डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

केंद्रप्रमुख(cluster head) विभागीय भरती 2023 #clusterhead, #jobs,

केंद्रप्रमुख विभागीय भरती 2023


केंद्र प्रमुख (cluster head) विभागीय भरती(jobs) परीक्षेसाठीची नवीन अर्हता व अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना आणि केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी*

       जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी 1994 मध्ये केंद्र प्रमुखाचे पद निर्माण करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांवरील नियंत्रणाकरिता केंद्रप्रमुख पद असते. 



केंद्र प्रमुखांची (cluster head) जवळजवळ 70 टक्के रिक्त पदे असून ती लवकरच भरली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात रिक्त पदे  भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक यांनी पत्राद्वारे सर्व जिल्हा परिषदांकडून रिक्त पदांची माहिती मागवली आहे. 

         1 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुख रिक्त पदे 50 टक्के पदोन्नती व 50 टक्के विभागीय परीक्षेने भरली जाणार आहेत. केंद्रप्रमुख विभागीय परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर सोपवली आहे.


केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा नवीन अर्हता -

 (महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक: ०९ मार्च, २०२३)*

       विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 

            किंवा

प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी

धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा(शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. 


केंद्रप्रमुख(cluster head) वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन - 4400*

        

केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण,तयारीचे स्वरूप व संदर्भ पुस्तके

        केंद्र प्रमुख रिक्त पदे स्पर्धा परीक्षेने भरण्यासाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय 1 डिसेंबर 2022 द्वारे सुधारित व अद्ययावत करण्यात आला असून तो केंद्र प्रमुख पदाच्या कामकाजाशी सुसंगत करण्यात आला आहे.या पदासाठी 200 गुणांची परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.

        पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातून होणार आहे.

         पेपर क्रमांक एक मध्ये  बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.

        पेपर क्रमांक दोन मध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत.

         केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.


 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता

        बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

सदरील पुस्तक फोटो केवळ मार्गदर्शकपर पब्लिश आहे. कुठलीही जाहिरात नाही .


■ केंद्रप्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ

1. केंद्र प्रमुख(cluster head) परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण मार्गदर्शक - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (दुसरी आवृत्ती)

2. केंद्र प्रमुख परीक्षा बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटक पेपर एक संपूर्ण तयारी - के सागर (चौथी आवृत्ती)

3.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)

4. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)

        तसेच पेपर एकमधील बुद्धिमत्ता चाचणी व गणितासाठी स्वतंत्रपणे के सागर,नितीन महाले,शांताराम अहिरे,सतीश वसे यांची पुस्तके अभ्यासता येतील.

       यामधील शिक्षक अभियोग्यतेशी संबधित कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व घटकांवर उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात.या घटकाच्या तयारीसाठी डॉ शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचे  पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.

         मराठी भाषिक क्षमतेसाठी  के'सागर,बाळासाहेब शिंदे,डॉ.आशालता गुट्टे  यांची पुस्तके अभ्यासावीत.

        इंग्रजी भाषिक क्षमतेसाठी के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे यांची पुस्तके अभ्यासता येतील.


 ■ पेपर क्रमांक दोन- शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह*

       यामध्ये शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.प्रस्तुत पेपर अभ्यासक्रम पूर्णतः नवीन व केंद्र प्रमुख कामकाजाशी निगडित आहे.


▪️ पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह* 


★भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण

★शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण

★माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण

★अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण

★माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण

★वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण

★संप्रेषण कौशल्य  - 15 गुण


    एकूण - 100 गुण


     केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ


१.केंद्रप्रमुख(cluster head) परीक्षा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (अत्यंत उपयुक्त संदर्भाची दुसरी आवृत्ती)*

         सदर पुस्तकातून पेपर दोनमध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 

       तसेच केंद्र प्रमुख परीक्षा पेपर दोनच्या अभ्यासक्रमाची तयारी करण्यासाठी पुढील पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.

1.शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र- डॉ.ह.ना.जगताप,नित्यनूतन प्रकाशन (पाचवी आवृत्ती)

2.शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.

        केंद्र प्रमुख पेपर क्रमांक एक व दोनचा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक आहे.केंद्र प्रमुख परीक्षेची जाहिरात शासन पातळीवरील हालचाली पाहता केंद्रप्रमुख जाहिरात लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे, तसेच ही पदे बऱ्याच वर्षांपासून रिक्त असल्याने लवकरच ती विभागीय परीक्षेद्वारे भरली जातील, तेव्हा केंद्रप्रमुख पदाचा व्यापक अभ्यासक्रम लक्षात घेऊन पात्र शिक्षकांनी सखोल अभ्यासाला त्वरित सुरवात करून परीक्षेतील आपले यश सुनिश्चित करावे.

            

Rte प्रवेश सोडत जाहीर #rte,

 Rte प्रवेश बाबत सोडत निघाली ...


शिक्षण हक्क कायदा म्हणजेच RTE च्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत निघाली आहे. या कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात आली.



२०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत निघाली. या सोडतीमध्येही पुणे जिल्ह्याने विक्रम केला.

राज्यातील शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाची सोडत जाहीर केली.याअंतर्गत प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त अर्ज आले आहेत. म्हणजे पुणे जिल्ह्यातील पाल्यांनी या योजनेचा सर्वाधिक लाभ घेतला. तर जागेपेक्षाही कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आहेत.आरटीई प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील प्रवेशासाठीची लॉटरी काढण्यात आलीय.

यंदा अर्ज संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. राज्यातील ८ हजार ८२८ शाळांमधील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी ३ लाख ६४ हजार ४७० पालकांनी आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज भरले होते. लॉटरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. आरटीई अंतर्गत आर्थिक आणि वंचित घटकांतील मुलांचे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे.


प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पहा...

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी रहिवाशी दाखला, जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला( खुल्या प्रवर्गासाठी), जन्माचा दाखला, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेअंतर्गत प्रवेश दिला जातो.

पुणे जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवली जाणार आहे.प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीमध्ये पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा,



सन 2023-24 चे शैक्षणिक वर्ष (शाळा) 12 जून पासून सुरु होणार...

 आता उन्हाळ्याच्या सुट्या  दि. 02 मे 2023 पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि, 11जून 2023 ग्राह्य धरावा. 

पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये दुसरा सोमवार, दि.12 जून, 2023 रोजी  जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सोमवार दि. 26 जून, 2023 रोजी सुरु होतील.

 इ.11 वी चा निकाल दि. 30 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यानंतरच्या कानावता तथापि, तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील


3. शाळांतून उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करून त्याएवेजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सताच प्रसंगी तो समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगी आवश्यक निदेश आपले स्तरावरून द्यावेत असे आदेशात नमूद केलेले आहे.


4. माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकुण 6 दिवस जास्त होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

 वरीलप्रमाणे शाळेच्या सुट्टी का काटेकोरपणे पालन करण्याबाबत सांगितलेले आहे.