जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत | inter district | transfer | ottmaha|
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत...inter district transfer
inter district transfer आदेश पहा...👇
आंतरजिल्हा बदलीबाबत बिंदु नामावली अपलोड करण्याबाबत | inter district transfer
सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत
.
अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक
शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्याच्या अनुषंगाने बिंदुनामावली बदली पोर्टल वर
अपलोड करण्यासाठी आज दुपारी १२.०० वा. पासून Vinsys IT Services (1) Pvt. Ltd, व्दारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
मुळ आदेश पहा....
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक
सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.
आंतरजिल्हा बदलीबाबत महत्त्वाचे
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक
शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
२. आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते.
मात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच सन २०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आज करण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रियेकरीता E.D. लॉगीन मध्यरात्री पासून सुरु करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दि. १४/०९/२०२३ ते दि. १७/०९/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी असे आदेशात म्हटलेले आहे.
शासन आदेश पहा...
आंतरजिल्हा बदली महत्त्वाचा आदेश...
सन २०२२ मध्ये ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही
२०२१ चे बदली धोरण पहा....
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी सन २०२२ ची आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबविण्यात आलेली आहे. तसेच दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.
३. तथापि, शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील दि.२१.०६.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १ मध्ये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी, असे नमूद केले आहे.
सदर मुद्याच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. असे पत्रात नमूद केलेले आहे.
i) सन २०२२ मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळणेसाठी पात्र ठरले होते, तथापि रिक्त जागा नसल्याने ज्यांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची यादी संबंधित जिल्हा परिषदांनी Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Pune कडून प्राप्त करुन घ्यावी.असे पत्रात नमूद केलेले आहे.
ii) सदर यादीमधील शिक्षकांची दि.२३.०५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मागदर्शक सूचना व संवर्गनिहाय प्राधान्यक्रमानुसार सुधारित यादी तयार करण्यात यावी. सन २०२२ मधीलशिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण / सक्षम प्राधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत उपलब्ध करून घेण्यात यावी. अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी तयार करावयाच्या यादीमध्ये प्राधाम्न्य देण्यात यावे.असे पत्रात नमूद केलेले आहे.
ii) आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक शिक्षकांनी नमूद केलेल्या पर्यायानुसार संबंधित जिल्हा परिषदांमध्ये रिक्तता असल्यास अशा शिक्षकांची तात्काळ बदली करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांमध्ये सद्यस्थितीत प्रवर्गनिहाय रिक्त पदे नसतील, अशा ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदांनी परस्पर समन्वयाने त्या त्या प्रवर्गामध्ये रिक्त पदे उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने संबंधित शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करावी.
iv) आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर जिल्ह्यातील रिक्त जागा विचारात घेवून ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि.२३.०५.२०२३ मधील मुद्दा क्र. १३ व १४ नुसार आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी.
(v) आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीबाबत शा.नि. दि.२३.०५.२०२३ मधील २.८ मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट या वर्षीच्या बदलीकरिता शिथिल करण्यात यावी.असे पत्रात नमूद केलेले आहे.