डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

चांद्रयान 3 #mission moon,

  भारत परत एकदा नव्याने एक मोठा मिशन घेऊन आलेला आहे चांद्रयान तीन म्हणून हे मिशन आपणास माहीत असणार आहे.  

 आज दिनांक 14 जुलै 2023 रोजी ठीक  दुपारी दोन वाजून 34 मिनिटांनी हे अवकाशात चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित होणार आहे.

 या इतिहासाच्या नोंदीचे आपणही साक्षीदार होऊ शकतात हे आपल्या विद्यार्थ्यांनाही आपण दाखवून दाखवू शकता व भारताने साधलेली आजवरची एकूण प्रगतीची एक गौरवास्पद बाब आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकता मित्रांनो निश्चितही पोस्ट सर्व विद्यार्थ्यांना पालकांना गावकऱ्यांना आणि शैक्षणिक गटावर आपण पोहोचवावी ही आपणास नम्रपणे विनंती आहे.

आपणास दोन वाजून 34 मिनिटांनी लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी आपण क्लिक करावे किंवा व्हिडिओ बॉक्सला आपण क्लिक करावे.


१ वाजून ५० मिनिटांनी Live पहा...




इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे

 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकूणच प्री स्कूल ते बारावीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.

सेमिस्टर पॅटर्न, १५० विषयांची पाठ्य पुस्तके, जादुचा पेटारा आदींचा समावेश या बदलात असणार आहे.

खासकरुन नववी ते बारावी या तीन वर्षाच्या शैक्षणिक कार्यक्रमात मोठा बदल होणार आहे.

पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही पूर्णपणे बदलणार आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा एकूणच आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५० विषयांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना यातूनच आपले पर्याय निवडायचे आहेत. विशेष म्हणजे अकरावी व बारावीसाठी विज्ञान, वाणिज्य व कला अशा तीनच शाखा होत्या. आता संगीत, क्रीडा, हस्तकला व व्यावसायिक शिक्षणांनाही गणीत, विज्ञान, मानव्य शाखा, भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांप्रमाणे दर्जा मिळणार आहे.



नववी ते बारावीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) तयार करण्यात आला आहे. प्री-स्कूलमध्ये मुलांना पिशव्याशिवाय शिकवले जाईल. तीन ते आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना शाळेत दप्तर आणण्याची गरज नसेल. या मुलांचा जादुचा पेटारा मिळणार असून यामध्ये ५३ प्रकारचे खेळ, पोस्टर खेळणी, बोर्ड, बिल्डींग ब्लॉक, प्लेईंग कार्ड आदींचा समावेश असणार आहे. याचाच आधार घेऊन मुलांना शिकविले जाणार आहे.

थोडक्यात स्वरूप असे असणार...

सेमिस्टर पद्धतीचा अवलंब
इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे. तिन्ही वर्गांमध्ये प्रत्येकी १६ विषयांची परीक्षा द्यावी लागेल. नववीचा निकाल दहावीच्या निकालात जोडला जाईल व अकरावीचा निकाल बारावीच्या निकालाशी जोडला जाणार आहे.

स्थानिक भाषेचा वापर
इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक भाषेत असणार आहे. इयत्ता तिसरीमध्ये ८ ते ११ वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार असून प्रथमच त्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. पाचवीच्या वर्गात दुसऱ्यांदा मूल्यमापन होईल.

चार टप्प्यांमध्ये विभागणी
इयत्ता पहिली ते दुसरी फाऊंडेशन स्टेज, तिसरी ते पाचवी तयारी टप्पा, सहावी ते आठवी मध्यम आणि नववी ते बारावी माध्यमिक टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे. स्थानिक भाषेच्या वापराने विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडून घेणे सोपे होणार आहे.






pavitra portal पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती... आता 1 : 10 ऐवजी 1 : 3 उमेदवार..

 मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय, दिनांक ७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम प्रवर्ग, विषय व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येईल pavitra portal.


संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करावयाची आहे. त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करावी.


२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०७०६१७५९४७१६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



pavitra portal


conclusion-pavitra portal