डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नोकरी मिळत नसल्याने डी.टी,एड कडे पाठ फिरवली

 अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर हमखास नोकरीची हमी देणाऱ्या डीटीएड (डिप्लोमा इन टीचिंग एज्युकेशन -डी.एड.) मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक नसल्याचे चित्र आहे.



मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांची शासकीय भरती रखडल्याने या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. यासोबतच खासगी शाळांमध्ये शिक्षकांची परवड, शासनाचे उदासीन व वारंवार बदलणारे धोरण अशा अनेक कारणांमुळे परिस्थिती विपरीत झाली आहे.

 शिक्षकी पेशासाठी आवश्यक डीटीएड. प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करण्याची 21 जुलैपर्यंत होती. मात्र जिल्ह्यात असलेल्या डीएलएडच्या  2600 जागांसाठी केवळ 689 अर्ज मान्य झाले आहेत.
डीटीएड अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थी शिक्षक बनायचे. मात्र, नंतर नोकरी मिळवण्यासाठी पुन्हा टीईटी ही स्पर्धा देणे बंधनकारक आहे. दरम्यान, टीईटीमध्ये होणारे घोळ पाहता ती देऊनही नोकरीसाठी ताटकळत राहावे लागत असल्याने डीटीएड प्रवेशाची संख्या घटली आहे. नोकरीसाठी बराच काळ थांबावे लागते, थांबूनही नोकरीची शाश्वती नसते. सध्या शिक्षक भरती बंद आहे. नोकरीच्या सुरक्षिततेअभावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात घट झाली.

शिक्षकांनी काढला भव्य मोर्चा

काही वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यात डीएड कॉलेजची संख्या 100 हून अधिक होती, त्यातील 70 हून अधिक संस्था बंद पडल्याने केवळ 30 महाविद्यालये शिल्लक आहेत. त्यात 1 शासकीय, 8 अनुदानित व इतर विनाअनुदानित महाविद्यालयांची संख्या आहे. यातल्या काहींनी अधिकृतपणे बंद केली नसल्याने त्यांना गृहीत धरले जात आहे. 2004 पूर्वी संपूर्ण राज्यात डीएड 113 महाविद्यालये होती. 2004 नंतर ही संख्या 450 वर गेली आणि 2008 मध्ये राज्यात 1156 डीएड संस्था होत्या. 2012 नंतर भरती बंद झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने महाविद्यालये बंद पडली. विभागात 117 डीटीएड संस्था आहेत.

स्थिती

  • जागा - 2600
  • संस्था - 30
  • अर्ज - 900
  • मान्य अर्ज -689

शिक्षकभरती नसल्याने...

  • 8 वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शाश्वती नसल्याने अनेकांनी इच्छा असूनही हा अभ्यासक्रमात प्रवेशाचा विचार सोडला.
  • शिक्षकांच्या नोकरीसाठी आवश्यक असलेला बीएबीएड 4 वर्षीय नव्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाकडे कल वाढला.
  • डीएड झाल्यावर शासकीय शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा पास करणे आवश्यक, खासगी शाळा बी.एडला मागणी.
  • नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी, शिक्षण संस्थाही बंद, महाविद्यालयातील प्राध्यापकही झाले बेरोजगार


आंतरजिल्हा बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

 🚨 *Transfer Portal Alert.*🚨


आंतरजिल्हा बदली चे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उद्या म्हणजे 11 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 05.00 वाजता संपणार आहे.


तरी, सर्व अंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले अर्ज उद्या संध्याकाळी 05.00 वाजेपूर्वीच बदली पोर्टल वर भरून घ्यावे.


*यापुढे मुदतवाढ अथवा Rejection - Correction ची संधी मिळणार नाही.*






आंतरजिल्हा बदली अपडेट

 ऑनलाइन आंतर जिल्हा बदली संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट म्हणजे बदलीच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

 आता बदलीच्या तारखा या खालील प्रमाणे असणार आहे.


> मंजूर रोस्टर अपलोड करणे: 02 ऑगस्ट ते 03 ऑगस्ट, 2022

> रोस्टर प्रकाशित करणे: 04 ऑगस्ट, 2022


> रोस्टर पहाण्यास: 04 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट, 2022


आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करणे: 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट, 2022


प्रक्रिया सुरुवात : 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2022


> इंटर ट्रान्सफर ऑर्डर तयार करणे: 15 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022




डिजिटल चॕनलला सबस्क्राईब  करा व अपडेट मिळवा...