डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत.


शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते. सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेंतर्गत तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शासनाने उक्त नमूद शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरु आहे.


शासन निर्णय संदर्भ २ अन्वये, नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांचे संकेतस्थळावरील प्रदर्शित केलेनुसार संबंधित महिन्याच्या सरासरी दरानुसार फरकाची रक्कम शाळांना उपलब्ध करुन देण्याकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.


१. नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटी यांनी माहे जानेवारी, २०२४ करीता संकेतस्थळावर प्रदर्शित केलेनुसार माहे जानेवारी, २०२४ करीता प्रति अंड्याचा दर रु. ६.००/- निश्चित करण्यात येत आहे.


२. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत योजनेस पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना

अंडी/केळी उपलब्ध करुन दिले असलेची खात्री संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी.


३. जानेवारी, २०२४ करीता निर्धारित केलेल्या एकूण ५ दिवशी सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देणे आवश्यक आहे. योजनेस पात्र शाळेमध्ये संबंधित महिन्यामध्ये निर्धारित केलेल्या एकूण ५ दिवशी विद्यार्थ्यांना अंडी केळी या पदार्थाचा लाभ दिल्याची खात्री मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. शाळा/ केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांनी लाभ दिलेला नसल्यास संबंधित शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था पुढील कारवाईस पात्र राहतील, याबाबत सर्व शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांना अवगत करुन देण्यात यावे.


४. माहे जानेवारी, २०२४ च्या पाच दिवसांकरीता द्यावयाच्या रकमेची परिगणना मुद्दा क्रमांक १ मध्ये नमूद केलेनुसार केंद्रीय स्वयंपकागृहाकरीता आवश्यक अनुदान आणि शाळांना वितरीत करावयाची फरकाची रक्कम याची परिगणना करुन त्यानुसार अनुदान मागणी संचालनालयाकडे नोंदविण्यात यावी.


५. शाळांना अग्रीम स्वरुपात रु.५.००/- याप्रमाणे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, सबब शाळांकरीता फरकाच्या रकमेची मागणीम रु. १.००/- यादराने करण्यात यावी आणि केंद्रीय स्वयंपाक्रगृह संस्थांकडील शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात आवश्यक अनुदान मागणी रु. ६.००/- याप्रमाणे माहे जानेवारी, २०२४ मधील पाच दिवसांकरीता करण्यात यावी.


६. शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या नियमित आहाराची माहिती एम.डी. एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. फरकाची रक्कम वितरण करतांना सर्व शाळा नियमितपणे एम. डी. एम पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदवित असल्याची खात्री तालुक्यामार्फत करुन घेण्यात यावी.


७. शाळांना अग्रीम स्वरुपामध्ये वितरीत केलेल्या अनुदानाची रक्कम व उक्त मुद्दा क्रमांक १ मध्ये नमूद केलेली रक्कम यामधील तफावत आणि प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थी संखेची परिगणना करुन फरक रकमेची मागणी संचालनालयास त्वरीत सादर करण्यात यावी.


८. प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी योजनेस पात्र सर्व शाळांमधून नियमितपणे होईल, याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी घ्यावयाची आहे.


शासन आदेश पहा...




शालेय परिपाठ दिवस 178

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस178वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२३फेब्रुवारी २०२४

वार- शुक्रवार

तिथी- माघ शु १३ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि ३ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024

सूर्योदय 07:03, 

खगोलीय दुपार: 12:52, 

सूर्यास्त: 18:42, 

दिवस कालावधी: 11:39, 

रात्र कालावधी: 12:21.

🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙

 सुविचार

मोत्याच्या हारापेक्षा

घामाच्या धारांनी मनुष्य

अधिक शोभून दिसतो.


Good Thought


Success is the sum of small efforts, repeated.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना


जयंती


१५६४- जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरचा जन्म


१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)


१९६५: अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू: २६ नोव्हेंबर२००८)


पुण्यतिथी

१७७७:  कार्ल फ्रेड्रिक गॉमस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकी, आर्किमिडीज आणि न्यूटन यांच्या तोडीचा गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स आणि नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषय त्यांचा मोठा अभ्यास होता. (जन्म:  ३० एप्रिल  १७७७)


special day

 1947: International Organization for Standardization (ISO) established


 Birth Anniversary


 1564- Birth of world famous playwright Shakespeare


 1876: Debuji Jhingraji Janorkar aka 'Sant Gadge Maharaj' - Seeing extreme ignorance, unsavory customs and superstitions, he took a vow of absolute service and effectively used the medium of Kirtana for it.  (Died: 20 December 1956)


 1965: Ashok Kamte – Police Commissioner martyred in Mumbai terrorist attack (died: 26 November 2008)


 death anniversary

 1777: Carl Friedrich Gaums – German mathematician and physicist, mathematician of Archimedes and Newton's division, elliptic functions and non-Euclidean geometry, etc.  The subject was his major study.  (Born: 30 April 1777)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ

आली चाळीशी करा एकादशी.

परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलणे.


Proverb with its meaning

A penny saved is a penny earned.


वाचवलेला एक पैसा म्हणजे कमावलेला पैसा.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे


दात आहेत पण चावत नाही,

गुंता होतो काळ्या शेतात,

सगळे माझ्यावर सोपवतात.

सांगा पाहू मी कोण?


⇒ उत्तर: कंगवा


 थांबून वाजते पण घड्याळ नाही,

बारीक लांब पण काठी नाही,

दोन तोंडची पण साप नाही,

श्वास घेते पण तुम्ही नाही?


⇒ उत्तर:  बासरी


Riddles

What has a Head and a Tail.But no body?

Ans coin

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

विनोद

शिक्षक:- मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बरं बाहेर       येते?

बंड्या:-सुई कोणी टोचली ते बघायला😄😄

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान कर्नाटक

01)कर्नाटक चा राज्य प्राणी --- हत्ती



02) कर्नाटक चे राज्य फुल --- कमळ



03) कर्नाटक चा राज्य वृक्ष --- चंदन 


04) कर्नाटकचे प्रमुख लोकनृत्य:- यक्षगान, कुनीता, करगा, लांबीन


05) कर्नाटकच्या प्रमुख नद्या:- कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा, सरस्वती, कालिंदी.



 General Knowledge Karnataka

 01) State Animal of Karnataka --- Elephant



 02) State Flower of Karnataka --- Lotus



 03) State Tree of Karnataka --- Sandalwood


 04) Major folk dances of Karnataka:- Yakshagana, Kunita, Karaga, Lambin


 05) Major rivers of Karnataka:- Kaveri, Krishna, Tungabhadra, Saraswati, Kalindi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जिल्हा परिषद लहान शाळा स्पर्धेबाहेर

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा...


लहान शाळेची झाली निराशा सर्व शाळेना समान निकष परिणाम स्वरूप छोटया शाळा ठरल्या अपयशी...

जणू ८ वी च्या मुलाची ४ थी मधील मुलासोबत धावण्याची स्पर्धा... 
कोण जिंकणार परिणाम आधीच.... 



 गेल्या महिन्यापासून राज्यभरात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये लहान शाळा  बाहेर पडल्या ,याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या शाळांना आणि लहान शाळांना समान निकषावर तपासणी झालेली आहे.
 त्याच्या परिणाम स्वरूप लहान शाळा यांची आर्थिक क्षमता उपक्रमातील विविधता तसेच विविध स्पर्धा स्वरूप यात अनेक मुद्दे लागू नसल्याने त्या मुद्याच्या गुणांना लहान शाळेना मुकावे लागले व झालेली कामे तसेच मुलांची असलेली स्पर्धा सहभाग यातील तफावत पहाता राज्यभरातील लहान शाळेना हा उपक्रम विषमता निर्माण करणारा ठरलेला आहे.
मुल्यांकन करताना देखील या शाळेंकडे पहाण्याचा दृष्टिकोन तसेच आंतरराष्ट्रीय शाळा तयारी करणाऱ्या एकूण शाळा याच विजयी ठरतील हे पुर्वग्रह असलेले मुल्यमापन हे राज्यभरात दिसून आलेले आहे. 

यापुढे जर अशी स्पर्धा होणार असेल तर निश्चितच शाळेंचा लहान गट व मोठा गट अशा स्वरूपात होणे फार महत्त्वाचे ठरेल.

आपणास याविषयी काय वाटते काॕमेंट करा....