चला सोपा करूया परिपाठ
*दिवस 140 वा*
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र च्या वतीने नुतनवर्षाच्या 💐💐💐🌹🌹🌹 खूप खूप शुभेच्छा !!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आजचे पंचांग
दिनांक.०१/०१/२०२४
भारतीय सौर १०, पौष शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.आज पासून ही माहिती देण्यात येईल.
वार:-सोमवार
अयन-उत्तरायण
ऋतू - हेमंत ऋतू
मुस्लिम धर्मियांचा महिना "जमादीलाखर "
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Today's almanac
Dated.01/01/2024
Indian Solar 10, Paush Shaka 1945 (This date is according to Indian Solar Calendar which is the official calendar of India. This information will be given from today.
Day:-Monday
Ayana-Uttarayana
Ritu - Hemant Ritu
The holy month of Muslims "Jamadilakhar"
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सोमवार, 01 जानेवारी 2024
सूर्योदय 07:07,
खगोलीय दुपार: 12:38,
सूर्यास्त: 18:09,
दिवस कालावधी: 11:02,
रात्र कालावधी: 12:58.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*सुविचार*
कोणत्याही विजयासाठी नम्रता हवीच.
Good Thought
“You don’t have to be great to start, but You have to start to be great.” – Zig Ziglar
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
दिनविशेष
१८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
〉
१८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
१८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
१९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
special day
1848: Mahatma Jotiba Phule and Savitribai Phule started the first girls' school at Bhide Wada Pune.
〉
1862: Indian Penal Code came into existence.
1894: Indian physicist Satyendranath Bose born. (Death: 4 February 1974)
1943: Birth of Raghunath Mashelkar, Scientist, Director General of Council of Scientific and Industrial Research, Padma Shri, Padma Bhushan winner.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
म्हणी/proverb
माकडाच्या हाती कोलीत
A fireband in the hand of madman
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
कोडे
असा सुळकं इकडे तिकडे पळतो
मी फक्त पाण्यातच राहू शकतो!
:-मासा
Puzzle
I run here and there with speed
I can live only in water
Who I am?
:-Fish
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
बोधकथा
दुधाचा पेला
एके दिवशी हरी शाळेतून घरी आला आणि त्याला अचानक खूप भूक लागली. त्याला माहित होते की आज आईने स्वयंपाक केलेला नाही. तो भुकेने व्याकुळ झाला आणि एका घरातून दुसऱ्या घरात जेवण मागू लागला. शेवटी एका मुलीने त्याला दुधाचा मोठा ग्लास दिला. जेव्हा हरी पैसे देऊ लागला तेव्हा तिने ते नाकारले आणि त्याला परत पाठवले. बऱ्याच वर्षांनंतर, ही मुलगी जी आता प्रौढा झाली होती, आजारी पडली. बऱ्याच डॉक्टरांना दाखवूनही तिच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. शेवटी ती शहरातल्या नामवंत डॉक्टर सोबत, मोठ्या इस्पितळात गेली. डॉक्टरांनी काही महिने तिच्यावर उपचार केले आणि ती बरी झाली. ती खूप आनंदून गेली पण बिलाचे पैसे भरता येणार नाही ह्या विचाराने मनातून धास्तावली. जेव्हा हॉस्पिटलकडून तिच्या हातात बिलाचा लिफाफा आला तेव्हा तिने तो उघडला त्यावर लिहिलेली अक्षरे होती "रक्कम मिळाली,एका दुधाच्या पेल्यातून!" तात्पर्य: चांगले काम कधीच वाया जात नाही.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
Moral story
The Golden Touch of Midas
Once upon a time, there was a Greek King, Midas.
He was very rich and had lots of Gold. He had a daughter, who he loved a lot.
One day, Midas found an angel in need of help. He helped her and in return she agreed to grant a wish.
Midas wished that everything he touched would turn into gold. His wish was granted
On his way home, he touched rocks and plants and they turned into gold.
As he reached home, in excitement he hugged his daughter, who turned into gold.
Midas was devastated and he had learnt his lesson. Upon learning his lesson, Midas asked the angel to take his wish away.
Moral of the story
Greed is not good for you. Be content and satisfied to lead a happy and fulfilling life
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
सामान्य ज्ञान-संकलन ज्ञानराज दरेकर
०१) नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे ?
- रवींद्रनाथ टागोर.
०२) लॅटीन भाषेत होमो शब्दाचा अर्थ काय ?
- मानव.
०३) नर्मदा नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे ?
- मध्यप्रदेश.
०४) कोणत्या प्राण्याला "वाळवंटातील जहाज"असे म्हणतात ?
- उंट.
०५) "सारे जहाँ से अच्छा" हे गीत कोणी लिहिले आहे ?
- मोहम्मद इकबाल.
General Knowledge-Compilation by Gnanraj Darekar
01) Who is the first Indian to win Nobel Prize?
- Rabindranath Tagore.
02) What does the word homo mean in Latin?
- Human.
03) Narmada river originates in which state?
- Madhya Pradesh.
04) Which animal is called "ship of desert"?
- Camel.
05) Who wrote the song "Sare Jahan Se Achcha"?
- Mohammad Iqbal.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
श्लोक
पृथ्वीयां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्।
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते।।
अर्थ:- या पृथ्वीवरती तीन रत्न आहेत ती म्हणजे पाणी अन्न आणि सुभाषित म्हणजेच गोड वचने मात्र मूर्ख लोक दगडांना म्हणजेच हिऱ्यामोत्यांनाच रत्नाची उपमा देत राहतात.
Meaning:-on Earth, there are three precious things – water, food, and good speech. However, fools consider fragments of gems to be most valuable.
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
*सर्वांना येणारे 2024 हे वर्ष सुख समृद्धी आनंद आणि भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा🙏💐*
*May the year 2024 be filled with happiness, prosperity to all.💐🙏*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚