डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पेरिस्कोप.... दप्तरमुक्त शनिवार

 *दप्तर मुक्त शनिवार एक दिवस नवचैतन्याचा....*


पेरिस्कोप

विज्ञानाची गोडी लहानपणी लागावी तसेच शास्त्रज्ञ ओळख व नाविण्यपुर्ण अशा अनेक कृती शाळेत आयोजित करण्यात येतात. सन २०२२ चा अखेरचा शनिवार आनंददायी व ज्ञानवर्धक ठरला तो पेरिस्कोप च्या निर्मितीतून ... 




औरंगाबाद तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरूमखेडावाडी ही सतत नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी अग्रक्रमी आहे.

 यामध्ये शनिवार दप्तर मुक्त शाळांमध्ये अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग शाळेमध्ये घेतल्या जातात. मुलांना तंत्रज्ञानाची आवड लहानपणी लागावी यासाठी रोबोटिक्स कार निर्मिती, ड्रोन फ्लाईंग प्रात्यक्षिक , रोबोट प्रात्यक्षिक याचबरोबर  मातीकामात मूर्ती निर्मिती यामध्ये साच्यांचा वापर करून मूर्ती तयार करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना  आत्मसात करून दिल्या जात आहे . 

याचबरोबर मैदानी खेळाची विद्यार्थ्यांना आवड लागावी यासाठी कबड्डी खो-खो यासारख्या खेळांचा समावेश शनिवारच्या दिवसांमध्ये केला जात आहे. पुस्तकांचे वाचन , ज्ञानरचनावादी साहित्याचा वापर तसेच  याचबरोबर शाळेमध्ये *"आमचा नॉलेज झोन"* या अंतर्गत ऑलम्पिक मेडल विजेते परमवीर चक्र विजेते तसेच शास्त्रज्ञाची माहिती पुस्तकाच्या स्वरूपात, पोस्टर स्वरूपात  शालेय परिसरामध्ये करून देण्यात आलेली आहे . 

मुरूमखेडावाडी शाळा ही डोंगर भागात असून शाळेचा परिसर  सुंदर  बनतो तो शाळेच्या  ७५० पेक्षा जास्त झाडांनी, हिरवाईने नटलेली ही शाळा असून या परिसरातच विद्यार्थ्यांना या नॉलेज झोनचा व इतर उपक्रमांचा फायदा मिळत आहे. एक नाविन्यपूर्ण उपक्रमाची साथ सोबतच तंत्रज्ञानाची गोडी मुलांना लागत आहे .

शाळेतील शिक्षक प्रकाशसिंग राजपूत यांनी वेळोवेळी नवीन नवीन उपक्रम राबवत सहकारी शिक्षक दिलीप आढे यांचेही सहकार्य मिळवित शाळेमध्ये उपक्रम राबवलेले आहे .

शाळेतील पालक सभा ही शाळेच्या विकासापासूनच शाळेच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी असते सन २०१८ पासूनचा पालक सभेचा सहभाग शाळेच्या एकूणच वाढलेल्या प्रगतीमध्ये दिसून येत आहे.

करमाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बनकरसाहेब व सोनुने सर यांचे मार्गदर्शन नियमित असून या उपक्रमांना शिक्षणविस्तार अधिकारी श्री रमेश ठाकूर तथा गटशिक्षणाधिकारी थावरे मॕडम यांच्या नियमित शुभेच्छा व पाठबल लाभत आहे बरोबरच शिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री चव्हाणमॕडम यांच्या गेल्या २ वर्षात दोन भेटीही झालेल्या असून त्यांनी ही DFC उपक्रमाचे कौतुक केलेले आहे.

नविन गीत तळपता ज्वाला

 


🚩🚩 *तळपता ज्वाला*....🔥🔥


https://youtu.be/gxU0l_OgD7s


*छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेले हे शौर्यगीत कृपया जास्तीत जास्त शेअर करा....*



*विशेष आभार.*


*खा.डाॕ. अमोलजी कोल्हेसाहेब*


*गीतगायन व संगीत*

*सुभाष शिंदे*


*गीतलेखन*

*प्रकाशसिंग राजपूत*

📲 9960878457 



https://youtu.be/gxU0l_OgD7s

संवर्ग 2 चे फॉर्म भरणे

 जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेतला टप्पा क्र २ पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत फाॕर्म भरण्यासाठी vinsys तर्फे हा मार्गदर्शक व्हिडीओ टिम डिजिटल च्या वतीने मी प्रकाशसिंग राजपूत घेऊन आलो आहे.