My Body Parts (माझ्या शरीराचे अवयव)
🔅
इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी व संभाषण सराव होण्यासाठी श्री नितीन गबालेसर निर्मित इंग्रजी संभाषण हा उपक्रम आपणासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र घेऊन आला आहे.
संकलन व प्रकाशन
प्रकाशसिंग राजपूत
(समूहनिर्माता)
(डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र )
My Body Parts (माझ्या शरीराचे अवयव)
Now I am speaking about my body parts.
मला दोन डोळे आहेत. ते माझे दोन कॅमेरे आहेत.
I have two eyes. Those are my two cameras.
मी डोळ्याने पाहतो. मी डोळ्याने हे सुंदर जग पाहू शकतो.
I see with my eyes. I can see this beautiful world with my eyes.
माझ्या डोळ्यामुळे मी छान दिसतो. माझे डोळे मोठे आहेत.
I look nice because of my eyes. My eyes are big.
माझ्या डोळ्यांचा रंग काळा व पांढरा आहे.
The colours of my eyes are black and white.
मी माझ्या डोळ्यांची खुप काळजी घेतो कारण ते खुप महत्त्वाचे आहे.
I take care of my eyes very much because it is very important.
डोळे माझे ज्ञानेंद्रिये आहेत. कारण डोळ्याने 83% ज्ञान मिळते.
My eyes are my sense organs because I get 83% of knowledge with my eyes.
मला दोन कान आहेत. मी कानाने ऐकतो.
I have two ears. I listen / hear with my ears.
मी माझ्या कानाने गोड आवाज व संगीत ऐकु शकतो
I can listen/hear sweet sound and music, with my ears.
आपण कोणतीही भाषा एकेल्याशिवाय शिकु शकत नाही
We can't learn any language without listening.
ऐकण्याने मला ज्ञान मिळते, म्हणून माझे कान ज्ञानेंद्रिये आहेत
I get knowledge from my ears; so these ears are sense organs.
आपण आपल्या कानाची काळजी घ्यायला हवी
We should take care of our eyes.
मला एक नाक आहे. नाकाने मी श्वास व वास घेतो
I have a nose. I breath and smell with my nose.
मी माझ्या नाकाने विविध पदार्थाचे, फुलांचे छान वास घेऊ शकतो.
I can smell of different dishes, flowers, with my nose.
माझ्या नाकात दोन नाकपूड्या आहेत.
There are two nostrils in my nose.
माझ्या नाकाने मला वासाचे ज्ञान मिळते म्हणून ते ज्ञानेंद्रिय आहे.
I get knowledge of smell with my nose so it is a sense-organ.
माझ्या नाकाने मी छान दिसतो.
I look nice because of my nose.
मला डोक्यावर केस आहेत.
I have hair on my head.
माझे केस दाट व काळे आहेत.
My hair are thick and black.
माझे केस माझ्या डोक्याचे धूळीपासून उन्हापासुन व थंडीपासून बचाव करतात.
My hair protect my head from dust, sun and cold.
मी माझे मोजू शकतन नाही.
I cannot count my hair.
म्हताऱ्या व्यक्तींचे केस पांढरे असतात.
Old persons have white hair.
काळ्या केसांमूळे मी छान दिसतो.
I look nice because of my black hair.
माझे नाक हे डाव्या आणि उजव्या कानांच्या मध्ये आहे.
My nose is between my left and right ears.
मला एक तोंड आहे मी तोंडाने खातो व बोलतो.
I have a mouth. I eat and speak with my mouth.
मला एक जिभ आहे मी जिभेने चव घेतो.
I have a tongue. I taste with my tongue. माझी जिभ लाल व गुलाबी आहे.
My tongue is red and pink.
माझ्या जिभेमूळे मी स्पष्ट बोलू शकतो.
I can speak clearly with my tongue.
माझ्या जिभेमूळे मला चवींचे ज्ञान मिळते म्हणून ती ज्ञानेंद्रिय आहे.
I get knowledge of taste with my tongue so it is my sense organ.
माझ्या जिभेमूळे मी अनेक पदार्थांची चव घेऊ शकतो.
I can taste many dishes with my tongue.
मला बत्तीस दात आहेत.
I have thirty-two teeth.
मी माझ्या दाताने अन्न चावतो.
I chew the food with my teeth.
मी माझ्या दाताने चावू शकतो.
I bite with my teeth.
माझे दात पांढरे व मजबूत आहेत. मी माझ्या दाताने उस देखील खाऊ शकतो,
My teeth are white and strong I can even eat
आपण दररोज दोन वेळा दात घासले पाहिजे.
We should brush our teeth twice in a day.
माझ्या पांढऱ्या व सरळ दातांमुळे माझं हास्यं छान दिसतं
My smile looks nice because of my white and straight teeth.
मला एक मान आहे. माझी मान ही डोक्याला शरीराशी जोडते..
I have a neck my neck connects my head with the body.
मी माझ्या मानेने डोक्याला 180° डीग्री कोनामध्ये फिरवू शकतो.
I can move my head in 180" degree angle.
मी माझ्या डोक्याने व मानेने होकार व नकार दर्शवू शकतो.
I can indicate 'yes' and 'no' with my head and neck.
मला एक पोटं आहे. मी पोटात अन्न व पाणी साठवतो.
I have a stomach. I stoar food and water in my stomach.
मी माझ्या दोन्ही हाताने टाळी वाजवतो, वस्तु उचलतो.
I clap and lift object with my both hands.
मी ढोपरांपासून माझे हात हालवू शकतो.
I can move my hands from my elbows.
मी माझ्या हाताने बॅडमिंटन, कॅरम, टेनिस, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, क्रिकेट हे खेळ खेळतो.
I play badminton, carom, Tennis, chess, vollyball, basketball, cricket with my hands.
माझ्या हातांना दहा बोटे आहेत
My hands have ten fingers.
माझ्या बोटाने मी वस्तु पकडतो. मी बोटाने टिचकी मारू शकतो.
I hold things with my fingers. I can snap with my fingers.
मी कॅरम आणि धनुष्यबाण चालवणे हे खेळ बोटोन खेळतो.
I play carom and Archery with my fingers.
मी माझ्या बोटाने गोटी मारू शकतो.
I can strike a marble with my finger.
मी माझ्या बोटाने पेन पकडतो व लिहितो.
I hold pen and write with my fingers.
बी बोटाने मुठ बनवतो.
I make the fist with fingers.
मला दोन पाय आहे, मी पायाने चालतो, पळतो, उड़ी मारतो.
I have two legs. I walk, run, jump with legs.
मी माझ्या पायाने आणि हाताने सायकल चालवतो.
I ride bicycle with my legs and hands
मी माझ्या पायाने फूटबॉल, लंगडी हे खेळ खेळतो.
I play football, langadi with my legs.