डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्रच्या या वेबसाईटला अवश्य Follow करा....पोस्टवर काॕमेंट अवश्य करा....धन्यवाद

शालेय परिपाठ दिवस 178

 *चला सोपा करूया परिपाठ*

*दिवस178वा*



💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजचे पंचांग

तारीख -२३फेब्रुवारी २०२४

वार- शुक्रवार

तिथी- माघ शु १३ शके १९४५

अयन-उत्तरायण

ऋतू - शिशिर ऋतू

मुस्लिम धर्मियांचा महिना " शाबान" 

भारतीय सौर दि ३ फाल्गुन शके १९४५(हा दिनांक भारतीय सौर दिनदर्शिका जी भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे त्यानुसार आहे.

शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024

सूर्योदय 07:03, 

खगोलीय दुपार: 12:52, 

सूर्यास्त: 18:42, 

दिवस कालावधी: 11:39, 

रात्र कालावधी: 12:21.

🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙🌞🌙

 सुविचार

मोत्याच्या हारापेक्षा

घामाच्या धारांनी मनुष्य

अधिक शोभून दिसतो.


Good Thought


Success is the sum of small efforts, repeated.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दिनविशेष

१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना


जयंती


१५६४- जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरचा जन्म


१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)


१९६५: अशोक कामटे – मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर (मृत्यू: २६ नोव्हेंबर२००८)


पुण्यतिथी

१७७७:  कार्ल फ्रेड्रिक गॉमस – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकी, आर्किमिडीज आणि न्यूटन यांच्या तोडीचा गणितज्ञ, इलिप्टीक फंक्शन्स आणि नॉन युक्लिडियन जॉमेट्री इ. विषय त्यांचा मोठा अभ्यास होता. (जन्म:  ३० एप्रिल  १७७७)


special day

 1947: International Organization for Standardization (ISO) established


 Birth Anniversary


 1564- Birth of world famous playwright Shakespeare


 1876: Debuji Jhingraji Janorkar aka 'Sant Gadge Maharaj' - Seeing extreme ignorance, unsavory customs and superstitions, he took a vow of absolute service and effectively used the medium of Kirtana for it.  (Died: 20 December 1956)


 1965: Ashok Kamte – Police Commissioner martyred in Mumbai terrorist attack (died: 26 November 2008)


 death anniversary

 1777: Carl Friedrich Gaums – German mathematician and physicist, mathematician of Archimedes and Newton's division, elliptic functions and non-Euclidean geometry, etc.  The subject was his major study.  (Born: 30 April 1777)


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

आजची म्हण व अर्थ

आली चाळीशी करा एकादशी.

परिस्थितीनुसार आपल्या सवयी बदलणे.


Proverb with its meaning

A penny saved is a penny earned.


वाचवलेला एक पैसा म्हणजे कमावलेला पैसा.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोडे


दात आहेत पण चावत नाही,

गुंता होतो काळ्या शेतात,

सगळे माझ्यावर सोपवतात.

सांगा पाहू मी कोण?


⇒ उत्तर: कंगवा


 थांबून वाजते पण घड्याळ नाही,

बारीक लांब पण काठी नाही,

दोन तोंडची पण साप नाही,

श्वास घेते पण तुम्ही नाही?


⇒ उत्तर:  बासरी


Riddles

What has a Head and a Tail.But no body?

Ans coin

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

विनोद

शिक्षक:- मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बरं बाहेर       येते?

बंड्या:-सुई कोणी टोचली ते बघायला😄😄

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सामान्य ज्ञान कर्नाटक

01)कर्नाटक चा राज्य प्राणी --- हत्ती



02) कर्नाटक चे राज्य फुल --- कमळ



03) कर्नाटक चा राज्य वृक्ष --- चंदन 


04) कर्नाटकचे प्रमुख लोकनृत्य:- यक्षगान, कुनीता, करगा, लांबीन


05) कर्नाटकच्या प्रमुख नद्या:- कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा, सरस्वती, कालिंदी.



 General Knowledge Karnataka

 01) State Animal of Karnataka --- Elephant



 02) State Flower of Karnataka --- Lotus



 03) State Tree of Karnataka --- Sandalwood


 04) Major folk dances of Karnataka:- Yakshagana, Kunita, Karaga, Lambin


 05) Major rivers of Karnataka:- Kaveri, Krishna, Tungabhadra, Saraswati, Kalindi.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: