📺डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 🖥
आज रोजी शाळाकेंद्रित असलेला समूहाचे
राज्यस्तरीय जिल्हा तसा समूह अंतर्गत १०१ समूह झाले आहेत व १८००० सदस्य सभासद असून जवळपास १५००० शाळा या एकत्र आल्या आहेत.
आज रोजी शाळाकेंद्रित असलेला समूहाचे
राज्यस्तरीय जिल्हा तसा समूह अंतर्गत १०१ समूह झाले आहेत व १८००० सदस्य सभासद असून जवळपास १५००० शाळा या एकत्र आल्या आहेत.
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र समूहनिर्मिती :-
डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या व्हाटसअपचे ३५ जिल्ह्यातल्या ३५५ तालुक्यातले शिक्षक ८६ समूह बनवून १८००० पेक्षा जास्त शिक्षक व १५००० शाळा डिजिटल प्रवाहात एकत्र आणत .संपूर्ण शाळा डिजिटल करत प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट दिशेने वाटचाल करत संपूर्ण शाळा प्रगत होऊन डिजिटल शाळा वृद्धी व त्यांची समृद्धीचे कार्य अविरत सुरु आहे. संपूर्ण शाळा डिजिटल करत प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट दिशेने वाटचाल करत संपूर्ण शाळा प्रगत.
करोना काळातील शैक्षणिक व सामाजिक कार्य
डिजीटल शाळा एकञित करत महाराष्ट्रसह कर्नाटकातील मराठी भाषिक बेळगांव जिल्ह्यातही व्यासपीठ निर्माण करत ३५ जिल्ह्यातील १८ हजार शिक्षकांना या चळवळीचा भाग बनवत २०१३ पासून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करत सोलार ऊर्जा वापर प्रसार करत सध्या शाळा बंद असतांना ही डिजिटल लाईव्ह क्लास सुरु करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अध्ययन सुलभ करण्यात सहभाग घेतला आहे. या कार्याचा अल्पसा परिचय ...
🔹कोरोना प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यात वाडीतील नागरिकांचे स्वच्छता बाबतीत व आरोग्य दृष्टिकोनातून कोरोना बाबत बचावात्मक बाबतीत प्रबोधन.
🔹राज्यस्तरीय शैक्षणिक कविता गायन स्पर्धा हेडगेवार हाँस्पीटलची संस्था असलेली सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांचे प्रायोजक मिळवून जून महिन्यात कविता गायन स्पर्धेत ११७ कविता आल्या ज्या अँनिमेशन युक्त करत ४ लक्ष १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कविता उपलब्ध करत विद्यार्थ्यांना ज्ञानदानात हातभार लावला.
🔹शाळा बंद असल्याने मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र या निर्माण केलेल्या राज्यस्तरीय समूहाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक बाबी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत, त्यात दररोज १ ली ते ८ वी पर्यत डिजीटल लाईव्ह क्लास द्वारे राज्यभरातील शिक्षकांच्या साहय्याने आँनलाईन शिक्षण झाले एका वर्षभरात १० लक्ष विद्यार्थ्यांना उपयोग झालेला आहे.