मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा...
लहान शाळेची झाली निराशा सर्व शाळेना समान निकष परिणाम स्वरूप छोटया शाळा ठरल्या अपयशी...
जणू ८ वी च्या मुलाची ४ थी मधील मुलासोबत धावण्याची स्पर्धा...
कोण जिंकणार परिणाम आधीच....
गेल्या महिन्यापासून राज्यभरात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये लहान शाळा बाहेर पडल्या ,याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या शाळांना आणि लहान शाळांना समान निकषावर तपासणी झालेली आहे.
त्याच्या परिणाम स्वरूप लहान शाळा यांची आर्थिक क्षमता उपक्रमातील विविधता तसेच विविध स्पर्धा स्वरूप यात अनेक मुद्दे लागू नसल्याने त्या मुद्याच्या गुणांना लहान शाळेना मुकावे लागले व झालेली कामे तसेच मुलांची असलेली स्पर्धा सहभाग यातील तफावत पहाता राज्यभरातील लहान शाळेना हा उपक्रम विषमता निर्माण करणारा ठरलेला आहे.
मुल्यांकन करताना देखील या शाळेंकडे पहाण्याचा दृष्टिकोन तसेच आंतरराष्ट्रीय शाळा तयारी करणाऱ्या एकूण शाळा याच विजयी ठरतील हे पुर्वग्रह असलेले मुल्यमापन हे राज्यभरात दिसून आलेले आहे.
यापुढे जर अशी स्पर्धा होणार असेल तर निश्चितच शाळेंचा लहान गट व मोठा गट अशा स्वरूपात होणे फार महत्त्वाचे ठरेल.
आपणास याविषयी काय वाटते काॕमेंट करा....
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा
याबाबत आपली काॕमेंट करा.