डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा 12 जुलै पासून सुरू | teachers-online-transfer | ottmahardd

विशेष संवर्ग भाग 1 मधील  शिक्षकांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा 12 जुलै पासून सुरू*








माहिती लेखन 

*संजय नागे दर्यापूर*

*9767397707* 


 *दि. 11 जुलै  2025*                                           

✳️ *संवर्ग 1 च्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम कसा भरावा.*


✳️  *संवर्ग एकच्या शिक्षकांनी फॉर्म भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा*


✳️  *आज सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा निहाय रिक्त पदांच्या याद्या संध्याकाळी पोर्टलवर अपलोड करण्यात येतील याद्या अपलोड होताच प्रकाशित करण्यात येतील*


✳️  *संवर्ग एकच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिनांक 12 जुलै 2025  ते  15 जुलै  2025 या दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे*


✳️ *संवर्ग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याकरिता दिसतील* 


✳️ *संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त 30 शाळा भरणे अनिवार्य आहे*


✳️ *जर आपण बदली पात्र नसाल तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतील कारण आपण बदली पात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास आपली पूर्वीची शाळा कायम राहील*


✳️ *परंतु आपण बदली पात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत या यादीमध्ये येत असाल तर निश्चितच जास्तीत जास्त पर्याय भरण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल अन्यथा वरील टप्प्यांमध्ये बदली होऊ शकते यापुढे कोणतेही संवर्गाला मुदतवाढ मिळणार नाही* 


✳️ *पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर खालील लिंक वर आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण पोर्टलवर पोर्टल सुरू झाल्यानंतर प्राधान्यक्रम भरू शकता*


✳️ *विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांनी मोबाईल वरून प्राधान्यक्रम कसा भरावा*


https://ott.mahardd.in/


*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*


*➡️ आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*

*➡️ लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल*


➡️ *स्क्रीनवर आलेले declaration  स्विकारून डाव्या मेनूतील Intra district वर क्लिक करावे*


➡️ *त्यातील application form वर क्लिक करावे*


➡️ *त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर application type  व action असे दोन ऑप्शन दिसतील*


➡️ *Cadre 1 च्या समोर view application चा tab दिसेल application tab वर क्लिक केले की*


➡️ *Cadre 1 application form *स्क्रीनवर दिसेल त्यावर* 


*शिक्षकाचे नाव* 


*आडनाव* 


*शाळेचा यु डायस नंबर* 


*शिक्षकाचा शालार्थ आयडी* 


*ही माहिती आपणास दिसेल यामध्ये आपण कोणताही बदल करू शकणार नाही*


➡️ *त्याखाली मला बदलीतून सूट हवी आहे असा प्रश्न दिसेल व* *त्याखाली आपला संवर्ग एक मधील प्रकार दिसेल*


*वरील सर्व ही माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत read only mode मध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही*


➡️ *त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल*


*पर्याय निवडण्यासाठी add preferences या टॅब वर क्लिक केल्यानंतर*


➡️ *खालील लाल रंगाच्या रकान्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल*


➡️ *याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त 30 प्राधान्यक्रम आपण निवडू शकता*


➡️ *प्राधान्यक्रम भरतांना त्याखालील drop down मधून तालुका निवडावा व त्याखालील drop down  मधून शाळा निवडावी*


➡️ *शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील* 


*किती मंजूर पदे*


*किती कार्यरत पदे*


*शाळेतील रिक्त पदे*  


*समानीकरणाअंतर्गत ठेवलेली पदे* 


*बदली पात्र शिक्षकांची पदे*


*ह्या सर्व संख्या दिसतील*


➡️ *Add tab  वर क्लिक केली की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्य क्रमामध्ये ऍड केली जाईल*


➡️ *आपल्या प्राधान्यक्रमामध्ये प्रत्येक शाळा ऍड करताना add  केलेली शाळा save करणे अनिवार्य आहे*


➡️ *या ठिकाणी संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील याचाच अर्थ आपणास फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमांमध्ये दाखवल्या जातील*


➡️ *Add केलेली प्रत्येक शाळा save या  tab वर  क्लिक करून  save करावी*

 ➡️ *आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर × या चिन्हावर क्लिक करून  do you want to remove selected School हा pop up दिसेल त्याखाली yes वर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून delete केली जाईल*


➡️ *अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना add preferences  वर क्लिक करून शाळा जोडावी प्रत्येक शाळा जोडल्यानंतर save  करावी*


➡️ *अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला application form submit करणे आवश्यक आहे त्याकरिता त्याखालील submit tab वर क्लिक करून आपला फॉर्म submit करावा आपण फॉर्म submit न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही*


➡️ *यानंतर आपल्या लॉगिन केलेल्या मोबाईल नंबर वर पुन्हा एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल*


➡️ *स़वर्ग एकच्या शिक्षकांना दिनांक 11 जुलै 2025 ते 14 जुलै 2025 प्राधान्यक्रम भरण्याकरिता सुविधा दिलेली आहे त्यानंतर लगेच 15 जुलैला संवर्ग एक च्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल व लगेच त्यानंतर दोन दिवसांनी संवर्ग दोन ला प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली*

➡️ *वरील माहिती ही फक्त मार्गदर्शनपर आहे प्राधान्यक्रम भरताना शासन आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा*


*बदली प्रक्रिये संदर्भात कोणताही संभ्रम किंवा अडचण येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*


*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती मार्गदर्शन समूह*


*धन्यवाद*

वैयक्तिक अडचणींकरिता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही ग्राम विकास विभागाचे आदेश |online-teachers-transfer

 शिक्षक संवर्ग ऑनलाईन बदली प्रक्रिया सन २०२५


जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबींसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यावर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


२. तसेच दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अ.क्र.२.४.४ नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ठ शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरूस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल, बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरूस्ती करण्यात येणार नाही, अशी तरतुद आहे. ही तरतुद शासनाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.०७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत बदलीकरिता घोषित केलेल्या वेळापत्रकामधील सूचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात आलेली आहे.


तथापि, बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, छ. संभाजीनगर, धुळे, जळगांव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या यादयांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती.

   

३. तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नांदेड यांनी विशेष संवर्ग १ व २ मध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून देखील दुरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे. तसेच विविध लोकप्रतिनिधींमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.


४. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही दि.१८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यांनुसार राबविण्यात येते. त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्यावरील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याकरिता वेळापत्रकानुसार सुमारे पाच महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे. त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे, बदलीस होकार/नकार दर्शविणे, बदलीकरिता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे. तसेच ही कार्यवाही याकरिता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे. वैयक्तिक अडचणींकरिता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही. त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्दयांबाबत येणाऱ्या अडचणींबाबत सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत मे. विन्सीस आय.टी. सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांच्याशी संपर्क करून विहित मुदतीत समन्वयाने तपासून सोडविणे आवश्यक आहे.


५. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणांस विनंती आहे. असे पत्रात म्हटलेले आहे.







गेल्या 20 वर्षांपासून नदी पोहून शाळेत येत आहे त्यांनी 20 वर्षात कधीच एकही दिवस शाळा चुकवलेली नाही | school-teacher-news

 दररोज सकाळी एक माणूस पाण्यात उतरत असतो – त्याच्या हातात प्लास्टिकची एक पिशवी असते, ज्यात कपडे, जेवणाचा डबा आणि पुस्तकं असतात. तो कोणी मोठा जलतरणपटू नाही, पण त्याचं ध्येय मात्र जगावेगळं आहे. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यातल्या पदिंजट्टुमुरी गावात राहणारे अब्दुल मलिक नावाचे हे शिक्षक गेली तब्बल २० वर्षं एका नदीतून पोहत शाळेत जात आहेत.



अब्दुल मलिक हे प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. त्यांच्या घरापासून शाळेचं अंतर फारसं नाही, पण दररोज बसने जायचं झाल्यास तीन तास लागतात आणि तेही प्रवास खडतर आणि अस्वस्थ करणारा असतो. म्हणून त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला – कडलुंडी नदी पार करत पोहून शाळेत जाण्याचा.


पाण्यात पोहताना ते एका टायर ट्यूबचा वापर करतात आणि त्यामुळंच त्यांना "ट्यूब मास्टर" म्हणून ओळख मिळाली. आजवर त्यांनी एकही दिवस शाळा चुकवलेली नाही. त्यांचं शिस्तबद्ध जीवन आणि शिक्षणासाठी असलेली निष्ठा विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श निर्माण करतं. इतकंच नाही, तर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पोहणं शिकवणंही सुरू केलं आहे.


अब्दुल मलिक हे केवळ शिक्षक नाहीत, तर पर्यावरणप्रेमी नागरिकही आहेत. नदीचं प्रदूषण वाढू नये म्हणून ते नियमितपणे विद्यार्थ्यांसह नदी स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रम राबवतात. पाण्यातील प्लास्टिक, कचरा ते स्वतः गोळा करून नदीचे संरक्षण करतात.



त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, याचं हे एक सजीव उदाहरण आहे. अब्दुल मलिक यांनी परिस्थितीवर मात करत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे – जो शिक्षण, पर्यावरण आणि समर्पण या तिन्ही गोष्टींचं जिवंत प्रतीक आहे.





ॲजिओप्लाॕस्टी संदर्भात राज्यात विषमता |anjioplasty-teachersonline-transfer-mahardd|

ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

 शासन निर्णयानुसार, ही प्रक्रिया ३१ मे रोजीच पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, यंदा ही प्रक्रिया लांबली. आता १६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असताना बदली प्रक्रियेला आता कुठे गती आली आहे. मागील महिन्यात जिल्हा परिषद शिक्षकांनी बदली पोर्टलवर आपले 'प्रोफाइल' अद्ययावत केले. 



आता त्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.  संवर्ग एकमध्ये प्रामुख्याने दिव्यांग शिक्षक, गंभीर आजाराने ग्रस्त

असलेले शिक्षक, तसेच वयाची ५३ वर्षे उलटलेल्या शिक्षकांचा समावेश होतो.


ॲजिओप्लाॕस्टी संदर्भात राज्यात विषमता


नुकतेच सांगली जिल्हा परिषदेने संवर्ग १ अंतर्गत वंचित राहिलेल्या ॲजिओप्लाॕस्टी  झालेल्या शिक्षकांना विशेष प्रक्रिया राबवित बदली होण्यासाठी आदेश निर्गमीत केलेले असतांना मात्र मराठवाडयातील अनेक जिल्ह्यात ॲजिओप्लाॕस्टीला संवर्ग १ पासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. याबाबतीत अनेकदा ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा करूनही एक राज्य एक बदली धोरण असतांना ही झालेली विषमता गंभीर म्हणावी लागेल. व ॲजिओप्लाॕस्टी झालेल्या शिक्षकांकडून तीव्र निषेध याबाबतीत होत आहे.

आपल्या जिल्ह्यात ॲजिओप्लाॕस्टी ला संवर्ग १ लाभ दिला की नाही काॕमेंट करा...




प्रशिक्षणसाठी घाईघाईने जाणाऱ्या 30 शिक्षकांच्या वाहनाचा अपघात|educational-news-shaikashnikbatmi-teachersjob|

 टँकरची बसला धडक, 30 शिक्षक जखमी, गॅस गळतीनंतर आगीचा भडका; मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये भीषण अपघात...

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी खासगी बस एलपीजी टँकरच्या जोरदार धडकेने 30 फूट खोल दरीत कोसळली. यात बसमधील 30 शिक्षक आणि चालक असे 31 जण जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे.

रत्नागिरीजवळील निवळी-बावनदी घाटात रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. अपघातग्रस्त टँकरमधून गॅसगळती झाल्याने आगीचा भडका उडाला. त्यात दोन घरे खाक झाली तर दोन वाहनेही जळाली. अपघातानंतर महामार्ग 9 तास ठप्प होता. वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी लगतचा परिसर रिकामा केला.



शिक्षक प्रशिक्षणासाठी बसने रत्नागिरीत येत होते. सकाळी आठच्या सुमारास बावनदी येथील रस्त्यावर बसला मागून भरधाव येणाऱया टँकरने धडक दिली. त्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 30 फूट खोल दरीत कोसळली, तर टँकर पलटी झाला. एलपीजी टँकर जयगड येथून मुंबईकडे चालला होता. बावनदीच्या अलीकडील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या खासगी बसला टँकर धडकला. खासगी बसमधून प्रवास करणारे 15 शिक्षक आणि 16 शिक्षिका असे एकूण 31 जण अपघातात जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जखमी महिला प्रवाशांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पाली, संगमेश्वरमार्गे वळवली वाहतूक 

एलपीजी टँकर रस्त्यावर पलटी झाल्यानंतर गॅस गळती होऊन परिसरात आग लागली. त्यात काही झाडे व रिकामी घरे जळाली. गॅस गळतीचे वृत्त समजताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः हजर राहून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. येथील वाहतूक पाली आणि संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली.

जखमींची नावे

अमोल कोतवाल, राजेश यादव, धर्मेंद्र देरुगडे, दिलीप डोंगरे, संकेत जागुष्टे, कमल महाडिक, विराज सावंत, निशिकांत वानरकर, मंदा खाडे, वृषाली यादव, श्वेता चव्हाण, स्मिता पाटील, जयश्री गावडे, मीना घाडगे, नेहा मेस्त्री, मनीषा कांबळे, प्रियांका जाधव, रुपाली भुवड, उषा खुडे, नीता बांद्रे, हर्षाली पाकळे, सुलक्षणा पाटील, मालिनी चव्हाण आणि मिता शिरकर अशी जखमींची नावे आहेत.

प्रशिक्षण मधील सक्ती   ; शिक्षक संघटनेचा आरोप

प्रशिक्षणाला वेळेपूर्वी हजर राहण्यासाठी घाईने येणाऱया शिक्षकांच्या गाडीला निवळी बावनदी येथे अपघात झाला. या अपघाताला शिक्षण विभाग जबाबदार आहे. प्रशिक्षणास हजर राहण्यास पाच मिनिटे उशीर झाला तरी शिक्षकांना प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यास प्रशासनाचा नकार होता. त्यामुळे प्रशिक्षणाला लवकर पोहोचण्यासाठी शिक्षकांना खासगी बसने प्रवास करणे भाग पडले, असा आरोप कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी व रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केला.

रखडलेल्या महामार्गावर चाकरमान्यांची रखडपट्टी, माणगावात वाहनांच्या रांगा 

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गेलेले चाकरमानी येत्या 16 जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुंबईत परतत आहेत. या परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे चाकरमान्यांची जागोजागी रखडपट्टी होत आहे. महाड ते वडखळदरम्यान महामार्गाचे बरेचसे काम अर्धवट स्थितीत पडले आहे. कोलाड येथील पुलाचे काम मागील काही वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. त्यामुळे या परिसरात शनिवारपासून मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. रविवारीही वाहतूककोंडीचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागला.

महामार्गाच्या जागोजागी रखडलेल्या कामांमुळे चाकरमान्यांचा कोकण ते मुंबई प्रवासातील वेळ चार ते पाच तासांनी वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 13 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. अजूनही ते पूर्ण झालेले नाही.


शिक्षक बदली संवर्ग १ व २ बाबत महत्त्वाचे....