डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

टी.ई.टी प्रकरणातील दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२१ भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६ (डी) आणि महाराष्ट्र विद्यापिठ मंडळाच्या व इतर विनिर्दोष्ट परीक्षामध्ये होणान्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम, १९९० (सुधारीत) कलम ७,८ अन्वये दि. १६/१२/२०२१ रोजी फौजदारी गुन्हा

दाखल करण्यात आलेला आहे. ज्याअर्थी दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करून घेतली


त्यात असे निष्पन्न झाले की, ७८८० उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतले. ज्याअर्थी अशाच स्वरूपाच्या व्यापम घोटाळयात मा. सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेत मोठया प्रमाणात गैरप्रकार झाले असतील आणि घोटाळयामध्ये सहभागी उमेदवारांना वेगळे करता येत असेल तर अशा परीक्षा रद करू नये तर, जर अशा उमेदवारांचे निकाल वेगळे काढता आले तर कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांचे निकाल रद करावेत..


असे निर्देश दिलेले आहेत. (निधी कैम वि. मध्य प्रदेश राज्य सरकार (२०१६) ७ एस.सी.सी. ६१५) ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम, १९९८ भाग दोन प्रकरण पाच मधील कलम ८ मध्ये कार्यकारी समितीचे कार्य व कर्तव्य नमूद आहे. त्यामधील उपनियम (२) (य) मध्ये दिलेल्या अधिकारानुसार कार्यकारी समिती अस्तित्वात नसल्याने राज्य परिषद समितीस शास्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार आहेत. ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, राज्य परिषद समिती सभा क्र. १२३ ठराव क्र. ३५० दि. २४/०६/२०२२


अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारीत करण्यात करण्यात आलेला आहे.


अ) परिशिष्ठ अ मध्ये नमूद ७५०० उमेदवारांच्या गुणामध्ये फेरफार करून अपात्र असतांना देखील अंतरिम / अंतिम निकालामध्ये सदर उमेदवारांना पात्र जाहीर करण्यात आलेले आहे. सचव सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.


उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.


ब) परिशिष्ठ व मध्ये नमूद २९३ उमेदवार हे अंतरिम / अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या


विहित पध्दतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत, तथापि त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे अथवा



प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सबब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित


करण्यात येत आहे. उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे.


क) | परिशिष्ठ क मध्ये नमूद ८७ हे उमेदवार आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर यांनी निश्चित केलेले आहेत. त्यापैकी ६ उमेदवारांचा परिशिष्ठ अ मध्ये नमूद ७५०० उमेदवारांमध्ये समावेश आहे. उर्वरित ८१ उमेदवारांपैकी ७६ उमेदवार हे अंतरिम / अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत व ३ उमेदवार परीक्षेस अनुपस्थित आहेत, त्यामुळे सदर सर्व उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणान्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे, 

ड) परिशिष्ठ क मध्ये नमूद २ उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी झालेली नाही. यांची माहिती परिक्षेच्या कोणत्याही माहितीशी


जुळत नाही. यांचेबाबतीत पुढील प्रमाणे शास्ती प्रस्तावित करण्यात येत आहे.


> यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधीत करणे.


एकुण ७८८० पैकी ६ उमेदवारांची नावे दुवार असल्याने अंतिम कारवाई उपरोक्त ठरावाप्रमाणे एकूण ७८७४ उमेदवारांबाबत करणेस मान्यता देण्यात आलेली आहे. त्याअर्थी, आत्ता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम १९९८ भाग २ प्रकरण ५ मधील कलम ८ उपनियम (२) (य) मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून सोबत दिलेल्या परिशिष्ट अ,ब,क समाविष्ट परीक्षार्थी उमेदवार यांचे विरूद


त्यांचे नावासमोर नमूद प्रमाणे शास्ती निश्चित करीत आहे.




शिक्षक विराट मोर्चा प्रमुख मागण्या

 📣📣📣📣📣📣📣📣📣

*चलो औरंगाबाद!!*         *चलोऔरंगाबाद!!!  शिक्षकांच्या  राज्य व जिल्हास्तरावरील विविध प्रलंबित मागण्यासाठी विराट मोर्चा ८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार*

✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻🙏🏻✊🏻

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

*1) दि.1 नोव्हेबर2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचा-याना जुनी पेन्शन योजना लागू करावी.*

*2)  मागील बारा- तेरा वर्षांपासून प्रलंबित शिक्षण विस्तार अधिकारी ,केद्रप्रमुख, याचबरोबर मुख्याध्यापक,विषय शिक्षक पदोन्नती तात्काळ करण्या बाबत संबधित यंत्रणेला आदेशीत करावे. 13 वर्ष विलंबाची चौकशीकरून दोषींवर कारवाई  करण्यात यावी,याबाबत विभागीय आयुक्त यांनी 30 जून प्रयन्त सर्व पदोन्नती करण्याचे निर्देश दिलेले होते त्यांच्या आदेशाला जिप जुमानत नसल्याने सरकारचे लक्ष वेधले जाणार*



*3) वस्तीशाळा शिक्षकांची मुळ नियुक्ती दिनांक ग्राहय धरून सेवाजेष्टतेचा लाभ देण्यात यावा.*


*4)दि 1 नोव्हेबर 2005 नंतर नियुक्तं शिक्षकांचा(dcps) हिशोब अदययावत देण्यात यावा व सदरील रक्कमं nps मध्ये वर्ग करण्यात यावी.*


*5)मयत डीसीपीएस धारक बांधवांचे प्रस्ताव निधी अभावी तीन वर्षापासून जि प औरंगाबाद येथे रखडलेले आहे ते प्रस्ताव त्वरित निकाली काढून मयतांच्या कुटुंबियांना आर्थिक दिलासा द्यावा.*


*6) वैदयकीय व पुरवणी देयकांची जेष्टता डावलून दोन दोन वर्षापासून देयके निेकाली न काढणा-या  कर्मचा-यांची चौकशी करून कारवाई करावी व  राहिलेली सर्व पुरवणी व वैद्यकीय देयके तात्काळ काढण्यात यावीत*.


*7) शिक्षक कर्मचारी जमा कोट्यवधी कल्याण  निधी, व्याजासह वर्गणीदा शिक्षक कर्मचा-यांना व्याजासहीत परत मिळावी.*


*8) जिल्हा परिषद प्रशालेत अनेक वर्षापासून वर्ग 2 व 3 चे राजपत्रित मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत ,सदरील पदे तात्काळ भरण्यात यावीत.*


*9) जिल्हा व राज्यं पुरस्कार प्राप्तं  शिक्षकांना देय असलेली अतिरिक्त वेतनवाढ शासनस्तरावरून विनाअट देण्यात यावी.4सप्टेबर 2018 चा शासन आदेश दुरूस्तं करून प्रत्येक वर्षीच्या जिल्हा पुरस्कार व राज्यं पुरस्कार पाप्तं शिक्षकांना अतिरिक्तं  वेतनवाढी मुजुर कराव्यात*


*10) सर्व शिक्षकांना कॅशलेस विमा योजना लागू करावी.*


*11) शिक्षकांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ( 10:20:30 ) लागू करावी.*


*12) वरिष्टं व निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणा-या शिक्षकांना वेतनश्रेणीचा तात्काळ तीन महिन्यात लाभ देण्यात यावा.*


*13) शिक्षकांना मुख्यालयी निवासाची व्यवस्था नसल्यामुळे व पाल्याना उच्च शिक्षण सोय नसल्याने  मुख्यालयी राहूण्याच्या अटीतुन सुट देण्यात यावी.*


 *14)शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या नावाखाली वेगवेगळया संस्थाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातुन गोंधळ निर्माण करू नये.अनाठायी टपाल कामे व उपक्रम बंद करावे*


*15) मागील काही काळापासून प्रशासन नियमीतपणे  ऑनलाईन विविध प्रकारची माहिती मुख्याध्यापक,शिक्षकांकडून मागवत असते.सदरील माहितीमुळे विदयार्थ्याना अध्यापन करण्याचा महत्वाचा वेळ वाया जातो.त्यामुळे विदयार्थ्याच्या प्रगतीवर व  शालेय कामकाजावर याचा परिणाम होतो.शिक्षकांना शिक्षणहक्क कायदयान्वये अध्यापनाचे काम करू दयावे*


*16) राज्यातील बहूतांश शाळांची वीज जोडणी बिल अदा न केल्यामुळै तोडण्यात आली आहे.वीज बिलासाठी पुरेसे अनुदान उपलब्धं करून दयावे.*


*17)प्रत्येक केद्रशाळेस संगणक तज्ञ्ज्ञ व शिपाई ,लिपीकांची नियुक्ती करावी.*


*18) बी एल ओ व इतर सर्व प्रकारची अशैक्षणीक कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत.*


*19) सातव्या वेतन आयोगाचे दुसरा व तिसरा हप्ता तात्काळ अदा करावा.*

 

*20)पाचवीचा वर्ग उच्च प्राथमिक शाळेला जोडून तीन वर्गास पदवीधर शिक्षक असावे*.

*सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर श्रेणी लागू करावी.*


*21) एक ते सात वर्गाच्या शाळेस विनाअट मुख्याध्यापक पद मान्य करण्यात यावे.*


*22) कला ,कार्यानुभव, संगीत या विषयासाठी आंतरवासिता शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी.*


*23 ) पंचवीस वर्षांपूर्वी निर्माण झालेली केंद्र शाळांची पुनर्रचना करून नव्याने  दहा शाळांसाठी एक केंद्र निर्माण करण्यात यावे.*


*24) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना वर्ग खोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या.*


*25) नव्याने अवघड क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांतील पात्र शिक्षकांना बदली प्रक्रियेत सामावून घ्यावे.*


*26) वेतनातील अशासकीय कपाती (एलआयसी, पतसंस्था) आदींचे धनादेश मुख्याध्यापकांना तात्काळ देण्यात यावे*


*27) दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक तंत्रज्ञान तात्काळ उपलब्ध करून द्यावे* .


*28)  सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बिंदू नामावली तयार करून सेवा जेष्ठता यादी तयार करावी व 4 टक्के नुसार पदोन्नती करण्यात यावी.*


 *29)  मुळसेवापुस्तिका अद्ययावत व पडताळणी साठी तालुका स्थरावर कॅम्प लावावेत,व सर्व नोंदी अद्ययावत कराव्यात.सेवापुस्तिकांची पडताळणी करण्यात यावी.*    

      

*30)  अनुदानित शाळेतील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकाप्रमाणे जि प च्या शिक्षकांनाही अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मंजुर करणे.*


*31) विद्यार्थी संख्या अभावी बंद पडलेल्या शाळातील शिक्षकांचे बदल्यांपूर्वी समायोजन करा.*


*32) सातव्या आयोगाचा खंड दोन प्रकाशित करून वेतन त्रुटी दूर करा.*


🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


    *शिक्षक संघटना समन्वय समिती*

               *जिल्हा औरंगाबाद*


✊🏻👊🏻✊🏻👊🏻✊🏻✊🏻💪🏻👊🏻✊🏻👊🏻

एम.पी. एस. सी मार्फत नौकरीची संधी

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य राज्य सेवा भरती लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.



यासाठीची अधिसूचना  जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, फर्मचे सहायक निबंधक, तालुका क्रीडा अधिकारी, संचालक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. 

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ तांत्रिक अधिकारी,  फर्मचे सहायक निबंधक, तालुका क्रीडा अधिकारी, संचालक 

 एकूण जागा - 21 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 


कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer, Directorate of Insurance) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

फर्मचे सहायक निबंधक   - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायदा पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

तालुका क्रीडा अधिकारी  - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीसह बीपीएड पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

संचालक  - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

 उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 

 कागदपत्रं आवश्यक -

  बायोडेटा दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला  ओळखपत्र  पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022

JOB TITLEMPSC General State Services Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ तांत्रिक अधिकारी (Junior Technical Officer, Directorate of Insurance) फर्मचे सहायक निबंधक (Assistant Registrar of Firms) तालुका क्रीडा अधिकारी (Taluka Sports Officer) संचालक (Director, Directorate of Forensic Science Laboratory) एकूण जागा - 21
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Law/ Commerce/ Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. फर्मचे सहायक निबंधक (Assistant Registrar of Firms) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तालुका क्रीडा अधिकारी (Taluka Sports Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree in Arts, Science, Commerce or law with a Bachelor of Physical Education पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. संचालक (Director, Directorate of Forensic Science Laboratory) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Master's Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख22 ऑगस्ट 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 01 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 02 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 03 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 04 महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.