डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

जिल्हातंर्गत टप्पा क्र ३

 जिल्हाअंतर्गत बदली मधील टप्पा क्रमांक तीन बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या याबाबत मार्गदर्शनपर व्हिडिओ दिलेला आहे. अपडेट राहण्यासाठी डिजिटल समूह वेबसाईटला भेट देत रहा....



प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' या पदाला राज्य सरकारनची मान्यता

 उच्च शिक्षणात औद्योगिक क्षेत्राच्या गरजा ओळखून नियमित शिक्षणात व्यवसाय शिक्षण अंतर्भूत करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' या पदाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या धोरणाची अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.



आयोगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीच्या अनुषंगाने 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस'संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय संस्थांमधील प्राध्यापकांच्या मंजूर पदांच्या १० टक्क्यांच्या प्रमाणात 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस' यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 त्यानुसार, अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र, साहित्य, ग्रामीण विकास, सेंद्रिय शेती, न्यायिक व्यवसाय, प्रसारमाध्यम, उद्योग आदी क्षेत्रात किमान पंधरा वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीची प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदासाठी नियुक्ती करता येणार आहे.


बदली अर्ज भरण्यापुर्वी ही माहिती पहा....

या पदासाठी संस्थेद्वारे वृत्तपत्रात जाहिरात देऊन निवड प्रक्रिया राबवली जाईल. संस्थेतील दोन वरिष्ठ प्राध्यापक आणि संस्थेबाहेरील एक तज्ज्ञ यांची समिती निवडीसाठी शिफारस करेल. त्यानंतर संस्थेतील प्रशासकीय परिषद, कार्यकारी परिषद किंवा वैधानिक समिती निवडीबाबत निर्णय घेईल. नियुक्त प्राध्यापकाला तिसऱ्या आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना किमान एक विषय शिकविणे बंधनकारक राहणार आहे. या नियुक्त प्राध्यापकांचा कार्यकाळ सुरवातीला एक वर्षासाठी राहील. त्यानंतर मूल्यमापनाद्वारे जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी मुदतवाढ देता येईल, असे स्पष्ट धोरणात स्पष्ट केले आहे.

या पदावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांची नियुक्ती संस्थांनी स्वत:च्या निधीतून, मानधन तत्त्वावर किंवा उद्योगांकडून प्रायोजित निधीतून अशा प्रकारातून करावी लागणार आहे. यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेशात स्पष्ट केले आहे.

अहमदनगर मध्ये शिक्षकावर प्राणघातक हल्ला

 *प्राथमिक शिक्षकावर प्राणघातक हल्ला*                                                     **********जि प प्राथमिक शाळा धारवाडी ता अकोले येथील कार्यरत शिक्षक श्री-नजन भाऊसाहेब यांच्यावर गावातील एका माथेफिरूने बियरच्या रिकाम्या बाटलीने डोक्यात प्राणघातक हल्ला केला.सदर शिक्षक रक्तबंबाळ अवस्थेत पंचायत समिती अकोले येथे काल संध्याकाळी आले. त्यांना तात्काळ विस्तार अधिकारी जालिंदर खताळ व बाळासाहेब दोरगे यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी आणले. त्यानंतर खताळ साहेबांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व तात्काळ पोलिस स्टेशनमध्ये राजेंद्र सदगीर, आण्णासाहेब आभाळे, बाळासाहेब आरोटे, नितिन नेहे, मारूती बांगर, बाळासाहेब गंभिरे,बाळु बेणके,भांडकोळी सर आदि पदाधिकारी पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित झाले. पोलिस निरीक्षक मिथुन घुगे साहेब यांच्याशी चर्चा करुन तात्काळ आरोपीला 353 कलमान्वये अटक करावी अशी मागणी केली. त्यांनी ती तात्काळ मान्य केली.🤝 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝       

                                     त्यानंतर अकोले तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत साहेब हेही गुन्हा दाखल करण्यासाठी रितसर शिक्षण विभागाचे परवानगीपत्र घेऊन उपस्थित झाले. नंतर सरांना  अकोले ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करून मेडीकल रिपोर्ट तयार करुन घेतला.नंतर पोलिस स्टेशनमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम चालू होते.353 कलमाअंतर्गत सदर इसमावर गुन्हा दाखल केला असुन पोलिस सकाळी अटक करण्यासाठी पोलिस पथक धारवाडी येथे रवाना झाले. सदर घटनेचा अकोले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतिने निषेध करण्यात येत आहे*