डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

अहमदनगरचे शिक्षक बदलीबाबत कोर्टात

 *जिल्हाअंतर्गत बदली प्रकरण*


*मा. सचिव, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, विभागीय आयुक्त नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांना मा. उच्च न्यायालयाची  नोटीस



अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक यांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रकरणासंदर्भात मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे. जिल्हा परिषद अहमदनगर यांनी जिल्हा अंतर्गत बदली करिता ८ जून २०२२ रोजी, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर 2022 रोजी प्रसिद्ध केलेली यादी ही शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या साठी उपयोगी असल्याने ती वापरण्यात येईल, असा सर्व शिक्षकांना विश्वास होता. परंतु दिनांक 10 जून 2022 रोजी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी एक पत्र काढून जिल्हाअंतर्गत बदली करता सन 2017 अवघड क्षेत्र यादी, ही 2022 मधील होणाऱ्या बदल्यासाठी लागू करण्याचे सर्व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना कळविण्यात आले होते. त्यामुळे व्यथित शिक्षकांनी मा. जिल्हा परिषद, अहमदनगर येथे बदल्यांकरता 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अवघड शाळांची यादी वापरण्यात यावी, यासंबंधी निवेदन दिले होते, परंतु त्याचा कुठेही विचार करण्यात आला नव्हता. त्यामुळे सद्यस्थितीत बदल्या प्रक्रियेत होणाऱ्या अन्यायाच्या अनुषंगाने श्री. संदीप कवडे व इतर शिक्षकांनी, मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे माननीय ॲड. अरविंद जी. अंबेटकर यांच्या वतीने, दिनांक 10 जून 2022 रोजी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी निर्गमित केलेल्या पत्रास आव्हान देण्यात आले आहे तसेच  जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया करिता जून 2022 मध्ये नव्याने केलेली अवघड क्षेत्रातील शाळांची यादी सदर बदली करिता वापरण्यात यावी अशी मागणी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे करण्यात आली आहे.


 दिनांक 23 जून 2022 रोजी मा. उच्च न्यायालय येथे सदर याचिकेवर सुनावणी होऊन शासनास व जिल्हा परिषदेस मा. उच्च न्यायालय यांनी नोटीस काढलेले आहेत. तसेच मा. न्यायालय यांनी आपल्या निकालात नोंदवले आहे, की जर शासनाकडे नवीन अवघड क्षेत्रातील यादी उपलब्ध असताना जुनी 2017 ची यादी वापरण्याचे काय हेतू (logic) आहे, हे आमच्या निदर्शनास येत नाही. शासनाच्या या कृतीवर मा. उच्च न्यायाने नाराजी व्यक्त करून, 2017 ची आऊटडेटेड लिस्ट  बदली प्रक्रियेत का वापरण्यात येणार आहे? नवीन यादी का वापरणार नाही? यासंदर्भात दिनांक 12 जुलै पर्यंत लेखी म्हणणे सादर करण्याचे सांगितले आहे.


याचिकाकर्ते यांच्यावतीने ॲड. अरविंद जी. अंबेटकर, शासनाच्या वतीने ॲड. एस.जी. कार्लेकर व जिल्हा परिषदेच्या वतीने ॲड. ऐ.डी. आघाव यांनी काम पाहिले.

नवोदय विद्यालय समिती महाराष्ट्र मार्फत 1616 जागेसाठी भरती

 नवोदय विद्यालय समिती महाराष्ट्र मार्फत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. 

यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.



प्राचार्य, पीजीटी, टीजीटी, टीजीटी (3री भाषा), संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी पुरुष, पीईटी महिला, ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राचार्य ,पीजीटी , टीजीटी , टीजीटी ( TGT Third Language) संगीत शिक्षक , कला शिक्षक , पीईटी पुरुष , पीईटी महिला, ग्रंथपाल इ. 

 एकूण जागा - 1616 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राचार्य - 

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master Degree + B.Ed. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 पीजीटी -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 टीजीटी (TGT) -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B.Tech. Computer Science / IT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

टीजीटी ( TGT Third Language) - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Education of NCERT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 संगीत शिक्षक  - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Degree Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

कला शिक्षक (Art Teacher) - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी any discipline of Fine Arts. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

पीईटी पुरुष  - 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

 पीईटी महिला -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

ग्रंथपाल (Librarian) -

 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी one year Diploma in Library Science पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 

ही कागदपत्रं आवश्यक

  बायोडेटा,दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो भरती शुल्क प्राचार्य पदासाठी- रु. 2000/- पीजीटीसाठी- रु.1800/- टीजीटी आणि इतर शिक्षकांसाठी (संगीत, कला इ.)- रु. 1500/- 


JOB TITLENavodaya Vidyalaya Samiti Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राचार्य (Teaching Staff posts like Principal) पीजीटी (PGT) टीजीटी (TGT) टीजीटी ( TGT Third Language) संगीत शिक्षक (Music Teacher) कला शिक्षक (Art Teacher) पीईटी पुरुष (PET Male) पीईटी महिला (PET Female) ग्रंथपाल (Librarian) एकूण जागा - 1616
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राचार्य (Teaching Staff posts like Principal) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master Degree + B.Ed. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पीजीटी (PGT) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. टीजीटी (TGT) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B.Tech. Computer Science / IT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. टीजीटी ( TGT Third Language) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Education of NCERT पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संगीत शिक्षक (Music Teacher) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Degree Course पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कला शिक्षक (Art Teacher) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी any discipline of Fine Arts. पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पीईटी पुरुष (PET Male) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. पीईटी महिला (PET Female) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी D.PEd पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ग्रंथपाल (Librarian) - अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी one year Diploma in Library Science पर्यँत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
भरती शुल्कप्राचार्य पदासाठी- रु. 2000/- पीजीटीसाठी- रु.1800/- टीजीटी आणि इतर शिक्षकांसाठी (संगीत, कला इ.)- रु. 1500/-
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://navodaya.gov.in/nvs/en/Recruitment/Notification-Vacancies/ या लिंकवर क्लिक करा.

CBSE ने 'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

 CBSE च्या विद्यार्थ्यांना तसंच शाळांना वेबसाईटवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता. CBSE कडून मोठं पाऊल उचलण्यात आलेले आहे.




 CBSE इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी टर्म 2 चे निकाल जाहीर करण्याआधी, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने  'परीक्षा संगम' हे नवीन पोर्टल सुरू केले आहे.

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी हे निकष आपण पुर्ण करत आहात का?

हे पोर्टल सर्वांसाठी OSD (one stop destination)  म्हणून काम करेल अशी माहिती बोर्डाकडून स्पष्ट  करण्यात आलेली आहे. यात टर्म 2 च्या निकालासह परीक्षेशी संबंधित सर्व क्रियाकलापांचा समावेश आहे. CBSE च्या परीक्षा संगम पोर्टल parikshasangam.cbse.gov.in वर प्रवेश करता येईल. त्याचे 3 भाग आहेत - 

शाळा (गंगा), 
प्रादेशिक कार्यालय (यमुना) 
आणि 
मुख्य कार्यालय (सरस्वती).

शालेय विभागात, अभ्यासक्रम, परिपत्रक, नमुना प्रश्नपत्रिका इत्यादी परीक्षा साहित्याचा पर्याय आहे. OASIS, परीक्षा नोंदणी इ. सारख्या पूर्व परीक्षा उपक्रम. यासह, अंतर्गत क्रमांक आणि पुनर्मूल्यांकन इत्यादीसारख्या परीक्षेनंतरच्या क्रियाकलापांसाठी अर्ज करण्याचे पर्याय आहेत. परिक्षा संगम पोर्टलद्वारे डायरेक्ट डिजीलॉकरमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.

ही आहे सीबीएसई परीक्षा संगम पोर्टलची थेट लिंक इथेच जाहीर होणार CBSE टर्म 2 निकाल 2022 CBSE इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 चा निकाल जाहीर होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार जुलैमध्ये निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in
व cbse.gov.in निकाल पाहू शकणार आहेत.

असे पास होणार विद्यार्थी...

विद्यार्थ्यांना प्रत्येक अटी स्वतंत्रपणे उत्तीर्ण करण्याची गरज नाही आणि अंतिम निकालात 33 टक्के गुण मिळवणे हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे असेल. 
     टर्म 1 चा निकाल जाहीर करताना, CBSE ने किती विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले किंवा होऊ शकले नाहीत याचा डेटा जारी केला नाही आणि विद्यार्थ्यांना त्यांचे गुण विचारात न घेता टर्म 2 च्या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. बोर्डाने तेव्हा जाहीर केले होते की अंतिम गुणांच्या आधारे उत्तीर्णतेची टक्केवारी मोजली जाणार आहे.