डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच.

 MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. एमपीएससीने आपला नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येत आहे असे ट्विट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे. यंदाच्या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. परंतु विद्यार्थ्यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. हा आक्षेप विद्यार्थ्यांनी व्यक्तही करून दाखवला पण त्याला यश आले नाही.

अखेर या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून पुण्यात बालगंधर्व चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भांत विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. गुरुवारी अखेर या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला .

अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक होणार होती. परंतु ती रद्द झाली. त्यानंतर बैठक न घेता आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला. या निर्णयाची माहिती ट्विट करून दिली. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जी काही परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत आयोगासोबत चर्चा केली होती.

अवघड शाळेवर कोणते शिक्षक ठरले पात्र

MPSC च्या अभ्यासक्रमात कोणते मोठे बदल करण्यात आले आहेत?

  • आता MPSCची परीक्षा ही वर्णनात्मक असेल आणि यात एकूण 9 पेपर असतील.

  • त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे पेपर प्रत्येकी 300 गुणांचे असतील तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील.

    • याशिवाय मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील.

    • सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

    • सोबतच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल.


अवघड शाळेवर बदलीस कोण पात्र ठरले?

 अवघड क्षेत्रासाठी  पात्र शिक्षक  कोण ठरले?*


  जिल्ह्यातील एकुण सेवाजेष्ठता ग्राह्य धरुन 

१) खो बसला आहे परंतु  त्याना दोनही फेरीमध्ये शाळा मिळाली नाही आणि त्या  जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे त्यांचे नाव यादीमध्ये आले 





२) बदली पात्र आसताना प्रशासकीय अर्ज केला होता परंतु खो बसला नाही आणि पसंतीक्रमांतील शाळा मिळाली नाही  आणि त्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र असेल व त्यांच्या पदाची  अवघड मध्ये जागा रिक्त आसेल त्यांचे नाव यादीमध्ये आले 


३) ५३ + आहेत परंतु त्यानी ऑनलाइन ला *बदलीतुन सुट  नको*  असा पर्याय  दिला होता (म्हणजे बदली हवी असा पर्याय दिला होता ) म्हणुन  त्यांचे नाव यादीमध्ये आले 


३) ५३ + आहेत परंतु त्यानी ऑनलाइन ला बदलीसाठी बदली तुन सुट हवी असा पर्याय दिला नाही म्हणजे  नकार दिला नाही त्यांचे नाव यादीमध्ये आले 


४) इतर एकुण सेवाजेस्ठ शिक्षक त्यांचे नाव यादीमध्ये आले

पाच हजार ची लाच घेताना शिक्षण विभागातील महिला लेखाधिकाऱ्यासह एकजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना पुणे शिक्षण विभागातील महिला वरिष्ठ लेखाधिकाऱ्यासह कनिष्ठ लेखाधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले.   



ही कारवाई सोमवारी दि.20 फेब्रुवारीला केली. याप्रकरणी पुणे एसीबीने लष्कर पोलीस ठाण्यात  गुन्हा ही दाखल केला आहे.

वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला गिरी(वय-38), कनिष्ठ लेखाधिकारी अनिल श्रीधर लोंढे (वय-57) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. याबाबत एका शिक्षकाने पुणे एसीबीकडे  तक्रार केली आहे.

तक्रारदार हे शिक्षक असून त्यांच्या सेवा पुस्तकावर सहाव्या  व सातव्या वेतन आयोगानुसार  वेतन निश्चितीची पडताळणी करुन देण्यासाठी वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला गिरी यांनी 6 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असात प्रमिला गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
तर कनिष्ठ लेखाधिकारी अनिल लोंढे यांनी लाचेच्या मागणीला मदत केल्याचे निष्पन्न झाले.
यावरून पथकाने सोमवारी सापळा रचला.
प्रमिला गिरी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना अनिल लोंढे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.