डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जुनी पेन्शन २००५ पुर्वी जाहिरात | old pension| |nps|

 १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या व १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या करिता १९८२  ची जुनी पेंशन लावतांना कारायवयाची अंमलबजावणी.


शासन परिपत्रक :

ज्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-


राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा. विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक २ अनुसार दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावेत.


नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करुन त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी.असे आदेशात म्हटलेले आहे.

संपूर्ण शासन आदेश पहा....

nps




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: