डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक माॕकपोल व संपूर्ण प्रक्रिया |election mock poles|evm machine|

 Mock Pole / अभिरुप मतदान


मतदानाला सुरुवात करण्याच्या दिड तास अगोदर Mock Pole / अभिरुप मतदानाला सुरुवात करावी. जर मतदान प्रतिनिधी उपस्थित नसतील तर 15 मिनिटे वाट पहावी. केवळ 2 मतदान प्रतिनिधी उपस्थित असतील किंवा नसतील तरिही सकाळी 5.45 वाजता Mock Pole / अभिरुप मतदानाला सुरुवात करावी.
EVM ची जोडणी करा


BU3 ची केबल BU2 ला BU2 ची केबल 

BU1 ला  BU 1 ची केबल VVPAT ला-VVPAT ची केबल CU ला जोडा.


(VVpat, BU च्या डाव्या बाजूला ठेवा)

1 BU + VVPAT मतदान कक्षामध्ये व CU मतदान अधिकारी 3 च्या टेबलवर ठेवा VVPAT चा नॉब उभा (Vertical) करा 1 CU चा Switch On करा


BVC हा क्रम लक्षात ठेवा


Mock Pole / अभिरुप मतदान ला सुरुवात करा


सुरुवातीला VVPAT मध्ये निघालेल्या 7 Paper Slip असल्याची खात्री करा व त्या बाहेर काढा 1 CU वरील Clear बटण दाबा C-R-C करुन घ्या


1 Total बटण दाबून '0' मतांची खात्री करा व VVPAT मध्ये Paper Slip नसल्याचे म. प्रतिनिधींना दाखवा  BU वर म. प्रतिनिधींना सर्व उमेदवारांना समसमान मते देण्यास सांगा किमान 50 मते द्या 1 दिलेल्या मतांची मतदान अधिकाऱ्यांनी उमेदवार निहाय नोंद घ्यावी

 1 CU चे Close बटण दाबा 

 CU चे Result बटण दाबा 

1 VVPAT च्या ड्रॉप बॉक्स मधील स्लीप बाहेर काढा

 1 उमेदवारनिहाय स्लीप मोजणी करा


Mock Pole Result चा ताळमेळ घ्या


Paper Slip Count = CU Result Count = म. प्रतिनिधींनी केलेल्या मतदानाची उमेदवारनिहाय नोंदमतदान केंद्राध्यक्ष यांचे सोपे कार्य


Result Tally झाल्यावर Clear बटण दाबून CU मधील Mock Pole डेटा क्लीअर करा


पुन्हा Total बटण दाबून '0' मतांची खात्री करा व VVPAT च्या ड्रॉप बॉक्स मध्ये Paper Slip नसल्याचे उपस्थित मतदान प्रतिनिधीना दाखवा


CU चा Switch Off करा


CU मतदानाकरिता सील करा


हिरवी AB सील + स्पेशल टॅग अॅड्रेस टॅग गुलाबी पेपर सील यावर म.प्रतिनिधी / PRO यांनी सही करा

VVPAT च्या ड्रॉप बॉक्स अॅड्रेस टेंग ने सील करा


Mock Pole च्या वेळेस निघालेल्या सर्व पेपर स्लीप च्या मागे Mock Pole Slip असा शिक्का मारा

सर्व पेपर स्लीप तुम्हाला दिलेल्या काळ्या पाकिटात ठेवा. पाकीट गुलाबी सील ने सील करा

काळ्या पाकिटावर मतदान केंद्र नाव, क्रमांक, मतदानाचा दिनांक, म. प्रतिनिधी व PRO सही इ. तपशील भरा


Mock Pole प्रमाणपत्र अभिरुप मतदान प्रमाणपत्र अचूक तयार करा

जोडपत्र -5: केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 अभिरुप मतदान प्रमाणपत्र

CU चे Switch On करा व EVM मतदानाकरीता तयार व्हा

सर्व पेपर स्लीप तुम्हाला दिलेल्या काळ्या पाकिटात ठेवा. पाकीट गुलाबी सील ने सील करा काळ्या पाकिटावर मतदान केंद्र नाव, क्रमांक, मतदानाचा दिनांक, म. प्रतिनिधी व PRO सही इ. तपशील भरा

Mock Pole प्रमाणपत्र अभिरुप मतदान प्रमाणपत्र अचूक तयार करा


जोडपत्र -5: केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 अभिरुप मतदान प्रमाणपत्र

CU चे Switch On करा व EVM मतदानाकरीता तयार व्हा


सकाळी ठिक 7.00 वाजता मतदानाला प्रारंभ करा


सुरुवातिला भरायची विविध प्रमाणपत्रे


मतदारयादीला चिन्हांकीत प्रत म्हणून वापरण्यासंदर्भात प्रमाणपत्र तयार करा जोडपत्र- 4


मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र तयार करा जोडपत्र 6: भाग 1


मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी भरायला घ्या जोडपत्र 7


मतदान केंद्राध्यक्षांसाठी तपासणी ज्ञापन: जोडपत्र 10


मतदान प्रतिनिधी / कार्यमओचक प्रतिनिधी यांचे ये-जा नोंदपत्रक जोडपत्र 11
मतदान प्रतिनिधीला द्यायचा प्रवेश पत्राचा नमुना जोडपत्र 12
मतदान प्रतिनिधींना देण्यात आलेला प्रवेशपत्रांचा हिशोब जोडपत्र 13


मतदान केंद्राध्यक्ष याचे सोपे कार्य


मतदान पूर्ण झाल्यावर करायची कार्यवाही...


मतदान पूर्ण झाल्यावर


संध्याकाळी 06.00 नंतर रांगेतील शेवटच्या मतदाराने मतदान केल्यानंतर

CU मधील Total Button दाबून एकूण मतांच्या संख्येची नोंद करा

(17C मध्ये अनुक्रमांक 6 वर व केंद्राध्यक्षांची दैनंदिनी मध्ये अनुक्रमांक 10 (4) वर व इतर आवश्यक ठिकाणी)CU चे Close Button दाबा

जोडपत्र- 5 : मतदान केंद्राध्यक्षांचे अहवाल भाग 3 तयार करा

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर क्लोज CLOSE बटण दाबणे

मतदान संपल्यावर CU च्या डिसप्ले वरील Poll End Time याची नोंद घ्या

जोडपत्र 6: केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग 3 तयार करा

मतदान प्रक्रिया समाप्त होण्याच्या वेळी करायचे घोषणापत्र

CU चे Switch बंद करा

VVPAT चा नाँब आडवा (Horizontal) करा

BU व VVPAT ची केबल काढा

CU, BU व VVPAT Carrying Case मध्ये ठेवा


Carrying Case ला Address Tag ने Seal करा


जोडपत्र 6: केंद्राध्यक्षाद्वारे घोषणापत्र भाग 4 तयार करा


मतदानयंत्र मोहोरबंद केल्यानंतरचे घोषणापत्र

जोडपत्र 8: नमुना 17क: भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब बनवायला घ्या

जेवढे मतदान प्रतिनिधी असतील तेवढे 3 जादा 17क जोडपत्र बनवा

सर्व मतदान प्रतिनिधींना फॉर्म 17क द्या


आता निवडणूक कागदपत्रे पाकीटे मोहोरबंद करायला घ्या. दिल्याप्रमाणे 6 पाकिटे तयार करा.

आवश्यक ती पाकिटे मोहोरबंद करा बाकी तशीच ठेवा. केंद्रावर साहित्य पोहोच करा व घरी जा


मतदान केंद्राध्यक्ष यांचे सोपे कार्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: