डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

बदली सुधारित वेळापत्रक

 बदलीचे सुधारित वेळापत्रक नव्याने आज दि. ३१ जानेवारी २०२३ ला प्रकाशित झालेले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार सुधारित वेळापत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. सध्या बदलीपात्र शिक्षकांची सॉफ्टवेअरद्वारे बदलीप्रक्रिया चालविण्याकरिता दिनांक २७.१.२०२३ ते ३१.१.२०२३ (५ दिवस) हा टप्पा सुरु आहे. परंतु बदलीपात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्याने सॉफ्टवेअरसाठी बदली प्रक्रिया चालविण्याकरिता दिलेला ५ दिवसांचा अवधी कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संदर्भाधीन दिनांक २३.१.२०२३ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक असल्याचे म्हटलेले आहे .






बदली प्रक्रिया अपडेट

 📣📣📣📮📮📮📣📣📣

 *बदली पात्र प्रक्रिया.व पुढील अपडेट*

                   🛑🛑🛑

✳️ *बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया (Eligible Round-1) 31 जानेवारी रोजी पूर्ण होईल.*



➡️ *बदली झालेल्या शिक्षकांची यादी,विस्थापित झालेल्या शिक्षकांची यादी आणि सुधारित रिक्त पदांची यादी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी EO/CEO लॉगिनला उपलब्ध होईल.*

➡️ *या याद्या प्रसिद्ध करताना प्रत्येक जिल्ह्याच्या कामकाजावर अवलंबून आहेत जे जिल्हे काम पूर्ण करतील ते याद्या प्रसिद्ध करतील आणि ज्या जिल्ह्यांचे काम पूर्ण होणार नाही असे जिल्हे एक ते दोन दिवस रिक्त पदांच्या याद्या व बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास लागू शकतात*


✳️ *पुढील अपडेट*


 ➡️ *1 फेब्रुवारी 2023*


*जिल्हा निहाय रिक्त पदांच्या याद्या प्रकाशित करणे*


*जिल्हा निहाय  विस्थापित  शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणै*


*जिल्हा निहाय बदली झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे*


➡️ *2 फेब्रुवारी 23 ते 7 फेब्रुवारी 23*


*बदली पात्र टप्प्यामधील विस्थापित शिक्षकांना पसंती क्रम भरणे*

➡️ *8 फेब्रुवारी 23 ते 12 फेब्रुवारी 23*


*विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया चालविणे*


➡️ *या वरील बदली प्रक्रियेतील राऊंडमध्ये बदली पात्र शिक्षकांमधून जे शिक्षक विस्थापित झाले अर्थातच त्यांच्या पसंती क्रमानुसार शाळा मिळाल्या नाहीत असे शिक्षक विस्थापित झालेले असतील अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागेल*


 ➡️ *तसेच ज्या शिक्षकांनी एक युनिट मधून लाभ घेतलेला आहे परंतु त्यांचे जोडीदार शिक्षक बदली पात्र नव्हते  अशा शिक्षकांचा समावेश या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही कारण ते बदली पात्र नव्हते त्यांना फक्त एक युनिटमध्ये जागा मिळू शकणार होत्या परंतु त्यांना जर शाळा मिळाल्या नसतील तर ते शिक्षक आहेत  त्या शाळेवर राहतील*


➡️ *तसेच दोन बदली पात्र शिक्षकांनी एक युनिट म्हणून अर्ज केलेला असेल तर त्या दोघांच्याही बदल्या झालेल्या असतील तर अशा शिक्षकांना पसंती क्रम भरावा लागणार नाही* 


➡️ *किंवा त्या एक युनिट मधील ज्या शिक्षकाने अर्ज केलेला असेल त्या शिक्षकाची बदली झालेली असेल व त्यांचा बदली पात्र जोडीदार विस्थापित झालेला असेल तर अशा जोडीदाराला या टप्प्यामध्ये पसंती क्रम भरावा लागेल* 


➡️ *किंवा एक युनिट मधील दोन्हीही पती-पत्नी शिक्षक विस्थापित झालेले असतील तर अशा शिक्षकांना पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये पसंती क्रम द्यावा लागेल*


➡️ *या प्रक्रियेमध्ये बदली पात्र शिक्षकांमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांचा समावेश होईल इतर विस्थापित शिक्षकांचा समावेश होणार नाही*


*🙏🏻सस्नेह धन्यवाद🙏🏻*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

डिजिटल द्विभाषिक परिपाठ

डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र 

द्विभाषिक परिपाठ


 चला सोपा करूया परिपाठ...


*संकल्पना व लेखक*

*सौ रोहिणी पिंपरखेडकर-विद्यासागर*

मोबाईल नंबर 9130958046



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख - २७ जानेवारी २०२३

वार- शुक्रवार

तिथी-माघ शुक्ल ६ शके १९४४

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " रज्जब" 


Today's almanac

 Date - 27 January 2023

 Friday

 Tithi-Magh shukla 06

 Shaka 1944 

 Ayana-Uttarayana

 Ritu - Shishir Ritu


"Rajjab" month of Muslims 


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सूर्योदय: सकाळी ७.०५

सूर्यास्त: सायं. ६.१७

 दिवस कालावधी ११ तास १२मिनिट १६ सेकंद


चंद्रोदय: ११.१२(सकाळी)

चंद्रास्त: २३.५७(संध्याकाळी)

आकार  चंद्रकोर(३२.२%)

प्रदीपन ३८.३%


आजचा चंद्र क्षितिजा खाली असेल.


Sunrise: 7.05 am

 Sunset: Evening  6.17,


Day duration 11 hours 12 minutes 16 seconds


 Moonrise: 11.12(am)

 Moonset: 23.57 (Evening) 

Waxing Crescent(32.2%)

 Illumination 38.3%


 Today's moon will be below the horizon.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सुविचार

*बहाणे बंद करून परिवर्तनाची सुरवात करणेच परिपक्वता होय. एकविसाव्यां शतकात स्थैर्य शोधू नका, सतत शिकत रहा.*

*- युवाल नोआ हरारी*


Good Thought


 *Maturity is about stopping the excuses and starting the transformation.  Don't settle for stability in the 21st century, keep learning*

 *- Yuval Noah Harari*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.


१९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख यांचा जन्म(मृत्यू: १० ऑगस्ट १९८६)


२००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन(जन्म: ४ डिसेंबर १९१०)


special day

 1967: Maharashtra State Textbook Production and Curriculum Research Board was established.  Now is known as 'Balabharati'.


 1926: General Arun Kumar Vaidya – 13th Army Chief of India born (died: 10 August 1986)


 2009: R.  Venkataraman – 8th President of India, Union Minister, Jurist, Freedom Fighter Died (Born: 4 December 1910)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ


एकाच माळेचे मणी - सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.


Proverb with its meaning


Beads of the same necklace - all people are of the same nature.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे


 मी उडू शकतो पण मला पंख नाहीत, मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत, मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो, ओळखा पाहू मी कोण?

उत्तर : ढग


puzzle


  I can fly but I have no wings, I can cry but I have no eyes, darkness follows me wherever I go, guess who I am?

 Answer: Clouds


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान

1 बालभारती ची स्थापना केव्हा झाली?

उत्तर 27 जानेवारी 1967


2 राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर 25 जानेवारी


3 भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?

उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद.


4) हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे?

उत्तर:- उत्तरेला


5) भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?

उत्तर:- अरबी समुद्र

general knowledge

 1 When was Balbharti established?

 Answer:- January 27, 1967


 2 National Voter's Day is celebrated on which day?

 Answer:- January 25


 3 Who was the first President of India?

 Answer:- Dr. Rajendra Prasad.


 4) In which direction of India are the Himalayas?

 Answer:- North


 5) Which sea is west of India?

 Answer:- Arabian sea


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बोधकथा

एकदा कबुतरांनी गरुडाला घाबरून आपले संरक्षण करण्यासाठी एका घारीला आपल्या कळपाचे प्रमुख म्हणुन नेमले. 

घारीने याचा फायदा घेतला. एक एक कबुतराला आपल्याला भेटण्याचा आदेश देऊन ती त्यांना मारून खात असे. 


गरुडापेक्षा जास्त कबुतरांना त्या घारीने मारले. 


कबुतराला हे लक्षात आले तेव्हा त्यांना पश्चाताप झाला, पण आता फार उशीर झाला होता. 


“रोगापेक्षा इलाज भयंकर”


Once the pigeons were afraid of the eagle and appointed a black kite as the head of their flock to protect them.


  Black kite took advantage of this.  She used to order the pigeons to meet her one by one and kill them and eat them.


 That bird killed more pigeons than eagles.


 When the pigeon realized this, he regretted it, but it was too late.


 “The cure is worse than the disease”


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

English words

Names of colours


Yellow  यलो   पिवळा


Orange    ऑरेंज    केसरी


Pink        पिंक     गुलाबी


Purple    पर्पल     बैंगनी


Indigo     इंडिगो      जांभळा


विद्यार्थ्यांना एक एका रंगाबद्दल जास्तीत जास्त वाक्य बोलायला सांगता येईल.

जसे

Rose is pink

Lips are pink

I have pink pen

I have pink saree.

Do you like pink colour?

etc.