डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शिक्षक दिनी आंदोलन #teachersday

 शिक्षकांना शिकवू द्या जिल्हा परिषद शाळा टिकू द्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षक दिनी  लक्षवेधी आंदोलन teachersday

         जिल्हा परिषद शिक्षकांना कायमच असणारी अशैक्षणिक कामे, विविध सर्व्हे, ऑनलाईन माहिती, परीक्षेचा भडिमार, बी एल ओ ची कामे अशी विविध अशैक्षणिक कामे बंद करून "शिक्षकांना शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकवू द्या!"असे लक्षवेधी बॅच लावून  उद्या शिक्षक दिनी शिक्षकांनी काम करावे असे आवाहन शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





         शिक्षक दिनानिमित्त देशभर शिक्षकांचा सन्मान होत असताना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शाळा सध्या बदनाम करण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून शिक्षकांना अशी  अशैक्षणिक काम लादून ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप समन्वय समिती च्या वतीने करण्यात आला आहे. शिक्षकांना वेगवेगळी उपद्रवी उपक्रमामुळे व मागितल्या जाणाऱ्या माहितीमुळे संपूर्ण शिक्षक त्रस्त झाले आहे.

           याचा निषेध म्हणून औरंगाबाद जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने एकत्र येऊन शासनापर्यंत रोष व्यक्त होण्यासाठी व आपल्या भावना पोहोचवण्यासाठी सर्वांनी शिक्षक दिनी "आम्हाला शिकवू द्या, जिल्हा परिषद शाळा टिकू द्या" अशा आशयाचे घोषवाक्याचे टॅग लावून शिक्षक काम करणार असल्याचे शिक्षक समन्वय समिती तर्फे आवहान करण्यात आले आहे.

'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?

 'आदर्श शिक्षक पुरस्कार' म्हणजे भीक लागली की खैरात?


श्याम नाडेकर यांच्या लेखणीतून

(लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर )

 'तुम्हाला आम्ही पुरस्कार देतो, त्यासाठी तुम्हीच प्रस्ताव पाठवा', असे म्हणणे आणि प्रस्ताव पाठवल्यावरही 'छाटणी करून पुरस्कार देऊ', असा प्रकार करणे म्हणजे शिक्षकाचा आणि त्याच्या सेवेचा अपमानच नव्हे का? असाच काहीसा प्रकार 'आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या बाबतीत होत असल्याची चर्चा शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक वर्तुळात रंगायला लागली आहे.

शिक्षक दिनाच्या पर्वावर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. मात्र, यासाठी स्वतः शिक्षकांना स्वतःच्या कार्याचा गवगवा करणारे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करावे लागते.

केलेले अथवा करत असलेले उल्लेखनीय कार्य प्रखरतेने दिसत असताना, त्या कार्याची दखल स्वतः घेण्याऐवजी शिक्षकालाच स्वत:विषयी प्रस्ताव पाठवण्यास सांगणे, योग्य ठरते का? हा प्रकार म्हणजे, पुरस्कार भिकेमध्ये देण्यासारखे किंवा शासनाकडून खैरात वाटण्यासारखाच असल्याची खंत जिल्ह्यातील अनेक स्वाभिमानी शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

संपुर्ण लेख वाचा....




वृक्षांगण #कविता

 माझी निसर्ग व वृक्षसंपत्ती यावरील काव्यरचना व्हिडीओ स्वरूपात नक्कीच पहा...

गायन - श्रीमती ज्योती फड मॕडम 



🌴🌴🌳 *वृक्षांगण*🌳🌴🌴


हिरवी काया देई छाया,

असावं या भुमीवर,

हिरवाईने नटलेलं,

वृक्षांगण मनोहर,


साजे ही वृक्ष असोत,

कितीही आगळी वेगळी  ,

कर्म माञ एकच,

असेल जरी रुपे निराळी,


उभे राहती सोसुनी ,

ऊन ,वारा नी पाऊस,

करती सर्वच अर्पण ,

त्यागून सजीवसृष्टीस ,


सर्वत्र फुलवा हिरवी अंगणे,

माणसा तु सोड क्रूरता,

तोडूनी ही वृक्षसंपती,

निसर्गात होईल कमतरता ,


 वर्षानुवर्षे होत हा संहार,

 होईल हानी लाखमोल,

उत्पत्ती तुझी नाही विनाशा,

ठेव जाण वृक्ष लावूनी अनमोल,


  *प्रकाशसिंग राजपूत*

      छ. संभाजीनगर