डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पाच हजार ची लाच घेताना शिक्षण विभागातील महिला लेखाधिकाऱ्यासह एकजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

सेवा पुस्तकावर सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना पुणे शिक्षण विभागातील महिला वरिष्ठ लेखाधिकाऱ्यासह कनिष्ठ लेखाधिकाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  रंगेहाथ पकडले.   



ही कारवाई सोमवारी दि.20 फेब्रुवारीला केली. याप्रकरणी पुणे एसीबीने लष्कर पोलीस ठाण्यात  गुन्हा ही दाखल केला आहे.

वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला गिरी(वय-38), कनिष्ठ लेखाधिकारी अनिल श्रीधर लोंढे (वय-57) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. याबाबत एका शिक्षकाने पुणे एसीबीकडे  तक्रार केली आहे.

तक्रारदार हे शिक्षक असून त्यांच्या सेवा पुस्तकावर सहाव्या  व सातव्या वेतन आयोगानुसार  वेतन निश्चितीची पडताळणी करुन देण्यासाठी वरिष्ठ लेखाधिकारी प्रमिला गिरी यांनी 6 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असात प्रमिला गिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
तर कनिष्ठ लेखाधिकारी अनिल लोंढे यांनी लाचेच्या मागणीला मदत केल्याचे निष्पन्न झाले.
यावरून पथकाने सोमवारी सापळा रचला.
प्रमिला गिरी यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच घेताना अनिल लोंढे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: