...


   प्रकाशसिंग राजपूत 

   औरंगाबाद 


    


बदलीचे संदर्भात महत्त्वाचा आदेश

 

बदली संदर्भात आज मुख्यकार्यकारी अधिकारी Ceo सर्व यांना आज आदेश प्राप्त झाले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकाची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.


२. शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच त्याकरिता दि.३१/०८/२०२२ पर्यंत सेवानिवृत्त / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे, त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा झालेल्या रिक्त जागा, तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर अद्ययावत करण्याचे संदर्भीय दि. १९/०९/२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे.

३. आता संदर्भीय दि. २१/१०/२०२२ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही माहे जानेवारी, २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी दि. ३१/१२/२०२२ पर्यंत सेवानिवृत्ती / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली / रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन, ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर रिक्त पदांचा तपशील अद्ययावत करावा. तसेच, डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावीत असे आदेशित करण्यात आलेले आहे. 


आजचे बदली आदेश पहा


शिक्षणाधिकारी लोहार यांना कोठडी

 

सोलापूर मधील  कोंडी येथील शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग वाढवण्यासाठी हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी सुनावली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती. लोहार यांच्या अन्य मालमत्तेची चौकशी करण्यात येणार आहे. 

कोल्हापूर शिक्षक वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानाची तपासणी झालेली नाही. दोन-तीन दिवसांमध्ये ती केली जाणार आहे.

केंद्रप्रमुख पदभरतीबाबत आदेश

 केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत पत्र .

रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास सादर करणेबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५०: ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदरील कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल सदर पत्रासोबत जोडलेल्या विहित नमुन्यांत Excel शिट मध्ये उक्त माहिती संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावी जेणेकरून केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे संचालनालयास सुलभ होईल..


बदली अपडेट

 📣📣📢📮📮📮📢📣📣

*जिल्हा अंतर्गत बदली बाबत दिनांक 31 ऑक्टोबर 2022 रोजी चे काही महत्त्वपूर्ण VC updates**दिलेल्या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया वेळेत होणार*

*संवर्ग १/२ बदली हवी की नको ते बदली फॉर्म भरतानाच  (दि ५/११/२०२२ ते  ७/११/२०२२) जाहीर करावे लागणार.**बदली प्रक्रिया टप्प्या-टप्प्यानुसार राबवली जाणार.*


*प्रत्येक टप्प्यावर रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार.*


*संवर्ग १ ला फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*


*संवर्ग २ ला बदलीपात्र व निव्वळ रिक्त अशा सर्व जागा मागता येणार.*


*बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांच्या जागा मागता येणार.*


*बदलीपात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त व बदलीपात्र अशा सर्व जागा मागता येणार.*


*वरील सर्व संवर्गांना वर नमुद केल्याप्रमाणे त्या त्या प्रकारच्याच जागा बदली विकल्प भरताना दिसणार आहेत.*


*केवळ माहितीस्तव..* 


*बदली पोर्टल जरी सुरू असले तरी बदली पोर्टलवर फक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन होत आहे.*


*शिक्षकांची लॉगिन सध्या होत नाही. शिक्षकांनी सध्या पोर्टलवर कोणतीही प्रक्रिया करायची नाही. दिनांक पाच नोव्हेंबर 2022 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांनी बदली हवी किंवा नको एवढेच नोंदवायचे आहे.*

*सस्नेह धन्यवाद*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻