डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

पुढील वर्षापासून 'सेलिब्रिटी स्कूल' सुरु होणार

  देशात नवीन शैक्षणिक धोरण आता राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेतून उच्च व तंत्र शिक्षणासह इतरही सर्व प्रकारचे शिक्षण घेता येणार आहे. यामुळे शाळांमध्ये पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांचा ओघ वाढणार आहे. मराठी मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



'सेलिब्रिटी स्कुल' सुरू करणार...


शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून 'सेलिब्रिटी स्कुल' सुरू करण्यात येणार आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ (सेलिब्रिटी) इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व आदी कला शिकवतील. त्यानंतर स्पर्धा घेवून पहिल्या १ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेले सेलिब्रिटी या १ हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देतील,

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 'इंद्रधनुष्य २०२३' हा कला आणि क्रीडा आविष्कारांचा सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळीतील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम येथे संपन्न झाला. या सोहळ्यात २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला आणि क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.


अवघड क्षेत्रातील बदली अर्ज

 जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतील पुढील टप्पा  म्हणजेच अवघड क्षेत्रात करावयाच्या बदल्यासाठी शिक्षकांनी जे फॉर्म भरायचे आहेत .

त्याबाबत आज विन्सिस तर्फे एक मार्गदर्शन पर व्हिडिओ पाठवण्यात आलेला आहे व अर्ज करण्याच्या पूर्वी हा व्हिडिओ निश्चित सर्वांनी पहा जेणेकरून पुढील प्रक्रियेत अडचणी येणार नाही.





महाराष्ट्रात लवकरच शिक्षक भरती

 

शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची  भरती होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती सभागृहात दिली.



राज्यातील पात्रता  धारक Ded शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होत नव्हती. परंतु, आता लवकरच राज्यात तीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात याबाबतची माहिती दिली.

आमदार राजेश एकडे आणि इतरांनी विधानसभेत काल यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 

0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध, शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या बेरोजगार तरुणांना वणवण भटकावे लागत आहे. सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे उपप्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना लेखी उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांची पदे भरती जातील अशी माहिती दिली.